दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा भाग ठीक होता.शाॅर्ट फिल्म सुरवातीला रटाळ वाटली.पण नंतर ठीक होती.शेवट आवडला.स्वतः पेक्षा सगळयांना आपल्या मित्रां /मैत्रिणींबद्दल खात्री असते की १० वर्षांनी कोण कुठे असेल किंवा काय असेल..
सगळयांमधली मैत्री, ते बंध खूप ठळकपणे जाणवले. मस्त वाटलं. काही दिवसांनी सगळ्यांचं माजघर सुटेल पण माजघराने दिलेली मैत्री नक्की असेल..इति आशू.
आशू सगळ्यात बेस्ट.!

मला रेश्माचं उत्तर सगळ्यात जास्त आवडलं - दहा वर्षांनी रेश्मा नसेल - नसावी! Happy
दुर्दैवाने दहा वर्षांपूर्वीही लोकांना हेच वाटत असेल तरी अशा रेश्मा आहेतच. Sad

चीनू एपिसोड अतिशय बोर झाले >> +१
पण ति माजघरावरची शॉर्ट फिल्म आवडली Happy

रेवा एरवी बोअर होते पण यावेळचा ट्रॅक बरा वाटला. रेश्मा, राकेश, निशा हा त्रिकोण नेहेमीसारखाच न सुटता काही वेगळेपणाने शेवट होतो का हे बघायला आवडेल.

कालचा भाग खूप आवडला! कबीर मीनल चे सगळेच सीन्स आवडले, स्पेशली कॉफी शॉप मधले Wink
ललित प्रभाकर आदित्यच्या भूमीकेतून एकदम दाढी मिशीवाल्या कबीर मधे छान सूट झाला. मीनल बरोबरची त्याची केमीस्ट्री मस्त वाटली.
आगाऊ मिनलची कबीर आज बहुतेक शाळा घेइल Happy

ललित येणार कळल्यावर मला rmd तुमचीच आठवण आली Lol

पण मला मीनलला नाटकाचा बेस इतका समजवायला लागतोय ह्याचं आश्चर्य वाटलं, अमेरिकेला तिचे नाटक गेलं आणि ती जाऊन आली असं होतं की D3 च्या कथेत मागे. जेव्हा स्वानंदी खरंच अमेरिकेला गेली होती तेव्हा.

खरंय! मे बी ती या आधी पाट्याच टाकत असेल. त्यांनी तिचा अ‍ॅटीट्युड चुकीचा आहे हे दाखवायचा प्रयत्न केलाय असं मला वाटलं

मीनल-अबीरची केमिस्ट्री आवडली! मस्त दिसत आहेत ते एकत्र. बरेऽऽऽच दिवसांनी इन्ट्रेस्टिंग ट्रॅक आणलाय दिदोदुत. बघणेबल असा Wink

हो, मीनल अगदीच अमॅच्युअर दाखवली आहे... मेबी अबीरला मोठं दाखवण्यासाठी Happy ती एका पद्धतीनं अभिनय करते आणि त्याला दुसरी पद्धत अपेक्षित आहे असं काहीतरी दाखवायला हवं होतं. पण एक जोडी म्हणून ते कमाल दिसत आहेत. मीनलासाठी बेस्ट हीरो आहे हा!

असेल कबीरला मोठं दाखवण्यासाठी शॉट असतील तसे, ललितने फार सहज मस्त टोन वापरून काम केलंय. मीनल दिसली छान पण काल समहाऊ ती नाही पटली मला, अगदी त्याच्यासमोर सरेंडर attitude वाटला मला. त्याला मोठं करण्यासाठी तिला असं मिळमिळीत दाखवणं बघायला नाही आवडलं.

उलट तिचा मुळचा dashing attitude आणि त्याने त्यावर थंड किमान शब्दात तिला तिची जागा दाखवून देणं ही जुगलबंदी बघायला आवडेल मला. Happy

गुरुवार एपिसोडमध्ये मिनलचे इमोशनल होणं आवडलं मला. ललितला मोठा रोल असेल की काही दिवसांसाठी आणलंय, मोठा असावा असं वाटतंय.

हो तिघेही उठायचा प्रयत्न करतात आणि मिनल बडबड करायला लागल्यावर परत गप्प! Proud
कबीर ! हाय मेरी जान Happy

आमेन rmd. Lol

तो फारच सहज वावरतो, बोलतो. सही एकदम.

मला रेशीमगाठीमध्ये तो आवडला पण मेघना बाईसाहेब बघवत नव्हत्या सो मी नाही बघितली ती सिरीयल.

त्याआधी तो गंध फुलांचा मध्ये व्हिलन होता, ती पण नाही बघितली मी.

Pages