बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.
इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4
आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)
मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.
असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.
तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,
देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)
तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.
त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.
मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.
पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?
काशी स्पृहा जोशी आणि मस्तानी
काशी स्पृहा जोशी आणि मस्तानी अम्रुता खानविलकर
काशी अमृता सुभाष आणि मस्तानी
काशी अमृता सुभाष आणि मस्तानी मृण्मयी देश्पांडे(जानकी हा हा हा हा आ आ आ कुं कु..............)
काशी मुक्ता बर्वे आणि मस्तानी
काशी मुक्ता बर्वे आणि मस्तानी सोनली कुलकर्णी (नवी)
काशी विभावरी देशपांडे मस्तानी
काशी विभावरी देशपांडे मस्तानी सो कु नवी
मुक्ता बर्वे काशीबाई असेल तर
मुक्ता बर्वे काशीबाई असेल तर कोणीही मस्तानी असो. लक्ष जाणारच नाही तिच्याकडे. मुक्ताकडेच लक्ष केद्रित होईल. तिच जिंकुन घेईल.
नवी सो कु मला नाही आवडणार मस्तानी म्हणून.
क्रांती रेडेकर आणी सई
क्रांती रेडेकर आणी सई (दुन्यादारी वाली).
स्वजो(झबा) बाजीराव म्हुन.
पंत, मस्त खेळ काढलायत.
पंत, मस्त खेळ काढलायत.
निधी
निधी
क्रांती रेडेकर आणी सई
क्रांती रेडेकर आणी सई (दुन्यादारी वाली).
स्वजो(झबा) बाजीराव म्हुन.>>>>>:हहगलो: आईग!
स्वजो(झबा) बाजीराव म्हुन.>>>>
स्वजो(झबा) बाजीराव म्हुन.>>>> हे वाचलं नव्हतं. उठाले रे बाबा.
ऐश किंवा कॅट दोघी
ऐश किंवा कॅट दोघी कुपोषणग्रस्त दिसतात.
>>
ऐशचे सोडा, जुन्या हिरोईनींची चर्चा नको, पण कॅट कुठल्या अँगलने कुपोषणग्रस्त वाटते हे समजू शकेल का?
तिच्या अभिनयाच्या मर्यादा आहेत म्हणून तिला अशी भुमिका मिळू शकत नाही, मात्र तिच्यापेक्षा सुंदर अभिनेत्री गेल्या वीस वर्षात तरी झाली होती का हो.... अगदीच चाळीस नाही म्हणत कारण मला मधुबाला विरुद्ध कतरीना असा वाद तुर्तास तरी नकोय.
ऐशचे सोडा, जुन्या हिरोईनींची
ऐशचे सोडा, जुन्या हिरोईनींची चर्चा नको, पण कॅट कुठल्या अँगलने कुपोषणग्रस्त वाटते हे समजू शकेल का?>>
सगळ्याच अँगलने. तपशील विचारु नका. लोक बघत आहेत ही चर्चा
कॅट लाल भारतीय ट्रेडीशनल
कॅट लाल भारतीय ट्रेडीशनल पोशाखात खूप सुंदर दिसते. ती एक आहे जी भारतीय आणि वेस्टर्न कपडे तितक्याच सुंदरतेने कॅरी करते आणि चांगली दिसते.
(सध्या वेट लॉस केला असावा, पण धूम ३ आणि जिनामिदो मधली कॅट छान सुदृढ होती असे आठवते. जिनामिदो मध्ये तिच्या एन्ट्रिच्या सीन मध्ये तो फुलांचा फ्रॉक किती छान दिसलाय तिला.)
ती मांजर अजिबात भारतीय वाटत
ती मांजर अजिबात भारतीय वाटत नाही
बाजीरावाच्या रोलसाठी राकट
बाजीरावाच्या रोलसाठी राकट अभिनेता हवा. पूर्वीच्या नाना सारखा. रणवीर नकोच होता.
मराठीत मिलिंद गुणाजी एखादं वेळी चालेल पण स्वजो नको. डॅनिएल क्रेगची मराठी आवृत्ती नाही का ?
ऐश किंवा कॅट दोघी
ऐश किंवा कॅट दोघी कुपोषणग्रस्त दिसतात.
>>
निषेध!
काशीबाईसाठी स्पृहा जोशी आणि
काशीबाईसाठी स्पृहा जोशी आणि मस्तानीसाठी सोनाली कुलकर्णी (नवीन)!
(तसे पाहिले तर माधुरी दीक्षित आणि सोनाली बेंद्रे शोभल्या असत्या पण असो )
बाकी बाजीरावासाठी २ तास घोडा पळवू शकेल आणि एका दमात १०० तरी जोर बैठका घालणारा आणि अभिनय करणारा गडी चालून जाईल.
ऐश किंवा कॅट दोघी
ऐश किंवा कॅट दोघी कुपोषणग्रस्त दिसतात.
>>
निषेध!
>>>>
दोघी मस्त स्लिम, ट्रिम, हेल्दी दिसतात
कल्पना करा.. जान्व्हवीचे बाबा
कल्पना करा..
जान्व्हवीचे बाबा बाजीरावाच्या भूमिकेत.
पाठीवर ढाल तलवार, घोडा उधळलेला , नजरेत अंगार , वायुवेगाने दौडत चाललेला बाजीराव पेशवा अचानक ब्रेक्स लावतो आणि म्हणतो
सगळं वाट्टोळं केलं या बाईने माझं.. कला, आता आपण एका छताखाली नाही राहू शकणार !
(No subject)
.
:हहगलो:.
कापोचे - आत्ता समोर तीच
कापोचे - आत्ता समोर तीच सिरीयल सुरू आहे व यांचाच सीन सुरू आहे, त्यामुळे थेट पोहोचली ही कॉमेण्ट
हे राम! असं म्हणून बाजीराव
हे राम! असं म्हणून बाजीराव परत गेले.
आणि जान्हवी मस्तानी
आणि जान्हवी मस्तानी म्हणून....
काहीही हा राऊ....
जान्हवीचे बाबा:
जान्हवीचे बाबा: बाजीराव
कलाबाई: काशीबाई
बेबीआत्या: मस्तानी (छान गोरीगोमटी आहे की!)
नवीन डायलॉगः
काशीबाई (शनिवारवाड्यात सगळ्यांसमोर कांगावा करत): अरे देवा मला उचलून का नेत नाहीस. हे बघण्यापेक्षा विष घेऊन मरते कशी! तुम्ही शाहूमहाराजांना आणि सगळ्यांना सांगा मस्तानी आणि हे याला जबाबदार आहेत ते! चांगली कोठडी दाखवू देत मग यांना!
मस्तानी: हे काय बोलणं झालं? कसं बोलायचं तेही माहिती नाही पेशवीणबाईंना!
बाजीरावः काशी तू गप्प बस!!!!
(No subject)
अरे हे काय चालू आहे
अरे हे काय चालू आहे
अरे हे काय चालू आहे>>
अरे हे काय चालू आहे>> टाईमपास.
ऋन्म्या तु गप्प बस. .......
ऋन्म्या तु गप्प बस. .......:D
काशी तू गप्प बैस. अरे देवा!
काशी तू गप्प बैस.:हहगलो: अरे देवा! चीकू कमाल केली.:हहगलो:
वरचे डॉयलॉग अगदी या कलाकारान्च्या आवाजात इमॅजीन केले.:फिदी: पण मस्तानीचा आवाज चुकून सुप्रिया पाठारे उर्फ मोठी आईचा वाटला.:फिदी:
Pages