लागणारा वेळ - १ तास
लागणारे घटक -
१) १०-१५ कोवळी तोंडली
२) एक कांदा
३) ७-८ लसूण पाकळ्या
४) २ हिरव्या मिरच्या (ऐच्छिक)
५) १०-१२ काड्या कोथिंबीर
६) डावभर तेल
७) अर्धी वाटी डाळं
८) अर्धी वाटी शेंगदाणे
९) पाव वाटी तीळ
११)१ मोठा चमचा धणेपूड
१२) १ लहान चमचा हळद
१३) १ लहान / मोठा चमचा तिखटपूड
१४) १ मोठा चमचा आमचूर पावडर किंवा चिंचेचा कोळ
१५) २ मोठे चमचे गोडा मसाला/ किचन किंग मसाला किंवा रोजच्या भाजी-आमटीला वापरू तो कुठलाही मसाला
१६) अर्धी वाटी गूळ
१७) दीड मोठा चमचा मीठ
१८) कणीक (ह्याचं प्रमाण कृतीमध्ये येईल)
१९) पराठे भाजायला तेल
२०) ४ वाट्या पाणी
कृती -
१) चिराचिरी:
- तोंडली धुऊन, निथळून, एकाचे दोन (लांब) तुकडे करून बाजूला ठेवावी.
- कांदा, कोथिंबीर, मिरच्या हे घटक धुऊन बारीक चिरून घ्यावे.
- लसणाच्या पाकळ्या ठेचून बारीक चिराव्या.
२) मिक्सरमध्ये बारीक करणं -
- डाळं, शेंगदाणे (हे आधी खमंग भाजले असतील तर उत्तम), तीळ मायक्रोवेव्ह ओव्हनात १-२ मिनिटं हाय पॉवरवर भाजून, गार करून, ह्या सगळ्यांची मिक्सरमधून (एकत्र) बारीक भुकटी करून घ्यावी.
३) फोडणी -
- प्रेशरपॅनमध्ये तेल गरम करून, (वाटलं तर मोहरी - हिंग घालून,) चिरलेले सगळे घटक, मिक्सरमधून काढलेली भुकटी, मसाले, आमचूर पावडर / गूळ, मीठ घालावं. कुठलाही घटक वेगळा परतण्याची गरज नाही.
- कृतीसाठी लागणारे सगळे घटक आता प्रेशरपॅनमध्ये २-३ मिनिटं जास्त आचेवर परतून, त्यात ४ वाट्या पाणी गरम करून घालावं.
- व्यवस्थित ढवळून, झाकण लावून, कुकरच्या १-२ शिट्ट्या झाल्यावर आच बंद करावी.
४) पराठ्यांसाठी पिठाचा गोळा तयार करणं -
- प्रेशर पॅनची वाफ गेल्यावर भाजी थोडी गार होऊ द्यावी. भाजीला पातळ रस्सा तयार झालेला नसावा. कारण फार कणीक घालावी लागेल. साधारण घट्टं पिठल्याची कसिस्टन्सी असावी. रस्सा झालाच तर आटवून घ्यावा लागेल.
-पोटॅटो मॅशरनं तोंडली मोडून घ्यावी किंवा अख्खी भाजी सरळ एकदा मिक्सरमधून बारीक करावी.
-ह्या भाजीची एकदा चव घेऊन बघावी. त्यात आता कणीक घातली जाणार असल्यामुळे पराठ्यांना योग्य प्रमाणात होईल अशा अंदाजानं मीठ, तिखट वरून घालावं.
-भाजीत मावेल इतकी कणीक घालून पराठ्यांसाठी गोळा मळावा.
५) पराठे करणं -
- फार पातळ किंवा अतिजाड नसलेले, मध्यम जाडीचे पराठे लाटावे. अगदी सहज लाटले जातात.
-तवा व्यवस्थित गरम करून, त्यावर आधी पराठे दोन्ही बाजूंनी चांगले शेकून, त्यानंतर वरून तेल सोडून भाजावे.
-पराठ्यांचं वाण अगदी सर्वसामान्य तिखटमिठाच्या पराठ्यांसारखं दिसलं तरी चवीला वेगळे आणि छान लागतात.
-बराच वेळ भाजूनही पराठ्यांचं वाण कच्चं दिसतं. पण ते कच्चे नाहीत हे लक्षात घेऊन टोमॅटोच्या लोणच्याशी, दह्याशी गरमागरम खायला घ्यावे.
'ब्रह्मघोटाळ्याचे पराठे' ह्या शीर्षकामागची कहाणी सांगणं आवश्यक आहे.
तोंडली शिजायला वेळ लागतो. पण मसाल्याची तोंडलंभाजी वेळेअभावी लवकर शिजवणं भाग होतं. त्यामुळे प्रेशरकुक करायचं ठरलं. भाजीला लागणारे कृतीतले सगळे घटक प्रेशरपॅनमध्ये २-३ मिनिटं परतून, पाणी घालून प्रेशरकुक केले. प्रेशर निघाल्यावर झाकण उघडलं आणि... ब्रह्मघोटाळा!!! नेमकं का आणि कसं झालं माहिती नाही, पण सगळ्या घटकांचं शिजून एकजीव बदगं तयार झालं! जे काय कुकरात दिसत होतं ते चपातीशी खावसं वाटण्याच्या पलीकडलं होतं. तोंडल्यांच्या अस्तित्वाच्या थोड्या खुणा काय त्या बाकी होत्या. ते सगळं तसंच ठेवून दिलं. शिळा उपमा गिळला, कपभर चहा ढोसला. मग जरा तरतरी आली.
एरवी उरल्यासुरल्या वरण-भाज्या-आमट्यांमध्ये वेळोवेळी कणीक घालून लाटलेले पराठे, थापलेली थालीपिठं आठवली. ह्या तोंडल्याच्या पिठलंसदृश बदग्याला पराठ्यांमध्ये सद्गती देण्याचं ठरवलं....
....घातलेल्या मसाल्यांमुळे आणि इतर घटकांमुळे पराठे नेहमीपेक्षा फारच चवदार आणि वेगळे लागले. तेव्हापासून बरेचदा हे पराठे ठरवून ह्या पद्धतीनं होऊ लागले.
बदलण्यासाठी घटक -
तोंडली
(No subject)
तोंडल्यांचं पंचामृत? असं कसं
तोंडल्यांचं पंचामृत? असं कसं करवतं म्हणते मी तुम्हाला ? असा अपमान करता तुम्ही पंचामृताचा?
सुलेखा ह्यांचीच कृती असावी.
सुलेखा ह्यांचीच कृती असावी.
रिया, नंतर "माझाच अंदाज बरोबर
रिया, नंतर "माझाच अंदाज बरोबर होता" असा खोटा क्लेम करता येऊ नये म्हणून योग्य त्या जागी अंदाज व्यक्त करून मी माझ्याच परतीच्या वाटा बंद केल्यात. तुम्ही तिथे पोचलेल्या दिसताय की.
तुम्ही तिथे पोचलेल्या दिसताय
तुम्ही तिथे पोचलेल्या दिसताय की.
>>>
हे नाही कळलं कुठे केलाय क्लेम?
(संयोजकांच्या विपूत काही दिसलं नाही )
लोकं रेसीपी पेक्षा, कोनी
लोकं रेसीपी पेक्षा, कोनी लिवली हाच खेळ खेळण्यात दंग आहेत.
हिच एक स्पर्धा ठेवा.
झंपे तू कशावरून सुलेखातैची
झंपे
तू कशावरून सुलेखातैची म्हणतेयेस ते सांग आता
सुलेखा काकुंकडून तोंडल्याच्या
सुलेखा काकुंकडून तोंडल्याच्या भाजीचा गिचका होवू शकणार नाही. मुद्दाम करायचा असल्यास गोष्ट वेगळी.
टॉमेटोच्या लोणच्याचा क्लु घेवून बघायला हवा.
रीया हा घे क्लू , त्या खूपच
रीया हा घे क्लू ,
त्या खूपच डीटेल मध्ये लिवतात. गूळ आणि मायक्रोवेव खूपदा असतो वापरलेला.
पण आता बदगं वगैरे माळवी गुजराती प्रभाव असलेले मराठी नाही वापरतात... सो मे नॉट बी हर.
नाहितर गूळ चालणार्या वैदर्भीयची असू शकते. नाहितर सीकेपी आयडी कडून.
ह. घ्या वैदर्भीय, सिकेपी आणि इतर....
असं फक्त १०-१५ तोंडल्यांची ४
असं फक्त १०-१५ तोंडल्यांची ४ कप पाणी घालून भाजी म्हणजे मला तर स्वप्नील जोशीचीच शंका येते. (कायच्याकै कामं करण्यात दुसरे कोण अव्वल आहे? ;)) मंडळाने थेट त्याच्याकडे साकडे घातले काय?
तोंडलीचे पराठे मला इतके
तोंडलीचे पराठे मला इतके आवडलेले नाही. (हे उगाच कोणी न विचारता पिंक टाकली )
इतकं गिर्र शिजवून ... कसे लागत असणार?
इथे लैच व्हरायटी येणार आहेत,
इथे लैच व्हरायटी येणार आहेत, आगदी भेंडी, गवार पासुन ते रताळे, अर्वी सुरण असे काहिही घालाता येईल
बदलायचा आजुन एक घटक हवा होता असे वाटते
कारल्याने काय घोडं मारलय मग?
कारल्याने काय घोडं मारलय मग? १०-१५ कोवळी कारली नाहितर तब्येतील बरं म्हणून पडवळ.
>>>बदलायचा आजुन एक घटक हवा होता असे वाटते<< +१
तोंडल्याचे पराठे..
तोंडल्याचे पराठे.. भन्नाटच.
लाल तोंडल्यासारखे जिचे ओठ आहेत ती... बिंबाधरा !!!
मंजूडी पोळी म्हणते, चपाती
मंजूडी पोळी म्हणते, चपाती म्हणत नाही म्हणजे ही तिची नाहीच रेसिपी रिया
आता पुढच्या रेसिपीत संयोजक
आता पुढच्या रेसिपीत संयोजक आपल्याला चकवण्यासाठी भाषेची थोडी सरमिसळ करुन रेसिपी देणार बहुतेक ( आधीच्या दोन रेसिपीजनाही अशी गुगली टाकलेली असू शकते )
फोटोमधल्या डिश, ट्रे टेबल
फोटोमधल्या डिश, ट्रे टेबल क्लॉथ वरून लागेल का तपास.
घोटाळ्याचे कर्ते उघडकीस आलेच पैजेत
( उगा टीपी करतेय हां , पाकृ मधे मी वाचन्मात्र )
पराठ्यांच्या बाजूला
पराठ्यांच्या बाजूला क्रॅनबेरी चटणी सदृश पदार्थ दिसत आहे.
हे अमेरिकेतल्या कोणाचंतरी हस्तलाघव आहे. मृण्यमीच असणार ती.
ओ मामी, त्यांनी टोमॅटोच्या
ओ मामी,
त्यांनी टोमॅटोच्या चटणीशी खा म्हणून लिवलय की! क्रॅनबेरी चटणी न्हायी.
अम्रिकेत डावाच्या मापानी तेल
अम्रिकेत डावाच्या मापानी तेल घालतील का?
संयोजक ही बायप्रॉडक्ट स्पर्धा/खेळ पण मस्तय
कवे, अगदी हेच हेच्च माझ्या
कवे, अगदी हेच हेच्च माझ्या मनात आलेलं जेंव्हा मी टिनाची रेसीपी म्हणाले. पण संयोजकांनी मुद्दाम केलेले बदल असू शकतात की हे
पुढील वर्षी अशी स्पर्धा
पुढील वर्षी अशी स्पर्धा ठेवायला हरकत नाही.... पाकृ वाचा आणि आयडी ओळखा
पराठ्याचं वाण, बदगं हे शब्द
पराठ्याचं वाण, बदगं हे शब्द महाराष्ट्रात कुठे वापरले जातात हे माहित असेल तर रेसिपी कोणाची हे कळेल :). मी हे शब्द ऐकलेले नाहीत, पण माझा गेस सिंडी / सीमावर ;).
माझाही अंदाज सिंडीच आहे
माझाही अंदाज सिंडीच आहे
अग्गोबै ! त्या बिंबाधरा
अग्गोबै ! त्या बिंबाधरा शब्दाचा अर्थ आज कळला.
गायन्याकवाले एका आजाराला स्ट्रॉबेरी अॅपिरन्स असा शब्दप्रयोग करतात.
ते चित्र पाहिलं तर लोक स्ट्रॉबेरी खायचं बंद करतील !
बबो दिसला घोटाळा की घेतलं
बबो दिसला घोटाळा की घेतलं आमचं नाव मी नाय ती.
बदगं हा शब्द मायबोलीवर याआधी
बदगं हा शब्द मायबोलीवर याआधी मृण्मयी आणि दिनेश यांनी वापरला आहे. यापैकी एकाची पाकृ असणार.
मला पण हा रेसिपी कोणाची ओळखा
मला पण हा रेसिपी कोणाची ओळखा गेम आवडलेला आहे. दही बघून सिंडी नाही वाटत
माझे पैसे पण मृण्मयी वर.
Dinesh is not a fan of dough
Dinesh is not a fan of dough rolling recipes as he stated numerous times. So he either go for thaapalele or otalele stuff. Can't be his recipe.
My guess - sanyojak has some kind of weird programme which produces weird recipes with weird ingredients
हो दिनेश नसतीलच. पदार्थ
हो दिनेश नसतीलच. पदार्थ बनवताना घोटाळा ...अन त्यातून 'ब्रह्मघोटाळा'. त्यामुळे माझा संशय मृण्मयी वर.
Pages