दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग होत कधी कधी बोअर पण. पण बाकी रटाळ मालिकान्पेक्षा ही हजार पटीने बरी. निदान थोड हसु आल्याने मनाचा तणाव तरी जातो.:स्मित:

मला कालचा भाग नाही आवडला.

सुजय, मिनल आणि कैवल्यने त्या प्रज्ञेशला योग्य सल्ला देणे अपेक्षित होते. सगळेच प्रश्न अनुत्तरित ठेवून मजेत एपिसोड संपवून कसं चालेल ?

मला कालचा भाग नाही आवडला.

सुजय, मिनल आणि कैवल्यने त्या प्रज्ञेशला योग्य सल्ला देणे अपेक्षित होते. सगळेच प्रश्न अनुत्तरित ठेवून मजेत एपिसोड संपवून कसं चालेल ?

मला कालचा भाग नाही आवडला.

सुजय, मिनल आणि कैवल्यने त्या प्रज्ञेशला योग्य सल्ला देणे अपेक्षित होते. सगळेच प्रश्न अनुत्तरित ठेवून मजेत एपिसोड संपवून कसं चालेल ?

मला कालचा भाग नाही आवडला.

सुजय, मिनल आणि कैवल्यने त्या प्रज्ञेशला योग्य सल्ला देणे अपेक्षित होते. सगळेच प्रश्न अनुत्तरित ठेवून मजेत एपिसोड संपवून कसं चालेल ?

मला कालचा भाग नाही आवडला.

सुजय, मिनल आणि कैवल्यने त्या प्रज्ञेशला योग्य सल्ला देणे अपेक्षित होते. सगळेच प्रश्न अनुत्तरित ठेवून मजेत एपिसोड संपवून कसं चालेल ?

मला कालचा भाग नाही आवडला.

सुजय, मिनल आणि कैवल्यने त्या प्रज्ञेशला योग्य सल्ला देणे अपेक्षित होते. सगळेच प्रश्न अनुत्तरित ठेवून मजेत एपिसोड संपवून कसं चालेल ?

मला वाटतं रूटिन लाईफ दाखवायचा प्रयत्न आहे. त्या मुलाबद्दल निर्णय घेताना लागणारे निकष, दृष्टिकोन घराघरात बघायला मिळतात. काहीतरी प्लस मायनस घेऊन निर्णय होतोच शेवटी. पण ती 'प्रोसेस' एंजॉय करायला शिकणं महत्त्वाचं. एकसुरी निर्णय होणार्या घरात असा चहूबाजूंनी विचार करण्यातली गंमत दाखवणं महत्त्वाचं. ते त्यांनी छान केलं. शेवटी तो मुलगा काहीतरी निर्णय घेणारच, पण शेवटी रेश्माला तो जे म्हणतो की आईबाबाही असेच भांडतात,.पण तुमचं घर भारी आहे यातच सगळं सार आलं, नाही का? Happy
वर शर्मिलाने लिहीलंय ते मान्य आहे की त्या एका गुणावर जास्त काळ नाही तग धरणार. पण रूटिन लाईफ असंच असतं ना, रोज काहीतरी नवीन घडतच असतं, पण नवीन काही घडत नसतं. थोडीशी चारशे पाच आनंदवन, बोलाची कढी, गंगाधर टिपरे प्रकारात मोडणारी मालिका आहे. ती साप्ताहिक होती म्हणून आजही प्रचंड लोकप्रिय ठरली. नंदिनीने ही सुचवणी आधी केलीच आहे.

पियू, सुजय त्या मुलाचा (बहुतेक) रोल मॉडेल असतो. म्हणून तर त्याच्यासमोर तो चहाही पीत नाही Lol आणि नववी दहावीत अशा करीयर वगैरेच्या गोष्टी वयाने मोठ्या ताईदादांशी डिस्कस करणे कॉमन आहे. कित्येक पालकच अशा सोनारांकडून कान टोचवून घेत असतात की. आणि अशा एकत्र राहून स्वतंत्र जगणार्या टोळक्याविषयी त्या मुलाच्या वयात आकर्षण असणारच. त्यामुळे त्यांनी तयार नेपथ्याचा परफेक्ट वापर केलाय दहावीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर असे मला वाटते. याउलच, जुयेरेगा मधे हे दाखवलं असतं तर घिसंपीटं वाटून इग्नोर झालं असतं.

Ashu, agadi nemaki post
Mala hech lihayach hot pan shabd sapadat navhate
Apalya life madhe tari daily kuthe kahi special ghadat? Dakhavun dakhavun dakhavanar kiti n kai?

Dakhavun dakhavun dakhavanar kiti n kai?
>>>>>>>>>>>>>>

यावर एक वेगळा धागा काढलास तर मायबोलीकर्स डायलॉग्ज्स सकट वेगळे काय काय दाखवू शकतो त्याचा ढीग रचतील पोस्टींचा Proud

वर शर्मिलाने लिहीलंय ते मान्य आहे की त्या एका गुणावर जास्त काळ नाही तग धरणार. पण रूटिन लाईफ असंच असतं ना, रोज काहीतरी नवीन घडतच असतं, पण नवीन काही घडत नसतं. >>> पण आशू, जेव्हा तुम्ही रोज एक भाग दाखवता व तो लोकांनी बघावा अशी अपेक्षा करता तेव्हा काहीतरी इंटरेस्टिंग दाखवणे आवश्यक आहे ना? नेहमी धमाल विनोदीच दाखवायला हवे असे नाही पण काहीतरी एंगेजिंग हवे. तो लिव्ह-इन वरची चर्चा असलेला भाग फारसा विनोदी नसूनही मस्त होता.

हो, मोबाईलचा भाग मलाही आवडला. योगासनवालाही बरा होता. आशूला बिचार्‍याला काय त्या अवघड पोझमधे अडकवून ठेवलं इतका वेळ Proud

टॉयलेटमधे जाणं-येणं रिलेटेड प्रसंग जरा जास्तच नाही का होताहेत. ते म्हणजे ऑलमोस्ट एक पात्र झालय असं वाटतय Proud

त्या मोबाईल च्या एपिसोड मधे रेश्मा जेव्हा ते दोघे येतील तेव्हा मी काय स्वयंपाक करेन वगैरे सांगू लागते तेव्हा दोन मिनीट मीनल उपहासाने तिला आपण केळवणच करू म्हणून टोन बदलून सांगते तो एक सीन तिने एकदम किलर काम केले आहे :). जबरी हसलो. त्या मोबाईल रेंज विकत मिळण्याच्या भागात सुद्धा ती अ‍ॅना ला त्या विकणार्‍याला 'कैसे हो भैय्या' हे कसे विचारायचे ते अगदी अंग हलवून करून दाखवते तेव्हाही जबरी हसलो होतो.

प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे.
>>
कसली तरुणाई? सगळे कलाकार तारुण्य उलटून गेलेले वाटतात.

मोबाईलच्या भागात आलेला मुलगा आधी कुठल्या सिरियलमधे होता का?<<<<<<<<
'एका लग्नाची दुसरी गोष्ट' मधला ज्ञाना होता तो.

इथले प्रतिसाद वाचुन मी काल सलग २-३ तासाचं रिपीट टेलिकास्ट बघितलं.. मज्जा आली.. Happy
ना अतिद्यानामृत ना अतिविनोद ..

मीनल, अ‍ॅना .. मस्त काम करतात ..

शर्मिला, मागच्या पानावरच्या पोस्टीला +१.

पण मला तो मोबाईलचा भाग नाही आवडला. किंवा मी काही मिस केल्यामुळे मला तो झेपला नाही. मीनलला तो फोन सापडातो, पण ती तो अनलॉक कसा करते? फोनलॉक, अ‍ॅपलॉक वगैरे काही प्रकार नाहीत आजच्या जमान्यात? आणि फोन हरवला असेल तर सगळ्यात आधी त्या गर्लफ्रेंडला कळायला हवं ना?

योगासनांच्या भागातला अ‍ॅना रात्री मेणबत्ती लावुन प्राणायम करत असतो तो सीन जबरदस्त जमलय.. जाम हसायला येतं त्या भागात

Pages