लागणारा वेळ - १ तास
लागणारे घटक -
१) १०-१५ कोवळी तोंडली
२) एक कांदा
३) ७-८ लसूण पाकळ्या
४) २ हिरव्या मिरच्या (ऐच्छिक)
५) १०-१२ काड्या कोथिंबीर
६) डावभर तेल
७) अर्धी वाटी डाळं
८) अर्धी वाटी शेंगदाणे
९) पाव वाटी तीळ
११)१ मोठा चमचा धणेपूड
१२) १ लहान चमचा हळद
१३) १ लहान / मोठा चमचा तिखटपूड
१४) १ मोठा चमचा आमचूर पावडर किंवा चिंचेचा कोळ
१५) २ मोठे चमचे गोडा मसाला/ किचन किंग मसाला किंवा रोजच्या भाजी-आमटीला वापरू तो कुठलाही मसाला
१६) अर्धी वाटी गूळ
१७) दीड मोठा चमचा मीठ
१८) कणीक (ह्याचं प्रमाण कृतीमध्ये येईल)
१९) पराठे भाजायला तेल
२०) ४ वाट्या पाणी
कृती -
१) चिराचिरी:
- तोंडली धुऊन, निथळून, एकाचे दोन (लांब) तुकडे करून बाजूला ठेवावी.
- कांदा, कोथिंबीर, मिरच्या हे घटक धुऊन बारीक चिरून घ्यावे.
- लसणाच्या पाकळ्या ठेचून बारीक चिराव्या.
२) मिक्सरमध्ये बारीक करणं -
- डाळं, शेंगदाणे (हे आधी खमंग भाजले असतील तर उत्तम), तीळ मायक्रोवेव्ह ओव्हनात १-२ मिनिटं हाय पॉवरवर भाजून, गार करून, ह्या सगळ्यांची मिक्सरमधून (एकत्र) बारीक भुकटी करून घ्यावी.
३) फोडणी -
- प्रेशरपॅनमध्ये तेल गरम करून, (वाटलं तर मोहरी - हिंग घालून,) चिरलेले सगळे घटक, मिक्सरमधून काढलेली भुकटी, मसाले, आमचूर पावडर / गूळ, मीठ घालावं. कुठलाही घटक वेगळा परतण्याची गरज नाही.
- कृतीसाठी लागणारे सगळे घटक आता प्रेशरपॅनमध्ये २-३ मिनिटं जास्त आचेवर परतून, त्यात ४ वाट्या पाणी गरम करून घालावं.
- व्यवस्थित ढवळून, झाकण लावून, कुकरच्या १-२ शिट्ट्या झाल्यावर आच बंद करावी.
४) पराठ्यांसाठी पिठाचा गोळा तयार करणं -
- प्रेशर पॅनची वाफ गेल्यावर भाजी थोडी गार होऊ द्यावी. भाजीला पातळ रस्सा तयार झालेला नसावा. कारण फार कणीक घालावी लागेल. साधारण घट्टं पिठल्याची कसिस्टन्सी असावी. रस्सा झालाच तर आटवून घ्यावा लागेल.
-पोटॅटो मॅशरनं तोंडली मोडून घ्यावी किंवा अख्खी भाजी सरळ एकदा मिक्सरमधून बारीक करावी.
-ह्या भाजीची एकदा चव घेऊन बघावी. त्यात आता कणीक घातली जाणार असल्यामुळे पराठ्यांना योग्य प्रमाणात होईल अशा अंदाजानं मीठ, तिखट वरून घालावं.
-भाजीत मावेल इतकी कणीक घालून पराठ्यांसाठी गोळा मळावा.
५) पराठे करणं -
- फार पातळ किंवा अतिजाड नसलेले, मध्यम जाडीचे पराठे लाटावे. अगदी सहज लाटले जातात.
-तवा व्यवस्थित गरम करून, त्यावर आधी पराठे दोन्ही बाजूंनी चांगले शेकून, त्यानंतर वरून तेल सोडून भाजावे.
-पराठ्यांचं वाण अगदी सर्वसामान्य तिखटमिठाच्या पराठ्यांसारखं दिसलं तरी चवीला वेगळे आणि छान लागतात.
-बराच वेळ भाजूनही पराठ्यांचं वाण कच्चं दिसतं. पण ते कच्चे नाहीत हे लक्षात घेऊन टोमॅटोच्या लोणच्याशी, दह्याशी गरमागरम खायला घ्यावे.
'ब्रह्मघोटाळ्याचे पराठे' ह्या शीर्षकामागची कहाणी सांगणं आवश्यक आहे.
तोंडली शिजायला वेळ लागतो. पण मसाल्याची तोंडलंभाजी वेळेअभावी लवकर शिजवणं भाग होतं. त्यामुळे प्रेशरकुक करायचं ठरलं. भाजीला लागणारे कृतीतले सगळे घटक प्रेशरपॅनमध्ये २-३ मिनिटं परतून, पाणी घालून प्रेशरकुक केले. प्रेशर निघाल्यावर झाकण उघडलं आणि... ब्रह्मघोटाळा!!! नेमकं का आणि कसं झालं माहिती नाही, पण सगळ्या घटकांचं शिजून एकजीव बदगं तयार झालं! जे काय कुकरात दिसत होतं ते चपातीशी खावसं वाटण्याच्या पलीकडलं होतं. तोंडल्यांच्या अस्तित्वाच्या थोड्या खुणा काय त्या बाकी होत्या. ते सगळं तसंच ठेवून दिलं. शिळा उपमा गिळला, कपभर चहा ढोसला. मग जरा तरतरी आली.
एरवी उरल्यासुरल्या वरण-भाज्या-आमट्यांमध्ये वेळोवेळी कणीक घालून लाटलेले पराठे, थापलेली थालीपिठं आठवली. ह्या तोंडल्याच्या पिठलंसदृश बदग्याला पराठ्यांमध्ये सद्गती देण्याचं ठरवलं....
....घातलेल्या मसाल्यांमुळे आणि इतर घटकांमुळे पराठे नेहमीपेक्षा फारच चवदार आणि वेगळे लागले. तेव्हापासून बरेचदा हे पराठे ठरवून ह्या पद्धतीनं होऊ लागले.
बदलण्यासाठी घटक -
तोंडली
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केवळ तोंडली बदलून त्याइअवजी
केवळ तोंडली बदलून त्याइअवजी इतर का ही ही पदार्थ घालून बाकी कृती तीच सेम ठेवायची आहे ना?
साहित्याची यादी फारच लांबलचक आहे.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
तोंडली ऐवजी ब्रह्म् घालून
तोंडली ऐवजी ब्रह्म् घालून घोटाळणार.
ही पाकृ मंजूडीची अथवा
ही पाकृ मंजूडीची अथवा पूनमची असल्याचा संशेव येतोय.
मस्त आहे ब्रह्मघोटाळा मला
मस्त आहे ब्रह्मघोटाळा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला शीर्षक, लिहिण्याची स्टाईल, बदगं वगैरे शब्द, फोटो सगळ्यावर फक्त आणि फक्त मृण्मयीचा ट्रेडमार्क दिसतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जोरदार!
जोरदार!
फक्त १०-१५ तोंडल्याची भाजी
फक्त १०-१५ तोंडल्याची भाजी कोण करायला घेईल?!! (हे रूनमेशचे कारभार असावेत काय??
मला शीर्षक, लिहिण्याची
मला शीर्षक, लिहिण्याची स्टाईल, बदगं वगैरे शब्द, फोटो सगळ्यावर फक्त आणि फक्त मृण्मयीचा ट्रेडमार्क दिसतोय >>>> तेरी बात मे दम है, अगो.
नाय गं सी अमेरिकेतल्या इं.
नाय गं सी अमेरिकेतल्या इं. ग्रो. मधे १०-१२ तोंडलीच चांगल्या स्थितीतली मिळाली असतील.
मामी कोवळी तोंडली हा शब्द
मामी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोवळी तोंडली हा शब्द महत्त्वाचा आहे कारण जून असतील तर त्याचं बदगं होणार नाही आणि वेगळा ब्रह्मघोटाळा होईल.
दीड मोठा चमचा मीठ, चार वाट्या
दीड मोठा चमचा मीठ, चार वाट्या पाणी आणि थोडी हेरगिरी, मायबोली इतिहासाचे(पा आ आ विभाग) सखोल वाचन यांवरून मला जरा वेगळा अंदाज लागतोय. सध्या गुलदस्त्यात ठेवू. बरोबर आला तर सांगू.
ही पाकृ मृण्मयीची किंवा
ही पाकृ मृण्मयीची किंवा मामीची.
मामी च्या *ला, घेऊन घ्यायचं
मामी![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
च्या *ला, घेऊन घ्यायचं तर तोंडलं घ्यायचं, ते कोवंळ निवडण्यात वेळ घालवायचा. ते कोवळं की जून ते बाहेरून कसं कळतं?? कापल्यावर लाल निघांल तर जून ना?? का दुसरी काही टेस्ट आहे??
सी, जून तोंडलं चिरतांनाच
सी,![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
जून तोंडलं चिरतांनाच जाणवतं. लाल असेल आतून तरी वापरलेलं चालतं (म्हणे).
तू बर्यापैकी कन्फूज झाली का आता (तरी)?
मी आणि हे इतके घोटाळे? काय
मी आणि हे इतके घोटाळे? काय हे? मेरी रेप्युटेशनका तो खयाल करो!
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मला तोंडल्याची भाजीच आवडते![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
अंंमळ जाद्याच खटपट आहे या पराठ्यांत!
१०-१५ तोंडल्यांना ४ वाट्या
१०-१५ तोंडल्यांना ४ वाट्या पाणी मृण नाही घालणार... ही मृणची पाकृ नाही. आधी शीर्षकावरून मला तसं वाटलं.
योकु हो, कनफूजड! लाल तोंडल
योकु
हो, कनफूजड!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
लाल तोंडल टाकून देते मी. जिभ जड पडते असे कुणीतरी सांगितले होते.
अरे काय दंगा चालवलाय! सगळ्या
अरे काय दंगा चालवलाय! सगळ्या डिटेक्टिव्ह अस्मिता झाल्यात.
प्रवेशिकेचा विचार करा.
नको... प्रवेशिकेसाठी इतके
नको... प्रवेशिकेसाठी इतके घोटाळे कोण करेल?
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
छ्या! खूपच फाफट पसारा यादी
छ्या! खूपच फाफट पसारा यादी आहे.
बरं, इतक्या यादीत फक्त एकच घटक बदलून?
मी इतकी खटपटीची कोण्तीही
मी इतकी खटपटीची कोण्तीही रेसिपी करत नाही गं, मंजूडी.
तुझी पराठ्यांची स्पेशॅलिटी
तुझी पराठ्यांची स्पेशॅलिटी आणि वाटीतलं दही बघून मला वाटलं ही तुझीच पाकृ.
आज अॅक्च्युअली घरी ब्रह्म
आज अॅक्च्युअली घरी ब्रह्म नाही पण त्यापेक्षा भारी असे त्रिमुर्ती घोटाळ्याचे पराठे केले ब्रेफाला. उ.लेले बटाटे, फ्लॉवरची उरलेली भाजी आणि ज्युस काढून झाल्यावर उरलेला गाजराचा चोथा.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे बापरे किती ते घटक! मी तर
अरे बापरे किती ते घटक!
मी तर घटक गोळा करता करताच घोटाळा करीन !!
मी तर घटक गोळा करता करताच
मी तर घटक गोळा करता करताच घोटाळा करीन !!>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला टिनावर पण संशय येतोय
मला टिनावर पण संशय येतोय थोडा.
तिच्या पाकृमधे संयोजकांनी बदल केले असतील थोडेसे (लिहिण्याच्या स्टाईल मधे)
रीया, टिना भाजी करताना त्यात
रीया, टिना भाजी करताना त्यात आमचुर आणि गुळ घालेल असं वाटतंय तुला?
आणि तिच्या रुमवर मावे आहे?
मुझे अब मंजूडी पे शक हो रहा है.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मावे बद्दल माहीत नाही. गुळाचं
मावे बद्दल माहीत नाही.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
गुळाचं लक्षात नाही आलं. आमचूर बद्दल बेनिफिट ऑफ डाऊट चालून जाईले की
गुळ आहे म्हणजे टिना नाही. मग जास्त शक्यता मृण्मयीचीच वाटतेय.
अल्पना, गूळ घातलेले पराठे?
अल्पना, गूळ घातलेले पराठे? माझ्या हातून?? तोंडल्याची भाजी गिच्च झाली तर मी फारतर पंचमृत करेन गं त्याचं.
मुझे अब मंजूडी पे शक हो रहा
मुझे अब मंजूडी पे शक हो रहा है![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>
बात मे दम है
भरतदादा, सांगून टाका की. आपल्या त्या ह्यांच्या सारखं 'मला तर हे आधीच माहीत होतं' असं कशाला करायचं म्हणते मी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages