घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी

Submitted by निराली on 28 May, 2011 - 17:24

परदेशातल्या व देशातल्या घरांमधे एक मोठा फरक जाणवतो तो म्हणजे धुळीचा व स्वच्छतेचा.
परदेशात खुप कमी श्रमात घर स्वच्छ ठेवता येते पण भारतात रोजचं डस्टिन्ग निदान दोनदा तरी करावं लागतं. पण दोन्ही ठिकाणी जर right tools and products माहीती असतील तर काम खुप सोप्पं होतं.

काही बाफं वर सिंक व बाथरूम किंवा भांडी कशी स्वच्छ ठेवावीत हे प्रश्नं पाहिले म्हणून हा घराच्या स्वच्छतेचा (सगळ्याच प्रकारच्या) धागा उघडलाय.

बरेच वेळा काही जणांना जे products किंवा पद्धती अगदी बेसिक वाटतील त्या बकिच्यान्ना माहिती पण नसतील त्यामुळे जे काय माहिती असेल, बेसिक किंव्हा रीसर्च केलेले ते सगळे लिहावे, ज्याने अनेकांना
मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देशात व्हॅक्यूम वापरणार्‍यांचा काय अनुभव?
माझ्या माहेरी घेतलेला आहे य वर्षांपूर्वी. वाटलं होतं जेवढा उपयोग होईल तेवढा काही तो वापरला गेला नाही. रोजच्या केर फरशीसाठी तो काही खास जमला नाही. आणि परत ते आपण स्वतःच करा. त्याचा आवाज इत्यादी. तरी तेव्हा केर आम्हीच काढायचो आणि फरशी एक दिवसाआड पुसायचो. मी, आई आणि बाबांच्यात खोल्या वाटलेल्या होत्या. त्यामुळे तो व्हॅक्यूम वापरला जायचा. मग केर फरशी ला बाई लावल्यावर आठवड्यातून एकदा जळमटं साफ करण्यापुरता वापरला जायचा. घरात होता म्हणून.
आता तर तो बहुतेक वर्ष दीड वर्षात चालू पण केला नसेल. जळमटं केर काढताना बाईच काढून टाकते. आठवड्यातून एकदा एकेका खोलीची काढायची अशी बोली आहे. व्हॅक्यूमचा पसारा काढणे आणि परत जागच्याजागी ठेवणे याचाच इतका घोळ होतो त्यापेक्षा पटकन नाकाला फडकं बांधून कुंचा घेऊन साफ करणं बरं वाटतं.

पण कॉम्प, गाडी आणि स्लायडिंग खिडक्यांचे चॅनेल्स यासाठी हॅण्ड व्हॅक्यूम किंवा मिनी व्हॅक्यूम असेल तर बरं असं वाटतंय सध्या. तर देशात कुठले ब्रॅण्डस आहेत छोट्या व्हॅक्यूमसाठीचे? आणि त्याचा किती उपयोग होतो कुणी सांगेल का?

सुप्रभात,

खरेच विविध अ‍ॅटेचमेंट सहित असलेला व्हॅक्ली अतिशय उपयोगी असतो. मी युरेका फोर्बचे वॅक्ली विकलेले आहेत व डेमो पण दिलेले आहेत घरो घरी. पण तो फार जड आहे रोजच्या वापराला. मिनी वॅक फार मिळतात होम शॉपिन्ग नेट्वर्क किंवा रिलायन्स डिजिटल/ क्रोमा मध्ये उपलब्ध आहेत. चिनी / कोरीअन ब्रँड पण चालतात.

१) ब्लोअर साइड वापरून धूळ डिस्प्लेस करता येते कीबोर्ड/ लॅप्टॉप टीवी इत्यादींवरील.
२) गादीवरून फिरविल्यास ड्स्ट माइट्स जातात, डॉग हेअर, कॅट हेअर काढण्यासाठी उपयुक्त. घरी दमा पेशंट असल्यास जरूर करावे. किंवा डस्ट अ‍ॅलर्जी असल्यास करवून घ्यावे.
३) रंग देण्यास एक अ‍ॅटेच मेन्ट असते. ती नीट न वापरल्यास सर्व रंगून निघते. Happy आस्क मी.
४) कार वॅक वेगळा मिळतो.
५) रांगती बाळे जमिनीवरील किंवा कडा कोपर्‍यातील कचरा शोधून तोंडात घालतात. त्यामुळे ते सर्व साफ करण्यास अति उपयुक्त.
६) न वापरातले रजया कपडे इत्यादी सील करून ठेवण्यास उपयुक्त.

ती नीट न वापरल्यास सर्व रंगून निघते. <<<
आस्क मी टू...
फिरोदियासाठी बनवलेले प्लास्टर बॅण्डेजचे २५ मास्कस काळे करायचे असतील तर घरात नवीन घेतलेला व्हॅक्यूम वापरावा हे मला कुठल्या अवलक्षणी वेळेला सुचलं कुणास ठाउक. एकही मास्क रंगला नाही पण माझ्या रूममधल्या सगळ्या वस्तूंचे, आमच्या दोघींचे (मी आणि मैत्रिण) पाय, भिंतीचे स्कर्टिंग आणि वरचा भाग आणि रूममधली जमीन मात्र सही रंगली. आई कालेजात होती गेलेली. नशीब पोस्टर कलरच वापरला होता. त्यामुळे ती येईपर्यंत सगळे उरका पाडून पुसून काढले. फक्त कपाटाच्या पायावरचे डाग आणि भिंतीच्या स्कर्टिंगच्यावरच्या भागातले डाग ते गेले नाहीत. आईने आल्यावर ते बघितलं तोवर मी प्रॅक्टिसला पळालेली होते. रात्री आल्यावर इतकं काळं का दिसतंय सगळं असं विचारून विचारून आईने सगळं वदवून घेतलंच. वैतागण्यापलिकडे आई काही करू शकत नव्हती कारण सांगून पूर्ण होईतो मी गाढ झोपी जायच्या मोडमधे होते. Happy

५) रांगती बाळे जमिनीवरील किंवा कडा कोपर्‍यातील कचरा शोधून तोंडात घालतात. त्यामुळे ते सर्व साफ करण्यास अति उपयुक्त.<<<
असहमत. कोपरे धड साफ करत नाही म्हणून तर व्हॅक्यूमवरची मर्जी उडाली मातोश्रींची.

असहमत. कोपरे धड साफ करत नाही म्हणून तर व्हॅक्यूमवरची मर्जी उडाली मातोश्रींची.> मे तेरेकु टेक्निक बतातुं. पहिले ब्लोअर लगाके पाइप के आगे पतला अ‍ॅटेचमेंट लगाके कोपरे मेंसे सर्व कचरा ब्लो करनेका फिर
कुंचा से एकत्र करनेका. फिर सकर साइड लगाके सक करके लेनेका. हे सर्व ठिकाणी अ‍ॅप्लिकेबल आहे. पंखे जाळी जळमटे वगैरे पहिले जोराचा झोत सोडून डिस्प्लेस करून जमिनीवर पडू द्यायचे. एसी वगैरेत पण एक झोत मारायचा. कचरा खाली पड्तो तो सक करून टाकायचा मग कामवालीला तिथून पुसून घ्यायला सांगायचे. डेटॉल किंवा लायझॉलने. रूम ऐसा साफ होएंगा कि अपुन को भी नहाना पडेंगा. चमकेंगा एकदम.

लयच कटकट है क्की.. त्यापेक्षा कामवालीला नाकाला बांधायला चार जास्तीची फडकी द्यावीत ते बरं.. Wink

माझ्या मुलीला लहानपणी अ‍ॅलर्जिक ब्रॉन्कायटीस होता म्हणून मी युरेका फोर्ब्सचा व्हॅक्ली घेतला होता. गाद्यांमधली धूळ सक करण्यासाठी काही दिवस वापरला पण ते इतकं अवजड होतं प्रकरण आणि कॉप्लिकेटेड अ‍ॅटेचमेन्ट्स की काढायला, ठेवायला वैताग यायचा. डेमो देणार्‍याने इतका सहज वापरुन दाखवलेला आणि त्याच्याइतकं चकाचक करणं काही आम्हाला जमलं नाही कधीच. मग एकदा तो दिवाणाच्या आत ठेवून दिला तो तिथेच पुढची अनेक वर्षं राहीला. हल्ली हल्लीच एकाला फुकट देवून टाकला. पण खरं तर एखादा हॅन्डी व्हॅक्ली मिळाला तर मलाही हवाय. वर्कस्टेशन, वॉलयुनिट्स, बुकरॅक, फायली,फोल्डर्स, खिडक्यांच्या जाळ्या वगैरे ठिकाणी आजूबाजूला जमणारी धूळ पाहिली की मला नेहमी असं वाटतं. आमच्या घराच्या खिडक्या अक्षरशः पूर्ण भिंतभर आहेत आणि रस्त्याच्या बाजूला त्यामुळे धूळ सकाळी पुसली तरी संध्याकाळी परत जमते.

आमच्याकडे युरोक्लीन बुलेट आहे.
इंदूरला होतो तेव्हा छताची जळमटे काढायला छान उपयोग व्हायचा.
आता मुंबईत तितका वापरला जात नाही, तरीपण अगदीच बंद करुन ठेवलेला नाही.
अमा म्हणतात तसा गाद्या साफ करायला चांगला.
भिंतींचे कोपरे स्वच्छ करायला प्रॉपर अ‍ॅटॅचमेंट वापरले की होते.
जाळ्याही (नेट) मस्त स्वच्छ होतात.
पलंगाच्या, कपाटांच्या खालचा कचरा लोटांगण न घालता निघतो. उंचीवरच्या फळ्या वर न चढता स्वच्छ करता येतात.
पण यासाठी योग्य ती अ‍ॅटॅचमेंट्स लावायला आणि बदलत रहायला पेशन्स हवा.

रंग लावायला एकदा वापरला तर त्या डब्याची छिद्र बुजली.

मला पंखा मात्र नाही स्वच्छ करता येत त्याने. एक माणूस काठीने पंख्याची पाती अडवायला लागतो. आता कचरा ब्लो करायची अमांची आयडिया आजमावुन पाहीन.

परदेशात वाटतं कि भारतात कित्ती मजा असते. सगळ्या गोष्टींकरता बाई असते,कुणाला काही करावं लागत नाही.
देशात, सगळे बाईच्या नाटकाला कंटाळलेले असतात कारण वेळेवर येत नाही, काम नीट नाही.
हा आता युनिव्हर्सल प्रॉबलेम होउन बसलाय.

मी व्हॅ. क्लीनर घेतला होता तेव्हा मला वाटले होते स्प्रिंग क्लीन नावाची घर साफ करायचे सर्विस सुरू करावी.
इथे मोठाली घरे असतात ती साफ करायचे काँट्रॅक्ट घ्यावे. ते प्रपोजल धूळ खात पडले.

ओये अमा... असल्या YZ आयडीया एकत्र करून आपण दोघी एक पुस्तक काढू शकू..
YZ Cleaning
YZ Food
YZ Starstruck....
अशी सिरीज... Wink

कामवाल्या बाईला सांभाळणे हे पेशन्सचे काम असते हे खरे. पण आपल्याला काय काय अपेक्षित आहे, कोणती कामे, कशी, कुठल्या वेळेत करुन हवी आहेत हे एकदा स्पष्ट शब्दांमधे सुरुवातीलाच समजावायचे. त्या कामाकरता ती जे पैसे सांगेल ते कबुल करायचे. उगीच शंभर दोनशे करता घासाघीस करु नये. बायका कबुलही होतात कमी पगारावर पण मग त्या मन लावून काम करत नाहीत. ठरल्यापेक्षा जास्त करायची वेळ आली तर नखरे करतात. त्यापेक्षा आपण दोनेकशे रुपये असेही उडवतो सहज मग या तर आपल्याच घरातले काम करुन आपला भार हलका करणार आहेत तेव्हा त्याबद्दल फार काही वाटून घेऊ नये.
कामवाल्या बाईबरोबर वायफळ गप्पा करायला आपल्याला वेळ नसतो आणि गप्पा जितक्या कमी कराल तितक्या बर्‍याच असतात पण तरी त्यांच्या घरच्या माणसांची, मुलाबाळांची जरा चौकशी करावी अधुनमधुन त्यामुळे त्यांनाही बरं वाटतं.
पगार अ‍ॅडव्हान्स हवा असेल एखाद्या वेळेस तर ठीक आहे पण उठसुट उधार मिळणार नाहीत हेही निदान मी आधीच स्पष्ट शब्दांमधे सांगते त्यामुळे त्या मागतच नाहीत. पण वेळ आली तर मदत करावी. माझ्या मुलींना सांभाळणार्‍या आजींना मात्र मी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एकदा आणि त्यांच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी एकदा अशी पैशांची मदत केली होती ती यांनी प्रेमाने मुलीला सांभाळले माझ्या या कृतज्ञतेपोटी.
कामवाल्या बायकांच्या बाबतीत मी आपण ऑफिसात जशी अपेक्षा करतो बॉस कडून तशीच त्या आपल्याकडून करत असतात याची जाणीव ठेवून वागते. आपल्याला केलेल्या कामाच्या स्तुतीची, पगारवाढीची, सुट्ट्यांची वेळोवेळी गरज लागतेच तशी त्यांनाही लागते. हल्ली या बायकांजवळ मोबाईल फोन असतात. त्यांच्याशी संपर्कात रहाणे सोपे जाते.
विश्वासू, घर सोपवून जावे इतक्या खात्रीची, स्वच्छ, जास्त दांड्या न मारणारी बाई मिळणे कठीण असते पण अशक्य अजिबात नसते. थोडा पेशन्स ठेवायला लागतो. जर बाई आपल्या अपेक्षांमधे बसत नसेल तर तिला सरळ नको येऊस सांगावे. त्यापेक्षा घरातल्यांच्या सहकार्याने काम स्वतःच करावे योग्य बाई मिळेपर्यंत. दुसरी बघावी. चांगली बाई मिळतेच. ओळखीत, मैत्रिणींकडे चांगलं काम करणार्‍या, विश्वासू बायका असतील तर त्यांना विचारावे. मारुन मुटकून आपल्याला काम न आवडलेली बाई ठेवली तर स्ट्रेस होतो आपल्यालाच. तसं करु नये कधीच. याबाबतीत प्रोफेशनल अ‍ॅटीट्यूड ठेवावा.

यशस्वी करिअर करणार्‍या बाईच्या पाठीमागे एक विश्वासू घरचं काम सांभाळणारी बाई ठामपणे उभी रहाणं अत्यंत गरजेच असतं हे कायम लक्षात ठेवावं.

इति कामवाली बाई पुराणम संपूर्णम Proud

शर्मिला अल्टिमेट मेड- मॅनेज मेंट पोस्ट ऑफ द डे. तुझी एक खोली वॅक्युम क्लीन करून देउ का त्या बदल्यात. Happy

ओके मग आपण तीन 'तरुण मुलीं' ची कपाटं अशी सुटसुटीत टर्म वापरुया Proud

जोक्स अपार्ट पण वॉर्ड्रोब मॅनेजमेन्ट हा अत्यंत गरजेचा विषय आहे माझ्या करता. कोणी टिप्स देत असेल तर वेलकम.

सिल्क, कॉटन्सच्या महागड्या पण नेसत नसलेल्या साड्या, पूर्ण लांबीच्या कॉटन, सिल्कच्या सुंदर, वर्क केलेल्या ओढण्या ज्या आता फॅशनमधे नाहीत त्यांनी एक प्रचंड मोठा भाग व्यापलेला आहे माझ्या कपाटाचा. ज्यांचं नक्की काय करावं कळत नाहीये. नीरजा तुझी मदत खूप गरजेची आहे याबाबतीत.

जोक्स अपार्ट पण वॉर्ड्रोब मॅनेजमेन्ट हा अत्यंत गरजेचा विषय आहे माझ्या करता.>> माझे कपडे बोळे ,नाहीतर धुवायला, नाहीतर इस्त्रीला, नाहीतर अंगावर. कपाटात एलिअन सुद्धा आरामात राहील. बोळ्यांमध्ये नाक खुपसले कि कसा छान घरगुती वास येतो. शिस्त नाहीच मला.

ओके मग आपण तीन 'तरुण मुलीं' ची कपाटं अशी सुटसुटीत टर्म वापरुया <<< करेक्ट!! Happy

मी प्रकारांप्रमाणे वेगळं केलंय. आणि कपड्यांसाठी ड्रॉवर्स हा सगळ्यात उत्तम प्रकार आहे. पाश्चात्यांचं अनुकरण करायचं तर यात करावं.. Happy

कामवालीचा विषय निघालाच आहे तर. दांड्या कमी व्हाव्यात यावर आमच्याकडे वापरला जाणारा हमकास उपाय Happy

माझी कामवाली महिन्यातुन ४ तरी दांड्या मारायची आणि त्याही न सांगता. पण विश्वासु आहे म्हणुन बदलायला नको वाटते. मग एकदा तिला सांगितले तुला महिन्यात २ रजा मिळतील. त्यापेक्षा जास्त झाल्या तर मी पैसे कापणार. आणी कमी झाल्या की त्या प्रमाणात देणार. तरी बाईसाहेबांना काही फरक पडला नाही. मग सांगितले न सांगता दांडी मारली तर डबल कापणार. पहिल्या दोन्-तिन महिने नुसते समज दिली पण ४थ्या महिण्यात खरच कापले. तेव्हा जरा जागेवर आल्यात. अ‍ॅटलिस्ट फोन करायचा त्रास तरी घेतात.

या उलट स्वयंपाकवाली.. तिला सुरवातीलाच २ सुट्ट्यांचा रुल सांगितला. तर मोस्टली मलाच पैसे द्यावे लागतात. ( एकही सुट्टी नसते काही महिन्यांत ). पण या रुल मुळे एखादा दिवस लोकांकडे नाही केले तरी माझ्याकडे काम करते Proud

वर्षा हे ग्रेटच आहे.

दोन ड्रॉवर्स मधे मी स्टोल्स, स्कार्फ, ओढण्या, आतले कपडे असे ठेवते. पण ते खूप विस्कटतात काढता ठेवताना घाईच्या वेळी. एस्पे. सिल्कचे असतात ते मग चुरगळतात. आणि ड्रॉवरची दशा होते. बाकी कपडे रॅक्समधे किंवा हॅंगरवर ठेवते. माझा प्रॉब्लेम म्हणजे काही कपडे, कुर्ते वगैरे वरती आहेत, दिसतात तेच सारखे वापरले जातात. सेम प्रॉब्लेम मुलींचा होतो. खाली ठेवलेले बिनवापराचे रहातात. कारण आठ-दहा दिवसांतच लावलेल्या कपाटाची जी अवस्था होते त्यात खालच्या घड्यांमधले कपडे दिसतच नाहीत Proud

मिक्स अ‍ॅन्ड मॅच करण्याच्या नादात कपड्यांची फार उलटापालट होते असा माझा अनुभव. पूर्वी बरे ठराविक सेटच असायचे चुडिदार कुर्त्यांचे. मी अनेकदा ठरवते की कपाटातला प्रत्येक ड्रेस नीट वापरुन झाल्याशिवाय नविन खरेदीच करायची नाही. निदान वर्षभर तरी. ते वर्ष अजून उजाडायाचं आहे.

कधीच आख्खं कपाट आवरायला काढायचं नाही हा एक नियम आहे माझा. एकावेळेला एकच कप्पा. म्हणजे कंटाळा येत नाही.

माझ्या जरीच्या साड्या आणि तत्सम एथनिक कपडे मी सुती कापडात गुंडाळून ठेवले आहेत..
@वर्षा_म@: बायकांच्या बाबतीत मला मदत लागेल तुमची.. माझा जुन्या बायका नव्या घरात यायला तयार नाहीयेत लाम्ब पडेल म्हणून.. Sad

माझा प्रॉब्लेम म्हणजे काही कपडे, कुर्ते वगैरे वरती आहेत, दिसतात तेच सारखे वापरले जातात>> मी पण.
ह्या आठवड्यात दोनच सेट्स धुवुन इस्त्री करून वापरिले. Austerity mode on होता. उद्या जीन्स!! की झालंच.

शर्मिला आणी वर्षा , खरचं खूप विचार करून पोस्ट्स लिहिल्यात.

माझी मामी एक नाही तर दोन बायका मॅनेज करते. दोघींना प्रत्येकी ५ हजार पगार आहे. का? तर विश्वासू आहेत आहेत आणी वेळेवर येतात त्यामुळे खोळंबा होत नाही. मला हा पगार जरा जास्त्च आहे असं वाटलं पण मुम्बईच्या महागाईला एव्ह्ढा लागतोच. ईति मामा .

माझ्या वडिलांच म्हणणं पण " आपल्याला बोनस मिळाला कि त्यांना पण द्यावा, आपली पगारवाढ झाली कि त्यांना पण त्यानी न मागता आणी एक्स्ट्रा कामाची अपेक्षा न करता द्यावी."

माझ्या मावशी कडे एक बाई आहेत, गेली ३५ वर्षे, खूप छान आहेत. अगदी कामसू, काही बोलणं नाही, आणी विश्वासू आणी प्रचंड स्वछता. फार प्रेमळ पण आहेत. अश्या लोकांना द्यायला काही वाटत नाही. उलट त्यांच्या करता किती करू आणी किती नको अस होउन जातं. नुस्तं त्यानी सोडुन जाऊ नये म्हणून नाही तर प्रेमा पोटी.

अमेरिकेत एक कंटेनर स्टोअर म्हणून दुकान आहे. त्यांच्या कडे प्रोफेशनल ऑर्गनायझर्स ची सर्व्हिस (त्यांच्या प्रॉड्क्ट्स शी रीलेटेड) फ्री असते.
त्यांना आपले प्रॉब्लेम सांगितले कि कसं ऑर्गनाईझ करायचे तेव्ह्ड्या स्पेस मधे हे सांगतात. हे सगळं अर्थात पेपर वर छानच दिसतं पण त्यातल्या त्यात जर काही हेल्प होणार असेल तर मी लिंक्स देत आहे.

http://www.containerstore.com/tip/closets/drawers

Expert tips and Ideas मधे गेलं कि बर्याच सापड्तील. जरी हे सगळं subjective ani personal taste,
वर डिपेंडंट असेल, तरी काही मदत झाली तर बघता येईल.

युरोप मधली घरं बरीच शी आपल्या घरां साऱखी असल्या मुळे आयकीया ह्या दुकानाच्या काही टिप्स उपयोगी पड्तात का ते बघ.

http://www.ikea.com/ms/en_US/rooms_ideas/small_spaces/index.html

नीधप नी सांगितल्या प्रमाणे, http://www.flylady.com वर पण सांगतात कि एका वेळा थोडसं आवरावं आणी ते संपवून टाकावं. एकच ड्रावर, किंवा फक्त १५ मिंट एका गोष्टी वर काम, फक्त रोज पाच गोष्टींचा निकाल लावायचा. ( अर्थात ह्या रेट नी वेळ किती लागेल ह्याचा विचार करायचा नाही .

Pages