घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी

Submitted by निराली on 28 May, 2011 - 17:24

परदेशातल्या व देशातल्या घरांमधे एक मोठा फरक जाणवतो तो म्हणजे धुळीचा व स्वच्छतेचा.
परदेशात खुप कमी श्रमात घर स्वच्छ ठेवता येते पण भारतात रोजचं डस्टिन्ग निदान दोनदा तरी करावं लागतं. पण दोन्ही ठिकाणी जर right tools and products माहीती असतील तर काम खुप सोप्पं होतं.

काही बाफं वर सिंक व बाथरूम किंवा भांडी कशी स्वच्छ ठेवावीत हे प्रश्नं पाहिले म्हणून हा घराच्या स्वच्छतेचा (सगळ्याच प्रकारच्या) धागा उघडलाय.

बरेच वेळा काही जणांना जे products किंवा पद्धती अगदी बेसिक वाटतील त्या बकिच्यान्ना माहिती पण नसतील त्यामुळे जे काय माहिती असेल, बेसिक किंव्हा रीसर्च केलेले ते सगळे लिहावे, ज्याने अनेकांना
मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरश्यावर पडलेल्या पाण्याचे/ साबणाचे डाग कोलीन/ अ‍ॅमवेचे ग्लास क्लिनर/ तत्सम क्लिनर्स नी स्प्रे करून पुसले की जातात. किंवा स्वस्त उपाय हवा असल्यास वर्तमान पत्र थोडे भिजवून आरसा/काच पुसल्यास स्वच्छ होते. वाळल्यावर हवे असल्यास कोरड्य स्वच्छ फडक्याने पुन्हा एक हात मारावा. - ताईचा सल्ला Wink

कोलीन, साबण, घासणी हे सगळे उपाय झाले आहेत . बेसिक गोष्टी वापरून झाल्या आहेत
वर्तमान पत्र थोडे भिजवून आरसा/काच पुसल्यास स्वच्छ होते - हे खिडकीच्या काचांसाठी किवा ड्रेसिंग टेबल च्या आरश्या साठी वापरतो
हा आरसा बाथ टबच्या शेजारची एक आख्खी भिंतभर आहे. त्यामुळे खूप साबण उडतो
अ‍ॅमवेचे ग्लास क्लिनर वापरून बघते.
पण डाग खूप टफ आहेत. काही तरी special असेल तर सुचवा
टब च्या बाजूला जे पाणी साठते ते तुम्ही कसे साफ करता ? - वाईप वापरते पण काही युक्ती असेल तर सांगा असे विचारायचे होते

मृणाल, एवढे टफ डाग असतील तर आरसे, पंखे पुसायलाही वाईप्स मिळतात ते वापरुन बघा. त्या वाईप्सवर थोडंसं पाणी घालायचं आणि पुसायचं . मी काँप्युटर कीबोर्डपण पुसते त्या वाईप्सनी.

हातात टफ रबरी मोजे (हार्डवेयर दुकानात अ‍ॅसिड साठीचे सांगून मिळतात) घालून मगच अ‍ॅसिड हाताळा‍ ही विनंती. बाथरूमच्या बंदिस्त जागेत फ्युम्सचाही त्रास होऊ शकतो.
सांभाळून,प्लीज.

अगं त्या कुर्ल्याच्या बाईंकडे मला वाईप्स मिळाले होते मी आणि मुग्धा गेलो होतो तेव्हा. त्यातला एक काढून त्यावर थोडं पाणी शिंपडायचं. आणि त्या ओल्या कागदाने कीबोर्ड पुसायचा. त्या वाईपचं टोक करुन बटणांच्या मधून फिरवायचं. किंवा तो वाईप बटणांवर पसरुन यूक्लिप्स बटणांच्या दोन रांगांमधून वाईपसकट फिरवायच्या. मस्त साफ होतो कीबोर्ड. एकदम गावठी पद्धत Wink

मी ते वाईप्स गॅसची शेगडी, पंखे, कपाटाच्या सनमायका वगैरेवरही वापरले. उत्तम आहेत.

grease wipes.JPG

नाही. अज्जिबात गेली नाहियेत अजून तरी. पंख्याचाही रंग गेला नाहिये. तसे माईल्ड आहेत. नाहितर हातालाही त्रास झाला असता.

अगं त्या कुर्ल्याच्या बाईंकडे मला वाईप्स मिळाले होते मी आणि मुग्धा गेलो होतो तेव्हा. त्यातला एक काढून त्यावर थोडं पाणी शिंपडायचं. >>> पाणी का शिंपडायचं ? ते आधीपासून ओले नसतात का ?
भारतात डिसइन्फेक्टन्ट वाईप्स आणि स्प्रे मला अजूनतरी डी-मार्ट / बिग बझारमध्ये दिसलेला नाही. झटपट आणि परिणामकारक स्वच्छ्तेसाठी फार उपयोग होतो त्यांचा.

मृणाल १, बाथ टबला शॉवर कर्टन नाहीये का ?

ते आधीपासून ओले नसतात का ?>>> ओलसर असतात. पण पुसायला जेवढा ओलावा आवश्यक असतो तेवढा नसतो. मी तर एका वाईपवर एक चमचाभर पाणी शिंपडते. त्या कुर्ल्याच्या बाईंनी तसंच सांगितलं होतं.

ओके. जनरली वाईप्स भरपूर ओले असतात. उघडलेलं पाकीट जास्त दिवस ठेवलं की नीट बंद असेल तरी कोरडे पडायला लागतात म्हणून विचारलं.

इथे लिहिलं आणि बिग बास्केटच्या साईटवर लगेच टॉयलेट सीट क्लिनिंग स्प्रेची अ‍ॅड आली. आता मागवेन तिथून !

मृणाल, अ‍ॅसिड नको! बाथरूममधले नळ इत्यादी खराब होतात त्या वाफेने.
बाथटब शेजारचा आरसा म्हणजे त्यावर लाइमस्केलचे डाग असणार. सिलिट बँग किंवा तत्सम कंपन्यांचे लाइमस्केल रिमूवर येते ते वापरून पहा. साध्या साबणाने, वाइपने इत्यादी लाइमस्केल हटत नाही.
दुसरे म्हणजे रोज सकाळी सगळ्या आंघोळी झाल्यावर बाथरूमच्या भिंती (आरसे, टाइल्स इ) पुसून कोरडे करणे. त्यासाठी आधी स्क्विजी टाइप काही टूल वापरून पाणी निपटणे आणि मग कोरड्या टर्की नॅपकिनने पुसून घेणे.

आम्ही ग्रीनरूम मेकप अ‍ॅकेडमीत असताना भिंतभर आरसा चुना लावून मग वर्तमानपत्राने तो पुसून काढत असू.
कारण काय माहित नाही. पण स्पॉटलेस आरसा म्हणजे काय ते नंतर दिसत असे.

आरसा चुना लावून वर्तमानपत्राने पुसणे हे नवीन कळालं. पण नी, चुन्यामुळे बारीक स्क्रॅचेस नाही पडत काचेवर?

योकु,
चुना 'मायक्रोअ‍ॅब्रेजन' पद्धतीने काम करेल. टूथपेस्ट (जेल नव्हे) देखिल सेम काम करते.
तशीच रांगोळी. पेट्रोल पंपावर गाडिचे स्क्रॅचेस काढण्याची पावडर विकतात, ती खूप बारिक दळलेली रांगोळीच असते. दिव्याच्या अवसेला कंदिल स्टँड चिमण्यांच्या काचा आजी रांगोळीने साफ करीत असे, ते आठवलं

Thanks, मृदुला , नी & दि मा
टूथपेस्ट, चुना तर मिळेल लगेच
Cillit Bang ची products बघते कुठे मिळतात.

hostel chya room madhe dhekhna jhali ahet
barch upay karun thaklo
kahi jhalim upay ahe ka

Pages