Submitted by सिंडरेला on 2 June, 2015 - 10:22
ठिकाण/पत्ता:
6 Market Street, Suite 904
Plainsboro, New Jersey 08536
(609) 799-3100
प्रेमा आणि माया यांनी जिव्हाळाभावोजी यांच्या सन्मानार्थ एक कौटुंबिक स्न्हेहसंमेल्लन बागराज्यात ठेवले आहे. तर बागराज्यकरांनी आपल्या (तळ)घराची दारं उघडावित, बागेत खुर्च्या मांडाव्यात किंवा ठिकाणं सुचवावीत अशी प्रेमळ गळेपडू विनंती.
माहितीचा स्रोत:
टिपापा
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 20, 2015 - 11:30 to रविवार, June 21, 2015 - 17:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पोचलात की फोन करा.
पोचलात की फोन करा.
जिभा, पोहोचलात का ? ईमेल चेक
जिभा, पोहोचलात का ? ईमेल चेक करा .
भाई , कोणी कुठे पोहोचल्यावर कुणाला फोन करायचाय ते नीट लिहा ! उगीच आपलं त्या ह्यांच्यासारखं गोलमगोल स्टेटमेन्ट कराय्चं आपलं
जि.भा. संमेलन पार पडलं.
जि.भा. संमेलन पार पडलं. ब्याकयार्डात खरबरीत पाठींचं कॅटवॉक आणि फोटो सेशन पण अप्रतिमच झालं.
नुकताच Harrisburg ला पोहोचलो.
नुकताच Harrisburg ला पोहोचलो. गटगला धम्माल मजा आली. सगळ्यांना भेटून खुप मस्त वाटलं. काहीजणांना पहील्यांदाच भेटलो, अर्थात तसं आजिबात जाणवलं नाही. वेळात वेळ काढून, लांबवरुन खास गटगसाठी ड्राईव्ह करुन आल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!
आता वृत्तांत लिहायला घेतो
वृत्तांत आदल्या दिवशी "ठीक
वृत्तांत
आदल्या दिवशी "ठीक साडेअकरा वाजता पोहोचतो" असं म्हणून मी माझंच टोटल हसू करुन घेतलं होतं. त्यामुळे साडेअकरा ऐवजी साडेबाराला पोहोचायच्या बेताने निघालो. वाटेत "माया आणी प्रेमा बोलतोय, जरा ट्रॅफीक आहे, अजून चाळीस मिनीटे लागतील" असं सांगणारा एक फोन आला.
साडेबाराला पोहोचलो तर झोपडीमधे शुकशुकाट होता. चौकशी करायला म्हणून आत गेलो. काही रिझर्वेशन आहे का वगैरे वेटरकडे विचारलं, तर तो नाही म्हणाला. पण मग वहीत पाहील्यावर काहीतरी आठवल्यासारखे करुन म्हणाला, "अरे हा, काल एक फोन आला होता. २५ जणांकरता टेबल बुक करायला सांगितलं, आणी मी नाव विचारलं तर फोन ठेवून दिला. तर २५ जणांसाठी एक निनावी बुकींग आहे." एवढी माहीती मिळाल्यावर आपण गंडवलो गेल्याची शंका माझ्या अन वेटरच्या चेहर्यावर एकाच वेळी उमटली. तरी चेहरा निर्वीकार ठेवून बाहेर आलो. मग बारक्याचं जेवण उरकून घेतलं. त्याला स्वस्थ बसवेना, मग समोर एक छोटी बाग होती तिथे घेउन गेलो. काही वेळाने लांबून अनीलभाईंसारखा दिसणारा एक इसम दिसला, म्हणून धावत गेलो, तर ते अनीलभाईच होते. मग थोड्या गप्पा झाल्या. २५ जणांचे बुकींग आहे हे ऐकून त्यांनाही जबर धक्का बसला. ते जरा सावरल्यावर आम्ही आधी ५०, मग १००, आणी मग ५०० मैल परिघातले आठवतील तितके मायबोलीकर आठवून पाहीले, पण २५ टोटल काय लागेना! तितक्यात बाई, सिंडी आणी सायो आले. थोड्या गप्पा झाल्यावर म्हणाले, की सगळे जमलेत की, मग कशाला थांबलोय? आणी आम्ही आत गेलो. २५ आकड्याचं कोडं काही उलगडलं नाही.
जेवताना मराठीत मोठमोठ्याने "भाजी फार काही खास नाही, वडा अगदीच भंगार आहे" वगैरे टिप्पण्या चालू होत्या. थोड्या वेळाने बाजूला उभ्या असलेल्या २ वेटर्सपैकी एकाने "पाणी अजून आणू का?" अन दुसर्याने "लस्सी दोन हव्यात की तीन?" असे अस्खलीत मराठीत विचारले. पण त्यामुळे ओशाळवाणे वगैरे काहीही न होता "अरे, यांना आपल्या टिप्पण्या समजल्या की!" असं म्हणुन आम्ही पुन्हा त्यांच्यासमोरच चर्चा पुढे सुरु ठेवली.
जेवण झाल्यावर भाईंनी कल्टी मारली, अन आम्ही मै च्या घरी चहापानासाठी गेलो. तिथे देसाई आले, आणी नंतर वृंदाताई आणी एबाबा आले. नुकताच बफे हाणला होता, तरी चहापानाऐवजी चहा-फणस बेत होता. सगळ्यांबरोबर मस्त गप्पा झालया, काय ते इथे लिहीणार नाही मला माहीत नसलेल्या काही रहस्यांची उकलसुद्धा करण्यात आली.
जेवणानंतर फोटोसेशनचा ठराव मांडण्यात आला. तत्पूर्वी चर्चेदरम्यान "मनुश्य हा असा प्राणी आहे ज्यात स्त्रीया सुंदर असतात आणी पुरुष सुंदर नसतात" असा एक सिद्धांत बाईंनी मांडला होता, त्यामुळे काकवा आमच्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी फारश्या उत्सुक नव्हत्या. त्यांनी हळूच एकाबाजूला जावून 'काक्वा-ओन्ली' फोटोसेशन चालू केलं. पण मी, देसाई आणी एबाबांनी त्यांच्यामधे घुसून ४-५ फोटो काढवलेच.
निघताना पुन्हा उभ्या-उभ्या गप्पा झाल्या. माझ्या छोट्याश्या गाडीत पैठण्या ठेवायला जागा न उरल्यामुळे यावेळी पैठण्या राहील्या, त्याबद्दल क्षमस्व!
यंदा शिट्टी गटग बागराज्यात
यंदा शिट्टी गटग बागराज्यात फार जोरदार धडाक्यात दणक्यात पार पडलं. सविस्तर वृतांत जिव्हाळाभौजींनी लिहिलाच आहे त्यामुळे मी अधिक काही लिहित नाही.
मंदारचा ईशान फारच गोड आहे. त्याचं मराठीत चुटुचुटू बोलणं सगळ्यांनी फार एन्जॉय केलं.
भौजी नेक्स टायमाला जरा मोठी
भौजी नेक्स टायमाला जरा मोठी गाडी आणा मग पैठण्या आणि सोबत अबेच्या लग्नाचा बस्ताच बांधून आणता येईल तुम्हाला
'काक्वा-ओन्ली' फोटोसेशन >>
कशात काही नाही आणि चालले
कशात काही नाही आणि चालले अबेला बोहल्यावर चढवायला.
गटग जोरात झालेले
गटग जोरात झालेले दिसते.
निनावी बुकींग आहे. >>> चुकून जुन्या आयडी च्या नावाने बुकिंग केले होते का?
"मनुश्य हा असा प्राणी आहे ज्यात स्त्रीया सुंदर असतात आणी पुरुष सुंदर नसतात" >>> मग या सिद्धांताचे काय झाले पुढे? आणि कंबरनाथ हा अपवाद का मग असंबांच्या दृष्टीने?
"लस्सी दोन हव्यात की तीन?" >>> हे फक्त तुला एकट्याला विचारले?
बाकी बाईंनी मागच्या पानावर बार इतका गाडला की तो भारतातून बाहेर आला असेल
निनावी बुकींग आहे. >>> चुकून
निनावी बुकींग आहे. >>> चुकून जुन्या आयडी च्या नावाने बुकिंग केले होते का? >>
मला माहीत नसलेल्या काही
मला माहीत नसलेल्या काही रहस्यांची उकलसुद्धा करण्यात आली>>>
आर्च आणि हह कोण ते कळलं का?
बुवांची आणि
बुवांची आणि सत्यभामा-रुक्मिणीची भेट मिसली यंदा
कुणाला भाईंना सत्यभामा
कुणाला भाईंना सत्यभामा म्हणतेस की काय सिंडे ?!!
भावजी कोण?
भावजी कोण?
तो काय वृत्तान्त लिहिलाय की
तो काय वृत्तान्त लिहिलाय की भावजींनी.
नाही गं, तुला माहितीच नाही ती
नाही गं, तुला माहितीच नाही ती गोष्ट बहुतेक. कृष्ण, सत्यभामा आणि रुक्मिणी आमच्या सोबत होते
ओके, उद्या शोधुन वाचतो, आता
ओके, उद्या शोधुन वाचतो, आता निघायचि वेळ झाली.
मग या सिद्धांताचे काय झाले
मग या सिद्धांताचे काय झाले पुढे? >>>> त्याला 'मेकपच्या शोध लागल्यानंतर..' असे शेपूट जोडण्यात आले..
"लस्सी दोन हव्यात की तीन?"
"लस्सी दोन हव्यात की तीन?" >>> हे फक्त तुला एकट्याला विचारले?
>>>>
नाय ओ, मी आणी भाई एका कोपर्यात निमूटपणे जेवत होतो
निमूट जेवल्यामुळेच तर अनेक
निमूट जेवल्यामुळेच तर अनेक रहस्यांची उकल झाली
न आलेल्यांना 'कोणत्या
न आलेल्यांना 'कोणत्या रहस्यांच्या उकली झाल्या' हेच रहस्य आहे आता
Pages