Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो असा प्रोग्रामेबल कुकर मी
हो असा प्रोग्रामेबल कुकर मी अनेक वर्षे वापरला आहे जपानमधे ( त्यात प्रेशर ऑप्शन नव्हता बहुधा). सकाळी तांदुळ घालुन टायमर लावुन ठेवला की यायच्या वेळेच्या ४५ मि आधी कुकर सुरु होतो, आणि बरोबर घरी आल्यावर गरम भात तयार असायचा. खुप उपयोगी वाटायचा तेव्हा. यात कधी वरण केले नाही कारण तिथल्या कुकरचे वरचे झाकण काढुन घासायचे प्रॉब्लेम होते , परत वरणाचे पिवळे डाग इ. विचार करुन कधी केला नाही.
दक्षिणा , स्वस्ति खुप
दक्षिणा , स्वस्ति खुप धन्यवाद.. शोधते आता ठाण्यात फ्रिज मध्ल्या पिशव्या..
मी मध्ये एकदा चित्रान्ना,
मी मध्ये एकदा चित्रान्ना, बिसिबिळे भात यांच्याबरोबर 'पातळ' काय चांगलं लागेल? कोणतंही सार नको, ताक, कढी नको, परत आंबट. पापड, लोणचे याने भागणार नाही. काहीतरी 'ओले' लागेलच वाटीत.
चित्राना बिसिबेलॅ भात बरोबरः
चित्राना बिसिबेलॅ भात बरोबरः व्हेजिटेबल स्ट्यू, केरळी पद्धतीने/ अवियल तामिळ पद्धतीने.
आनंदी , बिग बाझार / रिलायन्स
आनंदी , बिग बाझार / रिलायन्स मार्ट / अपना बाजार सारख्या ठिकाणीही मिळतिल .
काल पसून आठवतेय , आता आठवल - मी पहिल्यान्दा बिग बाझार मधून आणल्या होत्या . थोड्या चांगल्या क्वालिटीच्या होत्या त्या. ब्राण्डेड पॅक होत.
प्राचीचं चिंचेचं सार छान
प्राचीचं चिंचेचं सार छान लागतं चित्रान्नाबरोबर. पण सार नको म्हणत्येस तर अवियल.
बिग बझार मध्ये बघु
बिग बझार मध्ये बघु शकते..
धन्यवाद स्वस्ति..
सोलकढी? टोमॅटो रस्सम्?
सोलकढी? टोमॅटो रस्सम्? कोंकणी वलवल (नारळाच्या हिरवी मिरची, मीठ लावलेल्या दुधात उकडलेला दुधी, लाल भोपळा, श्रावण घेवडा, मटार वगैरे भाज्या वाफवून घालायच्या व एक चटका द्यायचा. वरून तूप जिरे कढीपत्ता फोडणी. http://www.maayboli.com/node/19327)
किंवा मस्तपैकी पुदिना पाने, शेंदेलोण, पादेलोण, जिरेपूड, किंचित साखर हे घुसळलेल्या दह्याला लावायचे. ताकाइतके पातळ नको व दह्याएवढे घट्ट नको. हवे तर थोडासा मिरची ठेचा लावायचा. आणि अशा पातळसर दह्याबरोबर चित्रान्ना / बिसीबेळे भात सर्व्ह करायचा. दह्याला 'मसाला दही' किंवा मिंटी कर्ड यासारखे गोंडस नाव द्यायचे!
अवियलचा ऑप्शन जास्त चांगला
अवियलचा ऑप्शन जास्त चांगला वाटतोय. थँक्स!
गोंडस नाव >>
धन्यवाद सगळ्यांना! तो कुकर
धन्यवाद सगळ्यांना!
तो कुकर बघते.
माझ्याकडे असलेले स्लो कुकर आणि राइस कुकर खुपच मोठे मोठे आहेत. पार्टीच्या वेळी उपयोगी पडतात पण रोजच्या वापरासाठी नाही.
मला एक अवांतर मदत हवी आहे
मला एक अवांतर मदत हवी आहे (स्वयंपाकातली नव्हे :() मला हाणू नका प्लिज.
मला माझ्या शाळेतल्या ४ मैत्रिणी भेटणार आहेत नेक्स्ट वीक. त्यांना प्रेझेंट काय देऊ? २० वर्षांनी भेटतोय आम्ही. शाळेत आम्ही फक्त एका वर्गात होतो.
परत परत वाचावेसे वाटेल असे
परत परत वाचावेसे वाटेल असे पुस्तक दे.. !
दक्षिणा त्यान्च्या आवडी निवडी
दक्षिणा त्यान्च्या आवडी निवडी तुला माहीत असतील तर तशा वस्तु दे. म्हणजे कुणाला विणकाम, पेपर क्विलिन्ग असे आर्टिस्टीक किन्वा क्रिएटीव्ह काम करायला आवडत असेल तर तशा वस्तु दे. नाहीतर गिफ्ट व्हाऊचर्स दे.
मग दोन तीन दिवसांचा भात एकदम
मग दोन तीन दिवसांचा भात एकदम लाव वत्सला, पार्टी!
दक्षिणा, कानातलं, बांगडी, पर्स छोटंसं शो पीस काहीही चालेल. नुसत्या एका वर्गात होता ना तुम्ही! एका गृपमधे असता तर गंमतीशीर आठवण ठेवून देता आलं असतं.
आशुडी, वोईच् तो प्रॉब्लम है!
आशुडी, वोईच् तो प्रॉब्लम है! पहिल्या वाफेचा, गरमगरम भात लागतो!
अशा खूप वर्षांनी भेटणार्या
अशा खूप वर्षांनी भेटणार्या ग्रूपला देण्यासाठी स्कार्फ/स्टोल माझ्यामते बेस्ट ऑप्शन आहे. वन साइज फिट्स ऑल
अरे सगळेच ऑप्शन्स मस्त आहेत,
अरे सगळेच ऑप्शन्स मस्त आहेत, पुस्तक स्ट्रोल
त्या दिसतात कशा आणि साईज मध्ये किती फरक झालाय ते डायरेक्ट पाहिल्यावरच कळेल.
त्यामुळे साईज मॅटर करेल अशा गोष्टी घेणारच नाही आहे मी.
दक्षिणा जर थोडे बजेट जास्त
दक्षिणा
जर थोडे बजेट जास्त असेल (आणि वेळ असेल तर)तर प्रिन्ट्वेन्यु वरुन पर्सनलाइज्ड नाव लिहीलेली किचेन किंवा पाण्याची बाटली.
जर थोडे बजेट जास्त असेल (आणि
जर थोडे बजेट जास्त असेल (आणि वेळ असेल तर)तर प्रिन्ट्वेन्यु वरुन पर्सनलाइज्ड नाव लिहीलेली किचेन किंवा पाण्याची बाटली. >> +१ फक्त नाव ऐवजी गटग २०१५, मीट-अप २०१५ असले काहीतरी एकत्र येण्याची आठवण देणारे...
दुर्दैवाने तितका वेळ नाही आहे
दुर्दैवाने तितका वेळ नाही आहे माझ्याकडे. २२ ला भेटतो आहे आम्ही. आणि हा एकच वीकेन्ड आहे माझ्याकडे. म्हणजे फक्त २ दिवस.
पण २० वर्षांनीं भेटताय तर
पण २० वर्षांनीं भेटताय तर गिफ्ट द्यायलाच हवं का? भेटणं, बोलणं जास्त महत्वाचं नाही का?
(माझा शेल्डन झाला आहे .. मला कंजूष म्हणू नका .. म्हंटलंत तरी आता फरक पडणार आहे? ;))
पण २० वर्षांनीं भेटताय तर
पण २० वर्षांनीं भेटताय तर गिफ्ट द्यायलाच हवं का? >> कंजूष किंवा उधळा असा मुद्दा नाही. परवडेल ते करावे आणि गोड मानावे. (त्या गिफ्ट्ला प्रत्यक्ष भेटीपेक्षा जास्त महत्त्व नसावे हा तुझा मुद्दा लक्षात आला आहे.)
गिफ्ट असेल तर भेटीची एक छान आठवण वारंवार उजळते. फोटो नेहमी बघणे होत नाही, कालांतराने गप्पाही कधी कधी विसरल्या जातात. पण भेटवस्तू (स्कार्फ्/किचेन) समोर आली की 'कित्ती धम्माल आली होती' हे पॉझिटीव्ह फिलींग राहाते. उदा: टीशर्ट वर "बॅच ऑफ १९५०" इ इ प्रिंट करून घेतात. नेक्स्ट भेटीत टीशर्टचीच प्रत्येकाची एक स्टोरी असते - मावत नाही त्यात, फाटला, बोहारणीनेही नाही घेतला इ इ
(माझा फर्हान अख्तर झाला आहे जिंनामिदो मधला - डोंट हेजिटेट टू गिव्ह मी एक्सपेन्सिव्ह कार )
>> डोंट हेजिटेट टू गिव्ह मी
>> डोंट हेजिटेट टू गिव्ह मी एक्सपेन्सिव्ह कार
कारच का, मला तर एक्स्पेन्सिव्ह बॅगवती सुद्धा चालेल ..
मला हे गिफ्ट देणं घेणं प्रकार आता अजिबात आवडेनासा झाला आहे .. शेल्डन शी त्या बाबतीत बरी मैत्री जमेल माझी ..
दक्षी तुमच्या भेटीनंतर
दक्षी तुमच्या भेटीनंतर त्यांना घरी बोलवून तुझा बासुंदी पेसल पाज आणि त्याचा महिमा सांग. हेच मोठं गिफ्ट होऊन जाईल.
अवांतर - कीचेन साठी सहमत, आजकाल त्या बॅग्जना लावायच्या काहीतरी फॅशनेबल मिळतात नं त्या सगळ्यांना सारख्या घ्यायच्या (बॅगवतीवरून हे आठवलं नाही, मागच्या वेळी एका मैत्रीणीने दिली होती. :))
लमसा चहा आणि एकेक किलो साखर
लमसा चहा आणि एकेक किलो साखर कसे वाट्ते. एकदम बजेट्मध्ये. हलके घे ग.
हँड मेड चॉकोलेट्स ही शनिवारी बनवता येतील. मी पुण्यात असते तर बनवून आणून दिली असती.
अत्तर बाटल्या- त्या गेलेल्या दिव्सांचा सुगंध वगैरे.
अरोमा थेरपी / ध्यानाचे किट. एक दिवा एक तेल बाटली असे मिळते. १०० - १६०रु.
रुमाल/ टीशर्ट/ कानातली/ टेराकोटा ज्वेलरी सेट्स.
दक्षिणा, तुझे ऑन्लाईन शॉपिंग
दक्षिणा, तुझे ऑन्लाईन शॉपिंग वाटून टाक न लम्साची पाकिटे दे सर्वांना
अमा काश तुम पुना में होती.
अमा काश तुम पुना में होती. अत्तराची बाटली आणि चॉकलेट्स ही मस्तच आयडीया आहे. उद्या मोहिमेवर निघणार आहे.
दक्षे चॉकलेटस करणार असशील
दक्षे चॉकलेटस करणार असशील आणि काही शंका असतील तर मला कॉल कर
पुण्यात सदाशिव पेठेत गोडबोले
पुण्यात सदाशिव पेठेत गोडबोले ह्यांचे अत्तराचे दुकान आहे. मुलांचे पेरुगेट भावेस्कूल/ भरत नाट्य मंदीर च्या जवळ ते तुला अत्तरे देउ शकतील.
माबोवरच अकुने एका चॉकोलेट्स बनवणा र्या मुली बद्दल लिहीले होते तो बाफ उघडून बघ.
अजून एक हे सर्व मोबाईल ठेवायच्या बारक्या फॅशनेबल पाउच असतो ना त्यात घालून देता येइल म्ह्णजे तीन तीन गिफ्टा.
काल इडली-सांबार करायचं होतं.
काल इडली-सांबार करायचं होतं. इडल्यांची तयारी झाल्यावर लक्षात आलं की सांबार मसालाच नाहीये. पण रसम मसाला होता. तोच घातला डाळीत. शिवाय थोडी धणेपूड घातली. घरच्या इडली-सांबार फॅ.क्ल.ला कळलंही नाही बिन-सांबार मसाल्याचं सांबार आहे ते
एक युक्ती म्हणून आपलं सांगितलं.... कुणाच्यातरी कामी येईल कधीतरी
Pages