सलमान खान वरील आरोप सिद्ध.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53

सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...

न्याययंत्रणेचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रवी केंजळे, ____/\____ तुम्ही का जळताय एवढे श्वास वर म्हणे?
यांना पण बी आणि रुन्मेष सारखा जरा ब्रेक देता येईल का?

सलमानची शिक्षा कमी व्हावी म्हणून प्रार्थना करणारे लोक, त्याची बाजू घेणारे लोक त्याने दारू पिऊन गाडी चालवू नये, किंवा दारूच पिऊ नये अशी प्रार्थना का नाही करत? फॅन पॉवर भारतासारख्या महासत्तेच्या न्यायव्यवस्थेवर दडपण आणू शकते तर खुद सलमानवरच भावनिक दडपण आणू शकते. एक व्यक्ती (करून सवरून भागून का होईना) चांगल्या मार्गी लागल्याचं पुण्य त्या फॅन पॉवरच्या पदरी जमा होईल.

निधप का एवढ्या चिडल्यात सलमानवर?श्वासच्या ऑस्कर प्रमोशनला चॅरीटी दीली नाही म्हनुण काय.....

रवी केंजळे........अत्यंत रुचिहीन वाक्य.

@बी,
दारु न पिता गाडी चालवणा-या ड्रायवर्स कडून आजपर्यंत "एकही" अपघात झालेला "नाही",
हे सिद्ध करणारे, काही सर्वे / संशोधन पेपर्स आहेत का तुमच्याकडे?

>> स्पॉक हा मुद्दा मी विचारात अजून तरी घेतला नाही पण जे अपघात नकळत होतात मग ते दारु पिऊन वा दारू न पिऊन त्या अपघांताकडे मी वेगळ्या नजरेने बघतो. माझ्यामते असे अपघात होतात तेंव्हा ज्याच्याकडून ते होतात ती व्यक्ती आणि विक्टिम दोघे एकमेकांचे शत्रु वगैरे नसतात. पण चुक घडते आणि त्याची फळे जन्मभर भोगावी लागतात म्हणून नेहमी सतर्क असणे फार गरजेचे आहे.

माझ्या ऑफिसात एकाने एके दिवशी माझ्याशी वाद घातला की त्याचा गुन्हा सिद्ध होणारच नाही
मी शांत बसले.
आज गुन्हा सिद्ध झाल्यावर वाद घातला त्याला शिक्षा होणार नाही
मी गप्प बसले
आता शिक्षा झाल्यावर ते साहेब म्हणे अजुन गेलाय कुठे तो जेल मधे Uhoh

केवढा हा आशावाद Uhoh
तो पण सलमान साठी?

मी अजुनही गप्पच बसलेय

रिया, तो सलमानचा समर्थक आहे का? समर्थक असेल तर तुला राग येणे साहजिक आहे.
नसल्यास ही वाक्य सिस्टिम बद्दलच्या नैराश्यातून आलेली असू शकतात.

@बी,
तुम्ही कोणत्या मुद्द्याला काय प्रतिसाद देत आहात, ते तुमचे तुम्हाला तरी कळते आहे क?

बी, "दारु" पिउनच अपघात होतात. त्यामुळे चुक व्यक्तीची नसुन, दारुची आहे,
दारु न पिनार्या ड्रायवरकडुन कधिच अपघात होत नाहीत,
हे सिद्ध करणारे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे - सलमान फॅन असणे - या व्यतिरिक्त.

तुम्ही कशाच्या आधारावर हे म्हणत आहात की चुक व्यक्तीची नाही, दारुची आहे?
दारु जिवंत आहे का? दारु ला अक्कल आहे का? दारु ला निर्णय घेता येतो का? दारुला चुक - बरोबर मधला फरक कळतो का?

असच काही वर्षापूर्वी दिवन्गत नट राजकुमारच्या मुलाने, पुरु राजकुमार ने असाच अपघात केला होता. त्याला काय शिक्षा झाली माहीत नाही.:अओ: आता हा पुरु कुठल्या सिनेमात होता हे विचारु नका.

पण सलमान ला शिक्षा झाली हे चान्गले झाले. निदान त्या मृत व्यक्तीला आता तरी न्याय मिळाला. तो परत येणार नाही, पण अशा वागणूकीमुळे बड्या धेन्डाना थोडा चाप बसला तर बरे.

अ‍ॅडमिन, इथे अजिबातच संबंध नसताना वैयक्तिक पातळीवर उतरले गेलेय. स्क्रिनशॉटस घेतले आहेत. केंजळेने पातळी सोडायला सुरूवात केलेली आहे.
मी यावर काहीही रिअ‍ॅक्ट न होता फक्त तुमच्या निदर्शनास आणून देतेय गोष्टी.

<< क्ष मोड ऑन >>

पण डॉ. कैलास गायकवाड, दारू माणूसच बनवतो ना?

<< क्ष मोड ऑफ >>

Proud

स्पॉक, तुम्ही नशेत लिहित आहात का? मी असे कधी लिहिले की दारु न पिणार्‍याकडून कधीच अपघात होत नाहीत.

माझे सर्व मजकुर परत एकदा शुद्धीवर येऊन वाचा आणि मग बोला माझ्याशी. मला ही असली वादावादी मुळीच आवडत नाही. तुमचा तो छंद असेल तो दुसरीकडे जोपासा.

बी, दारू वाईट नाही असं कुठे म्हणालो? वाट्टेल ते बोलू नका.
>>>

तसेच मी किंवा बी देखील सलमान गुन्हेगार नाहीये असे म्हणत नाहीयेच.
पण दारूला नावं ठेवले तर त्यात गैर काय? ते या धाग्यावर या विषयावर अवांतर आहे का? नक्कीच नाही!

मुळातच तो एक अभिनेता म्हणून लोकांना आदर्श वगैरे वाटत असेल तर त्याने अपघातानंतर लगेच गुन्हा कबूल करायला हवा होता तसे न करता त्याने उलटेसुलटे उद्योग करुन गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला,न्यायव्यस्थेची एक प्रकारे खिल्ली उडविली त्यामुळे त्याच्या शिक्षेबाबत कुणाला वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. त्याला शिक्षा झाली नसती तर आपली न्यायालये पैशाने विकत घेता येतात असा गैरसमज समाजापुढे उभा राहिला असता.

रिलायन्स बाळाचा गुन्हा ड्रायव्हरने घेतला ना अंगावर. सलमानपेक्षा फार स्मूथ निघाले ते लोक. एकही विटनेस पुढे येऊ दिला नाही.

@बी,
दारु न पिता गाडी चालवणा-या ड्रायवर्स कडून आजपर्यंत "एकही" अपघात झालेला "नाही",
हे सिद्ध करणारे, काही सर्वे / संशोधन पेपर्स आहेत का तुमच्याकडे?

>>>>

वॉव ..
काय लॉजिक आहे,
सिगारेट न ओढणारेही कधी ना कधी मरतात आणि सिगारेट ओढणारेही मरतात, मग ओढा बिनधास्त .. Happy

न्यायव्यस्थेची एक प्रकारे खिल्ली उडविली त्यामुळे त्याच्या शिक्षेबाबत कुणाला वाईट वाटून घेण्याचे कारण नाही>>>

निर्भया प्रकरणात साडेसतरावर्षाच्या मुलाला फक्त ३ वर्षाची शिक्षा दिली गेली आणि तिचा खरा हत्यारा हा मुलगाच आहे ज्याने तिच्या योनीमधे लोखंड खूपसून तिचे अवयव बाहेर काढले. तेंव्हा न्यायालयाने फक्त त्याला ३ वर्ष शिक्षा सुनावली हे खिल्लि उडवण्यासारखे झाले ह्या इतक्या दारुण प्रकरणाची.

Pages