Submitted by निराली on 28 May, 2011 - 17:24
परदेशातल्या व देशातल्या घरांमधे एक मोठा फरक जाणवतो तो म्हणजे धुळीचा व स्वच्छतेचा.
परदेशात खुप कमी श्रमात घर स्वच्छ ठेवता येते पण भारतात रोजचं डस्टिन्ग निदान दोनदा तरी करावं लागतं. पण दोन्ही ठिकाणी जर right tools and products माहीती असतील तर काम खुप सोप्पं होतं.
काही बाफं वर सिंक व बाथरूम किंवा भांडी कशी स्वच्छ ठेवावीत हे प्रश्नं पाहिले म्हणून हा घराच्या स्वच्छतेचा (सगळ्याच प्रकारच्या) धागा उघडलाय.
बरेच वेळा काही जणांना जे products किंवा पद्धती अगदी बेसिक वाटतील त्या बकिच्यान्ना माहिती पण नसतील त्यामुळे जे काय माहिती असेल, बेसिक किंव्हा रीसर्च केलेले ते सगळे लिहावे, ज्याने अनेकांना
मदत होईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खार्या पाण्याचे डाग कसे
खार्या पाण्याचे डाग कसे काढावेत. सध्या घरी बोअरवेलचे पाणी आहे वापरायला. भांडी घासून वाळण्यासाठी टोपल्यात ओट्यावर ठेवली की निथळणार्या पाण्यामूळे सिंकच्या जवळचा ओट्याच्या भागावर पांढरे डाग पडायला लागलेत. हाताला सुद्धा तेवढा भग खरखरीत लागतो, हे डाग कसे घालवायचे?
बाथरुममध्ये नळावर आणि फरशी पुसल्यावर रुममध्ये मार्बलवर पण बर्याचदा असे (जर कामवालीने जास्तच ओली फ्रशी पुसली असेल तर)) पाण्याचे डाग दिसतात. यावर काही सोप्पा उपाय आहे का?
माझ्यामते नाही यावर काही
माझ्यामते नाही यावर काही उपाय. आठवड्यातून एकदा ती फरशी घासून साफ करणे, कारण सॉल्ट लेअर खरवडून काढल्याशिवाय जात नाही. फारतर पाण्यात अॅसीड घालून प्रयत्न करून पहा पण हाताची ईजा होण्याची शक्यता आहेच.
ईजीऑफ्बॅन्ग हा एक चांगला ऑप्शन आहे...
@अल्पना, मला पुण्यात दीप्ती
@अल्पना, मला पुण्यात दीप्ती केमिकल्स मधे एक प्रोड्क्ट मिळाले, जे पाण्यात मिसळून वापरले की ओट्यावरचे डाग जातात.
माझ्याकडे पण फरशी पुसल्यावर मार्बलवर डाग दिसतात, पण त्यावर या प्रोड्क्टचा अजून प्रयोग करुन बघितला नाहीये.
मार्बल असेल तर खास
मार्बल असेल तर खास मार्बलसाठीचे क्लिनर वापरा. मार्बल, ग्रानाइटसाठी विनेगर योग्य नाही. मात्र नळावर पडलेले डाग साध्या विनेगरने जातात. टोपल्याखाली मोठा थाळा ठेवला तर निथळणारे पाणी त्यात जमा होईल.
ईझी ऑफ्फ बँग इज गुड.
ईझी ऑफ्फ बँग इज गुड. माझ्याकडे ही खार्या पाण्याचे डाग मी त्यानेच घालवते.
नळावरच्या डागांपेक्षा
नळावरच्या डागांपेक्षा ओट्याच्या ग्रॅनाइटचा होणारा खरखरीतपणा ही मुख्य समस्या आहे. भांड्याचं टोपलं ठेवली जाणारी चौकोनी जागा एकदम वेगळी दिसातेय बाकी ओट्यापेक्षा. भांड्याच्या टोपल्याच्या साइझंच त्याखाली ठेवायला काहीच नाहीये. एखादा मोठा त्या साइझचा प्लास्टिकचा ट्रे मिळतोय का बघते.
सध्या तरी मार्बलची फरशी पुसतना नुसत्या पाण्यानेच पुसतेय मी. शोधते वेगळं क्लिनर.
धन्यवाद.
अल्पना, वॉटर सॉफ्नर मिळत असेल
अल्पना, वॉटर सॉफ्नर मिळत असेल तर तो वापरून बघ.
हो स्वाती. बाकी काहीच उपाय
हो स्वाती. बाकी काहीच उपाय नसेल तर तेच बघणार आहे. किमान स्वैपाकघरातल्या नळाला आणि वॉशिंग मशिनला तरी लावावा लागेल सॉफ्ट्नर.
>> भांड्याच्या टोपल्याच्या
>> भांड्याच्या टोपल्याच्या साइझंच त्याखाली ठेवायला काहीच नाहीये. एखादा मोठा त्या साइझचा प्लास्टिकचा ट्रे मिळतोय का बघते.
ट्रे नाही मिळाला तर जुना टॉवेल किंवा चादर वापरू शकतेस त्यासाठी.
पण मग तो टॉवेल ओला होवून
पण मग तो टॉवेल ओला होवून त्याचे डाग नाही पडणार का?
खरं तर माझं मन सॉफ्टनरकडेच झुकतंय. (भांडी पण पुसावी लागताहेत ना सध्या तर डाग पडून नये म्हणून धुतल्यावर १०-१५ मिनीटातच) पण या घरात किती दिवस रहाणार हे अजून माहित नाहीये म्हणून मोठा खर्च करायला कचरतेय थोडी.
सॉफ्नर पावडर्/सोल्यूशन नाही
सॉफ्नर पावडर्/सोल्यूशन नाही मिळत का नुसतं? ते एखादा चमचा वॉशिंग मशीनमधे घालता येतं साबणाबरोबर. भांडीही सॉफ्नर घातलेल्या पाण्यात शेवटी खळबळून घेतली तर निघावीत.
क्षार टॉवेललाच जातील असं वाटलं गं. तो टॉवेल/चादर तेवढ्यासाठीच वापरायचा आणि वाळवून ठेवायचा.
सॉफ्नर पावडर्/सोल्यूशन >>>
सॉफ्नर पावडर्/सोल्यूशन >>> याबद्दल माहितच नव्हतं. असं काही मिळालं तर मग खूप सोप्पं होईल.
इथे आणि इथे बघ अल्पना.
इथे आणि इथे बघ अल्पना.
धन्यवाद स्वाती.
धन्यवाद स्वाती.
दिवाळी साफसफाई साठी शुभेछा
दिवाळी साफसफाई साठी शुभेछा
किचन मधला चिकटपणा घालवण्यासाठी मि. मसल किचन क्लीनर (नारंगी स्प्रे बाट्ली)-फ्लोअर क्लीनर नाही -वापरा .स्वच्छ होते .वापरण्यापुर्वी हातत प्लॅस्टिक चे मोजे किंवा पिशवी वापरा.क्लीनरवर कसे वापरायचे ते दिले आहे ते प्रथम वाचा .
मी टाइल्स चक्क व्हिम बार व
मी टाइल्स चक्क व्हिम बार व स्टील स्क्रबर ने घासल्या. थोडे प्रिल पण घातले होते.
बाथरुममध्ये चिलटं होत असतील
बाथरुममध्ये चिलटं होत असतील तर पाणी वाहून नेणार्या जाळीत अधूनमधून उकळते पाणी ओतावे.
अमा- विम बार ठिक .स्टिल जाळी
अमा- विम बार ठिक .स्टिल जाळी ने खरे(चिरा) पडु शकतात .जर मि मसल मिळाले नाही तर विम बार हा पर्याय ठिक पण टाइल्स वर हिरवा स्कॉ-ब्राईट किंवा प्लॅस्टिक जाळी वापरा . नंतर साबणपाण्याने पुसून घ्या .
साबा नी डाय लावून तो टब मध्ये
साबा नी डाय लावून तो टब मध्ये धुतल्याने पांढर्या टब ला डाग पडले
कशाने निघतील ,ब्रश ने जात नाहीत
स्वराली, पेपर टॉवेल विनेगर
स्वराली,
पेपर टॉवेल विनेगर ने ओला करुन डाय असलेल्या भागावर पसर. साधरण तासाभराने डाग जातायत का ते पहा. नाहीतर मॅजिक इरेझर आहे का? तो वापरून बघ. काहीजण अॅसिटोन वाले नेल पॉलिश रिमुवर पण वापरतात. कुठलाही प्रयोग करताना सुरवातीला अगदी थोडा भाग टेस्ट करुन बघ. बाथटब चे फिनिश खराब होत नाहीये ना याची खात्री करुन घे.
टबचे डाग बाथरूम मॅजिक इरेझरने
टबचे डाग बाथरूम मॅजिक इरेझरने सहज जातील. (नेहमीच्या मॅजिक इरेझरने पण जातील. पण टेस्ट करून पहा.)
तसच बेकिंग सोडा + गरम पाणी मिक्स करून त्याने स्च्रॅच फ्री स्क्रबरने घासले तरी ते डाग सहज जातील.
आणि शेवटी नाहीच गेले ते डाग तर लोज मध्ये टब रिफिनिशर मिळते. नव्या सारखा टब होतो त्याने.
सो तुम्ही आणि सासुबाई , रिलॅक्स.
मिस्टर मसल किचन क्लिन जबरदस्त
मिस्टर मसल किचन क्लिन जबरदस्त आहे. मी तर कापडावर मारून बर्याच वस्तू बाहेरून साफ केल्या. माझा मिक्सर पांढरा आहे. एकदम चकचकित झाला. टाईल्स वर डायरेक्ट मारून पुसल्याने त्या घासल्याप्रमाणे चकचकित झाल्या आहेत.
अॅसिटोनने वरचे फिनिश पण
अॅसिटोनने वरचे फिनिश पण निघून जाईल. आणि घरात लहान मुले वगैरे असल्यास अॅसिटोन नकोच. त्याच्या फ्युम्सने मोठ्यांनाही त्रास होऊ शकतो. अॅसिटोन वापराल जिथे तिथे व्हेण्टिलेशन व्यवस्थित पाहिजेच.
तेलाची कढई साफ करायला
तेलाची कढई साफ करायला व्हिनीगर कसे वापरतात ?
तेलाची कढई साफ करायला
तेलाची कढई साफ करायला व्हिनीगर कसे वापरतात ?
मिस्टर मसल खुपच चांगले
मिस्टर मसल खुपच चांगले आहे.
ता.क. किचनमध्ये लहान झुरळ किंवा मुंग्या दिसल्यास त्यावरही स्प्रे करु शकतो. लगेच मरुन जातात.
धन्स स्वाती२ आणि सीमा .
धन्स स्वाती२ आणि सीमा .
विनिगर आणि सोडा वापरले . मॅजिक इरेझर ने पण बघावे लागेल .
मला हा धागाच सापडत न्हवता !
खूप दिवस हा धागा शोधून
खूप दिवस हा धागा शोधून विचारायचे होते .
रादर बाहेर देशात जावून आले कि तिथली स्वच्छता बघून आपली घरे जरा जास्तच अस्वच्छ वाटू लागतात.
तर
१. आरशावर पडलेले साबणाचे डाग कसे काय काढावे
२. टब च्या बाजूला जे पाणी साठते ते तुम्ही कसे साफ करता ?
दोन्ही गोष्टी फडक्याने
दोन्ही गोष्टी फडक्याने पुसल्या की साफ होतात.
आरश्यावर पडलेल्या पाण्याचे/
आरश्यावर पडलेल्या पाण्याचे/ साबणाचे डाग कोलीन/ अॅमवेचे ग्लास क्लिनर/ तत्सम क्लिनर्स नी स्प्रे करून पुसले की जातात. फार दिवस जुने असतील तर सरळ प्लॅस्टिक/नायलॉनच्या घासणीनी हळूवार घासून निघतात.
टबच्या बाजूला, बाथरूममधलं पाणी काढायला वाईप मिळतं त्यानी ते पाणी काढता येतं.
Pages