लागणारा वेळ - १ तास
लागणारे घटक -
१) १०-१५ कोवळी तोंडली
२) एक कांदा
३) ७-८ लसूण पाकळ्या
४) २ हिरव्या मिरच्या (ऐच्छिक)
५) १०-१२ काड्या कोथिंबीर
६) डावभर तेल
७) अर्धी वाटी डाळं
८) अर्धी वाटी शेंगदाणे
९) पाव वाटी तीळ
११)१ मोठा चमचा धणेपूड
१२) १ लहान चमचा हळद
१३) १ लहान / मोठा चमचा तिखटपूड
१४) १ मोठा चमचा आमचूर पावडर किंवा चिंचेचा कोळ
१५) २ मोठे चमचे गोडा मसाला/ किचन किंग मसाला किंवा रोजच्या भाजी-आमटीला वापरू तो कुठलाही मसाला
१६) अर्धी वाटी गूळ
१७) दीड मोठा चमचा मीठ
१८) कणीक (ह्याचं प्रमाण कृतीमध्ये येईल)
१९) पराठे भाजायला तेल
२०) ४ वाट्या पाणी
कृती -
१) चिराचिरी:
- तोंडली धुऊन, निथळून, एकाचे दोन (लांब) तुकडे करून बाजूला ठेवावी.
- कांदा, कोथिंबीर, मिरच्या हे घटक धुऊन बारीक चिरून घ्यावे.
- लसणाच्या पाकळ्या ठेचून बारीक चिराव्या.
२) मिक्सरमध्ये बारीक करणं -
- डाळं, शेंगदाणे (हे आधी खमंग भाजले असतील तर उत्तम), तीळ मायक्रोवेव्ह ओव्हनात १-२ मिनिटं हाय पॉवरवर भाजून, गार करून, ह्या सगळ्यांची मिक्सरमधून (एकत्र) बारीक भुकटी करून घ्यावी.
३) फोडणी -
- प्रेशरपॅनमध्ये तेल गरम करून, (वाटलं तर मोहरी - हिंग घालून,) चिरलेले सगळे घटक, मिक्सरमधून काढलेली भुकटी, मसाले, आमचूर पावडर / गूळ, मीठ घालावं. कुठलाही घटक वेगळा परतण्याची गरज नाही.
- कृतीसाठी लागणारे सगळे घटक आता प्रेशरपॅनमध्ये २-३ मिनिटं जास्त आचेवर परतून, त्यात ४ वाट्या पाणी गरम करून घालावं.
- व्यवस्थित ढवळून, झाकण लावून, कुकरच्या १-२ शिट्ट्या झाल्यावर आच बंद करावी.
४) पराठ्यांसाठी पिठाचा गोळा तयार करणं -
- प्रेशर पॅनची वाफ गेल्यावर भाजी थोडी गार होऊ द्यावी. भाजीला पातळ रस्सा तयार झालेला नसावा. कारण फार कणीक घालावी लागेल. साधारण घट्टं पिठल्याची कसिस्टन्सी असावी. रस्सा झालाच तर आटवून घ्यावा लागेल.
-पोटॅटो मॅशरनं तोंडली मोडून घ्यावी किंवा अख्खी भाजी सरळ एकदा मिक्सरमधून बारीक करावी.
-ह्या भाजीची एकदा चव घेऊन बघावी. त्यात आता कणीक घातली जाणार असल्यामुळे पराठ्यांना योग्य प्रमाणात होईल अशा अंदाजानं मीठ, तिखट वरून घालावं.
-भाजीत मावेल इतकी कणीक घालून पराठ्यांसाठी गोळा मळावा.
५) पराठे करणं -
- फार पातळ किंवा अतिजाड नसलेले, मध्यम जाडीचे पराठे लाटावे. अगदी सहज लाटले जातात.
-तवा व्यवस्थित गरम करून, त्यावर आधी पराठे दोन्ही बाजूंनी चांगले शेकून, त्यानंतर वरून तेल सोडून भाजावे.
-पराठ्यांचं वाण अगदी सर्वसामान्य तिखटमिठाच्या पराठ्यांसारखं दिसलं तरी चवीला वेगळे आणि छान लागतात.
-बराच वेळ भाजूनही पराठ्यांचं वाण कच्चं दिसतं. पण ते कच्चे नाहीत हे लक्षात घेऊन टोमॅटोच्या लोणच्याशी, दह्याशी गरमागरम खायला घ्यावे.
'ब्रह्मघोटाळ्याचे पराठे' ह्या शीर्षकामागची कहाणी सांगणं आवश्यक आहे.
तोंडली शिजायला वेळ लागतो. पण मसाल्याची तोंडलंभाजी वेळेअभावी लवकर शिजवणं भाग होतं. त्यामुळे प्रेशरकुक करायचं ठरलं. भाजीला लागणारे कृतीतले सगळे घटक प्रेशरपॅनमध्ये २-३ मिनिटं परतून, पाणी घालून प्रेशरकुक केले. प्रेशर निघाल्यावर झाकण उघडलं आणि... ब्रह्मघोटाळा!!! नेमकं का आणि कसं झालं माहिती नाही, पण सगळ्या घटकांचं शिजून एकजीव बदगं तयार झालं! जे काय कुकरात दिसत होतं ते चपातीशी खावसं वाटण्याच्या पलीकडलं होतं. तोंडल्यांच्या अस्तित्वाच्या थोड्या खुणा काय त्या बाकी होत्या. ते सगळं तसंच ठेवून दिलं. शिळा उपमा गिळला, कपभर चहा ढोसला. मग जरा तरतरी आली.
एरवी उरल्यासुरल्या वरण-भाज्या-आमट्यांमध्ये वेळोवेळी कणीक घालून लाटलेले पराठे, थापलेली थालीपिठं आठवली. ह्या तोंडल्याच्या पिठलंसदृश बदग्याला पराठ्यांमध्ये सद्गती देण्याचं ठरवलं....
....घातलेल्या मसाल्यांमुळे आणि इतर घटकांमुळे पराठे नेहमीपेक्षा फारच चवदार आणि वेगळे लागले. तेव्हापासून बरेचदा हे पराठे ठरवून ह्या पद्धतीनं होऊ लागले.
बदलण्यासाठी घटक -
तोंडली
शिजलेल्या तोंडल्याचं बदगं
शिजलेल्या तोंडल्याचं बदगं संपवायसाठी ब्रह्मघोटाळ्यात हात घालणं म्हणजे फारच आहे. मी त्यापेक्षा बदगं पाण्याच्या घोटाबरोबर गिळून टाकीन.
सुगरणींना चांगलंच आव्हान दिलंय संयोजकांनी.
शिजलेल्या तोंडल्याचं बदगं
शिजलेल्या तोंडल्याचं बदगं संपवायसाठी ब्रह्मघोटाळ्यात हात घालणं म्हणजे फारच आहे. मी त्यापेक्षा बदगं पाण्याच्या घोटाबरोबर गिळून टाकीन. >>
मामी इस म्हणींग राईट, शेजारी क्रॅनबेरी चटणी दिसतेय म्हणजे अमेरिकास्थित व्यक्तीचा घोटाळा दिसतोय.
माझे ही पैसे मृ वरच :). पण ओव्हनात, कूकरात असं मृ लिहिते का? नक्की आठवत नाही आहे. (अजून एक अस्मिता)
ओव्हनात, कूकरात इ चिनूक्साचा
ओव्हनात, कूकरात इ चिनूक्साचा हात मसुद्यावरून फिरल्याची निशाणी आहे.
पण बदगं, तिखटपूड, कुकरात,
पण बदगं, तिखटपूड, कुकरात, शिळा उपमा गिळला, कपभर चहा ढोसला > इत्यादी वाचल्यावर ही पाकृ मृणचीच.
अल्पना
अल्पना
काहीही म्हणा रेसिपी एकदम
काहीही म्हणा रेसिपी एकदम युनिक आहे. गुगलसर्च केला असता तोंडल्याच्या पराठ्याची एकही कृती सापडत नाही
योकु, बरोब्बर!! आता संयोजक
योकु, बरोब्बर!!

आता संयोजक दुसर्यांकडून रेस्प्या लिहून घ्यायला लागतील
बेटींग चालू असेल तर
बेटींग चालू असेल तर माझ्याकडून नं. १ ऑप्शन मॄ,. २-३ नंबरांवर आहेत काही मेंब्र पण ते चहा ढोसला, बदगं आणि शिळा उपमा गिळला वाचल्यावर सारखं सारखं मॄ चंच नाव डोळ्यासमोर येतंय.
काहीही हं अगो. दोंडाकाया
अरे पैसे काय, बेटींग काय!
अरे पैसे काय, बेटींग काय!
संयोजकांना अॉर्डर अॉर्डर म्हणायला लावू नका बरं. एवढा टीआरपी मिळालेल्या पाककृतींवर प्रवेशिका आल्या नाहीत तर त्या पुण्यवान बल्लवाचार्यांचे शाप लागून हात लावाल त्याचं बदगं होईल, लक्षात ठेवा. 
आशूडी, गीत लिहू काय?? एकदम
आशूडी, गीत लिहू काय?? एकदम गीताची सिच्युएशन आहे -
घोटाळा घोटाळा
झाला असा घोटाळा,
कुकरात घोटाळा,
मिक्सरात घोटाळा,
परातीत गेला घोटाळा...
चालले मी कराया पराठा
ब्रह्माने केला घोटाळा
(गोपाला गोपाला च्या चालीवर वाचावे
सैपाक करणारी अमृता सिंगच डोळ्यासमोर येते.)
सी पुढच्या वर्षी बेटिंग लावु
सी
पुढच्या वर्षी बेटिंग लावु कोणाची पाकृ ओळ्खा याच्यावर
(No subject)
अरे सीमंतिनी, दोंडकाया हा
अरे सीमंतिनी, दोंडकाया हा अतरंगी शब्द मला काय माहीत. मी आपलं तेंडली / तोंडली पराठा म्हणून सर्च केलं
पण आत्ता लगेच सर्च देऊन पाहिलं तर तोंडल्याची भाजी येतेय. पराठा दिसला नाही पहिल्या पन्नास शंभर फोटोंत तरी.
अगं अगो, टिंडोरा पराठा म्हणून
अगं अगो, टिंडोरा पराठा म्हणून सर्च कर, बरेच फोटो येतील येतील तोंडली पराठ्याचे.
ओके मो
ओके मो
मृण्मयी, तुझी काय इमेज आहे बघ
मृण्मयी, तुझी काय इमेज आहे बघ माबोवर..
>>>मृण्मयी, तुझी काय इमेज आहे
>>>मृण्मयी, तुझी काय इमेज आहे बघ माबोवर..
हो नं! उठा ले रे बाबा!
पराठे तुझेच का हे सांगून जा
पराठे तुझेच का हे सांगून जा बाई.
आधी पराठे करणार आहात का ते
आधी पराठे करणार आहात का ते लिहा.
पण ओव्हनात, कूकरात असं मृ
पण ओव्हनात, कूकरात असं मृ लिहिते का? >>>> मंजुडी लिहिते असं. पण बाकी सगळी साईन्स मृण्ययीची वाटतायत.
>> ओव्हनात, कूकरात असं मृ
>> ओव्हनात, कूकरात
असं मृ लिहीते .. बदगं सुद्धा मृ चंच आणि वर दर्शन देऊन स्वतः अवाहन करून गेली की पराठी करण्याचं ..
Pages