काल सकाळी अगदी झोपेत असताना ताईचा फोन आला लोणावळ्याला चलतेस का म्हणुन. अगदी ताबडतोब हो म्हटल आणि आवराआवर करुन तिच्या घरी पोहचली. तिथुन थोड्याच वेळात लोणावळ्याकडे प्रस्थान केल..
पहिला स्टॉप भुशी डॅम वर आणि पुर्ण दिवसासाठी मुड खराब .. अस वाटलं कुठुन दिमाग आला आणि इथ जाण्याकरीता हो म्हटलं .. पार्किंगसाठी फि रु.१००.. अबब! अस झालं. असो म्हणुन शंभरी त्याच्या हातात कोंबली आणि चालत निघालो. तिथ जाण्याच्या वाटेवर सगळी कचराकुंडी.. प्लॅस्टिकचे चमचे , ताट , सिगरेटचे थोटकं , कपडे काय नको ते पडलेलं.. किळस आली अगदी.. चिखलभरल्या चपलेनं लोक बाजुच्या पायर्यांवरुन चढत आणि खालच्या पायर्यांवर बसलेले लोक त्या पायर्यांवरुन पडणार्या पाण्यात बसुन मज्जा घेत होते..
तिथच बसलेल १५ २० पोरांचे २ ३ टोळके घाणेरड्या आवाजात ओरडत होते, अंगविक्षेप करत आहे आणि काय काय..
लोकांच्या मॉडर्न असण्याच्या संकल्पना कुठल्या थरापर्यंत वेगवेगळ्या असु शकतात त्याच पुस्तक उघडून बसल्यासारख वाटत होतं.. मुर्खासारखे वागत होते हे मोठे लोक तिथे.. कुणाला कुणाच सोयरसुतक नाही, करतय करु दे मरतय मरु दे यातला प्रकार..डॅम च्या भिंतीवर शब्दशः २५ ते ३० च्या दरम्यान असलेला सो कॉल्ड तरूण उभा राहुन मुततोय . माफ करा पण त्याच्या कृतीला बघुण दुसरा शब्द मला सुचत नव्हता.. खाली लोक पाण्यात ओले होत मज्जा करत होते.. काय म्हणाव याला ?
त्या पाण्यात भिजत , तिथं बसुन लोक कणिस खात होते आणि अक्षरशः तिथच त्या पायर्यांवर फेकत होते..
एक तरूण.. जबरदस्तीने लोवेस्ट करण्यासाठी जमेल तेवढा सरकवलेला जीन्स , कुल टिशर्ट, तारे जमीन पर मधल्या आमिर सारखी हेअरस्टाईल करुन गॉगल लावुन भिंतीवर उभा राहुन पचापचा त्या पाण्यात थुंकतोय आणि खाली छोटे लेकरं त्याच पाण्यात डुंबत असताना हे चाल्लयं.. त्याला मी शिव्या मारल्यावर तो आणि इतरहि लोक निव्वळ बघे बनलेले होते.. कुठ हरवल्या यांच्या संवेदना ? मुर्ख आहेत का हे ? श्शी..
माझ लग्न झालेल नाही , ना ही एखाद्या २ महिन्याच्या लहान मुलाला वागवायचा मला अनुभव आहे तरीही माझ्यामते २ ते ३ महिन्याच बाळ फुलासारखं नाजुक असतं आणि त्याला तसच जपावसुद्धा लागतं.. पण तिथ एक तरुणी तिच्या तेवढ्याच बाळाला भर पावसात हाती गुंडाळून डोक्यावर छत्री सुद्धा न घेता तसच घेऊन त्या पायर्या चढत होती.. एखाद्याची हौस मान्य करता येते पण त्या छोट्या न बोलत्या जीवाचे काय हाल होत असणार अथवा होणार ते त्या माऊलीला तरी ठाऊक होते की नाही देव जाणो. भुशी डॅम चा तो सुंदर अनुभव घेऊन इतर कुठ फिरायची इच्छाच मरुन गेली. जाता जाता तेवढ कार्ल्याला गेलो तर तिथही तिच तर्हा.
पहिल्यांदा लोणावळा २०१० मधे बघीतला होता.. त्यानंतर डायरेक्ट आत्ता जाण्याचा मुहुर्त निघाला. कित्ती फरक पडला या ५ ६ वर्षात..पुर्ण बाजारीकरण झालय प्रत्येक ठिकाणाचं.. कार्ल्याच्या लेण्यांना देवळाचं स्वरुप आलयं. ना ही त्या लेण्या पहिल्याएवढ्या वैभवात राहिल्याय आणि शंका आहे की देवीच्या देवळाच देवत्व तरी शाबुत आहे कि नाही ? तरी बर हि बेभान तरुणाई देवीदेवतांची तेवढी भक्त नाही .. नाहीतर तिथल्या देवळातल्या भक्तीच्या कृतीला विकृतीची जोड लाभायला असा कितीसा वेळ लागणारे..
लिहण तितकस जमत नाही पण सांगण्यापासुन खरोखरच राहावल नाही..
मला नाही वाटत यापुढं कधी लोणावळा जायची हिम्मत होईल . . आणखी एक सुंदर ठिकाण भेटीला पारख झालं ..
विदर्भ, अ-विदर्भ असले वाद
विदर्भ, अ-विदर्भ असले वाद कृपया बंद करून लोणावळ्यात या, (सॉरी येऊ नका)
लोणावळा आणि तत्सम ठिकाणी चालणार्या राक्षसी, हिणकस आणि घाणेरड्या प्रवृत्तींना आळा घालणे वाटते तेवढे सोपे नाहीये.
साधारण या दिवसांमधे राज्य राखीव पोलिस दल किंवा वेळ पडल्यास प्रत्यक्ष सैन्यदलाच्या छोट्या तुकड्यांना अशा ठिकाणी काही दिवसांपुरते तंबू ठोकून नेमावे. आणि असल्या चाळ्यांना आवर घातला जावा. (अगदी अयोध्येतल्या सारखी सुरक्षा). काही पथके फिरती ठेवली जावीत. प्रहार मधल्या नाना पाटेकर सारखी अनेक लोके अशा पथकांमधे असतील तर बराच फरक पडेल.
मुंबईत होणाऱ्या गैर
मुंबईत होणाऱ्या गैर प्रकरणांमुळे तिथली लोकं लगेच एकमेकांवर खूप विश्वास ठेवत नाहीत >> हा पुर्ण पॅरा पटलाच नाही. थोडक्यात तुम्हाला मुंबई माहितीच नाही. काही महिने/वर्ष मुंबईत राहून लगेच मुंबई आणि मुंबईकरांन्बद्दल मते बनवू नका. थोडे रूड वाटेल पण जर इतरांना मुंबई एवढी वाईट वाटते आणि स्वतःच्या जन्मगावा बद्दल एवढा जिव्हाळा आणि अभिमान असेल तर मुंबईत येवूच नये. आल्यावर निदान नावे तरी ठेवू नयेत.
टिना, सॉरी अवांतर प्रतिसादाबद्दल.
<<<मुंबई माहितीच नाही. काही
<<<मुंबई माहितीच नाही. काही महिने/वर्ष मुंबईत राहून लगेच मुंबई आणि मुंबईकरांन्बद्दल मते बनवू नका. थोडे रूड वाटेल पण जर इतरांना मुंबई एवढी वाईट वाटते आणि स्वतःच्या जन्मगावा बद्दल एवढा जिव्हाळा आणि अभिमान असेल तर मुंबईत येवूच नये. आल्यावर निदान नावे तरी ठेवू नयेत.>>>>> हेच म्हणतो...
सामी +
सामी + १००००००००००००००००००००००००००००००.
नागपूरच्या लोकाना मुम्बई आवडत नाही का ? मी जरा गंभिरपणे विचारतेय , खोचकपणे नाही.
माझी एक मैत्रिण आहे - मूळची नागपूरची , आता कर्मभूमी मुम्बई , लग्न झाले तर नवरा मुळचा मुम्बईचा .आता कित्येक वर्श मुंबईतच राहते .
पण तिच्या बोलण्यात नेहमीच " तुम्ही मुम्बईकर ना ... असे .. तसे .. मुम्बईत अस करतात .. ही पद्धत तुमच्या मुम्बईतच बघतलिय .. नागपूरला असं नसतचं" असाच सूर असतो .
मी पक्की मुम्बईकर आहे त्यामुळे आमचे चांगले वाजलयं दोन तीन वेळा .
पण शेवटी जीवाभावाची मैत्रिण असल्यामुळे भांडण फार वेळ टिकत नाही .
पण आता तिला कळलय त्यामुळे आमच्या बोलण्यात सहसा वादग्रस्त विशय आणत नाही .
टिने , सॉरीच . तुझ्याबद्दल राग नाही पण कोणालाच आपल्या जन्भूमी आणि कर्मभूमीबद्दल गैरसमज पसरवलेल आवडत नाहीच .
आणि शेवटी माहेरची व्यक्ति भेटली म्हणून कितीही आनंद झाला तरी या धाग्यावर प्रांतवाद आणायची गरज नव्हतीच.
लोक्स भारतीय होउया अन परत
लोक्स भारतीय होउया अन परत मुद्द्यावर प्रकटुन पुढे , एखादा टोल फ्री नंबर करायला हवा जिथे हे प्रकार थांबविण्यासाठी मदत मिळु शकेल . आयला सहकुटुंब कुठ सहलिला निघाव तर आत कुठ तरी जरा धाक्धुकच
ऑड डे बेस्ट ऑपशन अस कायम वाटत.
>>शेवटी माहेरची व्यक्ति भेटली
>>शेवटी माहेरची व्यक्ति भेटली म्हणून कितीही आनंद झाला तरी या धाग्यावर प्रांतवाद आणायची गरज नव्हतीच>><<
+१००
लोणावळ्याच्या धाग्यावर मुंबईला नावे ठेवायचे प्रयोजन कळले नाही.
विदर्भातल्या लोकांबद्दल मुंबईकर म्हणून काही निरिक्षणे केली आहेत, ती जर मांडली तर कदाचित तुम्हाला राग येईल. असो.
लोणावळ्याबद्दल विषय सुरु राहू दे
तुम्ही मुम्बईकर ना ... असे ..
तुम्ही मुम्बईकर ना ... असे .. तसे .. मुम्बईत अस करतात .. ही पद्धत तुमच्या मुम्बईतच बघतलिय .. नागपूरला असं नसतचं" असाच सूर असतो .
अहो स्त्री च्या मनातला माहेरसंबंधी हळवा कोपरा तो!! वैयक्तिक माझे विचारता मला माझे विदर्भातले जन्मगाव आवडते पण मुंबई ही आवडते! शीस्त असलेले शहर आहे ते (हे ज्यांना खोटे वाटते त्या लोकांनी एक आठवडा दिल्लीत काढावा, अर्थात काही कारणासाठी मला दिल्ली सुद्धा प्रचंड आवड़तेच्)
विषयासंबंधी बोलायचे झाल्यास
सार्वजनिक आयुष्यातली शिस्त हे भारतात एब्सेंट असलेले फीचर आहे, कदाचित लोक आज ६९ वर्षांनंतर सुद्धा मिळालेल्या स्वातंत्र्याच्या हैंगओवर मधुन बाहेर पडलेले नसावे, थोड्याफार फारकाने जगातल्या तमाम लोकशाही देशांच्या इतिहासात असले फेज सापड़तातच!!
एकंदरीत विदर्भाच्या प्रादेशिक
एकंदरीत विदर्भाच्या प्रादेशिक अस्मिता फारच जोरदार आहेत. आमच्यासारख्या विंचवाच्या बिर्हाडांना प्रदेशच नसल्यानं अस्मिता नसतातच. त्यामुळे आम्हाला बरोबर काय नी चूक काय ते समजत नाही.
नंदिनी +१ आपण सगळ्यानी
नंदिनी +१
आपण सगळ्यानी अस्मिता शिरेल पाहून झोपावे :p
आमच्यासारख्या विंचवाच्या
आमच्यासारख्या विंचवाच्या बिर्हाडांना प्रदेशच नसल्यानं अस्मिता नसतातच. त्यामुळे आम्हाला बरोबर काय नी चूक काय ते समजत नाही. >> +१
मला नाही वाटत यापुढं कधी
मला नाही वाटत यापुढं कधी लोणावळा जायची हिम्मत होईल . अरेरे . आणखी एक सुंदर ठिकाण भेटीला पारख झालं ..
याचं सल मलाही नेहमीच राहील.
निव्वळ किळसवाणं. किव येते त्या लोकांची.
पोटाला घालंतय त्या गावाला
पोटाला घालंतय त्या गावाला नावे का ठेवावीत म्हणते मी? उद्या अमेरिकेला गेलात तर गप पानात पडेल ते खाल ना? की अमेरिअन अस्से आम्ही तस्से करत रहाल? एवढे होते तर रहायचे ना विदर्भात?
>>>> कदाचित लोक आज ६९
>>>> कदाचित लोक आज ६९ वर्षांनंतर सुद्धा मिळालेल्या स्वातंत्र्याच्या हैंगओवर मधुन बाहेर पडलेले नसावे <<<<<
सोन्याबापू...... नसावे? नाहीतच!
शिवाय, ७७ वर्षा नंतर सुद्धा "कायदेभंगाच्या" हँगओव्हरमधुनही बाहेर पडलेले नाहीत.
>>>>> की अमेरिअन अस्से आम्ही
>>>>> की अमेरिअन अस्से आम्ही तस्से करत रहाल? <<<<<
इथ अमेरिकन ऐवजी आमच्यात हा शब्द घातला, की नव्या सुनेला सुरवातीच्या काळात "आमच्यात अस्से नी तुमच्यात तस्से इकडे नै चालायचे " म्हणणार्या कैक सासवां नजरेसमोर उभ्या राहिल्या.
कालांतराने सून वरघटल्यावर, हेच वाक्य सासूने ऐकवल्यावर सून प्रतिउत्तर देते की "होच्च मुळी, तुमच्यात तस्सच अस्त, उगाच पदरात धोंडा पाडून घेतला मी"
फक्त हल्ली "एवढे होते तर रहायचे ना विदर्भात?" या चालीवर त्यापुढील वाक्य म्हणजे " येवढे होते तर रहायचे होते ना माहेरीच" असे म्हणण्याचि हल्लीच्या सासवांना सोय राहिली नाहीये, कारण हल्लीच्या सूना सासूच्या पदराखालुन आपल्या नवर्याला बाजुला काढून केव्हा वेगळे राहू लागतात ते सासूलाच काय, नवर्यालाही लौकर कळत नाही...
कसे आहे, अस्सल पुणेकरासाठी,
खाली लिंक देतेय त्या
खाली लिंक देतेय त्या लोणावळ्याच्या नाही ठाणे, येऊर इथल्या संदर्भात आहेत पण विषय तोच आहे.
येऊर येथे काही गटांनी मागे कचरा सफाई मोहीम केली होती त्यात त्यांना १०० किलो कचर्यात असंख्य दारुच्या बाटल्याही मिळाल्या. तिथे येऊन दारु पिउन धिंगाणा घालण्याचे प्रमाण वाढले अहे असेही जाणवले . या बातम्या पेपरमधे आल्यानंतर प्रशासनाने तिथे जाताना बंधन, काही रस्ते बंद, रखवालदार असे उपक्रम सुरु केलेत. त्याचा उपयोग हळुहळू कळेल.
याबद्दल बातमी इथे
त्यानंतर निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन येऊर मधे गटारी अमावस्येला होणारा धिंगाणा टाळण्यासाठी ग्रीन गटारी हा उपक्रम केला. या संबंधी बातमी इथे आणि इथे
लोणावळ्यात आणि इतर ठिकाणीही निसर्गप्रेमींमर्फत असा उपक्रम राबवता येईल.
आता बरोबर.... प्रॉब्लेम आहे.
आता बरोबर.... प्रॉब्लेम आहे. तो सोडवायचा कसा ह्यावर चर्चा व्हायला हवी.
१५ ऑगस्टला जोडुन आलेल्या
१५ ऑगस्टला जोडुन आलेल्या सुट्टीमुळे झालेल्या गर्दीचा फोटो पाहिला लोकसत्ता मध्ये , भुशी डॅम परिसरातील.
मुन्गी शिरायला जागा नसेल अशी गर्दी.
पोटाला घालंतय त्या गावाला
पोटाला घालंतय त्या गावाला नावे का ठेवावीत म्हणते मी? उद्या अमेरिकेला गेलात तर गप पानात पडेल ते खाल ना? की अमेरिअन अस्से आम्ही तस्से करत रहाल?
>>>
आमी अम्रीकेला गेल्तो तेव्हा चिकन रस्सा लय पुचाट बनवला म्हून परत केला होता ...
वर नागपुरात कसा बनवतात ते पण शिकवून आलो होतो 
अगली बार उसकू बताया ... फिर उसने वैसाच बनाके खिलाया
अन बाहेरण आलेले लोक्सच शहराला बरे दिवस आणतात ... अस काहीसं तत्वज्ञान ऐकलं होत ...
सीमा, तुम्ही या धाग्यावर येऊन
सीमा, तुम्ही या धाग्यावर येऊन गेल्याचं दिसलं. म्हणून इथे लिहित आहे. (तुमची विपू बंद आहे.) काही दिवसांपूर्वी तुम्हाला संपर्कातून एक ईमेल केलं होतं. ते पाहणार का? कृपया स्पॅमही चेक करा.
अवांतराबद्दल सॉरी.
१५ ऑगस्टला जोडुन आलेल्या
१५ ऑगस्टला जोडुन आलेल्या सुट्टीमुळे झालेल्या गर्दीचा फोटो पाहिला लोकसत्ता मध्ये , भुशी डॅम परिसरातील.
मुन्गी शिरायला जागा नसेल अशी गर्दी.>>> आज काल अशी गर्दी कान्हेरी गुंफेला ही असते म्हणे . तिथे काय चलते ते माहित नाही , पण फार वेगळे नसावे.
मुंबईवर वेगळा धागा काढायच्या
मुंबईवर वेगळा धागा काढायच्या का?
मुंबईवर वेगळा धागा काढायच्या
मुंबईवर वेगळा धागा काढायच्या का?>>>>>> वाचवा! वाचवा म्हणत सैरावैरा पळत सुटलेली बाहुली.
....तो काढलाय ना आधिच "...ते
....तो काढलाय ना आधिच "...ते ही मुंबईसारख्या शहरात" असे म्हणुन?
वाचवा! वाचवा म्हणत सैरावैरा
वाचवा! वाचवा म्हणत सैरावैरा पळत सुटलेली बाहुली. >> मुंबईकर फारच पळापळ करतात. नैतर आमच्या ....... इथे कस सगळ सुस्तीत चालु असत...
मी मुम्बईकर नाही, पुणेकर आहे.
मी मुम्बईकर नाही, पुणेकर आहे.:खोखो:
अय्यो, मला वाटलं परत कुणाला
अय्यो, मला वाटलं परत कुणाला 'लोणावळ्यात विषण्ण करणारा अनुभव' आला की कॉय!

तर लोक इथे अजून मध्यप्रांतातच फिरतायत.
मग तुम्ही १ ते ४ ही वेळ सोडुन
मग तुम्ही १ ते ४ ही वेळ सोडुन पळापळ करत असाल...
हो.
हो.:फिदी:
अरे काये हे
अरे काये हे
Pages