थेंबे थेंबे तळे साचे - पाणी बचतीचे उपाय

Submitted by सावली on 8 September, 2015 - 02:23

यावर्षी अजिबातच पाऊस झालेला नाही आणि आता तो गणपतीत तरी पडेल, नवरात्रात तरी पडेल या आशेवर जगण्यातही फारसा अर्थ नाही. आतापर्यंत जो काही पाणीसाठी झालेला आहे तोच पुन्हा पाऊस पडेपर्यंत पुरवुन वापरणे याशिवाय दुसरा उपाय नाही. दुर्गम भाग किंवा जिथे पाणी कमी आहे तिथे लोक आधीपासुनच कमी पाण्यात दिवस भागवतात कारण जवळपास दरवर्षी तिथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. मात्र मुंबईसारख्या शहरात फारसे पाणी बचतीचे उपाय करावे लागत नाहीत. इतर शहरातले फारसे काही माहित नाही मात्र मोठ्या शहरात सहसा दिवसभरातुन एखाद वेळा तरी पाणी उपलब्ध होत असावे .

पण यावर्षीची दुष्काळी अवस्था पहाता ज्या ज्या शहरांत/ गावात रोज काही तास किंवा अगदी २४ तासही पाणी उपलब्ध आहे त्यांनीही स्वतःला पाणी बचतीची सवय लावुन घ्यायला हवी. इथे पाणी वाचलं तर ते दुसर्या ठिकाणी जिथे कमी उपलब्धता आहे तिथे देता येईल असे वाटते.

रोजच्या कामात कुठे पाणी वाचवता येईल , कुठे कमी पाण्यात भागवता येईल त्याबद्दलच्या उपायांची चर्चा या धाग्यात करुयात.

प्रत्यक्ष पाणी बचत

#
बोअरवेलचे पाणी उपलब्ध आहे म्हणुन हवे तितके उपसण्यात अर्थ नाही. त्यामुळे आधीच कमी असलेली पाण्याची पातळी अजुनच कमी होईल.

# गाडी धुण्यासाठी पाईप लावुन फवारा मारुन न धुता, बादलीत पाणी घेऊन धुतले तर खुप पाणी वाचते.

# घराची फरशी, बाल्कनी, खिडक्या भरपुर पाणी वापरुन न धुता, पुसुन घेता येईल.

#
पाण्याच्या नळासाठी एक जोडणी मिळते, त्यामुळे पाण्यात हवा मिक्स करुन पाण्याचा फ्लो जास्त वाटतो. ते जोडुन घ्यावे त्यामुळे नळ उघडल्यावर कमी पाणी वाया जाते.

#
भाज्या धुतलेले सगळे पाणी बादलीत साठवुन ठेवुन झाडांना घालावे किंवा टॉयलेटमधे ओतण्यासाठी ठेवता येईल.

#
भांडी कमीत कमी पाण्यात घासण्यासाठी वाहत्या नळाखाली न धुता बादली / टब मधे पाणी घेऊन धुता येतील.

#
जेवल्यावर लगेच एखाद्या भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यातच सगळ्या ताटं, वाट्या व इतर भांडी यांचे खरकटे काढुन टाकता येईल. हे वाहत्या पाण्याखाली केल्यास जास्त पाणी लागते.

#
कपडे धुण्यासाठी शक्यतो वॉ. म. टाळता येईल. दुसरा उपाय नसल्यास एकावेळे दोन / तीन दिवसाचे कपडे साठवुन धुतले तर कमी पाणी वाया जाईल.

#
अगदीच पाणी टंचाई येईल तेव्हा मशिन मधे तीन वेळा पाणी टाकुन कपडे विसळले जातात. त्यातले दुसर्या आणि तिसर्या वेळेचे पाणी एखाद्या ड्रम मधे साठवल्यास ( हे वेळखाऊ काम आहे मात्र ) टॉयलेट्मधे टाकायला , कपडे भिजवायला, भांडी पहिल्यांदा विसळुन घ्यायला वगैरे वापरता येईल. साबणाचा अंश असल्याने हे झाडांना वापरता येणार नाही.

#
जेवताना ग्लासमधे घेतलेले, वॉटरबॅग मधुन उरलेले पाणी सुद्धा फेकुन न देता हात धुणे किंवा झाडांना घालणे यासाठी वापरता येईल

# घरी किंवा ऑफिसमधे स्प्लिट एसी असेल तर त्या एसीच्या पाईपमधुन पाणी बाहेर येते ते एका बादली साठवुन वापरता येईल. हे खरेतर अगदी शुद्ध, म्हणजे हवेतुन आलेले पाणी असते. मात्र एसीचे पाईप साफ नसल्याने पाणीही खराब होते.

#
घरातल्या सगळ्यांना वेळोवेळी बोलुन सध्याची पाण्याची परिस्थिती आणी दुष्काळ याबद्दल बोलुन पाणी बचतीसाठी उद्युक्त करायला हवे. तसेच घरकामाला येणार्‍या बायकांनाही याबाबत सांगत राहुन, पाणी कमी वापरायचे सुचवायला हवे.

# ग्रे वॉटर ट्रिटमेंट प्लांट इमारतीत बसवता येईल, हा खर्चिक उपाय आहे शिवाय जागाही लागते.

अप्रत्यक्ष पाणी बचत करताना अन्न वाया न घालवणे हा खुप मोठा उपाय आहे. या वर्षी काही पिकलंच नाही तर आपण सगळेच काय खाणार त्यामुळे अन्नधान्य आयात केले तर त्याचा एकुण खर्च वाढणार.
तसेच वीजेची बचत करणे मह्त्वाचे आहे. हायड्रोलिक प्लांट पासुन वीजनिर्मिती यावर्षी अगदी कमी होण्याची शक्यता आहे.

अजुन काही उपाय असतील तर इथे लिहा.

प्रतिसादातुन कॉपी केलेल्या कल्पना

#(- अमा )
जमीन पुसणे एक दिव्सा आड

# (- हर्पेन)
टॉयलेट मधल्या एकेच बटन असलेल्या फ्लश टँक मधे एकेक लिटरच्या दोन बाटल्या ( पाण्याने भरलेल्या ) ठेवल्या असता प्रत्येक फ्लश मागे २ लिटर पाणी वाचवले जाऊ शकते. तरीही फ्लश मात्र व्यवस्थित होते. टँक कपॅसिटीचा जरा नीट अंदाज घेऊन अजून एखादी बाटली ठेवता येते का ते बघावे.

( -अरुंधती कुलकर्णी )
#
घरात बाल्कनीत किंवा अंगणात झाडे, रोपे वगैरे लावली असतील तर त्यांच्या मुळांजवळचा भाग सुका पालापाचोळा, निर्माल्य, सुकलेली फुले इत्यादींनी झाकल्यास जमीनीतला ओलावा टिकायला मदत होते. त्यांना खरकटी भांडी विसळलेले पाणी (गाळून) घालू शकता.

#
शॉवर वापरण्याऐवजी बादलीत पाणी घेऊन आंघोळ करणे.

#
जिथे शक्य आहे (आणि पाणी वाया जायची भरपूर शक्यता आहे तिथे) नळाच्या पाण्याची धार कमीच करून ठेवणे. खास करून वॉशबेसिन वापरताना भरपूर पाणी वाया जाते. नळाची धार कमी करायला खाली एक वेगळा नळ असतो बऱ्याच वॉशबेसिनना!

#
दात घासणे, दाढी करणे यांसाठी वाहत्या नळाचा वापर न करता भांड्यात पाणी घेऊन ते गरजेप्रमाणे वापरणे.

#
घरातील व सोसायटीतील गळणारे सर्व नळ, पाईप्स दुरूस्त करून घेणे.

#
आपल्या प्रभागात / गल्ली किंवा एरियात कोठे पाणी वाया जात असेल तर शासनाकडे तशी लेखी तक्रार करून तिचा पाठपुरावा करणे.

#
सोसायटीच्या टाकीचे पाणी वाहून न जाईल अशी व्यवस्था करणे.

#
गाड्या पिण्याच्या पाण्याने न धुता कपडे धुण्यासाठी वापरलेले साबणपाणी वापरून त्याने धुणे.

#डीविनिता
रोज रात्री बिल्डिंगचे गच्चीतले व्हॉल्व्ह बंद करतो, व सकाळी साडेसहाला परत चालू करतो. यामुळे वरच्या टाकीत पाणी साठते, लवकर सोडलेले पाणी नळ चालू राहिल्याने जात होते ते आता वाया जात नाही

(आशिका )
#
हौसिंग सोसायटीच्या किंवा ज्यांकडे वैयक्तिक टाकी आहे अशा गच्चीवरील पाण्याच्या टाकीला अ‍ॅटोमॅटीक पंप लावणे ज्यामुळे टाकी भरताच अधिक पाणी टाकीत पडणे थांबेल व ते पाणी वाहून जाणार नाही.

#
नळांना एक नेट बसवून पाण्याची धार कमी करुन घेता येईल.

#
हौसिंग सोसायटीत नोटीस लावून पाण्याचा पाइप वापरुन गाड्या, अंगण धुणे यावर बंदी घालावी.

#
दहीहंडी उत्सव तर होऊन गेला, पण मार्च महिन्यात होळीच्या सुमारास कदाचित ही पाणी समस्या अधिक बिकट झाली असेल. त्यावेळेस पाण्याने रंग खेळण्यावर बंदी घालण्यात यावी.

#
अनेक घरात पिण्याचे पाणी भरून ठेवले असते व ते उरले तर दुसर्‍या दिवशी सरळ ओतून टाकले जाते. ते पिण्यासाठी नाही तर निदान इतर गोष्टींसाटी वापरले जावे.

(दक्षिणा )

#
झाडाला एक दिवस आड पाणी.

#
ओटा प्रथम साध्या कोरड्या फडक्याने पुसून, वरून फक्त किचन क्लिनर स्प्रे करून नविन फडक्याने पुसणे. ओटा धुवत नाही. (अगदी ७-८ दिवसातून एकदा)

#
वॉशिंग मशिन आठवड्यातून २ वेळा लावते.

#
लघुशंकेसाठी पुर्ण फ्लश वापरत नाही.

#
बाल्कनी मी धुवत नाही, कबुतरांनी अतिशय घाण केली तर १५-१७ दिवसातून एक छोटी बादली पाणी ओतून ठेवते ती घाण पुर्ण खरवडून काढून दुसर्‍या बादलीत फक्त स्वच्छता करते. साबण पावडर वापरत नाही.

# (दिनेश. )
ताटाच्या ऐवजी पत्रावळी वापरता येतील. कोरडे पदार्थ ठेवण्यासाठी पण केळीची पाने, द्रोण, फॉईल वापरता येईल.

(ऋन्मेऽऽष )
#
सरकारने जाहीरातींचा भडीमार करत लोकांना सद्य परिस्थितीची जाणीव करून देत वेळीच सर्वांना पाणी वाचवायला आवाहन करायला हवे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच लोक घरच्या घरी बादलीत विसर्जन करून ते पाणी झाडांना घालतात.>>>मी हाच मार्ग वापरतो. आणि मुर्ती लहान असेल तर ते पाणीही कमी पुरतं. परत झाडांसाठी उपयोग होतोच.

आणि ते निर्माल्य टाकण्यासाठी ठेवलेल्या पात्रात न टाकता नदित शिरवण्याच्या अट्टाहासापायी प्लास्टीकच्या पिशवीसहित तो फेकणार्‍यांचा राग राग येतो मला पन Sad
कुणाला सांगायला जाव तर ऐकेल तर शप्पथ..
आजकाल लोकांना मॉब मधे जाऊन समजावणे वजा धमकावणे केले तरच भितीपायी ते ऐकतात नै तर हो का म्हणत परत जैसे थे..त्रास..

मला स्वतःला शाळेत असताना शिकलेल्या गोष्टीची सतत आठवण येते कि या भुईवर पिण्याच पाणी तुलनेने फार कमी आहे. आणि त्यातही आपली मानसिकता अशी कि पाण्याच भांड जरी बदलल तरी पिण्याच पाणी आणि टाकायच पाणी यात आपण पूर्णपणे डिफरंशीएट करतो. मग भलेही ते पाणी इतके दिवस उघड्यावर वाहत असलेल्या नदितुन , धरणातुन आलं तरी ते प्यायचं आणि अतिशय स्वच्छ असलेल्या घरावरच्या पाण्याच्या टाकीत गेलं कि ते वापरायच अशी आपली जडणघडण होते. या गोष्टीवर इलाज म्हणजे मी पिण्याच्या पाण्याचा अतिशय जपुन वापर करते..आता तर दिवसाआड नळ यायला सुरुवात झालीच आहे त्यामुळे आणखीनच जपून..

-> मला डाळ, तांदूळ, भाज्या, फळ धुवायला टाकीतल पाणी चालत.

-> झाडांना पाणी देताना त्याच्या मुळाशी असलेल्या मातीचा आणि पावसाचा मी अंदाज घेते.

->ब्रश करण्यासाठी मी प्यायच पाणी वापरत नाही. (हो कुणी कुणी वापरतात.)

->कधीच जुनं झालेल प्यायच पाणी मी बेसिन मधे फेकत नाही. ते एक तर बादलीत जात नाही तर झाडांना.

-> वाफारा घेताना प्यायच पाणी घेत नाही. (हो काहीजण घेतात)

-> पाहुण्यांना पाणी देताना मी अर्धा पेलाच भरुन देते. एखाद्यान ते पीलं नाही तर परत माठात टाकते . आणि उष्ट करुन सोडून देणारे पेले झाडाजवळ ओतते. नको असल्यास या ग्लासातल पाणी त्यात टा़कुन हव तेवढ पाणी पिणार्‍यांच जाम कौतुक वाटत मला..

मी मुळात प्यायचं पाणीच २ दिवसांनी एकदा भरायचे, कारण वेळ रोज साधायला मला जमत नसे आणि अडीच माणसांच्या वापरासाठी (स्वयंपाक आणि पिण्यासाठीसुद्धा) २ कळशा आणि २ जार पाणी पुरायचं. आता तसंही एक दिवसाआडच येतंय. त्यामुळे प्यायचं पाणी जपूनच वापरलं जातं.
इतरः

वॉ म रोज लावावं लागतं कारण लेक भरपूर कपड्यांचं धुणं काढते रोज. पण तिसर्‍या सायकलचं पाणी ड्रेन न करता पुढचा लॉट असेल तर त्याला साबण घालयला वापरते मी. ते पाणी स्वच्छच असतं. नसेल तर पायपुसणी धुवायला ते एका सायकलचं पाणी मला पायपुसणी तिनदा खळबळवयला उपयोगी येतं. मी रोज पायपुसणी धुते, कारण जुने कॉटनचे कपडे असतात पायपुसणी म्हणून. मला मॅट्स आवडत नाहीत. आणि लेक तशी मळकी मॅट्स घेऊन घरभर फिरत बसते! की पुन्हा तिचे हात धुवा! म्हणून हा उपाय.

बेसिनजवळ मग ठेवलाय, आधी तो भरून तेच पाणी वापरते. शक्यतो नळ चालू करत नाही. ओटा रोज धुवत नाही. पुसून घेते. ३-४ दिवसांनी एकदा धुते. अगदीच दूध उतू गेलं किंवा मेजर सांडलवंड झाली तर मात्र लगेच धुते.

खरकटी भांडी एकाच मगातल्या पाण्याने अगोदर साफ करून मग घासायला टाकते आणि कामवाल्या ताई भांडी घासायला लागल्या की समोर उभी राहून पाण्यावर लक्ष ठेवते. फरशी पुसायला पाऊण बादली (लहानशी बादली) पाणी पुरतं.

गाडी धुवत नाही. पुसतही नाही. मला मळकट गाडी चालते. नवर्याने कार पुसली (तोही पाणी कमी वापरायचं म्हणून ओल्या फडक्याने पुसतो कार) तर माझ्या दुचाकीला लकाकी येते. Wink

मला तर ताजं पाणी ही व्याख्याच पटत नाही. आपल्या घरी नळाला प्यायचं पाणी येतं ते कुठे तरी साठवलेलं असतंच की आधी, नव्याने आपल्या घरी येतं म्हणजे शिळं नाही असा होतो का? पावसाने नदीत, तलावात, धरणार साठवण करून त्या पाण्यावर प्रक्रिया करून आपल्याला पुरवले जाते मग ते ताजे कसे?
अगदी ताजेच पाणि प्यायचे असेल तर चातकासारखे ढगाकडे चोच उघडून बसावे लागेल.

मी तर प्यायचं म्हणून भरून ठेवलेलं पाणी पिऊ शकते अगदी २-३ दिवसांनी सुद्धा. मला काहीही फरक पडत नाही. मारे गडूत सिल करून ठेवलेली गंगा पवित्र आणि २-३ दिवसाचं पाणी शिळं? Uhoh
अजब न्याय आहे.

माझ्याकडे वेगळे नळच नाहीत. जे येते ते एकाच नळाला येते. प्युरीटमधे ते टाकले की खाली येते ते प्यायचे एवढाच फरक. प्युरीटमधले पाणी संपले की नवीन भरते. शिळे बिळे इल्ले.

नीधप, लोकं ढाबा वगैरे ठिकाणी रस्ता धुतल्यासारख्या चुळा भरतात, प्यायच्याच पाण्याने तोंड खसाखसा धुतात, नाक शिंकरतात, हात-पाय-मान वगैरेही धुतात (सेमी-अंघोळ) त्याला काहीतरी आळा हवा. चूळ भरायला प्यायचंच पाणी हवं हे बरोबरच आहे, पण बाटलीभर पाण्यातलं निम्मं पाणी अनेकजण चुळांसाठी वापरून रस्त्यावर त्या पाण्याचे सडासंमार्जन करताना दिसतात.

सध्या सोसायटी मध्ये एकच मिटर असते त्यामुळे एखाद्याने जास्त पाणि वापरले तर त्याला बिल येत नाही ते सगळ्याना विभागुन जाते त्यामुळे त्या फॅमिलीला त्याची झळ बसत नाही..प्रत्येक घराला जर पण्याचे मिटर असेल आणि वापराप्रमाणे जर चार्ज पडत असेल तर पाण्याचा अपव्यय टाळला जातो.

आमच्या कर्णाटकातल्या गावी मागच्या कित्येक वर्षापासुन ( पावसाळ्यातिल काही महिने सोडल्यास ) टॅकर ने पाणी येते. ते पाणी घरपोच आणुन द्यायला घागरीला २० रुपये घेतात. (सधारणतः १ रुपया लिटर होते). अश्यावेळी वर दिलेले सगळे उपाय केले जातात. कुठलेच पाणी टाकुन देण्यात येत नाही. प्यायच्या माठातले उरलेले पाणी न्हाणी मध्ये, कपडे पिळलेले पाणि संडासात वापरले जाते. जास्त पाणि वापरले की जास्त पैसे जातात म्हणुन सगळेच पाणि जपुन वापरतात.

मी तर प्यायचं म्हणून भरून ठेवलेलं पाणी पिऊ शकते अगदी २-३ दिवसांनी सुद्धा. मला काहीही फरक पडत नाही. मारे गडूत सिल करून ठेवलेली गंगा पवित्र आणि २-३ दिवसाचं पाणी शिळं? अ ओ, आता काय करायचं
अजब न्याय आहे. >>>>
अगदी माझ्या मनातला बोलला + ११११११११११११११११११११११११११११११११

प्रत्येक सोमवारी माझ्या ऑफिस मधला सर्व साधारण दृष्य आहे, लोक पूर्ण /अर्ध्या भरलेल्या बाटल्या अतिशय निर्बुद्धपणे रिकाम्या करताना पहिला आहे मी.
वर काही बोलायला गेलो तर 'अहो शुक्रवारी भरलं होता आता शिळं झाला आहे' असा सांगतात. नळाला येणार/ धरणातील /विहिरीतील / बोर मधलं कुठलं पाणी ताज असतं ते पण कधी न कधी साठलेलंच असता ना Angry

बर …. २ दिवसां नंतर जर हे पाणी शिळं होणार जर हे कळत तर आपल्याला पाहिजे इतकच पाणी भरून ठेवा न ?? हे न कळण्या इतपत तर आपण मंद बुद्धी नाही Sad

महाराष्ट्रात तसेच देशाच्या अनेक भागात पाण्याची मोठी टन्चाई जाणवते आहे... पाण्याचा कमी वापर करण्याबाबत येथे दिलेले काही पर्याय अमलात आणणे सहज शक्य आहे.

Pages