Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रमड..... मी पहिला प्रतिसाद
रमड..... मी पहिला प्रतिसाद टाकेन तुझ्या धाग्यावर....
मंदार कुमठेकर ..... अहो, सिरीयल जर थोडीतरी वास्तववादी असती तर मग कोणी एवढे कावले नसते !!!
<<<< या सिरीयलीत इतके असंख्य अपमान आणि इतके मरणाचे खोटे बोलणे, गैरसमज करवून देणे दाखवले आहे आणि तरीही लोकांना काय ही सिरीयल इंटरेस्टिंग वाटते कोण जाणे >>>>> ++++++++++१
आणि ही आदिती साधा धक्का लागून
आणि ही आदिती साधा धक्का लागून उजव्या अंगावर पडली ना? खाटेवर झोपल्या झोपल्या हिच्य डाव्या हातावर आणि डोक्याला पट्टी. ति ज्या पद्धतीने पडली त्या नुसार तिचं उजव्या साईडचं कंबरेचं हाड (फारफार तर) मोडायला हवं. धक्का बसला तरी कुणी इतका वेळ बेशुद्ध?
अशी झोपली आहे बाई की कायमचीच झोपली आहे ते कळत नाही.
आणि बराच वेळ बेसुध बैला सुधिवर आणायला डाक्टर लोक काय प्रयत्न करत नैत काय? मि तिच्या डोक्यात टाण्ण्कन फाईल मारली असती. आणि म्हणलं असतं ए बै उठ आता लै झालं नाटक.
नुसती शुद्ध गेलेली असून सुद्धा ऑक्सिजन मास्क कशाला?
रच्याकाने सुभाला ही बातमी
रच्याकाने सुभाला ही बातमी समजली तेव्हा तो कुठे परदेशात होता ना. मग आऊ आणि तो एकदमच हॉस्पीटलात कसे पोचले
दक्षिणा बर्याच अतर्क्य
दक्षिणा
बर्याच अतर्क्य गोष्टी आहेत याच्यात. गट्टुच्या अन्गात काय सन्चारले होते जयला रागवताना? माझा एक प्रसन्ग चुकला तो कोणी सान्गेल का? गट्टु आणी आउ अदितीला भेटायला येतात तेव्हा म्हसोबा व त्याची बायको आतच असतात ना? मग त्याना तिथे पाहुन गट्टु आणी आउला काय वाटते? की हे सान्गतात की ते अदितीचे आई वडिल आहेत असे की हे पण खोटे बोलतात?
आणि ही आदिती साधा धक्का लागून
आणि ही आदिती साधा धक्का लागून उजव्या अंगावर पडली ना? >> नाही गं राणी... ती डोक्यावर पडली.
आणि तो चक्क परदेशवारीत ब्रेक
आणि तो चक्क परदेशवारीत ब्रेक घेऊन आलाय

वेळात वेळ काढून हिला बघायला. आज रात्री परत जाणार म्हणे. कुठून आला, कुठं निघाला ते काही उल्लेख नाहीत. नुसताच फारिनच्या टुरितनं मधनं आला आणि आज परत चल्ला म्हणे
सुभा दुबईवरुन उडुन येतो.
सुभा दुबईवरुन उडुन येतो.:फिदी:
दक्षु तो आउला सान्गताना
दक्षु तो आउला सान्गताना दाखवलाय की आत्ता दुबईत आहे मग युरोपला जाणार आहे.
रश्मे सुभा आणि ऊ
रश्मे सुभा आणि ऊ (अर्र्र्र्र्र आ लिहायचं राहिल :फिदी:) तर ऊ आणि सुभा आत येतात तेव्हा म्हसोबा रडत असतो आणि यांना पाहून डोळे पुसतो. आणि सुभाला आग लावतो की मी फक्त मिटिंगला रजनी आणि जाड्याला बोलवलं होतं मग ही बया तिथे कुठून आली माहित नाही. मग आपसूक त्यांनी हास्पिटलात असणं स्वाभाविक झालं. मग म्हसोबाची सटवाई तिथे कशी आली? (आदिती ची आई) तर त्यावर म्हसोबा सांगतो की यांना कुणितरी सांगितलं की मी हॉस्पिटलला गेलो आहे तर यांना वाटलं मलाच हॉस्पिटलात ठेवलं आहे म्हणून या ही इथे आल्या मला पहायला (म्हणजे म्हसोबाला)
नशिब तिथे तरी अक्कल वापरली या
नशिब तिथे तरी अक्कल वापरली या शिरेलवाल्यांनी. नाहीतर अमेरिकेतून ताबडतोब निघून आला असं वगैरे दाखवायचे
या सगळ्या एपिमधला सुभाचा
या सगळ्या एपिमधला सुभाचा अभिनय अगदीच कैतरी होता.. उगाचच शुन्यात नजर लावुन बसवलय त्याला... दु:खी वाटण्यापेक्षा वेडसर जास्त दिसला... त्याच्याकडुन बर्याच चांगल्या अभिनयाची अपेक्षा आहे...
अस होय, म्हणजे म्हसोबा स्वतः
अस होय, म्हणजे म्हसोबा स्वतः खोटे बोलतो ते चालते त्याला. बाकी जावयाने खोटे बोलायचे नाही हे बरय.
ऊ
मला ऊ लावता येत नाहीय आउ च्या मागे, कारण ते ऑ होतय.
मला सुबोध भावेने ही सिरीयल का
मला सुबोध भावेने ही सिरीयल का स्वीकारली हा प्रश्न पडलाय. त्याला डिमांड काही कमी नसेल मग इथे का रमलाय
मला सुबोध भावेने ही सिरीयल का
मला सुबोध भावेने ही सिरीयल का स्वीकारली हा प्रश्न पडलाय. >>>>> आपल्यासारख्यांना शिरेल बघायला निमित्त म्हणुन
तुझ मला माहीत नाही अन्जु, पण केवळ त्याला बघण्यासाठीच मी ही शिरेल बघते..
अग मी पहिला भाग बघुनंच ठरवलं,
अग मी पहिला भाग बघुनंच ठरवलं, ही सिरीयल बघायची नाही. हिरोईन आवडली नाही. तिला आधी चार-चौघी मध्येपण बघितलं होतं, तिथेही आवडली नव्हती.
सुयश टिळक आवडतो पण त्याला अक्टिंग येत नाही. सुबोध भावे आवडतो पण त्यासाठी पूर्ण सिरीयल सहन करण्याची सहनशक्ती नाही.
पहिल्याच दिवशी सिरीयलची स्टोरी लक्षात आल्याने ही बेसलेस सिरीयल बघावी असं वाटलंच नाही पण सर्वच सिरीयलवरचे प्रतिसाद वाचायला आवडतात.
पैसा. हे जे प्रोफेशनल कलाकार
पैसा. हे जे प्रोफेशनल कलाकार आहेत की जे केवळ व्यावसायीक नाटके, सिनेमे यावर अवलम्बुन आहेत, दुसरी नोकरी करत नाहीत, त्याना उत्पन्न यातुनच असणार ना. काही कलाकार बॅन्केतुन, कम्पन्यातुन कामे करताना साईड बाय साईड नाटक, सिनेमे करतात त्याना गरज नसते एवढी. पण गिरीश ओक, निलेश साबळे सारखे डॉक्टर्स त्यान्ची मेडीकल लाईन पूर्णपणे सोडुन यात येतात तेव्हा यातुनच काय ते उत्पन्न असेल.
बाकी या कलाकाराना पेन्शन, फन्ड प्रकार कुठे असतो? म्हणून धडाधड मिळते ते नाईलाजास्तव स्वीकारत असतील.
हो रश्मी. जितक्या सिरीयल
हो रश्मी.
जितक्या सिरीयल लांबतील तितके कलाकारांना मानधन मिळत राहते. टीव्हीवर काम करताना जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचता पण येतं, हे पण अजून एक कारण असेल.
झाली चेश्टा मस्करी सुरु , अरे
झाली चेश्टा मस्करी सुरु , अरे सुधरा जरा
कुमठेकर तुम्ही इग्नोर मारा.
कुमठेकर तुम्ही इग्नोर मारा. जोपर्यन्त असल्या बीन कण्याच्या सिरीयल चालतील तोपर्यन्त आमचेही असेच चालणार, हम काय को सुधरेन्गे, जब सिरीयलवाले, निर्माता, कलाकार नही सुधरते?ऑ!
>>>> आणि ही आदिती साधा धक्का
>>>> आणि ही आदिती साधा धक्का लागून उजव्या अंगावर पडली ना? >> नाही गं राणी... ती डोक्यावर पडली <<<<<

नाही नाही, आदिति उजव्या अंगावरच पडली, डोक्यावर (खूप पूर्वीच) पडलाय तो डायरेक्टर !
मि इग्नोर करु शकत नाही ,माझी
मि इग्नोर करु शकत नाही ,माझी अत्यंत आवडीची सिरियल् आहे.
>>>> बाकी या कलाकाराना
>>>> बाकी या कलाकाराना पेन्शन, फन्ड प्रकार कुठे असतो? म्हणून धडाधड मिळते ते नाईलाजास्तव स्वीकारत असतील. <<<<
सिरियस मोड ऑनः
हे इतकेच कारण नसून, याच नव्हे तर कुठल्याही प्रोफेशनमधे एकदा का दिवसातल्या ठराविक तास/वेळेवर पैशांचा रतिब म्हणा मोबदला म्हणा, मिळणे सुरू झाले की आहे नाही तो दिवसरात्रीतला प्रत्येक क्षण/मिनिट/तास वापरून पैसे कमविण्याचे व्यसन लागते, व ज्या क्षण/मिनिट/तासाचे पैसे मिळत नाहीत, तो सर्व वेळ "अनप्रॉडक्टिव्ह" नुकसानीचा वाटू लागतो. अशी कैक/असंख्य उदाहरणे वेगवेगळ्या पेशात माझ्या माहितीत आहेत. अगदी आमचा "भिक्षुकी"चा धंदाही यातून सुटलेला नाही. असो
सिरियस मोड ऑफ.
>>> मि इग्नोर करु शकत नाही
>>> मि इग्नोर करु शकत नाही ,माझी अत्यंत आवडीची सिरियल् आहे. <<<<
सिरीयसली सांगतोय. करुन बघा, आयमीन सांगून बघा तर खरी.
अस तर नाही ना? की तुमच्या इथे तुमचा केबल/डिश वाला सिरियल बरोबर येथील माबोवरील टिकाटीप्पण्णी देखिल दाखवत रहातो? तसे असेल तर मग तुम्ही इग्नोर करूच शकत नाही हो... मान्य आहे मला.
तुम्ही अस करा, तुमच्या केबल/डिश वाल्याला सांगुन सेरियल बरोबरचे मायबोलीच्या या धाग्याचे प्रक्षेपण बंद करायला सांगा.... ते करतात. हल्ली काय? इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचा जमाना आहे.. काय वाट्टेल ते करू शकतात.... !
जितक्या सिरीयल लांबतील तितके
जितक्या सिरीयल लांबतील तितके कलाकारांना मानधन मिळत राहते. >>>
अवांतर. रोह माझ्या आईची बालमैत्रीण आहे. अजुनही कधेमधे सगळ्या मैतरणी भेटतात. होसुमी जेव्हा फारच बोअर झाली होती तेव्हा रोहला ह्या मैतरणींनी विचारले की मालीका किती दिवस चालू असणार आहे. तेव्हा ती म्हणली "हे म्हणाजे नोकरी करणार्या माणसाला विचारणे झाले की नोकरी किती दिवस चालू असणार आहे"
प्रेग्नंट आहे हे नक्की झालं
प्रेग्नंट आहे हे नक्की झालं का.
शेंबडा सांगेल, की बाकीच्यां मधे "कोण तो कोण तो " अस नाही झालं म्हणजे मिळवली.
नायतर ह्या शेंबड्याचे क्रेडिट कोणी औरच घेवुन जायचा.......ज्याय्ला ह्यांचा काय नेम नाय !
रश्मे पण आतला आवाज नावाचा
रश्मे पण आतला आवाज नावाचा काही प्रकार असतो की नाही? पैसे आणी प्रसिद्धी मिळतेय म्हणून काहीही आचरटपणा करायचा का पडद्यावर्?
प्रेग्नंट आहे का ती? असं
प्रेग्नंट आहे का ती?
असं असेल तर मुर्खपणाचा कळस असेल मग.
मी पण माझ्या भाचीला 'राधा ही
मी पण माझ्या भाचीला 'राधा ही बावरी' च्या वेळी विचारले कि किती टीका चाललीय तरी सिरीयल चालू ठेवलीय, तेव्हा तिनेपण साधारण असंच उत्तर दिलं होतं, नताशा.
ही पोस्ट लिंकसहित सुधरवून
ही पोस्ट लिंकसहित सुधरवून टाकली..
खरच ती प्रेग्नंट आहे का
खरच ती प्रेग्नंट आहे का
प्लीज नको. ते जानी अधीच डोके खातेये कस सांगू, कधी सांगू.
आता ही नको.
इथे तर बाप कोण हेही सांगावे लागेल. प्लीज नको
Pages