सतार

Submitted by kulu on 9 July, 2015 - 04:04

(सतारीच्या तारा तुटल्या त्या वेळी गंमत म्हणुन केलेली ही बाळबोध कविता किंवा जे काही आहे ते. कुठे पोस्टायचे ते कळत नव्हते. सतारीच्या तारा वरती खुंटीला गुंडाळलेल्या असतात. त्या खुंटीला उद्देशुन गट्टु हा शब्द वापरला आहे कारण एरव्ही पण मी तोच शब्द वापरतो Proud )

सांग सतारी काय करू मी,
अशा तुझ्या जर तुटल्या तारा,
कसा वाजवू आनंद भैरव
कसा आळवू मी भटियारां

जरा घेतसा मींड दुस्वरी
टणटण करुनी आवाज झाला
तार नव्हे तर गट्टू सुद्धा
केकाटूनिया बाहेर आला!

फिक्सिले मी त्या अनंत वेळा,
अनेक गट्टू ट्रायिले तरी
पण "तारे!" तव अनंत नखरे
"नकोच गट्टू ....मी एकटी बरी?"

आता मजला अक्कल आली
जर नसेल तुजला सुधरायाचे
नाईलाज जरी आहे माझा
आता तुजला बदलायाचे

माहित आहे अनेक वर्षे
वाजलीस तू गायलीस तू
कसा मिळेल तुज तरुण गट्टू
आता वृद्धा जाहलीस तू!

देता धमकी बदलायची
तिचे न माझे डोळे भरले
यमन पुन्हा मी आळविता मग
भांडण आमुचे मागे सरले!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान