विषण्ण करणारा अनुभव - लोणावळा

Submitted by टीना on 2 July, 2015 - 03:24

काल सकाळी अगदी झोपेत असताना ताईचा फोन आला लोणावळ्याला चलतेस का म्हणुन. अगदी ताबडतोब हो म्हटल आणि आवराआवर करुन तिच्या घरी पोहचली. तिथुन थोड्याच वेळात लोणावळ्याकडे प्रस्थान केल..

पहिला स्टॉप भुशी डॅम वर आणि पुर्ण दिवसासाठी मुड खराब .. अस वाटलं कुठुन दिमाग आला आणि इथ जाण्याकरीता हो म्हटलं .. पार्किंगसाठी फि रु.१००.. अबब! अस झालं. असो म्हणुन शंभरी त्याच्या हातात कोंबली आणि चालत निघालो. तिथ जाण्याच्या वाटेवर सगळी कचराकुंडी.. प्लॅस्टिकचे चमचे , ताट , सिगरेटचे थोटकं , कपडे काय नको ते पडलेलं.. किळस आली अगदी.. चिखलभरल्या चपलेनं लोक बाजुच्या पायर्‍यांवरुन चढत आणि खालच्या पायर्‍यांवर बसलेले लोक त्या पायर्‍यांवरुन पडणार्‍या पाण्यात बसुन मज्जा घेत होते..
तिथच बसलेल १५ २० पोरांचे २ ३ टोळके घाणेरड्या आवाजात ओरडत होते, अंगविक्षेप करत आहे आणि काय काय..

लोकांच्या मॉडर्न असण्याच्या संकल्पना कुठल्या थरापर्यंत वेगवेगळ्या असु शकतात त्याच पुस्तक उघडून बसल्यासारख वाटत होतं.. मुर्खासारखे वागत होते हे मोठे लोक तिथे.. कुणाला कुणाच सोयरसुतक नाही, करतय करु दे मरतय मरु दे यातला प्रकार..डॅम च्या भिंतीवर शब्दशः २५ ते ३० च्या दरम्यान असलेला सो कॉल्ड तरूण उभा राहुन मुततोय . माफ करा पण त्याच्या कृतीला बघुण दुसरा शब्द मला सुचत नव्हता.. खाली लोक पाण्यात ओले होत मज्जा करत होते.. काय म्हणाव याला ?

त्या पाण्यात भिजत , तिथं बसुन लोक कणिस खात होते आणि अक्षरशः तिथच त्या पायर्‍यांवर फेकत होते..
एक तरूण.. जबरदस्तीने लोवेस्ट करण्यासाठी जमेल तेवढा सरकवलेला जीन्स , कुल टिशर्ट, तारे जमीन पर मधल्या आमिर सारखी हेअरस्टाईल करुन गॉगल लावुन भिंतीवर उभा राहुन पचापचा त्या पाण्यात थुंकतोय आणि खाली छोटे लेकरं त्याच पाण्यात डुंबत असताना हे चाल्लयं.. त्याला मी शिव्या मारल्यावर तो आणि इतरहि लोक निव्वळ बघे बनलेले होते.. कुठ हरवल्या यांच्या संवेदना ? मुर्ख आहेत का हे ? श्शी..

माझ लग्न झालेल नाही , ना ही एखाद्या २ महिन्याच्या लहान मुलाला वागवायचा मला अनुभव आहे तरीही माझ्यामते २ ते ३ महिन्याच बाळ फुलासारखं नाजुक असतं आणि त्याला तसच जपावसुद्धा लागतं.. पण तिथ एक तरुणी तिच्या तेवढ्याच बाळाला भर पावसात हाती गुंडाळून डोक्यावर छत्री सुद्धा न घेता तसच घेऊन त्या पायर्‍या चढत होती.. एखाद्याची हौस मान्य करता येते पण त्या छोट्या न बोलत्या जीवाचे काय हाल होत असणार अथवा होणार ते त्या माऊलीला तरी ठाऊक होते की नाही देव जाणो. भुशी डॅम चा तो सुंदर अनुभव घेऊन इतर कुठ फिरायची इच्छाच मरुन गेली. जाता जाता तेवढ कार्ल्याला गेलो तर तिथही तिच तर्‍हा.

पहिल्यांदा लोणावळा २०१० मधे बघीतला होता.. त्यानंतर डायरेक्ट आत्ता जाण्याचा मुहुर्त निघाला. कित्ती फरक पडला या ५ ६ वर्षात..पुर्ण बाजारीकरण झालय प्रत्येक ठिकाणाचं.. कार्ल्याच्या लेण्यांना देवळाचं स्वरुप आलयं. ना ही त्या लेण्या पहिल्याएवढ्या वैभवात राहिल्याय आणि शंका आहे की देवीच्या देवळाच देवत्व तरी शाबुत आहे कि नाही ? तरी बर हि बेभान तरुणाई देवीदेवतांची तेवढी भक्त नाही .. नाहीतर तिथल्या देवळातल्या भक्तीच्या कृतीला विकृतीची जोड लाभायला असा कितीसा वेळ लागणारे..
लिहण तितकस जमत नाही पण सांगण्यापासुन खरोखरच राहावल नाही..
मला नाही वाटत यापुढं कधी लोणावळा जायची हिम्मत होईल . Sad . आणखी एक सुंदर ठिकाण भेटीला पारख झालं ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती पोस्ट तुम्हाला उद्देशुन नव्हती हे लिहुनही तुम्ही तुमच्यावर ओढवुन घेत असाल तर तुमच्या बाबतीतही हे माझे शेवटचे पोस्ट.

वरची पोस्ट: वेळेचं गांभिर्य /नाणं पोटात गेल्याचं गांभिर्य .काहींना एकाठिकाणी विनोद वाटेल दुसय्राला व्यवहार.बघा पटतंय का?

विषण्ण करणारा अनुभव - लोणावळा या धाग्यावर विषण्ण करणारा अनुभव येतोय का खरच ?

बर्‍याच पोष्टी येंटरटेनिंग होत्या..
असो..
परत एकदा काय लिहिल हे वाचुन तो दिवस आठवला..काटे आले..
अजुनही कुणाला जावस वाटत असेल निदान इथ्ल्यांना अस वाटत नाही..

राहता राहिला वॅक्स म्युझियम चा अनुभव..
तिथ सुद्धा त्या दिवशी भेट दिली होती मी..
कुणीतरी विचारलय म्हणुन लिहिते कि बाहेर जी नावे दिली त्या प्रतिमा वुड बी लिस्ट मधे आहेत..

तसे त्या संग्रहालयात सुद्धा काही खुप छान अनुभव नव्हता..लोकांच्या मर्कतलीला तिथं पण जोरदार चालु होत्या..
आत जातेवेळी तुम्हि फोटो काढु शकता पण हात वगैरे लावू नका प्लीज अस विणवणारीचा काहिएक फरक लोकांना पडत नव्हता..क्षणिक सुखासाठी आपण एखाद्याचि मेहनत पाण्यात घालु शकतो हे भान सुद्धा नव्हत..
बस एखादा हात फैलवलेला शाखा चा पुतळा असता तर लोक त्याला जाऊन बिलगले असते इथवर प्रकार चाल्लेला..त्या पुतळ्याचा हात हाती घेण काय, त्याला खरवडून पाहण काय..अशक्य..
तिथुनही मी धावतच बाहेर निघाली..
मुळात कुठ्ल्याही बाबतीत नियम पाळण कितीस अवघड आहे ?
आणि ते न पाळण्यात कसला आलाय अभिमान हेच कळत नाही मला..

मी स्वत: जेव्हा मन लावुन एखादी रांगोळी काढते तेव्हा स्वतःचा जरी धक्का लागुन ती खराब झाली तरी मला वाईट वाटत , बरेचदा राग सुद्धा येतो स्वतःचा.. इठ त्या कलाकाराने एवढ्या मेहतीन त्याची कला सादर केली प्रसंगी लोकविश्वासाखातर लोकांच्या आवाक्यात ठेवली आणि हे बिनडोक..
सोडा..लिहिण पण मुर्खपणाच आहे..

"नेमेची येतो मग पावसाळा" ... हा धागा वर काढला कारण फेबु वर एक संबंधित व्हिडीओ पहायला मिळाला:
लोणावळ्याला जाण्यापूर्वी हे पहा आणि ठरवा......

https://www.facebook.com/ahe.na.apratim/videos/974214386011214/

माझ्याही बाबतीत असाच एक अनुभव आहे.आम्ही दापोलीला गेलो होतो समुद्रावर .माझी मुलगी खुप चं एन्जॉय करत होती पण भरती असल्याने पाणी नि कचरा जरा जास्तच दिसत होता.असच खेळता खेळता तिचा पाय प्लास्टिक च्या पिशवित अडकला नि तोल जाउन ती पडली आणि गुडघ्याला फुटकि बिअरच्या बॉटलने चांगलेच कापले खुपच रक्त गेले.जास्त वाईट याचेही वाटले की माझी मुलगी खाल्लेल्या चॉकलेटचे रेपर पण चुकुनहि रस्त्यात टाकत नाही तिलाच लोकांच्या कचरा कुठेही टाकण्याच्या घनेरड्या वृत्तीचा त्रास सहन करावा लागला

अतुल्डीपाटील,
विडीयो पाहिला...
बापरे.. किती कचरापट्टी लोकांची..

नेमक काही दिवसांपूर्वी थोपू वर एक पोस्ट बघितली..
जर्मनी कि कुठल्याश्या देशात जेव्हा काही ब्लॉकेज मुळे रस्त्यावरच्या गाड्यांना मार्ग हळूहळू क्रमित करावा लागतो तेव्हा सार्‍या गाड्या चालणार्‍या लेनच्या उजव्या व डाव्या बाजुला लाईनमधे लागतात आण मधला मार्ग पूर्णपणे अँब्युलन्स व तत्सम आकस्मिक सेवांसाठी चालणार्‍या गाड्यांसाठी राखीव ठेवतात..
ते आणि हे चित्र बघुन डोळे भरुन आले Sad

एक विनंती. कृपया या दिवसात लोणावळा टाळाच. खुप भयंकर परीस्थिती उद्भवू शकते. आमची मित्र मंडळी तिथे रेस्क्यू ओपरेशन राबवतात, तेही स्वतःच्या खर्चाने. आपला वेळ काढून कौल आला की धावत सुटतात. एक मुलगा सेल्फीच्या नादात दरीत कोसळला. पण गर्दीमुळे रेस्क्यूवाली मंडळी तिथपर्यंत पोहोचू शकली नाहीत.दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह काढण्यात आला.

हा व्हिडियो वॉट्सअपवर सुध्दा फिरतोय. ती गर्दी आणि चेंगराचेंगरी पाहून लोक कशाला मरायला जातात तेच कळंत नाही.

सुनटुन्याने लिहिले आहे त्याप्रमाणे खरंच या दिवसात लोणावळा टाळणेच इष्ट.

मीपण कालच पाहिला हा विडियो, अगदी काटा आला अंगावर, किती ती गर्दी.

मैत्रीणी मागे लागल्यात कुठेतरी पिकनिकला जाऊया विथ फॅमिली पण सगळीकडेच हा नजारा असेल म्हणुन धीरच होत नाही Sad

लोणावळ्याला मागील रविवारी अतिगर्दीमुळे पोलिसांनी नवीन येणार्‍या पर्यटकांना रोखलं आणी परत पाठवलं.
विकांताला लोणावळा एकदम, 'नो-नो', विकडे ला कदाचित परिस्थिती बरी असेल.

>> सार्‍या गाड्या चालणार्‍या लेनच्या उजव्या व डाव्या बाजुला लाईनमधे लागतात आण मधला मार्ग पूर्णपणे अँब्युलन्स व तत्सम आकस्मिक सेवांसाठी चालणार्‍या गाड्यांसाठी राखीव ठेवतात..

एका वर्षीच्या महाबळेश्वर ट्रीपची आठवण झाली. तिथल्या पालिकेने पर्यटकांकडून कराच्या नावाखाली शेकडो रुपयांच्या पावत्या फाडायला जागोजागी हर एक चौकात माणसे पेरली आहेत. आणि ह्या पैशाच्या बदल्यात पर्यटकांना मिळतो तो प्रचंड ट्रॅफ़िक जाम, पार्किंग सुद्धा करता येणार नाही अशी बाजारपेठ, गर्दीचे शून्य नियोजन असलेले आणि कसल्याही सोयी सुविधा नसलेले पॉइंट्स. पालिका यातील कोणतीही गोष्ट देण्याची जबाबदारी घेत नाही. रस्त्यावर गुंड उभे करून पैसे लाटायची अधिकृत लुटालूट मात्र इमाने इतबारे सुरु असते.

स्वत:ला गाईड म्हणवणाऱ्या भुरट्यानी तर किळस यावी इतका कहर केला आहे. पर्यटकांना रस्ते नीट सापडू नयेत म्हणून रस्त्यांवरील दिशादर्शक खुणा आणि बोर्डवरची अक्षरे खरवडून खोडून टाकली आहेत (जेणेकरून रस्ते दाखविण्यासाठी का असेना, गाईड घेतील अशी अपेक्षा).

बाहेरच्या देशांत पर्यटनाचे पैसे घेतात. पण तशा सुविधाही ते देतात. इथे मात्र पर्यटन म्हणजे पैसे मोजून मानसिक त्रास सहन करणे असा प्रकार आहे.

माझा असाच अनुभव माळशेज घाटा बद्दल आहे, लोक रस्त्यावरच दारू पिऊन नाचत होते, पोलिस आले की तेवढ्या पुरत थांबायचा आणि गेले की परत सुरू..फॅमिली ला घेऊन जाण्याचे ही ठिकाणे आता राहिली नाहीत, त्यापेक्षा एखाद्या वॉटर पार्क मध्ये गेलेले चांगले. आणि खरा पाउस अनुभवायचा असेल तर एखादा ऑफबीट किल्ला जिथे अशी गर्दी नसते. एक वाटते की लोणावळा सारख्या सर्व निसर्गमय ठिकाणी दारूबंदी केली तरी अर्धि गर्दी गायब होईल.

पुण्या मुंबैच्या खुराड्यात राहणारे जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातात तेव्हा कीती ओरबाडू अन कीती नाही असे त्यांना होते.आमच्यासारख्या गावाकडच्या लोकांत ही ओरबाडू वृत्ती नाही.

आमच्यासारख्या गावाकडच्या लोकांत ही ओरबाडू वृत्ती नाही.>>> आत्यंतिकपणे असहमत.ही वॄत्ती असणारे दोन्ही पक्षी असतात.

काहीही हाँ ! शहरी लोकांचे सरसकटीकरण का ? उदा. मी आणि माझ्या शे दोनशे नातेवाईकांमधे असे कोणीही नाहीये.

सिंथेटिक जि, गावातली लोकसुद्धा लबाड असतात हो. आज कुठल्याही किल्ल्यावर जा, तिथे आसपासच्या गावातील मंडळी दारू पिऊन धिंगाणा करतात. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी राजमाची किल्ल्यावर मुक्काम करून स्वतःच्या डोळ्यांनी पहा. रात्री धिंगाणा करून सकाळी शिवज्योत घेऊन जातात. गेल्या आठवड्यातच माबोकरांचा सह्यमेळावा रसाळगवर होता. स्थानिक गावकरी दारू पार्टी करीत होते गडावर आणि त्यांना सोबत होती मनसे चा "खेड" शहराध्यक्ष वैभव खेडेकर याची. दारू पिऊन झाल्यावर देवीचा पुजारी गाभाऱ्यात जाऊन झोपलेला.

Pages