फ्रेंच ओपन टेनिस - २०१५

Submitted by Adm on 21 May, 2015 - 23:23

यट अनादर ग्रँडस्लॅम.. यट अनादर धागा !

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २४ मे रोजी सुरु होत आहे.

पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. यंदाच्या क्ले सिझनमध्ये राफाची कामगिरी नेहेमीसारखी झालेली नाही. ज्योको मात्र अफाट खेळला आहे. राफा जिंकला तरी किंवा हरला तरी इतिहास घडणारच आहे पण कुठला ते बघायचं!

गतविजेती शारापोव्हा यंदाही क्ले सिझनमध्ये फॉर्ममध्ये आहे.

मानांकने आणि ड्रॉ आज जाहिर होणार आहेत. ते आले की इथे अपडेट करेन.

स्पर्धेची वेबसाईट : http://www.rolandgarros.com/en_FR/index.html
(वेबसाईटची मात्र बर्‍यापैकी वाट लावली आहे!)

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेडररचं वय झालं! Sad येत्या आगष्टात ३४ पूर्ण होणार. या वयात कोर्टावर उतरणंच कठीणे.
-गा.पै.

खरच रे हिम्सकूल.. खुप यातना होतात.. एकेकाळचा एफर्ट्लेस व ग्रेसफुल खेळणारा व हरवण्यास कठिण असा फेडरर गेल्या ४ वर्षात असा सारखा सारखा हरताना पाहुन खुप खुप वाइट वाटते.

कदाचित नदाल सुद्धा फेडररच्याच पावलावर पाउल ठेवुन हळु हळु लोप पावेल अशीच चिन्ह या वर्षीचा त्याचा क्ले कोर्टवरचा खेळ बघुन वाटते.

पण जोपर्यंत फ्रेंच ओपनच्या तांबड्या मातीवर तो हरत नाही तोपर्यंत त्याला अजुन एका ग्रँड स्लॅमची आशा आहे.उद्या सकाळची क्वार्टरफायनल त्यांच्यातल्या नेहमी होत असणार्‍या सामन्यांप्रमाणे अटितटीची व्हावी हीच इच्छा! बेस्ट ऑफ ५ फॉर्मॅटमधे व तेही क्ले कोर्टवर.. नदालला हरवणे यंदा जबरदस्त फॉर्ममधे असणार्‍या जाकोव्हिकला अशक्य नाही तरी भारी पडेल असा माझा कयास आहे. उद्याची मॅच बघायला मी खुप उत्सुक आहे.. अ‍ॅज गुड अ‍ॅज फायनल..

आज सोंगा मस्तच खेळला. त्याने जिंकल्यावर मातीवर बुटाने काय लिहीले?

आणखी एक फेडरर पराभव, पण क्लेवर जास्त आशा नव्हतीच.

निशिकोरी त्सोंगा मस्त झाली मॅच.

Roland je T'aime (Roland Garros I love you) असे लिहिले त्याने. माव्हरीक प्लेयर्स आता फार उरले नाहीत त्यामुळे त्सोंगाचा खेळ मस्त वाटतो, टेंपरामेंटल असला तरी.

फ़्रेन्च ओपन एकही मॅच बघायला मिळालेली नाही या वेळी. काल फ़ेडरर वावरिंका बरोबर हरला. मॅच समरी मधे असे वाचल; २००२ नंतर पहिल्यांदा सेट मधे फ़ेडररला एकही सर्विस ब्रेक करता आली नाही.

धन्यवाद अमेय! इ एस पी एन अ‍ॅप वर सामना चालू असताना काहीच समालोचन नव्हते व सामना संपल्यावर सगळा इंटरव्ह्यु अस्खलीत फ्रेंच मधे होता त्यामुळे त्याने मातीत काय लिहीले व तो काय बोलला ते सगळे डोक्यावरुन गेले.

पण फेडरर- नदाल जरी लोप पावत असले तरी गेल्या १२-१३ वर्षात आपल्याला ज्या कॅलिबरचे टेनीस(पुरुषांमधे) त्या दोघांमुळे व जाकोव्हिकमुळे बघायला मिळाले त्याला टेनिसच्या इतिहासात तोड नव्हती.. खासकरुन २००५ ते २०१३ चा काळ टेनिसमधला सुवर्णकाळ म्हटला तरी हरकत नाही. थोड्याप्रमाणात बोर्ग मॅकेन्रो-कॉनर्स्-लेंडल्-बेकर्-एडबर्गचा काळ तसा म्हणता येईल.

बाय द वे.. फ्रेंच ओपनमधे अबॉव्ह ४५ लेजेंडस मधे जी फोर्जे, सेड्रिक पिओलिन,हेन्री लेकाँट्,पॅट कॅश,मॅट्स विलँडर, मायकेल पर्न्फोर्न्स, अँड्रेस गोमेझ वगैरे जुने टेनिसपटु खेळताना बघायला मिळाले.. नोस्टॉल्जिक!

आले आले.. निळ्या टी शर्ट मधे नदाल व शेंदरी टी शर्ट मधे जाकोव्हिक.

जाकोव्हिक कसला फिट दिसतोय.. सपल्,निंबल,बॅलंस्ड अँड टॉल्.. खरच वर्ल्ड क्लास अ‍ॅथलिट वाटतो बघुनच, नदालही फिट दिसतोय पण जाकोव्हिक पेक्षा जास्त मस्क्युलर.

टेनिस प्रेमींना आज मजा येणार मॅच बघताना.दोन जबरी स्टॅमिना असलेले अ‍ॅथलिट एकमेकांना टक्कर द्यायला तयार आहेत.. ४५ व्या वेळेला! Happy

पहिल्या सेटमध्ये ४-० ची लीड होती जी आता नेक टू ने़ चालू झालेली दिसतेय .. म्हणजेच आधीच्या काही एपिक मॅचेस् सारखी .. टोलवाटोलवी .. लास्ट मॅन स्टँडींग विन्स् ?

तुंबळ चाललेलं दिसतय !!!!! आत्ता राफाची सर्व्ह रिटर्न करताना कितीदा ड्युस झाला.
बरय मी घरी बघत नाहीये ते. लय टेन्शन येतं !

सशल.. तुझ्या जाकोव्हिकने ४-० लिड घालवला. नंतर १० व्या गेममधे ३ सेट पॉइंट्सचा फायदा त्याने उठ्वला नाही.. परत बाराव्या गेममधे अजुन ३ सेट पॉइंट्स वाया घालवले.. पण शेवटी पहिला सेट कसाबसा जिंकला...तसे करत राहीला मॅचमधे तर नदालच लास्ट मॅन स्टँडींग असेल! कारण नदाल इज जस्ट गेटींग वॉर्म्ड अप.... वॉच आउट! ही इज गोइंग टु गो इन नेक्स्ट गिअर नाउ....

पण तु म्हणतेस ते खरे आहे.. नेहमीसारखीच एपिक मॅच होणार अशीच चिन्ह दिसत आहेत!

सिंडरेला.. अग खरच मस्त रॅलिज चालु आहेत... पहील्या सेटमधे आधी जाकोव्हिकने मस्त २ ड्रॉप शॉट्स टाकले नदालला ते परतवता आले नाहीत.. मग दोनदा जाकोव्हिकला सेट पॉइंट्स असताना.. नदालने २ मस्त ड्रॉप शॉट्स टाकले व २ सेट पॉइंट्स वाचवले... आणि नेहमीप्रमाणे लॉब्स, रॅलिज, पासींग व क्रॉस कोर्टचे तिरके अँगल असलेले शॉट्स यांची रेलचेल..

मुकूंद हो ना ..

नादाल शी खेळताना रोलँड गॅरोस वर वरचढ ठरणे काही खायचे काम नाही हे कळतंय ..

पण तरी गो रे गो ज्योको! Wink Happy

२००५ ते २०१५ एका Grandslam मध्ये फक्त दोन पराभव
एकूण नऊ टायटल्स
तेही आजच्या वेगवान मॉडर्न टेनिसमध्ये
ग्रेट राफा!

दुर्दैवाने शरीर साथ देत नाहीये असे दिसतेय.

पण ज्योकोविच खूप सुरेख खेळला !

Sashal, yessss!!!

Joko did a wonderful job! Sorry, don't come here often. I can't type in Marathi and that is frustrating.

खरच रे हिम्सकूल.. खुप यातना होतात.. एकेकाळचा एफर्ट्लेस व ग्रेसफुल खेळणारा व हरवण्यास कठिण असा फेडरर गेल्या ४ वर्षात असा सारखा सारखा हरताना पाहुन खुप खुप वाइट वाटते.

Mostly, in this situation players retire. Fedrer has guts to stick around.

Yes, and I like how he talks about it too ( talking about Federer ..)

"I will retire when I feel like it" Happy

"I will retire when I feel like it">> कमावणारं दोनच हात- बॅकहँड आणि फोरहँड- आन खाणारी सहा त्वांडं कसा हाकावा संसाराचा गाडा गडीमाणसानंईनं . गड्याचं वय झालं म्हणूनशान काय झालं सोन्यासारख्या लेकरांकडे बघून जीवाला घोर नसन पडत का त्याच्या बायडीच्या. मेहनत तर करनच पडी.

Pages