होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं हा तर लग्नातला फोटो आहे, जानीची डिलीव्हरी म्हणे शेवटच्या भागात होणारे. सगळ्यांचं मार्गी लावून जानी-श्री बाळाकडे लक्ष देऊ शकतील ना , नाहीतर हिचं लग्न लाव, त्याला घरात आण, भांडणं सोडव ह्यात बिझी दोघं Wink

बेबी आत्याची सासरी रवानगी, सरू मावशीचं लग्न, जानूची डिलेव्हरी आणि बाबांचं पायाचं ऑपरेशन
हे सगळे नीट दाखवणार का नेहेमीप्रमाणे मालिका अर्धवट गुंडाळणार? अतुल परचुरे, मनोज जोशी, प्रसाद ओक आणि लीना भागवत यांना परत आणणार का?
जानूचे मालिकेतले ९ महिने पुर्ण व्हायला अजुन बराच वेळ आहे. जानूची डिलेव्हरी दाखवायची असेल तर मालिकेला किमान ६ महिन्यांचा लिप घ्यावा लागेल. नाहीतर डिलेव्हरी शक्य नाही.

वाटत तर नाहीये , सिमरन - अमेरिकेहून आलेली Happy .
श्री चे बाबा मिस्सिन्ग ,शरी आणि काका मिस्सिन्ग .
कला आणि बाबा मिस्सिन्ग ,
झालच तर गीता-मनिश मिस्सिन्ग

लोकहो, ही मालिका December किन्वा January महीन्यात सम्पणार आहे. हे काल की परवच्या Maharashtra Times मध्ये आले होते. आणी हो, जान्हवीचे बाळ पण येणार आहे.

अरे तो पप्पु आहे, ती बाजूला सरुमावशी. पप्पुचे आई बाबा आणी पप्पुची बहीण मोठ्या आईच्या बाजूला. ती सिमरन नैये काई.

तुम्हाला असं का वाटतयं की हि मालिका एव्हढ्यात संपेल म्हणुन. रात्री ८ वाजता कुणाच्याही घरी जा तिथे या जानी आणि सासवा असतातच दात विचकत. मुख्य म्हंजे त्या घरातील २ व्यक्तीतरी आवडीने बघत असतात यांचे माकडचाळे. ( या दोन व्यक्ती म्हंजे घरातील वयोवृद्ध, यांना स्टार प्लसवरील सिया के राम ही पौराणिक मालिका आता ऑप्शनला आहे पण तरीही ते जानीलाच बघणे पसंत करतात)
तात्पर्य काय तर अजुनही ही मालिका प्रेक्षकांना आवडतेय त्यामुळे एव्हढ्यात तरी मंदे ही शिरेल बंद करत नाही. लीप घेणं हे शिरेलवाल्यांच परमकर्तव्य पण बाकी आहे अजुन. पुढच्या पिढीत जानीचं बाळ, पिंट्याचं लेकरु, मनिषचं बाळं, सरुमावशीचं दत्तक मुल अशी पात्र असतील.

नव्या शिरेलीतले हिरो-हिर्वीण आवडले नाहीत ब्वा. असो मी शिरेलप्रेमी नसल्याने मला न बघायला कारण हवंच असतं.

दशमी क्रिएशन्सची आहे नवीन असं वाचलं. त्यांची एकच सिरीयल मला आवडली ती मात्र मी बघत होते. हिरो-हिरवीण आवडीचे होते. बाकी सो सो च.

नव्या शिरेलीतले हिरो-हिर्वीण आवडले नाहीत ब्वा. असो मी शिरेलप्रेमी नसल्याने मला न बघायला कारण हवंच असतं. >>> कुठली नविन सिरेल ???

थोडा वेळ एकदा बघितली मी ती रिया, गार्गी दाखवली मोठ्या ऋषींबरोबर चर्चा करताना. छोटी सीता गोड आहे. तिची आई भार्गवी चिरमुले आणि बाबा बिजॉय आनंद (सोनाली खरेचा नवरा आहे). औरत (जुनी मालिका) मध्ये मंदिरा बेदीचा हिरो होता तेव्हा मला आवडला होता आणि जुन्या महाभारतात अभिमन्यू होता बहुतेक. आता दाढी आहे म्हणून मी नाही ओळखलं त्याला पण नाव वाचलं कुठेतरी तेव्हा लक्षात आलं.

पसंत आहे मुलगी चे हिरो हिरॉईन अत्यंत रद्दड आहेत. Sad
आणि सगळ्या असल्या घरगुती शिरेलीच का? Uhoh बाकी विषय संपलेत का? Uhoh

शी मला तर प्रोमो पण बघावा वाटत नाही.
झी मराठीचे ब्रेन्स डेड झालेले आहेत, नवे काही सुचत नाही याना!

Pages