घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी

Submitted by निराली on 28 May, 2011 - 17:24

परदेशातल्या व देशातल्या घरांमधे एक मोठा फरक जाणवतो तो म्हणजे धुळीचा व स्वच्छतेचा.
परदेशात खुप कमी श्रमात घर स्वच्छ ठेवता येते पण भारतात रोजचं डस्टिन्ग निदान दोनदा तरी करावं लागतं. पण दोन्ही ठिकाणी जर right tools and products माहीती असतील तर काम खुप सोप्पं होतं.

काही बाफं वर सिंक व बाथरूम किंवा भांडी कशी स्वच्छ ठेवावीत हे प्रश्नं पाहिले म्हणून हा घराच्या स्वच्छतेचा (सगळ्याच प्रकारच्या) धागा उघडलाय.

बरेच वेळा काही जणांना जे products किंवा पद्धती अगदी बेसिक वाटतील त्या बकिच्यान्ना माहिती पण नसतील त्यामुळे जे काय माहिती असेल, बेसिक किंव्हा रीसर्च केलेले ते सगळे लिहावे, ज्याने अनेकांना
मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किचन मधल्या खिडकीच्या जाळ्या कशाने स्वच्छ कराव्या? फोडणी / तळणी चे तेल + धूळ यामुळे इतर खोल्यांमधल्या खिडक्यांपेक्षा ओशट होतात.

हे कुठे विचारू माहित नाही म्हणून इथे विचारतेय.
शिफ्टिंग करताना फर्निचर व इतर वस्तूंवर लावल्या गेलेल्या ब्राऊन टेपांचे डाग आणि ट्रान्स्परण्ट टेपांचा चिकटपणा दोन्ही घालवायचे तर काय करता येईल? कुठल्या सोल्युशनने वगैरे पुसून जातील का?
गेल्यावेळेसच्या (५ वर्षांपूर्वीच्या) शिफ्टिंगच्या वेळचेही असेच डाग राह्यलेत काही फर्निचरवर अजून. पण थोडेच होते आणि फार दर्शनी भागात नव्हते म्हणून मी सोडून दिलेय. पण एवढे वर्षात य वेळा पुसले जाऊनही ते डाग निघालेले नाहीयेत.

remove-tape-residueremove-stain.com/

remove-tape-residueCombine a teaspoon of dish detergent with a cup of white vinegar in a spray bottle and mist over the wooden surface to then remove any oil residue. Use a clean towel or paper towel to lift up the cleaning solution.

आमचं हॉलमधलं दर्शनी भागातलं फर्निचर लेकीने पूह आणि मिकिचे मोठे रेडीमेड स्टिकर्स आणि अजून काय काय तिने केलेली कलाकारी चिकटवून भरून टाकलं होतं. एक दिवस अचानक मनात काय आलं तर ते सगळं ओढून काढून टाकलं. मग त्यावर राहिलेले चिकट डाग एक दिवस दुपारी स्कॉच ब्राईट आणि लिक्विड सोपने तिनेच घासले, तर सगळं फर्निचर व्यवस्थित स्वच्छ झालं.

फर्निचरला सन्मायका आहे की व्हिनिअर?
सन्मायकावर करेन पण व्हिनिअरवर स्कॉच ब्राइट वापरायला भिती वाटतेय.
माझ्या प्लॅस्टिकच्या ड्रॉवर युनिटसवरचे डाग स्कॉच ब्राइटने घासून गेले नाहीयेत.

आधी अ‍ॅसिटोनने पूस, मग स्कॉच ब्राईट पाण्यात भिजवून हळूवार घासलंस तरी पुरेल.

स्कॉच ब्राईटने घासल्यावर फर्निचरचा घासलेला भाग अचानक भयंकरच स्वच्छ दिसू लागला. मग ती शेड मॅच करण्यासाठी अख्खं युनिट स्कॉच ब्राईटने पुसावं लागलं Lol
तस्मात्, एका बैठकीत होणार काम नाही हे.

मंजुडीच खरय.
माझ्या घरातले ऑफिस मध्ये असे डाग रॉकेल / पेट्रोल ने निघालेत.
प्लास्टिक खराब होऊ शकते.

आपल नेहमीच स्वयंपाकाच तेल + त्यात बेकिंग सोडा मिक्स करून थिक पेस्ट बनवा . ती पेस्ट स्टिकी रेसिड्यु असणार्‍या भागावर लावून हातानी किंवा छोट्या ब्रशने हळु हळु घासा . ( स्क्रॅचेस येणार नाहीत असा छोटा ब्रश) लगेच निघतो स्टीकी रेसिड्यु. नंतर गरम पाण्यात पेपर टॉवेल सोक करून पुसून घ्या.
इथे गु गॉन नावाचे प्रोडक्ट मिळते. त्याचे घरगुती व्हर्जन आहे हे. कुठलाही स्टीकर निघतो याने.

प्लीज हेल्प... घर शिफ्टींग चालू आहे. मुलाने वुडन फ्लोरिंग्वर मार्करने रेघोट्या मारल्यात. नेलपेंट रिमुवर, मॅजिक इरेझर, टुथपेस्ट कशाने जात नाहीये Sad
अवांतरः अमेरिकन गर्ल बाहुलीच्या तोंडावरही रंगरंगोटी झालीये आणि आता त्याची बहिण भयंकर चिडलीये. सो प्लीज हेपण कशाने जाऊ शकेल का?

मला पण मदत करा.
मिल्टन चा नवा कोरा टिफिन आणला, आणि वापराच्या पहिल्या दिवशीच आमरस नेला डब्यातून
डब्याला नाही पण वरच्या झाकणाला आतून आमरस लागल्याने त्याचे डाग पडलेत, ते काही केल्या जात नाहियेत. काय करू? Uhoh

वुडन फ्लोरिंग्वर मार्करने रेघोट्या मारल्यात. Try Iso Propyl alcohol, or Goo Gone spray , . Try these on an obscure area first though.

You can also try gently sanding the area , cleaning up all the dust and finishing with polyurathane - depending on how deep the stain has permeated the wood.

For mango stains, try leaving the container in the sun for a few hours.

Pages