दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रेण्ड्स वर बेतल्यासारखी वाटत नाही. इतक्या एपिसोड्स नंतर एखाद दुसरा सीन वगळता काहीच साम्य नाही. सहा सिंगल्स असल्याने फ्रेण्ड्स ची आठवण येते इतकेच.

टवका .. आणि गब्बू.. Happy दोन्ही भारी.. काल कैवल्य खरच भारी दिसत होता...
आशू तर एकदमच सॉलीड आहे, सगळे सीन तोच खाऊन टाकतो यार.. खूप सहज वावर आहे त्याचा Happy

आई आल्याचा पहिला एपिसोड अगदीच सो सो होता. बाई संवाद पाठ करून म्हणतायत ते कळत होतं. कालच्या भागात जरा बर्‍या वाटल्या. मुख्य म्हणजे दिसायला गोड आहेत.
फक्त सगळे त्यांना चिकटतात तो सिन मात्र ओढून ताणून केल्यासारखा वाटला.
तुझी आई ती माझी आई म्हणण्याचं एक भारावलेलं वय असतं ते या ६ जणांचं नक्कीच नाहीये.

आणि मी पण तुझ्या आईसारखीच आहे ना? हा डॉयलॉग जवळजवळ पाच वेळा होता वेगवेगळ्या जणांबरोबर त्या जगतमातेचा Lol

त्या रडक्या चेहर्‍याच्या रेश्माला आता आवरा अस म्हणायची वेळ येते दर एपिसोडला. बाकी मीनल, अ‍ॅना, आशु, सुजय सगळे भन्नाट आहेत.

मला आईचे एपिसोड कृत्रिम वाटले. ठरवून केल्यासारखं. कैवल्यचं झोपणं, आशूचं उदास होणं मग लगेच सगळ्यांनी खांदे पाडून त्याच्याकडे मूक मोर्चा नेल्यागत जाणं फार नकली वाटत होतं. आपण घरात असं एकमेकांसमोर चालत जाऊन किती वेळा बोलतो? शर्मिला का रार मागे लिहून गेली तसं मधेच नाटकाचं नेपथ्य आल्यासारखं वाटतं.

ती जग्गू मला पहिल्यापासून नाही आवडत यामुळे पूर्वी मला वाटायचे कि हि मालिका सुद्धा इतर मालीकांसाखी टीपीकल असेल.. .. म्हणूनच अगदी सुरवातीचे एपिसोड बघायचे टाळले होते.

.

आई बोअर होती आणि त्यात गुब्बूच्या आईचा रोल करायचाय तर बरी बाई घ्यायची की जरा >>>> अगदी बरोबर. तिकडे ६ - ६ आया आहेत, त्यातलीच एक घ्यायची उधार, २ एपिसोड्स साठी ....... Happy

काल मला आशु योग्य वाटला पण, तो नाही कृत्रिमपणे धावत गेला त्या आईकडे. तो स्वतःच्या आईची आठवण काढत बसला. तीच आली त्याच्याकडे.

मला आवड्लं कालचं दि दो दु .
टवका .. आणि गब्बू.. स्मित दोन्ही भारी.. काल कैवल्य खरच भारी दिसत होता...
आशू तर एकदमच सॉलीड आहे, सगळे सीन तोच खाऊन टाकतो यार.. खूप सहज वावर आहे त्याचा Happy >>>>>>>> +१

त्या आई चे केस कुठलस स्वस्तातलं जेल लाऊन कर्ल केले होते.....तिचि मान हलली कि सगळे कर्ल्स एकदमच हलायचे.....ती बट (बँग्स) त्रास देत होति सारखी......

Pages