रामराम दोस्तांनो,
वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. " या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .
सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..
सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्यांचा मित्र असणार्या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.
वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.
त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
.. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
गप्पांचे पान मधे तो धागा
गप्पांचे पान मधे तो धागा वाहता होतो..नविन पोस्ट पडतात तेव्हा जुन्या पोस्ट उडून जातात..
या धाग्यावर जसे आपण प्रचि टाकतो त्याचप्रमाणे त्यांची माहित,, इतर माहिती, सल्ले सर्वच येत..
प्रत्येकाला रोजच्यारोज माबोवर भेट देण जमल नाही तरी माहिती हवी तेव्हा लेखनाच्या धाग्यात वाचता येते पण गप्पांच्या पानात तस होत नाही..किंबहुना कधी कधी धडाधड पोस्टी पडत गेल्यास दोन मिनीटात काही उपयोगी लिहिलेल्या गेलेल हि पुसुन जात म्हणुन हा धागा लेखनाचाच हवा
साधना. यावरुन आठवले की एका
शी ब्वा..मी लय्यच एक्सप्लेन
शी ब्वा..मी लय्यच एक्सप्लेन करत बसली वाट्टे
मासा आत्ता दिसला..मस्ताय..
असे पु ल देशपांडे गार्डन मधे पन आहे ना ? तिथल्या छोट्या तलावात
रॅटल स्नेक फक्त अमेरिका खंडाच्या वाळवंटात आहेत.>> तेच तर .. मलाही हेच नॉलेज होत पण मी शँकी नेमके कुठ राहतात आणि सापाला लगे खुळखुळ्या अस आपल्याकडल नाव दिल्याने मी विचारले.. तसे त्यांनी लिहिल्याप्रमाणे ते कोकणात जर राहतात तर परत तोच प्रश्न हा दिसला कुठ ?
साधना, यस कोई मासा आहे,, चीन
साधना, यस कोई मासा आहे,, चीन मधे दोन कोई आणी एक काळा मासा (लहान आकाराचे) फिश टँक मधे ठेवतात्,तिथेही हे समृद्धीचे प्रतिक समजले जातात, खातांना पाहिलं नाही कोणाला..
जागु.. इट्स ओके.. आता बरोबर झालंय नं सगळं..
वा वा, हे कोइ मासे फक्त
वा वा, हे कोइ मासे फक्त मोबाइलच्या लाइव्ह वॉलपेपरमध्ये पाहिले होते. गोड दिसतायत ते..
टीना, अगं तो खुळखुळ्या म्हणजे आपल्याकडचा रसेल वायपर म्हणजे घोणस आहे.
खरा रॅटल स्नेक अमेरिका खंडाच्या वाळवंटात असतो आणि दक्षिण आफ्रिकेत पण आढळतो..
ओह..थँक्यु आत्मधुन.. शँकी ने
ओह..थँक्यु आत्मधुन..
शँकी ने तिथ कंसात रॅटल स्नेक लिहिल्यामुळे माझा गोंधळ झाला..
हे फ़ुल कसलं आहे?
हे फ़ुल कसलं आहे?

ही आपली लिली
ही आपली लिली
व्हाइट लिली
व्हाइट लिली
आज परत कोई मासे पाहायला गेले
आज परत कोई मासे पाहायला गेले तर कोई ले गया मेरे मासोंको
तळे पाणी काढुन स्वच्छ रिकामे. मासे कुठे गेले??? (कोणाच्या पोटात????)
सावली, अस्सल मत्स्यप्रेमी अजुन कुठला विचार करणार ??
शँकीने जो फोटो टाकलाय तो घोणसचा आहे?
नाही नाही, फोटो रॅटल स्नेकचाच
नाही नाही, फोटो रॅटल स्नेकचाच आहे. मी फक्त खुळखुळ्या म्हणजे घोणस एवढंच म्हणतेय
ही आपली लिली >>>>>>>>.अरे वा!
ही आपली लिली >>>>>>>>.अरे वा! धन्यवाद साधना, आत्मधून.
ओके. मीही संभ्रमात पडले.
ओके. मीही संभ्रमात पडले. घोणसाच्या अंगावर चेनसारखी डिजाईन असते हे बघुन ठेवलेय.. कधी गाठ पडायची शक्यता आढळली तर दुरुनच पळायला बरे. भारतात आढळणा-या चार विषारी सापांपैकी हे महाराज एक आहेत ना.
दिनेशदा कुठे आहेत? दिनेशदा,
दिनेशदा कुठे आहेत?
दिनेशदा, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ऑगस्ट महिना सुरु झाला.
कधी गाठ पडायची शक्यता आढळली
कधी गाठ पडायची शक्यता आढळली तर दुरुनच पळायला बरे. >>>>>>>>>:हाहा: साधने जागूला घेऊन जा बरोबर. मग फोटो काढूनच येशील.
घोणस इथे बघा,
घोणस इथे बघा, http://www.indianaturewatch.net/displayimage.php?id=354325
फोटोतच कसला भयंकर दिसतोय..
माझ्या आईला चावलेलं एकदा
माझ्या आईला चावलेलं एकदा घोणसीचं पिल्लू
.
.
हा घ्या इथ आणखी एक
हा घ्या इथ आणखी एक घोणस..
राजीव गांधी पार्क..
व्वा दोन दिवसात ५४ पोस्टी....
व्वा दोन दिवसात ५४ पोस्टी.... मस्तच..
एक से बढकर एक साप..
शाब्बास टीना, जागुच्या पाठोपाठ तुला पण धीटाई आली ग..
गप ए.. तो काचेच्या पलिकड होता
गप ए..
..
तो काचेच्या पलिकड होता
सापांना बघुन अजुनही हितभर होते पण बघितल्याशिवाय राहावत नाही..एक प्रकारच आकर्षण आहे त्यांच्याबद्दल..
म्हणुन दिसला कि 'आ बैल मुझे मार' च्या तोर्यात 'आ साप मुझे चाव(के दिखा)' अस म्हणत होईल तितक्या जवळ जाऊन बघत असते मी
तर मी काय सांगत होती ?
हां..उसके और मेरे बीच ने एक भला मोठा,जाडा काच था..
'आ बैल मुझे मार' च्या
'आ बैल मुझे मार' च्या तोर्यात 'आ साप मुझे चाव(के दिखा)' अस म्हणत होईल तितक्या जवळ जाऊन बघत असते मी ..
ओ टीनाबाय, एवढ्या पण शूरवीरपणा दाखवू नका. इथे काच होती म्हणून ठीक.
अरे जेव्हा काच असते तेव्हाच
अरे जेव्हा काच असते तेव्हाच तर ती शक्य तितक्या काचेच्या जवळ जाऊन बघते. एरवी जर साप समोर आला तर सापापेक्षाही जास्त वेगात ती पळेल
साधना..तुच ग बस तुच ओळखल मला
साधना..तुच ग बस तुच ओळखल मला

टिने पण ते साप किती घाण
टिने पण ते साप किती घाण दिसतात. एवढं काय प्रेम तुझं त्यांवर
साधना, लय भारी.
साधना, लय भारी.
टिने पण ते साप किती घाण
टिने पण ते साप किती घाण दिसतात. >>> नाही ग रिया किती चकचकीत दिसतात.
शाळकरी वयात , गारुड्याकडे असलेल्या सापाला हात लाऊन पाहिला होता.साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे म्हणून शाळेत शिकवले होते म्हणून.
चकचकित तर गांडूळं पण दिसतातच
चकचकित तर गांडूळं पण दिसतातच की गं
रीये, घाण नको ग
रीये,
घाण नको ग म्हणु..
भितीदायक म्हण हव तर पण घाण नै हं..घाण या शीर्षकाखाली गांडूळ, पैसा, अळ्या असले सगळे येतात..
ये उन सबसे परे है..हा रौफदार वाटतो मला. एवढा दरारा पाहिजे एखाद्याचा कि दिसला कि चार हात लांब राहिल लोकं ..
सापांचाच विषय निघाला आहे तर
सापांचाच विषय निघाला आहे तर हे काही साप...
सुंदरता दाखवणारे...
चापल्य दाखवणारे...
दरारा दाखवणारे....
आणि रुबाबदार.......
(सापांचे सर्व प्रचि : सौजन्य : युवराज गुर्जर...)
01.. Green Pit Viper Sri Lanka..
Pages