सलमान खान वरील आरोप सिद्ध.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53

सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...

न्याययंत्रणेचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रॅक्टीकल विचार केला तर फूटपाथ हे झोपण्यासाठी नसते,
>>
खरं सांगू का? ही असली वाक्य वाचून मला त्या मेलेल्या व्यक्तीच्या मृत्युची खिल्ली उडवली जातेय असं फील होतंय!

प्लिज असले मुद्दे इथे वारंवार येऊ नये म्हणून याचा अनुल्लेख करा रे Sad

त्या आरती छाब्रियाला त्रुंगात घालायला पाहिजे Angry
लोक फुटपाथवर झोपतात ते तिला आवडत नाही म्हणे.
खरंतर हे वाक्य वाचून मला राग येण्यापेक्षा हताश व्हायला झालं Sad

बर झाले नीधप तुम्ही आलात, तुमचा सलमानवर एवढा राग राग कशासाठी,त्याने श्वासच्या ऑस्कर प्रमोशनला चॅरीटी दीली नाही म्हनुन आहे का हा राग ,कळु दे एकदा

सुरी भोकसताना मनुष्य शुद्धीवर अस्तो. तसा तो दारु प्यायल्यावर नसतो.... अजिबात सहमत नाही

मग दारु पिऊन जर कोणी अत्याचार केले तर काय नशेत होता म्हणायचे काय ? नशेत असूनही किंवा नशेतच गुन्हे करण्याची प्रवृत्ती ही वाईटच .

प्रॅक्टीकल विचार केला तर फूटपाथ हे झोपण्यासाठी नसते, > त्याच प्रॅक्टीकल्ने विचार केला तर फुटपाथ गाडी चालवण्याकरीता देखील नसतात. हे आपण विचारात घेत नाही महाशय ?

@ ऋ, तुझे सगळे मुद्दे योग्य आहेत असे मानले तर हेच मुद्दे सलमान ला लागू होत नाहीत का ? मुळात दारू वाईट आहे ओके, मग ती सलमाने ने प्यायलिच का? आणि ती पिऊन वाट गाडी चालवलीच का?

बी या आयडिने केलेली विधाने कधिच मनावर घेऊ नयेत हे त्यांचे बीबी वाचुन बनलेले मत त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. तर ते असो.

गायक (?) अभिजित ने तर यापुढे जाऊन तारे तोडलेत.

एकही विटनेस पुढे येऊ दिला नाही.>> ज्याची गाडी ठोकली त्याला नवीन कोरी गाडी पण मिळाली. कोण कशाला विटनेस म्हणुन पुढे येईल. सारी दुनिया मुठठीमे! Sad

त्या आरती छाब्रियाला त्रुंगात घालायला पाहिजे राग
लोक फुटपाथवर झोपतात ते तिला आवडत नाही म्हणे>>>>> म्हणजे या छाब्रिया बाईला पण फुटपाथवरुन रेसिन्ग करायचीय का?

प्रॅक्टीकल विचार केला तर फूटपाथ हे झोपण्यासाठी नसते, पण या देशात गरीबांच्या नशीबात असेच जगणे आणि मग असेच मरणे आहे. दुर्दैवी आहे, पण हा मुद्दाही या धाग्यावर लक्षात घ्यायला हवा >> तुला जर खरंच सर्व बाजूंनी विचार करायचा असेल तर हेही लक्षात ठेव की फूटपाथ ही गाडी चालवायची जागा नाही. ते लोक तिथं झोपलेले नसते आणि फूटपाथवरून चालत असते तरी पण त्यांना मरणच आले असते.

मलाही अगदी हेच म्हणायचे आहे दक्षिणा. >> मग तेच म्हणायचे ना. चुक सलमानची नाही दारुची असे का म्हटले?

अजून नाही समजलं तुम्हाला स्पॉक? Wink Light 1

बी ह्यांची निर्भया ह्या मुलीचा उल्लेख असलेली पोस्ट कृपया स्वतः एडिट करा किंवा अ‍ॅडमिन प्लीज ते पोस्ट उडवा. एक तर विषयाशी संबंधित नाही व त्या मुलीची मेल्यानंतरही विटंबना होउ नये ह्यासाठी विनंती करते.

Actually! अभिजीत ची ट्विट टेर्रिब्बल आहे!

यानिमित्ताने इतर बॉलिवुडींचेही चेहरे बघायला मिळतायत! Happy

सलमान मला ही आवडतो. बिईंग ह्युमन तर्फे तो जे कार्य करतो त्याचा ही आदर आहेच, पण नकळत का होईना त्याने जो गुन्हा केला त्याबद्दल त्याला शिक्षा झाली हे योग्यच झालं.

>+१

ऋन्मेष, तू नेमका अतिशहाणा आहेस की मुर्ख तेकळेना झाल्याने माझा पास!
>>

फिर भी दिल है हिंदुस्तानी आठवला.

जुही चावला (शाहरूखला) - तुम आदमी हो के बंदर ?
शाहरूख - तुमको क्या पसंद है!

आता इथे खूप डुप्लिकेट आणि कंपूधारी लोक्स आले आहेत. आणि मी माझ्या वाक्यांचा किस काढत बसणार नाही कारण किस काढत बसणे माझ्या प्रवृत्तीत नाही.

तेंव्हा तुम्ही लोक्स कॅरी ऑन. मला जर काही लिहायचे असेल तर मी नक्कीच येईल. ही माझी ह्या धाग्यावरची शेवटाची पोस्ट मुळीच नाही.

केंजळे, तुम्ही वारंवार वैयक्तिक पातळीवर विधाने का करताय? तुमची असली विधाने माझ्यापेक्षा तुमच्याबद्दल बरंच काही सांगतात.
तुमच्या पातळीवर उतरून तुमच्याशी वाद घालण्याइतकी वाईट वेळ माझ्यावर अजूनतरी आलेली नसल्याने माझा पास. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. त्यामुळे तुम्हाला जे हवं ते समजा तुम्ही.

अभिजित या गायकाने खरंच तारे तोडले आहेत. निव्वळ हताश झाले आहे मी वाचून. ज्यांच्याकडे जनता कलाकार म्हणून आदराने पाहते त्यांनी अशी वक्तव्य करावीत? Sad

बी ह्यांची निर्भया ह्या मुलीचा उल्लेख असलेली पोस्ट कृपया स्वतः एडिट करा किंवा अ‍ॅडमिन प्लीज ते पोस्ट उडवा. एक तर विषयाशी संबंधित नाही व त्या मुलीची मेल्यानंतरही विटंबना होउ नये ह्यासाठी विनंती करते.>>

अमा, तुम्ही माझ्या पोस्टचा काय अर्थ लावला मला माहिती नाही. मी निर्भयाची इथे विटंबना करतो आहे असे तुम्हला का जाणवले माझ्या लिहिण्यातून हे जर नीट सांगितले तर नक्कीच पोष्ट संपादीत करेन. धन्स..

मुळात दारू वाईट आहे ओके, मग ती सलमाने ने प्यायलिच का? आणि ती पिऊन वाट गाडी चालवलीच का?

>>>>

सलमान वाईट नाहीयेच मुळी वा त्याने गुन्हा केलेलाच नाही वा त्याला शिक्षा झाली ते अयोग्य असे कुठेही म्हटले नाहीयेच मी.

फक्त मी दारू वर घसरलोय इतकेच.
आणि ते मी नेहमी करतोच.

तुम्हाला जेवढी सलमानने केलेया गुन्ह्याची चीड आहे तेवढीच मला व्यसनांची आहे.
खास करून व्यसन करतो कोण आणि भरावे कोणाला लागते.
इथेही तेच झालेय.

स्पॉक, मग माझाही मुद्दा असाच आहे की दारू न पिणारेही अपघात करतात ते इतर कारणांमुळे
>>
बाळा,
"ते" इतर कारण त्या ड्रायवरच्या अधिकारात / ताकदीत असेलच असे नसते.

गाडी चालवताना, दारु नाही पिली पाहीजे, ही गोष्ट ड्रायवरच्या अधिकारात / ताकदीत असते,
म्हणुन चूक दारु पिउन गाडी चालवणा-या ड्रायवरचीच आह, दारुची नाही,
असा तो मुद्दा आहे.

अ‍ॅडमिन, या केंजळे आयडीने परत वैयक्तिक शेरेबाजी चालवलेली आहे.
हे इथेच रहाणार असेल तर नाईलाजाने मला हे स्क्रीनशॉटस 'योग्य' त्या ठिकाणी पाठवावे लागतील.
आजवर मायबोलीला त्रास होऊ नये म्हणून असली चिखलफेक सहन केली होती. यापुढे केली जाणार नाही.

दारूविषयी चीड व्यक्त करून सलमानला झालेल्या शिक्षेवरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा आणि गुन्हा सौम्य आहे असे भासवण्याचा सुनियोजित प्रयत्न वाटतो.

मित्रहो जरी दारू पिवून गुन्हा झाला… नशेत चूक झाली
तरीही तो मोठा गुन्हाच आहे….

उदा.
दारू पिवून खून
दारू पिवून बलात्कार
दारू पिवून आनिखीन काही

त्या त्या गुन्ह्यानुसार आणि तरतुदीनुसार शिक्षा हि होतेच आणि झालीच पाहिजे…

गुन्हा तो गुन्हाच. माणूस कितीही चांगला अथवा वाईत असला तरीही
कायद्यापुढे सर्व समान….

बरे, हे झाले दारू पिऊन अपघात करून माणसे मारल्याबद्दल,
त्या चिंकारा की कोणत्याश्या हरणाच्या शिकारीचे पुढे काय झालय?

Pages