काल सकाळी अगदी झोपेत असताना ताईचा फोन आला लोणावळ्याला चलतेस का म्हणुन. अगदी ताबडतोब हो म्हटल आणि आवराआवर करुन तिच्या घरी पोहचली. तिथुन थोड्याच वेळात लोणावळ्याकडे प्रस्थान केल..
पहिला स्टॉप भुशी डॅम वर आणि पुर्ण दिवसासाठी मुड खराब .. अस वाटलं कुठुन दिमाग आला आणि इथ जाण्याकरीता हो म्हटलं .. पार्किंगसाठी फि रु.१००.. अबब! अस झालं. असो म्हणुन शंभरी त्याच्या हातात कोंबली आणि चालत निघालो. तिथ जाण्याच्या वाटेवर सगळी कचराकुंडी.. प्लॅस्टिकचे चमचे , ताट , सिगरेटचे थोटकं , कपडे काय नको ते पडलेलं.. किळस आली अगदी.. चिखलभरल्या चपलेनं लोक बाजुच्या पायर्यांवरुन चढत आणि खालच्या पायर्यांवर बसलेले लोक त्या पायर्यांवरुन पडणार्या पाण्यात बसुन मज्जा घेत होते..
तिथच बसलेल १५ २० पोरांचे २ ३ टोळके घाणेरड्या आवाजात ओरडत होते, अंगविक्षेप करत आहे आणि काय काय..
लोकांच्या मॉडर्न असण्याच्या संकल्पना कुठल्या थरापर्यंत वेगवेगळ्या असु शकतात त्याच पुस्तक उघडून बसल्यासारख वाटत होतं.. मुर्खासारखे वागत होते हे मोठे लोक तिथे.. कुणाला कुणाच सोयरसुतक नाही, करतय करु दे मरतय मरु दे यातला प्रकार..डॅम च्या भिंतीवर शब्दशः २५ ते ३० च्या दरम्यान असलेला सो कॉल्ड तरूण उभा राहुन मुततोय . माफ करा पण त्याच्या कृतीला बघुण दुसरा शब्द मला सुचत नव्हता.. खाली लोक पाण्यात ओले होत मज्जा करत होते.. काय म्हणाव याला ?
त्या पाण्यात भिजत , तिथं बसुन लोक कणिस खात होते आणि अक्षरशः तिथच त्या पायर्यांवर फेकत होते..
एक तरूण.. जबरदस्तीने लोवेस्ट करण्यासाठी जमेल तेवढा सरकवलेला जीन्स , कुल टिशर्ट, तारे जमीन पर मधल्या आमिर सारखी हेअरस्टाईल करुन गॉगल लावुन भिंतीवर उभा राहुन पचापचा त्या पाण्यात थुंकतोय आणि खाली छोटे लेकरं त्याच पाण्यात डुंबत असताना हे चाल्लयं.. त्याला मी शिव्या मारल्यावर तो आणि इतरहि लोक निव्वळ बघे बनलेले होते.. कुठ हरवल्या यांच्या संवेदना ? मुर्ख आहेत का हे ? श्शी..
माझ लग्न झालेल नाही , ना ही एखाद्या २ महिन्याच्या लहान मुलाला वागवायचा मला अनुभव आहे तरीही माझ्यामते २ ते ३ महिन्याच बाळ फुलासारखं नाजुक असतं आणि त्याला तसच जपावसुद्धा लागतं.. पण तिथ एक तरुणी तिच्या तेवढ्याच बाळाला भर पावसात हाती गुंडाळून डोक्यावर छत्री सुद्धा न घेता तसच घेऊन त्या पायर्या चढत होती.. एखाद्याची हौस मान्य करता येते पण त्या छोट्या न बोलत्या जीवाचे काय हाल होत असणार अथवा होणार ते त्या माऊलीला तरी ठाऊक होते की नाही देव जाणो. भुशी डॅम चा तो सुंदर अनुभव घेऊन इतर कुठ फिरायची इच्छाच मरुन गेली. जाता जाता तेवढ कार्ल्याला गेलो तर तिथही तिच तर्हा.
पहिल्यांदा लोणावळा २०१० मधे बघीतला होता.. त्यानंतर डायरेक्ट आत्ता जाण्याचा मुहुर्त निघाला. कित्ती फरक पडला या ५ ६ वर्षात..पुर्ण बाजारीकरण झालय प्रत्येक ठिकाणाचं.. कार्ल्याच्या लेण्यांना देवळाचं स्वरुप आलयं. ना ही त्या लेण्या पहिल्याएवढ्या वैभवात राहिल्याय आणि शंका आहे की देवीच्या देवळाच देवत्व तरी शाबुत आहे कि नाही ? तरी बर हि बेभान तरुणाई देवीदेवतांची तेवढी भक्त नाही .. नाहीतर तिथल्या देवळातल्या भक्तीच्या कृतीला विकृतीची जोड लाभायला असा कितीसा वेळ लागणारे..
लिहण तितकस जमत नाही पण सांगण्यापासुन खरोखरच राहावल नाही..
मला नाही वाटत यापुढं कधी लोणावळा जायची हिम्मत होईल . . आणखी एक सुंदर ठिकाण भेटीला पारख झालं ..
रॉबीनहूड , निर्माल्य असेल
रॉबीनहूड ,
..
निर्माल्य असेल
देवा , घरात असणार्या देवघराएवढ पावित्र्याच इमान जरा निसर्गाशी पन राखल तर सगळीच्कडे देव नांदेल..
हा फोटो कुठला? आमच्याकडे
हा फोटो कुठला? आमच्याकडे तळ्यावर निर्माल्य कलश असतात. एकतर कमीतकमी निर्माल्य निर्माण करावं आणि ते योजून दिलेल्या ठिकाणीच नेवून द्यावं.
रॉबीनहूड | 5 July, 2015 -
रॉबीनहूड | 5 July, 2015 - 14:41 नवीन
आताच भुशी डॅमवर दोन तरुण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त टीव्हीवर पाहिले. आनन्द वाटला.
<<<
ह्या प्रतिसादाचा अजिबात निषेध करावासा वाटत नाही ह्यातच काय ते आले.
atuldpatil, >> मला धार्मिक
atuldpatil,
>> मला धार्मिक संस्कार म्हणायचे नव्हते.
या संस्कारांमुळे मुले भविष्यात सुबुद्ध नागरिक होतील की दुर्गुणी बनतील, एव्हढेच पाहण्यात यावे. माझ्या मते सुबुद्ध नागरिक बनतील.
आ.न.,
-गा.पै.
आताच भुशी डॅमवर दोन तरुण
आताच भुशी डॅमवर दोन तरुण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त टीव्हीवर पाहिले. आनन्द वाटला.
>>>
समजले नाही. नक्की का आणि काय अर्थाने असा प्रतिसाद दिला आहे. खरेच आनंद झाला का?
मी सुद्धा दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा कट्टर विरोधक असलो तरी कोणी मेला की जीव हळहळतोच. तो कोणी जवळचा मित्र असेल तर तेवढाच त्रास होतो जेवढा एखादा निर्व्यसनी मित्र अपघातात गेला तर होतो. कारण कुठेतरी जबाबदार आपणही असतो असे वाटते. तो मित्र होता आपला, आधी आपल्यातच असायचा, खेळायचा, मग बहकला आणि नशेच्या नादाला लागला, आज जीव गमावला.. जर कदाचित आपण त्याला सुधारवू सावरू शकलो असतो तर आज हे झाले नसते, हे मैत्रीचेच अपयश वाटते.. अश्या दुर्घटनांत तीच जबाबदारी एक समाज म्हणून आपण घ्यायला हवी..
हो क्का?? फारच हळवा बुवा
हो क्का?? फारच हळवा बुवा तू...
पण सलमानच्या गाडीखाली आलेल्यांना न्याय मिळायच्या ऐवजी दारूबंदी व्हावी आणि सलमान ला काय शिक्षा व्हावी ह्याबाबत आळीमिळी वाले तुम्ही...प्रश्नच पडलाय आता, तोच ना तू? तुच ना तो?
ती मुले दारू पिऊन गेली नव्हती
ती मुले दारू पिऊन गेली नव्हती तिथे.
पाण्याच्या खोलपणाचा अंदाज आला नाही म्हणून गेली.
जिथे पाण्याचा अंदाज नसतो तिथे उतरायची मस्ती अंगाशी आली.
पावसाळी उन्माद आणि नियम
पावसाळी उन्माद आणि नियम तोड्ण्याची वृतअजुन काय?
वर गणपती पुळ्याचे उदाहरण आले आहेच. तिथेही उगीच माज दाखवायला खोल पाण्यात उउतरुन जीव गमावणारे आहेतच.
किनार्यावर फलक लावुन सुद्धा
टीना , भयानक प्रकार . हल्ली
टीना , भयानक प्रकार .
हल्ली पावसाळी सहल नको वाटते .
अवांतर :
तसाच प्रकार दहीहंडी च्या वेळेस मुम्बईत असतो .
ट्रक आणि बाईक वरून फिरणारे गोविन्दा टवाळक्या आणि छेडछाड यात फार मोठा तीर मारल्याचा आव आणतात .
भारतिय विमान प्रवाशांबद्दल हजार अनुमोदन
शनिवारीच एअर ईंडिया ने आलो . विमान १ तास लेट होत .
बोर्डिन्गची अनाउन्समेंट सीट नंबर प्रमाणॅ झाली . लोकानी गेट जवळ गर्दी केली .
नवरा मला अग चल , अग चल करत गर्दी तुन ढकलत होता .
मी , अरे रांग आहे ना म्हणून त्यावर चिडले . तो म्हणाला तु चल पुढे पटकन .
पूढच्या लोकानी आम्हाला जायला जागा दिली .
नंतर नवर्याने माझ्याकडे " कळलं ?? " वाला तु.क. टाकला .
" आपल्या लोकाना घाई करून गर्दी करायची सवय आहे . त्यातले कोणीही आता जाणारे नव्हते"
विमानात दोन सिट पुढे बसलेल्या महाभागाने एअर होस्टेस्शी भांडण केलं.
तिच्यापेक्शा सिनिअर स्टुअर्ड येउन काहीतरी समजाउन गेला .
थोड्या वेळाने केबिन ईन्चार्ज आला बोलायला .
माझा नवरा म्हाणाला दारू वरून काहीतरी वाजलं.
उतरताना तो महाभाग केबिन ईन्चार्ज ला सांगत होता
"you people be prepared for consequences"
एरोब्रिज नव्हता , बस आलेली म्हणून स्टाफशी उर्मटपणे बोलत होता .
उतरताना सीट बेल्ट ची साईन असतानाही लोक उठून केबिन बॅगेज काढत होती .
विमान थांबल्यावर गर्दी करून रांग लावून उभी राहीली फटाफट .
सर्वात विदारक चित्र विमानातून उतरताना होतं .
निघताना पाहील , स्नॅक्सचे रॅपर्स , हेड्फोन्स आणि ब्लॅन्केट्स चे प्लॅस्टिक कव्हर्स सीट्स खाली पडली होती .
बर्याच लोकानी ब्लॅन्केट्स चोळामोळा करून सीट वर टाकली होती .
ठीक आहे व्यवस्तित घडी करून नका ठेउ पण निदान सीट्वर तरी ठेवा .
काही ठिकाणी सीट्वरून लोंबकळत होती ,कुठे पायाखाली पडली होती .
कुठे हेडफोन्स लोम्बकळतायेत . बर्याच ठिकाणी स्क्रीन वर व्हिडिओ तसाच चालू .
सर्वात कहर म्हणजे , एका सीट्च्या बाजूला दोन युज्ड डायपर्स पडले होते .
लोक कधी सुधारणार काय माहीत .
स्वस्ति..इतक भयानक आणि ते ही
स्वस्ति..इतक भयानक आणि ते ही विमानात..
बसचा फिल आला मला..घाणेरडे लोक कुठले
डबल पोस्ट
डबल पोस्ट
घाणेरडे लोक कुठले >>
घाणेरडे लोक कुठले >> भारतातले.
आशिया खंड व मिडल इस्ट मधील
आशिया खंड व मिडल इस्ट मधील व्हिजीटर्स नी टॉयलेट्स कशी वापरावीत ह्यासाठी स्विस रेल मध्ये खास चित्रांची पोस्टर्स लावावी लागली आहेत. त्यात टॉयलेट पेपर फ्लश करावा, डस्ट्बिन मध्ये टाकू नये, फ्लश हाताने करावे पायाने नाही अश्या प्रकारच्या सूचना पण आहेत. सभ्य समाजात कसे वावरायचे त्याचे क्लासेस उघडावे लागतील बहुतेक.
http://www.mirror.co.uk/news/world-news/sit-dont-squat-toilet-training-5...
मला लवकर बोर्डिंग करायला
मला लवकर बोर्डिंग करायला आवडतं पण धक्काबुक्की न करता. (लहान मुलं बरोबर असतात त्यामुळे प्रायोरिटी मिळतेच.) का? कारण आम्ही भारताकरता घेतो ते फ्लाईट जाताना पुढे अहमदाबादला जाणार असतं आणि येतानाही तिथून येणार असतं. आपल्या सीटवरच्या ओव्हरहेड लॉकर्समध्ये आपल्या सामानाकरता जागा मिळतच नाही उशीरा बोर्ड केलं तर. आपण एकीकडे आणि आपलं सामान १० रो मागे कुठेतरी. जे मला आवडत नाही. बाकीच्या अनुभवाकरता अगदी अगदी. परवाच परत येताना बॅसिनेट्स लावतात तिथे एक माणूस बसला होता. एकटाच प्रवास करत होता. अखंड बिअर पित होता. आणि बरोबर चखनाही अर्थातच. त्याचे रॅपर्स, संपलेल्या पाण्याच्या बाटल्या सगळं त्याच्या सीटच्या आसपास विखुरलेलं होतं. चीड येत होती बघताना.
स्वस्ति, या बाबतीत आफ्रिकन
स्वस्ति, या बाबतीत आफ्रिकन लोक सुसंकृत आहेत म्हणायचे. एमिरेट्स च्या विमानात असले पसारे नसतात. शिवाय त्या विमानातल्या कर्मचार्यांना पण श्रेय द्यायलाच हवे. उतरायच्या आधी दोनतीन फेर्या मारून ब्लॅकेट्स, हेडफोन्स, सर्व कचरा गोळा करून व्यवस्थित पॅक करून ठेवतात.
फोटो काढणे भारतीयांच्या हातात
फोटो काढणे
भारतीयांच्या हातात मोबाईल म्हणजे माकडाच्या हाती जळते लाकूड आहे.
जरा बर्या दिसणार्या मुली , बायका दिसल्या की लपून छपून फोटो काढतात आणि नंतर व्हॉटसअॅप वर शेयर करत बसतात.
अतिशय नीच मनोव्रुत्तीची माणसे आहेत.
या फोटोंचा गैरवापर होउन कोणाचे आयुष्य बदबाद होउ शकते .
पुणे येथील कॉलेजमधे ११ वीच्या वर्गात टारगट पोरे एका शिक्षिकेचा 'मागून' फोटो काढत होती. . नंतर एका मुलीने लंच मध्ये हा प्रकार त्या शिक्षिकेला सांगितला .. त्या मुलाचा मोबाईल जप्त केला तर जवळपास प्रतेक मॅडम्चा या ना त्या अँगलचे फोटो त्यामधे होते व सर्व ग्रुपवर शेअर केले होते.
शिक्षकांनी पोलिस तक्रार करायचा आग्रह धरला तर मॅनेजमेंटने कॉलेजचा नाव खराब होइल आणि तुमच्या 'नोकरीवर परीणाम' होइल असे सांगितले
आपला कोणी चोरून फोटो काढत नही ना यावर लक्ष ठेवा .
टीना तू आमची वैदर्भीय दिसतेस
टीना तू आमची वैदर्भीय दिसतेस भाषेवरून लगेच लक्षात आले आणि जिज्ञासू निरीक्षक वृत्तीवरुनही. चुकीचे काही दिसले कि वऱ्हाड्यांना लगीत चीड येते. मी पण अशीच काही वर्ष मुंबईला राहिले आणि आमचं वऱ्हाडच बै बर असं वाटू लागलं ….आपली भाषा जरा आडवळणाची असेल पण मन अगदी सरळमार्गी
इतरांची काळजी, जिव्हाळा, मदतीसाठी चटकन धावणे, ओळख पाळख नसूनही एकमेकांकडे पाहून हसणे-बोलणे अश्या काही गोष्टी आपल्याकडे पावलागणिक दिसतात तसा जरा वानवा आहेच बाहेर. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये आपण जन्मापासून अश्या वातावरणात वाढलेलो असल्याने यापलीकडे काहीतरी चुकीचे दिसले कि लगेच नजरेत भरते आणि डोक्यातही जाते. खरतर माझ्या मते त्यांचाही त्यात दोष आहे असे नाही…मुंबईत होणाऱ्या गैर प्रकरणांमुळे तिथली लोकं लगेच एकमेकांवर खूप विश्वास ठेवत नाहीत. शिवाय वेळही कमी असतो त्यांच्याकडे मग फार लचांड मागे लावून घेत नाहीत ज्यांच्याशी काम त्यांच्याशी न तेवढ्या पुरतं बोललं कि झालं अस वागता वागता असे practical वागणे हेच त्यांच्यासाठी कम्फर्टेबल होऊन बसतं. स्वतःपुरता विचार करायचा असेल अन स्वतःपुरतंच वागायचं असेल तर कुठला आलाय इतरांचा विचार मग पायर्या चिखलाने माखताहेत कि पाणी घाण होतंय, कचरा पसरतोय कि आणखी काय होतंय कुणाला काहीच फरक पडत नाही. आपला आपला आनंद मिळवला कि संपलं …. हे बोलणे कदाचित जरा टोचणारे असू शकेल पण बाहेरच्या नजरेने बघितले कि स्पष्ट दिसणारी सत्यता हीच आहे. दुसरे आणि महत्वाचे ह्यांना पडत नाहीतर मला काय त्याचे म्हणत नव्याने आलेले बाहेरचेही मग तसेच वागू लागतात. एकूण सामाजिक जबाबदारीपासून दूर पळतोय आपण सर्वच
प्राप्ती तुमचं म्हणणं पटतंय.
प्राप्ती
तुमचं म्हणणं पटतंय. पुण्या मुंबईच्या कोशातील लोकांपेक्षा जिंदादील व-हाडी बरे. बरे काय चांगलेच.
>>टीना तू आमची वैदर्भीय
>>टीना तू आमची वैदर्भीय दिसतेस भाषेवरून लगेच लक्षात आले आणि जिज्ञासू निरीक्षक वृत्तीवरुनही. चुकीचे काही दिसले कि वऱ्हाड्यांना लगीत चीड येते.
भाषेचं ठीक आहे. बाकी पॉइंटांत चेंगड आहे.
बाकी विदर्भाचं माहिती नाही, पण नागपूराबद्दल सांगू शकते... आत्तापर्यंत बघितलेल्या पुणं, मुंबई, बंगलोर ह्या शहरांच्या तुलनेत बर्यापैकी स्वच्छ, मोकळं आणि कमी पोल्यूटेड आहे. पण मुख्य रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा परिसर बघा. टेकडीच्या गणपतीला गेलात तर फ्लायओव्हरखालचा भाग बघा. इतवारी, महाल ह्या भागांमधल्या गलिच्छ गल्ल्या, अजनी (रेल्वेस्टेशन आणि चुनाभट्टीकडे येतानाचा भाग), मेडिकल कॉलेजच्या बाजूचा (हनुमाननगराकडला भाग), फुटाळ्याकडून सेमिनरी हिलकडे जातानाचा रस्ता, गिरिपेठ, गोकुळपेठ आण एकूणच कॅनलरोडला नाल्यात फेकलेल्या कचरा घाणीचा त्रास..ह्यांच्याकडे बाहेरच्य नव्हे तर चांगलं आतल्या नजरेनं बघूनही हीच 'सत्यता स्पष्ट दिसते'.
(नागपूर वर्हाडात येत नाही असा उपमुद्दा आणि ते मोठं शहर आहे असा उपउपमुद्दा निघाला तर मात्र वरचं माझं पोस्टही चेंगडयुक्त ठरवता येईल!)
>>विशेषतः मोठ्या शहरांमध्ये आपण जन्मापासून अश्या वातावरणात वाढलेलो असल्याने यापलीकडे काहीतरी चुकीचे दिसले कि लगेच नजरेत भरते आणि डोक्यातही जाते.
बाकी ह्या वाक्याचा अख्ख्या परिच्छेदाच्या अनुषंगानं अर्थ लावायचा प्रयत्न केला, पण जमलं नाही.
>> विशेषतः मोठ्या
>> विशेषतः मोठ्या शहरांमध्ये
यानंतरचा पूर्णविराम गहाळ झाला आहे. अशा चुका लगेच नजरेत भरतात आणि डोक्यातही जातात.
प्रश्न निव्वळ स्वच्छतेबद्दलचा
प्रश्न निव्वळ स्वच्छतेबद्दलचा नव्हता तसा अभिप्रायही. मी एकूणच अनुभवांबद्दल बोलतेय.
दोहोतला फरक आणि त्यामागची कारणेही सांगितलीत. राहिला प्रश्न तुलना करायचा तर वेळेचे पालन ट्राफिक नियमांची सुसूत्रता आणि त्यांचे पालन या सगळ्यात मुंबई फार पुढे आहे. नागपुरी काय अगदी पुणेकरांनाही तिथवर पोचायला सध्यातरी शक्य नाहीये. टीना एकंदरीत ज्या अनुभवांबद्दल बोलालीय मी त्याबद्दल एकंदरीतच सांगतेय.
राहिला प्रश्न नागपूरच्या स्वच्छतेचा तर मागे किती वर्षाआधी तुम्ही नागपूर बघून गेलात किंवा मी तर म्हणेन पुन्हा एकदा नव्याने भेट द्याच. हनुमान नगर सक्करदरा हा जवळ जवळ पाचेक किमीचा चौरस परिसर भाजी मंडी आहे तरी तिथे त्याप्रमाणात अस्वच्छता मी तरी अजून पहिली नाही. बाजाराचा तो एक विशेष दिवस सोडला तर आजही ट्राफिक अगदी नियमित विनाअडथळा सुरळीत चालू असते तिथे. नाकाला रुमाल लावण्याची सुद्धा गरज भासणार नाही रस्तेही स्वछ असतात अगदी. हनुमान नगर हा नागपूरच्या उच्चस्तरीय चांगल्या रहिवासी भागांपैकी एक मानला जातो. रेल्वेस्टेशनच्या पुढला रस्ता पूल बांधल्याने अगदी कचात्याचा झालाय अरुंद झालाय पुलाचाच पसारा आहे तिथे म्हणून तिथे प्रचंड गर्दी असते पण अस्वच्छता नाही दिसली बुवा अगदीच नाक तोंड बांधून जायला लागावी अशीतर नाहीच नाही. टेकडीच्या गणपती जवळचा रस्ताही गाड्यांची चुकीच्या बाजूला ये जा आहे म्हणून आणि अर्थात टेकडीचा गणपती प्रसिद्ध देवस्थान म्हणून गर्दी असते खूप पण बोट ठेवावी अशी अस्वच्छता मी तरी नाही पहिली अजून ...काही अगदीच विशेष दिवस म्हणत असाल तर माहिती नाही मी जनरल डेज बद्दल बोलतेय. बोटावर मोजता येतील असे अस्वछ २-४ परिसर असणं साहजिक नाहीये का? बाकी अगदी आरश्यासारख स्वच्छ असावं वगैरे अपेक्षा अक्ख्या भारतात कुठेच करता येत नाही. त्यातल्या त्यात नागपूर खूप चांगलंय खरच.
>>>>>>>>>>>>>>इतरांची काळजी, जिव्हाळा, मदतीसाठी चटकन धावणे, ओळख पाळख नसूनही एकमेकांकडे पाहून हसणे-बोलणे अश्या काही गोष्टी आपल्याकडे पावलागणिक दिसतात तसा जरा वानवा आहेच बाहेर, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये.(इथे फुलस्टोप द्यायचा राहिलाच बै ) आपण जन्मापासून अश्या (अश्या म्हणजे वर लिहिलंय ना तश्या) वातावरणात वाढलेलो असल्याने यापलीकडे काहीतरी चुकीचे दिसले कि लगेच नजरेत भरते आणि डोक्यातही जाते.
असं होतं वाक्य ... आता जमतंय का
स्वाती आंबोळे .. इकडे लोक
स्वाती आंबोळे .. इकडे लोक बरेचदा अर्धे अर्धे शब्द वापरतात बोलीभाषेत किंवा शेवटचा शब्द चक्क गहाळ करतात (झाडीपट्टीत विशेषतः) कारण पुढला माणूस ऐकतोय तो आपल्या शब्दांना, भाषेला नाही. भावनांना समजून घेतो, इवल्या इवल्या गोष्टीत खुसपट काढत नाही तेव्हा तो १००% समजून घेणार हा विश्वास असतो आणि तो समजूनही घेतो. पूर्णविराम द्यायला विसरली चूकच झाली. काय करणार तीच सवय पडलीय ना पुढल्यावर विश्वास ठेवण्याची

तुम्ही बोलीभाषेत काय करता
तुम्ही बोलीभाषेत काय करता त्याचा लिहिताना पूर्णविराम देण्याशी काय संबंध असं मी आता विचारत नाही. कारण माझ्याकडे वेळ कमी आहे आणि मला माझा आनंद मिळालेला आहे.
तुमच्या इतरांना समजून घेणार्या स्वभावाची झलक तुमच्या पहिल्याच पोस्टमध्ये मिळालेली आहेच.
>>आता जमतंय का व्हय जी ! आता
>>आता जमतंय का
व्हय जी ! आता जमलं.
तुमच्या पोस्टीतल्या 'जिज्ञासू आणि निरिक्षक वृत्तीवरून वैदर्भीय ओळख'ण्याबद्दल गंमत वाटली.
टीना ह्यांनी लिहिलेली स्थिती खरोखर दुर्दैवी आहे. पण त्याचा शहरी, लहान गावातलं असण्याशी काय संबंध? टीनांनी त्यांच्या पोस्टीत तर तसा अजीबात उल्लेख केलेला नाही. तुम्हालाच त्या वैदर्भीय असाव्यात असा अंदाज आला, (वैदर्भीय) म्हणून त्यांना ते दृष्य खटकलं, (वैदर्भीय आहेत म्हणून) सडेतोड लिहावसंही वाटलं असं कनेक्शन जोडावसं वाटतंय.
>>मुंबईत होणाऱ्या गैर प्रकरणांमुळे तिथली लोकं लगेच एकमेकांवर खूप विश्वास ठेवत नाहीत. शिवाय वेळही कमी असतो त्यांच्याकडे मग फार लचांड मागे लावून घेत नाहीत ज्यांच्याशी काम त्यांच्याशी न तेवढ्या पुरतं बोललं कि झालं अस वागता वागता असे practical वागणे हेच त्यांच्यासाठी कम्फर्टेबल होऊन बसतं. स्वतःपुरता विचार करायचा असेल अन स्वतःपुरतंच वागायचं असेल तर कुठला आलाय इतरांचा विचार मग पायर्या चिखलाने माखताहेत कि पाणी घाण होतंय, कचरा पसरतोय कि आणखी काय होतंय कुणाला काहीच फरक पडत नाही. आपला आपला आनंद मिळवला कि संपलं ….
नागपूरातले मी वर्णन केलेले भाग चार महिन्यांपूर्वीच बघितलेत. त्या आधी वर्षानुवर्षं बघून झालेत. अस्वछतेचं मोजमाप फक्त नाकाला रुमाल लावावा लागतो किंवा नाही ह्यावरून ठरत नाही. गेल्या १५-२० वर्षांतले नागपुरातले पॉझिटिव्ह बदल कौतुकास्पद आहेत, पण तुमच्या पोस्टीतली, स्वच्छता राखण्याबाबत उदासीन असणारी, सामाजिक जबाबदारीपासून दूर असणारी माणसं विदर्भातल्या नागपूर शहरातही आहेत, आणि कुणाला त्याबद्दल फारशी चीड आलेली दिसली नाही.
मृण्मयी - मला शब्दशः तुम्ही
मृण्मयी - मला शब्दशः तुम्ही काढताय त्या अर्थाचं काहीही म्हणायचं नाहीये. एकंदरीत संपूर्ण अनुभवावरून मी स्वतः दोन शहरांमध्ये जो फरक अनुभवलाय आणि तो फरक आहे म्हणजे चांगले वाईट असेच नाही तर त्या त्या मागे काही विशिष्ट कारणेही आहेत हे मी स्पष्ट लिहिलंय म्हणजे मी कुणालाही वाईट ठरवत नाहीये फक्त इकडे मला वाटतात त्या काही चांगल्या गोष्टी बोल्ड करून लिहितेय्. आणि वैदर्भी आहे म्हणून चुकीच्या गोष्टी खटकल्या म्हणजे इतरांना ते खटकत नाही असा माझ्या तरी बोलण्याचा अर्थ नव्हता तो तसा कुणी काढूही नये. टीनाच्या एकंदरीत पोस्त मधल्या बोलण्या चिडण्यावरून ती जवळची वाटली सो मनात होत ते लिहिलंय तुम्ही अगदीच मनावर घेऊ नका मी मुद्दाम कुणाला टार्गेट वगैरे करून बोलले नाहीये अजिबात. सो दिखावे पे ना जाओ भावनाओ को समझो प्लीज
बाप रे! तुम्ही प्लीज नका
बाप रे! तुम्ही प्लीज नका म्हणू बा! दिल पिघल गया! (एक वैदर्भीयच दुसर्ञा वैदर्भीयाच्या भावना समजून घेणार. तुम्ही मनाला लावून घेऊ नका.)
इतरांची काळजी, जिव्हाळा,
इतरांची काळजी, जिव्हाळा, मदतीसाठी चटकन धावणे, ओळख पाळख नसूनही एकमेकांकडे पाहून हसणे-बोलणे अश्या काही गोष्टी आपल्याकडे पावलागणिक दिसतात तसा जरा वानवा आहेच बाहेर. >>>
प्राप्ती ,तुम्ही वैदर्भीय ब्रँडेड अभिमान घेवून आल्यामुळं मला आमचा कोल्हापुरी अभिमान घेवून याल्लाच पाहिजे.

ते वर लिहिलयं ना तसली लोक ढिगानं भरल्यात कोल्लापुरात.
आणि कोल्लापुरात कशाला आमच्या टेक्सासात पण.
आनि ते जाउद्या आमच्या मायबोलीवर असली कित्येक भेटल्यात मला. मी दिसले नाही बरेच दिवसात चौकशी करणारी, मला योग्य तो सडेतोड सल्ला देणारी, फोन करनारी. बरं हे सगळं करताना , उगाच भावनाना पदर वगैरे नाही. हलकटपणा करून, माने स्टाईल.
ब्रँडेड अभिमान ,जिव्हाळा कुठल्या स्पेसिफिक गावाचा असता तर सगळी लोक विदर्भातच मुव्ह झाली असती.
ब्रँडेड अभिमान ,जिव्हाळा
ब्रँडेड अभिमान ,जिव्हाळा कुठल्या स्पेसिफिक गावाचा असता तर सगळी लोक विदर्भातच मुव्ह झाली असती>>>
+१
आम्च्याकडे सध्या वैदभिय अस्मिता साबा रुपाने वास्तव्यास असल्याने अभिमान्,जिव्हाळा आणी दुसर्याला समजुन घेणे वैगरेचा पुरेपुरअनुभव आम्ही इतर गावातले मानव घेत आहोत.
१९ ओगस्टच्या प्रतिसादांचे
१९ ओगस्टच्या प्रतिसादांचे प्रयोजन कळले नाही या लोणावळ्यात
१९ ओगस्टच्या प्रतिसादांचे
१९ ओगस्टच्या प्रतिसादांचे प्रयोजन कळले नाही या लोणावळ्यात
<>>>
बात निकलेगी तो बहुत दूर तलक जायेगी
Pages