(सतारीच्या तारा तुटल्या त्या वेळी गंमत म्हणुन केलेली ही बाळबोध कविता किंवा जे काही आहे ते. कुठे पोस्टायचे ते कळत नव्हते. सतारीच्या तारा वरती खुंटीला गुंडाळलेल्या असतात. त्या खुंटीला उद्देशुन गट्टु हा शब्द वापरला आहे कारण एरव्ही पण मी तोच शब्द वापरतो )
सांग सतारी काय करू मी,
अशा तुझ्या जर तुटल्या तारा,
कसा वाजवू आनंद भैरव
कसा आळवू मी भटियारां
जरा घेतसा मींड दुस्वरी
टणटण करुनी आवाज झाला
तार नव्हे तर गट्टू सुद्धा
केकाटूनिया बाहेर आला!
फिक्सिले मी त्या अनंत वेळा,
अनेक गट्टू ट्रायिले तरी
पण "तारे!" तव अनंत नखरे
"नकोच गट्टू ....मी एकटी बरी?"
आता मजला अक्कल आली
जर नसेल तुजला सुधरायाचे
नाईलाज जरी आहे माझा
आता तुजला बदलायाचे
माहित आहे अनेक वर्षे
वाजलीस तू गायलीस तू
कसा मिळेल तुज तरुण गट्टू
आता वृद्धा जाहलीस तू!
देता धमकी बदलायची
तिचे न माझे डोळे भरले
यमन पुन्हा मी आळविता मग
भांडण आमुचे मागे सरले!
Chhanach
Chhanach
मस्त
मस्त
हेहेहे.... मस्त हितगुज आहे
हेहेहे....
मस्त हितगुज आहे तारेशी....
बहुतेक तू 'तारेत' वाजवत होतास....
(No subject)
व्वा! खूपच सुरेख!
व्वा! खूपच सुरेख!
छान
छान
खूप क्यूट!!!
खूप क्यूट!!!
छान ...
छान ...
मस्तच !
मस्तच !
मस्त
मस्त
सर्वांचे खुप खुप आभार !
सर्वांचे खुप खुप आभार !
मजेशीर.. ती तार अन तो
मजेशीर.. ती तार अन तो गट्टू... गंमत