आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............
तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!
अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!
याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
हो जागु, ते फोटो आठवले मला.
हो जागु, ते फोटो आठवले मला.
सगळेच फोटो मस्त! मानुषी,
सगळेच फोटो मस्त!
मानुषी, अभिनंदन!
आमच्याकडची बदकीण पिल्ल घेवुन घरटे सोडून गेली. झाले असे की जुलै फोर्थच्या गडबडीत घरट्याकडे लक्षच गेले नाही. रवीवारी सकाळी फिरायला गेले तेव्हा ओझरती नजर टाकली. ती काही दिसली नाही. तासभर फिरुन परत आले तरी पत्ता नाही म्हणून जवळ जावून बघितले तर एकच अंडे आणि बाकी कवचं झाकून टाकलेली. त्याअर्थी कुटुंब सुखरुप तळ्यावर रहायला गेले.
स्वाती२, बदकीण पिल्लाना
स्वाती२, बदकीण पिल्लाना पहिल्यांदा पाण्यात नेते तो क्षण मिळायला हवा होता. एक क्षणभर विचार करतात आणि पाण्यात झोकून देतात.
आज के मौसम का हालचाल .. हमारे
आज के मौसम का हालचाल ..
हमारे इधरकु (पुणेमे) पानी .. आपल हे बारिश आणे कि थोडी थोडी संभावना हय.. आसमान थोडूसा साफ्/खुला थोडूसा काले बादल वाला रहेंगा ..
जुन मधे टपकला तेव्हापासुन गायबच आहे .. त्याला कस सांगाव ऑफिसमधे जाणार्यांनी शिव्या घातल्या तरी तु काय मनाला लावून घेऊ नको रे बाबा. चालायच्च.. लेकर आहे म्हणून सोडून द्यायच. माझ्यासारखे आणखी बरेच चातक बसलेयत तुझी आस लावुन..आता तरी ये..
अरे थेंबा तुझी
अरे थेंबा तुझी आस.......
सा-या मनांच्या राऊळी
अरे थेंबा तुझी आस
यावे देवा, होऊ भोई
तुझ्या पालखीचे खास
रुप किती ते आठवे
पार नयनी दाटले
किती पाहणार अंत
तळी झरे रे आटले
कशी भेगाळली धरा
उकलले प्राण प्राण
तूच मुखी घाली आता
जल नव्हे संजीवन
मेघराशीतून यावे
धारा सहस्त्र होऊन
तृप्त करुनी टाकावे
घ्यावे रुप तू सगुण
आर्त हाका घालताती
धरा माणसे तुलाच
ये रे देवा परजन्या
न्हाऊ घाल आता तूच
अरे बरस बरस
घेई जीवनाचे रुप
ऐक गा-हाणे सा-यांचे
सृष्टी होईल तद्रूप.....
शशांकजी --------- /\
शशांकजी --------- /\ ---------
अप्रतिम!!!
टीना
स्वाती ताई एक अंड तसच राहिलं
स्वाती ताई एक अंड तसच राहिलं का? त्यातुन जीव नाही फुटला का?
दिनेश दा हे माहिती नव्हत बर का! काय मस्त वाटत असेल ना त्या क्षणी..:)
शशांक, मस्त कविता. सायली, हि
शशांक, मस्त कविता.
सायली, हि त्यांची पहिली परिक्षा असते. काही बदके उंचावर तर काही ढोलीतही घरटे करतात. पिल्लांनी तिथून थेट पाण्यात उडी मारायची असते. जे पिल्लू तरेल तेच जगण्याला लायक ! नाहीतर....
सर्व फ़ोटो छानच! मानुषी,
सर्व फ़ोटो छानच!
मानुषी, अभिनंदन!
शशांकदादा, सुंदर कविता!
वा शशांकदा आणि टीना. ५-६ दिवस
वा शशांकदा आणि टीना.
५-६ दिवस येऊन हौस भागवून गेलास. काय झाले अचानक? का रुसलास ऐन वेळेवर? अरे फक्त झलक दाखविलिस तर तुझ्या आगमनाने आम्ही धरतीवरील जीव सुखावलो होतो. आता डबकी, विहीरी, तलावे तुडुंब भरतील, नद्या दुथडी भरून वाहू लागतील, शेतातील धान्याची पिके डोलू लागतील, वृक्ष फळा फुलांनी बहरतील व किटका पासून ते माणसापर्यंत सगळ्या जीवांना वार्षिक अन्नधान्याची, पाण्याची सोय होईल ह्या आनंदात असताना तू अचानक कुठे दडून बसलास?
त्या शेतकर्यांचा तुझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नकोस. तुझ्या एकाच बरसण्यात तुझ्या विश्वासावर पेरणीतून उगवलेली धान्याची रोपे आज तुझ्या आशेवर तग धरून उभी आहेत. अरे त्या राना-वनांचे काय? कोणाच्या आधारावर त्यांचे पालन-पोषण होईल?
हम्म.. माहित आहे मला तुला ही वृक्षतोड, डोंगरतोड, पाण्याची नासाडी पाहुन घुसमटायला झालय. अरे पण अजूनही ह्या निसर्गाचा समतोल राखणारी माणसे आहेत, समुह आहेत. दरवर्षी न चुकता वृक्षारोपण करणारी, पाणी जपणारी, झाडे रुजवण्यासाठी डोंगर दर्यांत जाऊन बिया पेरणारी हिरव्या मनाची कितीतरी माणसे तुझ्या अस्तित्वासाठी, तुझ्या बाजूने खंबीरपणे उभी आहेत. तू अशी पाठ फिरवून त्यांना नाउमेद करू नकोस.
येरे येरे पावसा म्हणणार्या निरागस पिल्लांची तरी हाक ऐक. भावी निसर्ग रक्षणाची पिढी त्यात वाढतेय. त्यांची स्वप्ने उधळून लावू नको. आज चार हात तुझ्या अस्तित्वासाठी झटताहेत त्याचे नक्कीच ८ होतील. चल पुरे आता ये बरसत पुन्हा पूर्वीच्याच उमेदीने, जोमाने तुझ्यावर अवलंबून असलेल्या जीवांसाठी, तुझ्यासाठी झटत असलेल्या लेकरांसाठी तरी निदान.
बापरे म्हणजे बदकाची पील्लं
बापरे म्हणजे बदकाची पील्लं अंड्यातच टेंशन घेत असतील.....

हम्म! निसर्गाचा नियम, दुसरे काय!
जागु, क्या बात है!
माझ्या कडे पांढर्या सुपलीला आलेले पहिले फुल...
मैत्रीणी कडुन शेंगा आणल्या होत्या....
सायली, गोकर्णला सुपली म्हणतात
सायली, गोकर्णला सुपली म्हणतात हे आजच समजलं
हो अश्विनी सुपली देखिल
हो अश्विनी सुपली देखिल म्हणतात...:)
टीना शशांकजी, सुंदर
टीना
शशांकजी, सुंदर कविता.
जागू मस्त पोस्ट.
मलापण माहिती नव्हतं की गोकर्णला सुपली म्हणतात.
पांढरा गोकर्ण माझ्याकडेही आहे
.
शशांक मस्त कविता. जागू तुझं
शशांक मस्त कविता. जागू तुझं हे लिखाण फेबुवरपण आवडलंच होतं.
सायली सुपली मस्त.
स्वाती ताई एक अंड तसच राहिलं का? >>>>>>>>>>.. हो मलाही हेच विचारायचं होतं.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांचे मनापासून आभार्स
सर्वांचे मनापासून आभार्स ......
जागू - तुझेही लिखाण सुर्रेखच .....
कसेही करुन पाऊस येणे अत्यावश्यक आहे आता ....
जागू खूप सुंदर लिहीलंय ...
जागू खूप सुंदर लिहीलंय ... सुपली ... आवडलं...शशांकजी कविता आवडली..
टीना
सगळ्यांचे धन्यवाद. मी पण
सगळ्यांचे धन्यवाद.
मी पण सुपली पहिल्यांदाच ऐकल.
मी थोड्यावेळात डेंजर फोटो टाकणार आहे. सगळ्यांनी सावध रहा.
आमच्या पाणकोंबड्या शतपावली करताहेत आमच्या अंगणात.

सगळे रेडी असतील तेव्हा सांगा
सगळे रेडी असतील तेव्हा सांगा मग फोटो टाकते एकट्याने घाबरायला होईल.
सगळे रेडी असतील तेव्हा सांगा
सगळे रेडी असतील तेव्हा सांगा मग फोटो टाकते >>>>> रेडी, रेडी - टाक आता फोटु ....
एन्ट्री होत आहे. फुस्स
एन्ट्री होत आहे.
फुस्स फुस्स.........................
फुस्स फुस्स. >>>>> O M G
फुस्स फुस्स. >>>>> O M G !!!!!!!!
मला वॉटर मार्क टाकताना पण
मला वॉटर मार्क टाकताना पण भिती वाटत होती.
१)
२)
३)
४)
५)
६)
सॉलिड! १०चा आकडा स्पष्ट
सॉलिड! १०चा आकडा स्पष्ट दिसतोय. देखणा आहे नाग. तुझ्या घरी आला होता का?
वॉव, खूपच भारी फोटो आहेत -
वॉव, खूपच भारी फोटो आहेत - कोणी पकडलाय का त्याला ???
बाप रे जागू, अस्सल कोबा आहे
बाप रे जागू, अस्सल कोबा आहे ना ग ? तुझ्या घरी निघाला ?
आमच्या वाडीत राहते ह्यांचे
आमच्या वाडीत राहते ह्यांचे कुटुंब सगळे. मधून मधून असे फिरायला येतात घराजवळ आणि घाबरवतात आम्हाला.
हा आमच्या शेजारच्या म्हणजे आमच्या कंपाउंडला लागून असलेल्यांच्या अंगणात होता.
Great snaps, Jagoo
Great snaps, Jagoo
हाँ! भारी!
हाँ!
भारी!
जबराट....
जबराट....
Pages