आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............
तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!
अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!
याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सो क्यूट.. पोपट, खारी
सो क्यूट.. पोपट, खारी सहभोजन.. आणी तो बग.. सुंदर आहे
निरु गुलजार हे कीटकप्रेमी
निरु गुलजार हे कीटकप्रेमी दिस्ताहेत आणि अभ्यासही खूपच दिस्तोय कीटकांचा ....
भारी फोटो आहेत सर्व कीटकांचे ...
निरू गुलजार फोटो सगळे मस्तच
निरू गुलजार फोटो सगळे मस्तच आणि किड्यांचे फोटो नावासकट तर मस्तच. काय सुंदर दिसतात हे किडे सुद्धा.
सगळ्यांचे फोटो मस्तच.
नविन भाग!! मस्त माहिती आणि
नविन भाग!! मस्त माहिती आणि फोटो....मानुषी, मनोगत आणि कोलाज खासच गं!!
निरु गलजार यांनी क्लिक
निरु गलजार यांनी क्लिक केलेले कीडेमकौडेही इतके सुंदर दिसतात...........पोपट आणि खारीचं सहभोजन तर विलोभनीयच!
शशांकली आणि गुर्जी धन्यवाद! छान वाटलं सर्वांना मनोगत आवडलं
.यातच थोडे फेरफार करून यावर्षीच्या पहिल्या (रोटरी वर्ष साधारणपणे आत्ताच सुरू होते ना!) रोटरी बुलेटिनमधे लेख दिला आहे. या वर्षी एडिटरचं काम आहे. त्यामुळे काही ना काही(जरा तरी वाचनीय!) लिहीत रहाण्याची जबाबदारी आली आहे.
वर्षू पावडर पफ मस्तच!
अरे वा मानुषी मस्त. बुलेटीन
अरे वा मानुषी मस्त. बुलेटीन फक्त तुझ्या क्लब पुरते आहे की डिस्ट्रिक्ट च निघत त्याच? हो आता सुरु होतील सगळे रोटारी इन्स्टॉलेशन्स.
बहुतेक डिस्ट्रिक्टचं असावं.
बहुतेक डिस्ट्रिक्टचं असावं. अगं जागू मला नक्की माहिती नाहीये. पण परवा अचानकच दुसर्या क्लबच्या एका रोटेरियने विचारलं....काय काम चालू झालं का ...म्हणून. त्यावरून वाटलं.
<<निरु गलजार यांनी क्लिक
<<निरु गलजार यांनी क्लिक केलेले कीडेमकौडेही इतके सुंदर दिसतात...........पोपट आणि खारीचं सहभोजन तर विलोभनीयच!>> +१११
आणि तो पोल्का डॉट्स किती क्यूट
आहाहा.. एक से बढकर एक प्रचि
आहाहा.. एक से बढकर एक प्रचि आहेत सगळेच्या सगळेच..सुपर्ब...
निरू गुलजार, व्हेरायटी..क्या बात..
बाकी तो अंगतपंगत वाला प्रचि बेस ..
निरू गुलजार >> मस्तच, वेगळे
निरू गुलजार >> मस्तच, वेगळे फोटो..
मेळघाटातील संपूर्ण बांबू
मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्राने बनवलेल्या निसर्गपुरक राख्या मध्ये विविध झाडांच्या बीया लावलेल्या आहेत एक छान उपक्रम... हव्या असल्यास कळवावे. हा माझा व्यवसाय नाही ही एक त्या संस्थेसाठी मदत आहे.
मस्त आहेत राख्या. बांबुची
मस्त आहेत राख्या. बांबुची पाने आहेत का वापरलेली?
आमच्या बागेतुन एक छोटासा
आमच्या बागेतुन एक छोटासा पावसाळी पाण्याचा ओहोळ जातो. त्याच्या काठावरच्या Lea Plant वरील Common Leopard Butterfly....

राख्या मस्त आहेत. फुलपाखरु
राख्या मस्त आहेत.
फुलपाखरु सुंदर.
राख्या मस्त आहेत. निरु गुलजार
राख्या मस्त आहेत.
निरु गुलजार , आपल्या फोटोंमुळे नि. ग. ला एक वेगळेच डायमेंशन मिळाले आहे.
फार सुंदर फोटो.
राख्या छानच.. मला तर
राख्या छानच..
मला तर प्रत्येकवेळी निरू गुलजार यांनी टाकलेले प्रचि बघितले कि वाटत एक तर ते परदेशी असतात नै तर मी तरी..
नविन भागात माझा काही वाटा
नविन भागात माझा काही वाटा ..
खेड्यावर गेलो होतो तेव्हा याला बघुन फोटो काढायची इच्छा अनावर झाली .. तशी स्वारी जरा घुश्श्यातच होती तरी मनाजोगता एक फोटू मिळालाच.. देखणं , राजबिंड रुपडं असलं की कुठल्याही भावना का असेना..फटू चांगलेच निघतात त्याच जितंजागतं उदाहरण..
सातार्याला मैत्रीणीकडे गेली तेव्हा सज्जनगड पण पाहिला.. तिथे आम्ही पन होतो..
खाण्यात गुंग..
बनेश्वर, नरसापूर ला गेली होती तेव्हाचा.. जरा लाजाळू होती पण फोटू काढु दिला
सिंहगडावरचा मांडूळ / दुतोंड्या साप .. तसा होता हितभरच आणि त्याला बघुन आमची पण हितभर

मनाचा हिय्या करुन काढलेला प्रचि.. हलला वाटत कॅमेरा थोडूसा
आक्काकडे गावाला गेली होती तेव्हा आमच्या फडफडीमुळे आमच्या वामकुक्षीची वाट लागली ..
चला पटापट ओळखा बर सर्वांना..
.. दिवे घ्या
..
निरू गुलजार, मै ना कहती थी.. एक तर तुम्ही परदेशी आहात नै तर मी
टीना, लवली फोटो. तसा होता
टीना, लवली फोटो.
तसा होता हितभरच आणि त्याला बघुन आमची पण हितभर, हे लय भारी.
फोटो बघुनच माझीपण हितभर (शब्द पहिल्यांदाच ऐकलाय),
.
निरु, एखादा मायक्रो झूम
निरु, एखादा मायक्रो झूम असलेला कॅमेरा घ्याच. किटक तूमच्या नजरेला सहजच दिसतात असे दिसतेय. अश्या कॅमेरातून ते फारच सुंदर दिसतात.
स्वाती२ ते हाँगकाँग ऑर्किड पुण्यात पण आहे असे वाचल्याचे आठवतेय. पण मी काढलेल्या फोटोतले फुल मी पुर्वी बघितल्याचे आठवत नाही. पाने कांचनसारखीच पण खुप मोठी आहेत त्या झाडाची.
टीना, मस्त टिपले आहेत. अगदी
टीना, मस्त टिपले आहेत. अगदी खास पोझेस मिळाल्या आहेत.
वा,खूप स्पष्ट फोटो आलाय
वा,खूप स्पष्ट फोटो आलाय फुलपाखराचा..
टीना , मस्त मिळालेत तुला पोझेस!!!
राख्यांची अनोखी आयडिया खूपच छानै
टीना मस्त फोटो!
टीना मस्त फोटो!
टिनु.. मस्त फोटो!
टिनु.. मस्त फोटो!
दिनेशजी, मॅक्रो झूम असलेला
दिनेशजी, मॅक्रो झूम असलेला चांगला कॅमेरा आहे पण ते तंत्र अजून जरा कमीच जमते. (वस्तुतः Macro Photography साठी घरचाच शिक्षक आहे.) मॅक्रो मधे संपूर्ण किटक वगैरे न येता त्याचा एखादा भागच मोठा आणि तपशीलात येतो.
पण मला मात्र आख्खे Object च बरे वाटते. आणि फोटोग्राफीसाठी मूळ आवड पक्षी, प्राणी (Wild Life), निसर्ग, लॅन्डस्केप्स आणि वास्तु यांची. (किटक आपले येता जाता).
पण हा ग्रुप माझ्या मते झाडं, फुलं अशा Botanical गोष्टींसाठी विशेषतः निर्माण केलेला असावा (चुभूद्याघ्या) म्हणून मी खूप घाबरत घाबरत किटक, पक्षी, खार वगैरे फोटो टाकत असतो. आणिसर्व फोटोंच्या नावाचे श्रेय मात्र माझे नाही. ते माझ्या धाकट्या बंधुंचे...
सर्वांच्या प्रतिक्रीया आणि प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार..
निरू, किटक, पक्षी, प्राणी हे
निरू, किटक, पक्षी, प्राणी हे ही निसर्गाचे अविभाज्य घटक आहेत की.. त्यामुळे बिनधास्त टाका या सर्वांचे फोटो ही, बरोबर थोडीशी माहितीही पुरवली कि पर्र्फेक्ट फॉर नि.ग.
तुम च्या भावाने काढलेले फोटो खूप सुंदर असतात
इथे शेअर करण्याबद्दल धन्यवाद !!
वर्षू नील, धन्यवाद.... नि.ग.
वर्षू नील,
धन्यवाद....
नि.ग. वर टाकलेले फोटो मीच काढलेले आहेत.
किटक, माॅथ आणि फुलपाखरांची नावे मात्र भावाने पुरवलेली आहेत. त्याने काढलेले फोटो मात्र फारच सुंदर असतात..
राख्या छान! टिने मस्त पोझेस
राख्या छान!
टिने मस्त पोझेस दिल्या की गं सगळ्यांनी तुला !.मला गोगलगाय आवडली.
निरु गुलजार तुमची नवी एन्ट्री जोरात आहे. चालू द्या.
टिना फारच हटके फोटो.
टिना फारच हटके फोटो. मस्त.
नीरू वर्षूताईने सांगितल्याप्रमाणे निसर्गातील कोणत्याही घटका बद्दल माहीती वा फोटो ह्या ग्रुपला अपेक्षित आहेत. तुमचे वेगळे फोटो माहितित अजून भर टाकतात. तुमच्या फोटो मुळे काल माझ्याही लक्षात दोन किटक आले. म्हणजे त्यांच्याकडे लक्ष गेले. थोड्या वेळात फोटो टाकते. आणि कॅमेर्याबद्दल मलाही तसच होत. कॅमेर्याने अशे जवळून फोटो काढायला गेले की धुरकट येतात. त्यापेक्षा मोबाईलमधून चांगले येतात. बाकी लांबचे फोटो मला कॅमेर्यातून चांगले जमतात.
धन्यवाद
धन्यवाद सर्वांना..
कॅमेर्याने अशे जवळून फोटो काढायला गेले की धुरकट येतात. >> तुझपन अस होत होय.. मला वाटल इस परेशानी से गुजरने वाली खाली मै हि हूं .. मला वाटायच कि माझ्याच DG ने माझी साथ सोडली कि काय..
चनस, अग टिनु नावाचा आयडी आहे इथ अजुन एक..
तुला मला संबोधुन बोलायचे आहे का ?
मी फोटो काढलेत आता नावे
मी फोटो काढलेत आता नावे तुम्ही सांगा
हा काल अडेनियम वर रेंगाळला होता.

हे दोघे हळदीच्या पानांवर होते.

Pages