आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............
तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!
अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!
याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
व्वा काय मस्त धावतोय
व्वा काय मस्त धावतोय धागा..:)
मदन बाण,शुभ्र चांदण्या जणु
साप बापरे. दर पावसाळ्यात जागु सापाचे दर्शन घडवते ...... /\ ........
चिंब भिजलेला अनंत... क्या बात है!
निरु ते चिंचेच झाड आणि तो बाकडा, अगदी मनात कोरला गेला...मी तिथला आसमंत अनुभवते आहे...:)
आणि त्यावर आदिजो यांना सुचलेल्या अगदी समर्पक ओळी...
जागु समुद्राच्या लाटा खरच हळु हळु ताण कमी करतात..
निरु तुमची बाग आता कुतुहलाचा विषय ठरणार आहे..
>>>>निरु ते चिंचेच झाड आणि तो
>>>>निरु ते चिंचेच झाड आणि तो बाकडा, अगदी मनात कोरला गेला...मी तिथला आसमंत अनुभवते आहे...स्मित
आणि त्यावर आदिजो यांना सुचलेल्या अगदी समर्पक ओळी...
जागु समुद्राच्या लाटा खरच हळु हळु ताण कमी करतात..
निरु तुमची बाग आता कुतुहलाचा विषय ठरणार आहे..>>>> +1
निरु तुमची बाग आता कुतुहलाचा
निरु तुमची बाग आता कुतुहलाचा विषय ठरणार आहे..>>>> +१
निरु तुमची बाग आता कुतुहलाचा
निरु तुमची बाग आता कुतुहलाचा विषय ठरणार आहे..>>>>+१
निरु, फार सुरेख बाग आहे
निरु, फार सुरेख बाग आहे तुमची.
जागू, तो अनंताचा फोटो फार देखणा आलाय.
सगळे फोटो नी वर्णने मस्त!
सगळे फोटो नी वर्णने मस्त!
अरे वाह !!! फार सुंदर चालला
अरे वाह !!! फार सुंदर चालला आहे हा धागा. सुरेख फोटो अनंतचा. बघतांनाच घमघमायला लागला. दोळ्यासमोर वेग् वेगळ्या घरांमधिल अनंत आले.त्या बरोबर तो माळणार्या हयात नसलेल्या अनेक जणी..
दिल्लीत ल्या लोधी बागेत अनंताची अनेक झाडे आहेत. एकावेळी फुलतात.अहाहा!!! सांगता येत नाही कसे वाट्ते ते अनुभवतांना !!हे सारे एक फुल बघुन आठवले.झक्कास..
अंगणातल्या कडुलिंबावर सकाळी
अंगणातल्या कडुलिंबावर सकाळी पक्षांचा एक थवा आला होता. कावळ्यांना त्यांचं येणं आज्जिबात आवडलं नव्हतं. खूप कोलाहल माजला. ते पक्षी आणि कावळे .
मी गच्चीत जाईपर्यन्त सगळे उडून गेले. हे दोघेही माझी चाहूल लागल्याबरोबर उडून गेले.
खाकी पिवळसर अंग डोक्यावर काळा उलटा वळलेला तुरा, आणि चोच पिवळी.
हे कोण? फोटो झूम करून घेतला. या साळुख्या नक्की नव्हत्या. त्या रोजच असतात इथे.
निरु गुलजार, तुमची बाग फार
निरु गुलजार, तुमची बाग फार सुंदर दिसतेय. तो छोटासा ओढा पण मस्तच.
तुमची बाग आता कुतुहलाचा विषय ठरणार आहे..>>>> +१
मानुषी, ते सातभाई वाटत आहेत. हे ७/८ च्या थव्यानी असतात आणि फार कोलाहल करतात.
खाकी पिवळसर अंग डोक्यावर काळा
खाकी पिवळसर अंग डोक्यावर काळा उलटा वळलेला तुरा, आणि चोच पिवळी.
हे कोण? >>>> बहुतेक ब्राह्मणी मैना असणार .... Scientific name: Sturnia pagodarum
भांग पाडी मैना का? मानुषी ताई
भांग पाडी मैना का? मानुषी ताई मस्त टिपलीयेस!
अरे वा! मस्त धावतोय धागा!
अरे वा! मस्त धावतोय धागा! सगळे प्रचि व माहिती हिरवीगारेगार...
मानुषी, बरा टिपू दिलाय तिनं /
मानुषी, बरा टिपू दिलाय तिनं / त्यानं प्रचि ..
अख्खा एक दिवस लोणावळ्यात होती पण नि ग वर टाकण्यापुरता एकही प्रचि मिळाला नाही
निसर्ग भेटलाच नाही मला तिथं ..
हल्ली आमच्याकडेही छान वेगळे
हल्ली आमच्याकडेही छान वेगळे पक्षी येतात, सोसायटीच्या झाडांवर. नाहीतर एरवी कबुतर, कावळे, चिमण्या आणि साळुंक्या फक्त बघायला मिळतात.
मानुषीताई मस्त फोटो.
माझ्या बेडरुमच्या खिडकीतही
माझ्या बेडरुमच्या खिडकीतही हल्ली येवून बसतात दयाळ, साळुंक्या, बुलबुल. परवा एक पक्षी होता अगदी चिमुकला. त्याची शेपटी पंख्यासारखी शरिराला ९० अंशात पिसारलेली होती. आणि एका जागी बसला असला तरी भिरीभिरी स्वतःभोवती नाचत होता.
मग कदाचित तो नाचण पक्षी
मग कदाचित तो नाचण पक्षी असेल...
ह्म्म. काळा/करडा होता. मी
ह्म्म. काळा/करडा होता. मी डासांची जाळी लावलेल्या खिडकीच्या आतून मोबाईलने पटकन फोटो काढला त्यामुळे स्पष्ट आला नाही. त्यातून नाचकाम चालू होते त्याचे त्यामुळे ब्लरड आला. चांगला फोटो आला असता तर इथे टाकला असता.
आमच्या बेडरूमच्या खिडकी
आमच्या बेडरूमच्या खिडकी बाहेरच्या पिंपळावरती बसलेला Spotted Fan Tail Fly Catcher.. नाचण..
हो हो. हाच होता. धन्यवाद
हो हो. हाच होता. धन्यवाद
तुम्हाला ह्याचा अगदी क्लिअर फोटो घेता आलाय. एकाजागी स्थिर बरा राहिला!
सुंदर फोटो. खरेच अगदी
सुंदर फोटो. खरेच अगदी क्षणभरही स्थिर रहात नाही हा !
हे हल्ली खुप दिसतात इथे. शेव
हे हल्ली खुप दिसतात इथे. शेव खायला आवडते यांना. मुलगा खात होता गॅलरीत तर आले. मग एका कुंडीत ठेवली. तर आवडीने खाल्ली. मग चिमण्या, कावळेपण आले शेव खायला.
पण पक्षांसाठी योग्य की अयोग्य माहीती नाही. आता नाही देत.
पावसाचा आनंद घेताना दयाळ
पावसाचा आनंद घेताना दयाळ
वाॅव....
वाॅव....
व्वा सुंदर पक्षी दर्शन आज
व्वा सुंदर पक्षी दर्शन आज
आमच्या कडे पण दयाळ, बुलबुल, ashy,सातभाई, सुर्य पक्षी, शिंपी पक्षी , चिमण्या, कावळे, होलो,पाकोळी, कबुत्तर, शिक्रा, हळद्या नियमीत हजेरी लावतात.. सगळ्यांच्या वेळा आणि जागा ठरलेल्या..:)
आणि हो अधन मधन एक पांढर घुबड पण येतं...
मस्ताय नाचण चा प्रचि... सायली
मस्ताय नाचण चा प्रचि...
सायली चान्स भेटला तर कॅमेरात टिपशिल...पांढर घुबड बघायला जाम आवडेल मला
दयाळ पन भारीच
दयाळ पन भारीच
दयाळ पन भारीच
दयाळ पन भारीच
नाचण, दयाळ , दोन्ही मस्त!
नाचण, दयाळ , दोन्ही मस्त!
नाचण आणि दयाळ मस्तच.
नाचण आणि दयाळ मस्तच.
आमच्या खिडकीत बसलेली भिजलेली
आमच्या खिडकीत बसलेली भिजलेली साळुंकी..
Pages