बाजीराव मस्तानी - पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2015 - 15:19

बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.

इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4

आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)

मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.

असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.

तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,

देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्‍यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)

तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.

त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.

मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.

पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्र्यस्थपणे बघता बाजिराव-मस्तानी हीट होईल यात श्नका नाही, मराठी माणसाला ज्याला थोडाफार पेशव्याचा ईतीहास माहिती आहे
त्यानाच त्यातले तुटकेधागे जाणवतील,..
बाकी ज्या व्यक्तिला पेशवा कोण हेच माहित नाही त्याना भ्न्साळी ने दाखवलेला मसाला खराही वाटेल आणी रन्जक वाटेल यचि सोय भ्न्साळीने केलिये.

दिलवालं १८ ला रिलीज होतंय म्हैतीच नव्हत. मग समजल राऊत सायेबांनी पेशव्याला सपोर्ट का केला.
जय महाराष्ट्र!

काल मल्हारी गाण्याची झलक पाहिली. गाण्यात "वाट लावली" अस कैतरी ऐकु आल. ऐकुन वाटल खुद्द बाजीरावांनी हे ऐकल तर भन्सालीची वाट लावतील.. पिंग्यापेक्षा जास्त डोक्यात गेल हे गाण.

दिलवालं १८ ला रिलीज होतंय म्हैतीच नव्हत. मग समजल राऊत सायेबांनी पेशव्याला सपोर्ट का केला.
जय महाराष्ट्र!

>> बरोबर , दगडापेक्षा वीट मऊ. दिलवाले (शाखा चा ) हिट होण्यापेक्षा बाम बरा Happy
मला तर दिलवाले बघू नका म्हणून असे काही मेसेज आले आहेत की बास ?
मला एक गोष्ट कळ्त नाही , सगळ्या खानात हिंदुत्ववाद्याना शाहरूखचा राग जास्त का येतो ? तेही त्याने कित्येक चित्रपट राहुल अन राज करून अन गौरीशी इतक्या गुण्यागोविंदाने संसार करूनही ? जर पीके शाहरूखने केला असता तर लोकानी काय केल असत याची कल्पनाही करवत नाही

मी आणि माझ्या गर्लफ्रेंडनेही एकाच वेळच्या शोची दोन्ही चित्रपटांची एकेकच तिकीट बूक केली.
ईंटरव्हलनंटर तिकीटी एक्स्चेंज करणार आणि दोन्ही चित्रपट अर्धे अर्धे बघणार.
मग एकमेकांना आपण पाहिलेल्या अर्ध्याची स्टोरी सांगणार.
एकाच तिकीटाच्या पैश्यात आणि एकाच चित्रपटाच्या वेळेत डबल चित्रपट मजा>>>>>>>>>>>>>>>>>>> अगदीच काहीही हा ऋ.

पण फेकतोस मस्त >>>>> +१

'वाट लावली' च्या नंतर ते 'ततत ततत तत ततत्ता' असं आहे ते आणि त्याच्यावरचा बाजीचा नाच अगदी काहीही आहे.

बाजीरावांना न नाचवता त्यांचे ईतर सैनिक नाचत आहेत असे दाखवता आले असते.
पण हिरोला नाचवले तर हिट्स जास्त मिळतात
मग त्या केस मध्ये ऋत्विक रोशनला पाव्हणा कलाकार म्हणून नाचायला आणता आले असते.
हाच पाव्हण्या कलाकाराचा फंडा पिंगा गाण्यात वापरत करीना कतरीना नाचवता आल्या असत्या.

करीना कतरीना नाचवता आल्या असत्या.>>>>>>>> मला पिंग्याच्या जागी आता हातात नारंगी मोसंबीच्या बाटल्या घेतलेली चिकनी चमेली आणि ब्लाउझ आणि घागर्‍यात २ फुटापेक्षा जास्त अंतर राखुन असलेली फेवि़कॉल तंदुरी मुर्गी दिसु लागलीये.

दिलवाले फ्लॉप करण्यासाठी फिल्म्स इंडस्ट्रीमधूनच हालचाली सुरू आहेत अशी बातमी आहे. लेट्स सी.

दिलवाले फ्लॉप करण्यासाठी फिल्म्स इंडस्ट्रीमधूनच हालचाली सुरू आहेत अशी बातमी आहे.
>>>
शाहरूखच्या विरुद्ध ?? कसे शक्य आहे ?? आता तर सलमान भाईजानशी पंगा सुद्धा मिटलाय.. कोण आहे मग जो त्याच्या चित्रपटामध्ये टांग अडवेल.. आणि फ्लॉप करणार म्हणजे नक्की काय करणार? पब्लिक त्याच्या नावावर बघायला जाते पिक्चर, काय कसाय समजायच्या आधी २०० करोड जमा होणार.. बाकी त्यातील अ‍ॅकशन बद्दल जे काही ऐकलेय त्यानुसार ३००+ जाणार हा पिक्चर.. कॉमेडी, अ‍ॅक्शन, रोमान्स, इमोशन्स .. ७५ करोड प्रत्येकी !

^^^
नंदिनी , काय आहे रिझन फ्लॉप करायचं ?

तसे खान लोकांचे फ्लॉप होणं अवघडच असलं तरी त्या दिलवालेचं टिझर , गाणी अगदीच फ्लॉप पर्स्नॅलिटी वाटली, सिनेमा चांगला असेलही कदाचित!
बाकी भन्सालीचा सिनेमा हिट होणारच, पिंगा - मल्हारी नसतं तरी हिटच गेला असता, बाजीराव मस्तानी सुपर दिसतोय ट्रेलर वरून !

टिझर , गाणी अगदीच फ्लॉप पर्स्नॅलिटी वाटली>>>>>>>>> +१

आम्ही ही दिलवाल्यांपेक्षा बाजीमस्तानी बघायचं ठरवलंय.

शाहरूख प्रत्येक पिक्चरच्या आधी ईंटरव्यू देताना एक वाक्य बोलतो..

ये फिल्म / ये रोल मेरे लिये बहोत स्पेशल है, ये मेरे जिंदगी के पहले पाच फिल्मो में से एक होगी ..

सव्वाशे करोडचे वाक्य आहे हे !

४ दिवसांनंतर बघू फ्लॉप की सुपर हिट.
आता लष्कराच्या भाकर्‍या भाजून उपयोग काय Wink आणि हो रा.वन सारखा सुपर फ्लॉप चित्रपट सुध्दा २५० कोटी जमवून गेला.

माझ्या मते, भन्साली आणि कंपनीने, थोरला बाजीराव नाचवित जोडीने काशीबाई/मस्तानीला पिन्गा नामक तमाशा करायला लावित महाराष्ट्रात मराठ्यांच्या छाताडावर नाचवलित अन मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची पायपोसणी लक्तरे करुन ती सिनेमात स्वतःला हवीतशी मांडलीहेत, अन तरीही, शेळपट बनलेली बामणं अन मुर्दाड झालेले तमाम जातीवंशाचे मरहट्टे "बाजीरावाचा/पेशव्यांचा अपमानाचा प्रश्न तो बामणांचा प्रश्न असे सोईस्कररित्या समजुन घेत मुकाटपणे वाळूत तोंड खुपसुन बसलेत असे सध्याचे महाराष्ट्राचे चित्र आहे.
__शिवसेनेकडून अपेक्षा ठेवणेच चूक आहे असे वाटावे अशी सद्यपरिस्थिती.
____बाबासाहेब पुरंदरेंचा चेला भासत असलेल्या राज ठाकरेकडुन तरी काही होईल अशी अपेक्षा, तर ती देखिल फोलच....
______बीजेपीचे विचारुन नका, ते घोंगड भिजत कुजत घालुन बसलेले, शेन्डा ना बुडखा अशी त्यांची गत
_________अन यांच्या व्यतिरिक्तच्या बॉलिवुडच्या ताटाखालचे मांजर बनलेल्या तमाम कॉन्गी/कम्युनिस्ट्/ब्रिगेडी/समाजवादींना आनंदाच्या उकळ्या फुटताहेत असे एकंदरीत दृष्य आहे.
___________ तथाकथित बुद्धिवादी/विचारवंत ( की जंत? ), पत्रकार वगैरे, इनटॉलरन्सच्या नावाखाली पुरस्कार परत करीत मोदी सरकारचा निषेध करणारे "साहित्यिक" वगैरे मंडळी आळिमिळी गुपचिळी करुन बसलेले...
माझ्या मते सरत्या २०१५ च्या डिसेंबरातील परिस्थिती अशी आहे.

>>>> लिंबूभाऊ बाजिराव मस्तानी सुपर डुपर हिट्ट करणार आहे तुमचे हिंदुत्ववादी <<<<<
जसा हा धागा हिट होतोय तसा का? Wink
मग बेट वगैरे लावा... धाग्यावर जितक्या पोस्टी तितेके क्रोर धन्दा करणार की कसे यावर.... जाता जाता तुमचीही कमाई होईल, काय? Proud

पण खरच मज्जा येईल .
अपमानाचा प्रश्न अपमानाचा प्रश्न निव्वळ ओरडत बसा तुम्ही. आणि तुमचेच लोक "दिलवाले" बघु नका "बाजीराव" बघा म्हणून गल्लोगल्ली ओरडत फिरत आहे Wink
सही आहे

दिलवाले बघणार , कारण फूकट टिकिट्स मिळतायतं .
बाजीराव-मस्तानी बघायचाच आहे , सगळा राडा चालू व्हायच्या अगोदरपसून ठरवलेलं .
रणवीर आपल्याला तर आवडला बुव्वा ! त्याच्यासाठी दि-प्रि ला सहन कराव लागेलं - बघूया , झेलुया - असं म्हणून जायचं .

पिंगा गाण्यात नीट नऊवारी तरी दाखवायची ना. अजूनही नऊवारी नेसणार्या बायका अशा नेसतात का? लावणी करतात त्यापण किती नीट नेसतात. लो वेस्ट नेसतात का?

स्वप्नातला शॉट असला तरी वस्त्रभान ठेवायला हवे होते. डोला रे डोला रे मध्ये साड्या नीट होत्या.

लिंबू मग लोकांनी काय करायला हवे आहे? थिएटर वर जाउन पिक्चर बंद पाडायचा? त्याने दाखवले आहे ते तुम्हाला पटले नाही म्हणून?

प्रत्येक जातीत सगळे थोरपुरूष (आणि स्त्रिया) वाटून टाका. त्या त्या जातींच्या स्वघोषित प्रतिनिधींनी ठरवलेला त्यांचा इतिहास हाच खरा इतिहास आहे व त्यांची संमती घेतल्याशिवाय कोणालाही त्या व्यक्तींना 'टच' करता येणार नाही, नाहीतर राडे करू. अशी व्यवस्था असायला हवी आहे का?

Pages