प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते मानले तरी सुद्धा प्रत्येक स्त्री पत्नीच असते किंवा असायला नाही !
पाठीवर हात ठेवून लढत राहा म्हणणारी स्त्री कुणी मैत्रीण सुद्धा असू शकते .
कित्येक वेळेला पुरुष ज्या गोष्टी आपल्या पत्नीशी बोलू शकत नाहीत त्या सुद्धा एका चांगल्या मैत्रिणीशी मोकळेपणाने बोलतात .
असे नाते फारच सुंदर असते .
अपेक्षा नसतात . फक्त आधार असतो , एकमेकांना दिलेला . आणि विश्वास असतो, निस्वार्थी प्रेमाचा .
शारीरिक वासनेचा स्पर्श सुद्धा नसलेले मैत्रीचे निखळ नाते आयुष्य जगण्याची आणि येईल त्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देत राहते .
दुसरं काय हवं असतं ?
फक्त अश्या नात्यांमध्ये इर्षा , द्वेष , मत्सर या भावना घात करतात .
आपली मैत्रीण पुरुषाला जितकी प्रिय वाटते तितकाच तो आपल्या पत्नीच्या मित्राचा द्वेष करतो . आणि खरी आग इथूनच लागते . मग समजूतदार पत्नीसुद्धा आपल्या पतीच्या मैत्रिणीचा द्वेष करू लागते . कधीकधी हा क्रम उलट सुद्धा होतो .
एका सुंदर नात्याचा विनाकारण अंत होतो . किंवा अंत नाही झाला तर उगाचच लपवण्याची वेळ येते. आणि निखळ नात्याला संशयाचं गालबोट लागते .
खरंतर आपल्या पतीची मैत्रीण आपली सुद्धा छान मैत्रीण बनू शकते . तसंच पत्नीचा मित्र आपला मित्र बनू शकतो . पण असुरक्षिततेची भावना बुद्धीचा ताबा घेते आणि आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीचा फक्त संशयच येऊ लागतो .
खरंतर मैत्री हे फार सुंदर नाते . आणि स्त्री पुरुष भेदभावाची त्यात गरजच नसते .
आयुष्यातल्या सर्व सुंदर गोष्टी टिकवण्यासाठी आपण जितकी मेहनत घेतो तितकीच आपल्या जोडीदाराचे मित्र मैत्रीण टिकवण्यासाठी सुद्धा घेतली पाहिजे . कारण मैत्रीची जितकी गरज आपल्याला आहे तितकीच ती आपल्या जोडीदारालाही आहे
खरंतर आपल्या पतीची मैत्रीण
खरंतर आपल्या पतीची मैत्रीण आपली सुद्धा छान मैत्रीण बनू शकते . तसंच पत्नीचा मित्र आपला मित्र बनू शकतो >> नाही. नो थँक्स.
छान लिहिले आहे . स्त्री
छान लिहिले आहे .
स्त्री (मुलगी ) आणि पुरुष (मुलगा) हे किती अंतरापर्यंत छान मैत्रीत राहू शकतात याचा आशय देणारी एक नवी मराठी मालिका आले सध्या झी मराठी वर , दिल दोस्ती दुनियादारी , रोज रात्री १०.३० असते छान आहे मालिका .
हो मला असे वाटते की काही नाती
हो मला असे वाटते की काही नाती अशी असू शकतात.... कारण सध्याच्या काळात आपण सागळेच सारखे स्टे कनेक्टेड असतो.... त्यामुळे एक प्रकारचा मोकळेपणा सगळ्याच नात्यंमध्ये आल्याचे दिसते आहे...
पण अशी नाती जपताना दोन्ही बाजूने तशीच जपली जाणे गरजेचे आहे... काही नात्याला तर नावच न दिलेले बरे.... फ़क्त या नात्यांमधली सीमा रेषा खूप पुसट असते.. ती समजून घेतली तर तुमच्या सारखे भाग्यवान तुम्हीच... हेमावैम ...
खरंतर आपल्या पतीची मैत्रीण
खरंतर आपल्या पतीची मैत्रीण आपली सुद्धा छान मैत्रीण बनू शकते . तसंच पत्नीचा मित्र आपला मित्र बनू शकतो >>>>>>
शक्य नाही,. हे पुस्तकी विचार आहेत. आधी स्वताच्या घरी हे विचार चालतायत का ते प्रयत्न करुन बघा.
मला हा अपूर्ण लेख वाटला .
मला हा अपूर्ण लेख वाटला . म्हणाजे सांगायचय काहीतरी स्पेसिफिक केसबद्दल पण जनरलाइज करून लिहिल्यामुळे नीट समजत नाही काय म्हणायचेय.
काय बोलू... जुन्या आठवणी
काय बोलू... जुन्या आठवणी जाग्या झाल्या,
माझा रुमाल..
मी माझा अनुभव लिहेन..
थोडक्यात लिहावेसे वाटले तर इथेच..
खुलून आले तर स्वतंत्र धाग्यात..
खरंतर आपल्या पतीची मैत्रीण
खरंतर आपल्या पतीची मैत्रीण आपली सुद्धा छान मैत्रीण बनू शकते . तसंच पत्नीचा मित्र आपला मित्र बनू शकतो >> नाही. नो थँक्स.
>> मीपण नो थँक्स.. नुसत्या कल्पनेनेच कसंतरी झालं.
नवर्याच्या मित्राला किंवा मैत्रीणीला आपली मैत्रीण वै. मानयचं असेल तर एकच प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा.
"जर उद्या जोडीदार आणि माझ्यात घटस्फोटाची वेळ आली (इतर काही जनरल कारणामुळे) आणि त्यात माझी काहीही चुक नसेल तर जोडीदाराचा मित्र/ मैत्रीण (ज्याला/ जिला आपली बाजु माहीत आहे आणि ती बरोबर आहे हेही माहित आहे) आपल्या बाजुने उभी/उभा राहील का?"
या प्रश्नाच्या उत्तराने जरा जमीनीवर याल.
No, not accepted in india in
No, not accepted in india in both side...
"कित्येक वेळेला पुरुष ज्या
"कित्येक वेळेला पुरुष ज्या गोष्टी आपल्या पत्नीशी बोलू शकत नाहीत त्या सुद्धा एका चांगल्या मैत्रिणीशी मोकळेपणाने बोलतात .>>>>>>>>> "पत्नीशी बोलू शकत नाही" याचाच अर्थ त्यात लपवण्यासारखं काहीतरी आहे.
तरी देखील "शारीरिक वासनेचा स्पर्श सुद्धा नसलेले मैत्रीचे निखळ नाते आयुष्य जगण्याची आणि येईल त्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देत राहते .">>>>>> हा विचार न पटण्यासारखा आहे.
अवघड आहे पण अशक्य नाही.
अवघड आहे पण अशक्य नाही.
माझा अनुभव सांगते. माझ्या
माझा अनुभव सांगते. माझ्या नवऱ्याचा आमच्या लग्ना आधीपासूनच छान ग्रुप आहे. त्यातील दोघांचा एकमेकांशी आंतरजातीय विवाह सुद्धा झालाय. आम्ही प्रत्येक वर्षी भेटतो, फिरतो. पण तरीही त्याच्या मैत्रिणी आमच्याशी( आम्ही नंतर लग्न करून आलेल्या बायका) थोडं अंतर ठेवूनच वागतात. जो मोकळेपणा आणि सहजता त्यांच्या नात्यात आहे तशी आमच्यात नाही . इतकंच काय whatsapp ला त्यांनी ग्रुप बनवलाय ज्यात आम्हाला घेतलं नाही कारण आम्ही त्यांच्या आधी पासूनच्या मैत्रिणी नाही. फार अपवादाने असं घडत असेल जिथे नवऱ्या च्या मैत्रिणी ह्या 'मैत्रिणी' होतात आणि बायकोचे मित्र हे 'मित्र' होतत. कारण मैत्री काही ओढूनताणून नाही करता येत.
मध्यान्तरि याच विशयावर अक
मध्यान्तरि याच विशयावर अक मराथी सिनेमा येउन गेला. उमएश कामत आनि प्रिया बापत यन्चा
अच्छा. मराठी अजून सुधारलेलं
अच्छा.
मराठी अजून सुधारलेलं दिसत नाही.
खरंतर आपल्या पतीची मैत्रीण
खरंतर आपल्या पतीची मैत्रीण आपली सुद्धा छान मैत्रीण बनू शकते . तसंच पत्नीचा मित्र आपला मित्र बनू शकतो >> नवर्याच्या मैत्रिणीशी (आणि मित्राशीही) किंवा बायकोच्या मित्राशी (आणि मैत्रिणीशीही) मैत्री करण्याची गरजच काय?? दोघांनी एकमेकांचे मित्रमैत्रिणी स्वीकारले की झालं!! कोणासही असुरक्षितता वाटत असेल तर त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाची कमी आहे असे समजावे
खरंतर आपल्या पतीची मैत्रीण
खरंतर आपल्या पतीची मैत्रीण आपली सुद्धा छान मैत्रीण बनू शकते . तसंच पत्नीचा मित्र आपला मित्र बनू शकतो >> नाही. नो थँक्स.
>> मीपण नो थँक्स.. नुसत्या कल्पनेनेच कसंतरी झालं
>>> हे जनरलाइज का करतायत लोक ? प्रत्येक केस मधे मैत्री झालीच पाहिजे असे नाही , तसंच कधीच होऊच शकणार नाही हेही का धरून चालायचं ?
kapoche, ही प्रतिक्रिया
kapoche, ही प्रतिक्रिया लिहीली तेव्हा, नुकतिच मायबोलीवर लिहीण्यास शिकले होते, मराठी सुधारलेलं आहेच हो! आन्तर्जालावर लिहीण्याची सवय होतेय.