सलमान खान वरील आरोप सिद्ध.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53

सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...

न्याययंत्रणेचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग असे समज की आता त्या व्यसनालाच शिक्षा झाली आहे, आणि ते योग्यच आहे>>

Exactly!! अशा स्वरुपाच्या शिक्षेकडे हीन नजरेनी न बघता मी हाच विचार करतो की ही शिक्षा त्या व्यसनाला झाली आहे. त्या व्यक्तिला नाही.

पण ही अगदी आता भारतामधे काळाची गरज झाली आहे की दारु बंद व्हायला पाहिजे. दारुमुळे जेवढे नुकसान झाले आहे होत अहे तेवढे नुकसान इतर कुठल्याच व्यसनानी केले नसावे.

अमा, तुम्ही माझ्या पोस्टचा काय अर्थ लावला मला माहिती नाही. मी निर्भयाची इथे विटंबना करतो आहे असे तुम्हला का जाणवले माझ्या लिहिण्यातून हे जर नीट सांगितले तर नक्कीच पोष्ट संपादीत करेन. धन्स..>> तुमची पोस्ट एकदा वाचा. व एडिट करा. तिच्या वरील अत्याचाराचा उल्लेख इथे करणे गरजेचे नाही. यापेक्षा नीट सांगू शकत नाही.

ते मी न्यायालयाची खिल्ली उडवणे ह्या माझ्या आधीच्या आलेल्या पोष्ट्ला उत्तर देताना लिहिलेले वाक्य आहे. माझी पोस्ट मी वाचली परत. कळत नाही काय चुक केली मी.

@ बी: अमा ते डिटेलींग डिलिट करा असे बहुदा सुचवत आहेत. सर्वात क्रूर दोषीला सर्वात कमी शिक्षा असे लिहिले तरी पुरेसे आहे.

तुम्हाला जेवढी सलमानने केलेया गुन्ह्याची चीड आहे तेवढीच मला व्यसनांची आहे.>>
व्यसनांची चीड येऊन काय उपयोग....
ती व्यसने करणार्यांची चीड आली तर उपयोग..

बी इतके वर्णन करुन लिहिले तेच चूक आहे. हे क़ळण्याकरीता आपण निश्चितच लहान नसाल ही आशा आहे. पब्लिक फोरम वर या विवादास्पद गोष्टींचे वर्णन कसे करावे याचे ज्ञान असण्यास हरकत नसावी

प्रॅक्टीकल विचार केला तर फूटपाथ हे झोपण्यासाठी नसते>>
प्रॅक्टीकल विचार केला तर जास्त दारु ढोसुन न ठोकता गाडी चालवणे मायकेल शुमाकरलाही शक्य नाही.
आणि ते कायद्यातही बसत नाही.
प्रॅक्टीकल विचार केला तर माबोवर बर्‍याच प्रतिक्रिया फक्त आणि फक्त दुसर्‍याला उचकवण्यासाठीच लिहिल्या जातात आणि प्रॅक्टीकल विचार केला तर त्याकडे आपण दुर्लक्ष करु शकतो.
प्रॅक्टीकल विचार केला तर, जेंव्हा देव अक्कल आणि कॉमन सेन्स वाटत होता तेंव्हा बरचसे लोक गैरहजर होते, आणि जे होते त्यातले काही चाळणी घेउन हजर होते. सो असोच...

अजून एक नवीन ,
तत्पूर्वी नीधप आणि त्यांना अनुमोदन देणाऱ्या सर्वांना अनुमोदन ..

सलमानभाऊंनी काहीतरी मेडिकल सर्टिफिकेट सादर केलंय म्हणे, त्यामध्ये त्याला "neurological (किंवा तत्सम) condition which requires constant medical attention" अस झालाय म्हणे..
आणि आता वरच्या कोर्टातपण जाणार म्हणे..

एकंदर परिस्थिती पाहता आपण १५ वर्षांनी पुन्हा असाच एक बाफ काढून असेच भांडणार अस दिसतय Lol

रविंद्र पाटिल यांच्याबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. खरंच वाईट वाटलं. लोक पैसे आणि पावर अयोग्य पद्धतीने कशी वापरतात याचं उत्तम उदा.

बी - तु तुझी पोस्ट फार डिटेलमध्ये लिहिली आहेस ती एडिट कर. एखाद्या व्यक्तिबदल तिच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल इतकं डिटेल मध्ये लिहून त्याचा पुनरुच्चार होणं याला ही विटंबनाच म्हणतात.

मी वर लिहिले आहे परत लिहितो की तुम्ही नक्की कशाबद्दल लिहित आहत हे मला कळत नाही आहे. योनी ह्या शब्दाबद्दल तुमचा आक्षेप आहे का?

पण ही अगदी आता भारतामधे काळाची गरज झाली आहे की
दारु बंद व्हायला पाहिजे. दारुमुळे जेवढे नुकसान झाले आहे होत
अहे तेवढे नुकसान इतर कुठल्याच व्यसनानी केले नसावे.>>>>>>>>>>>>काय बोलताय बि,आमच्यासारख्यांनी मग काय गोमुत्र प्यायचे काय. Biggrin

रवी केंजळे तुमचं ही कठिण आहे. Lol दारू प्या हो, पण घरात प्या, नंतर रथसारथ्य करून लोकांचे जीव घेऊ नका म्हणजे मिळवलं.

कमाल आहे खरेच लोकांना दारु बिरु न पिता एक नशा चढलेली असते. काय काय लिहितात त्यांनाच त्यांचे कळत नाही. जणू सबंध मायबोलिवर हा वा अशा प्रकारचे शब्द नाहीतच. आत्ता सर्च केले तर अनेक धागे सापडतील. हे बघा: http://www.maayboli.com/search_results?as_q=%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%...

बापरे! हा धागा आला तेव्हा पहिले तीन, चार प्रतिसाद पाहून कामासाठी बाहेर गेलो. आत्ता पाहिले तर येथे अजस्त्र चर्चा झालेली आहे. ऋन्मेष आणि बी ह्यांचे प्रतिसाद वाचून अवाक झालो. केंजळे काहीतरी आठवेच बोलण्यासाठी प्रतिसाद देत असावेत. आणि पाच वर्षे म्हणजे अडीच वर्षे हे मीही आज पहिल्यांदा वाचले.

सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लागला आहे व त्याला वर्षे शिक्षा झालेली आहे.

ह्या सुमार अभिनय करणार्‍या, कैलासराव म्हणतात त्याप्रमाणे माजुर्डेपणाने वागणार्‍या आणि पैश्याच्या जोरावर यंत्रणा प्रभावीत करू पाहणार्‍या इसमाला ह्यापेक्षा अधिक शिक्षा किमान बारा वर्षांपूर्वी व्हायला हवी होती.

अती अती अवांतर -

लोकहो,

आजकाल, आजकाल काय, गेली कैक वर्षे समालोचक म्हणून आणि कॉमेडी शोजमधील एक आदरणीय व्यक्तीमत्त्व म्हणून सुटाबुटात वावरणारा, त्याच्या काळातील एक सामान्य फलंदाज नवज्योत सिद्धू ह्याने एका मनुष्याचा हॉकी स्टिक डोक्यात घालून खून केलेला होता. शिक्षा काहीही नाही.

रश्मींनी सांगितल्याप्रमाणे पुरुरवाच्या शिक्षेबाबत काही आठवत नाही.

संजय दत्तला तुरुंगातून रजा वगैरे मिळू शकते.

सलमानला शिक्षा व्हायला तेरा वर्षे लागली.

काळवीट प्रकरणाचे काय कोण जाणे!

गर्वसे बोलो, हम भारतीय है!

बेफिकीर माझा आताचा ( शोध ) प्रतीसाद तुम्हाला उद्देशुन नाहीये. नेमकी तुमची पोस्ट आल्यानन्तर माझी पोस्ट आली. नाहीतर म्हणाल कुठले शोध लावले.

Pages