Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53
सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...
न्याययंत्रणेचे अभिनंदन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटी न्याय मिळाला. बरं झाले.
शेवटी न्याय मिळाला.
बरं झाले.
हल्ली बातमीचे पण बीबी उघडायचे
हल्ली बातमीचे पण बीबी उघडायचे फॅडच आहे. डॉ. तुम्हीसुद्धा?? चांगली बातमी वाईट बातमी असे बीबी असताना वेगळा बीबी कशासाठी?
१३ वर्षॅ ! असो. न्याय मिळाला
१३ वर्षॅ ! असो. न्याय मिळाला की नाही हे ठाऊक नाही पण अपराधी सुटला नाही हे चांगले झाले.
मुकेश अंबानीचा मुलगा पण असाच अडकला असता तर?
न्याययंत्रणेचे अभिनंदन....
न्याययंत्रणेचे अभिनंदन.... कशासाठी १३ वर्षे लावली म्हणून ?
सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असते वकिलाला पैसे देवून एवढ्या काळात. अत्यंत टूकार न्याय यंत्रणा आहे आपली. दोष सिद्ध व्हायला एवढा वेळ गेला आहेच, आता कमीत कमीत शिक्षा किंवा लवकर जामिन कसा मिळेल याबाबत प्रयत्न केले जातील.
असो ...उशीरा का होईना त्या अपघातग्रस्तांना न्याय मिळाला असे म्हणावे लागेल.
या सगळ्यामध्ये हास्यास्पद
या सगळ्यामध्ये हास्यास्पद प्रकार म्हणजे काही महाभाग सलमानच्या सुटकेसाठी (आता शिक्षा कमी होण्यासाठी) प्रार्थना करत आहेत.
कानपूर येथे आयोजित करण्यात आलेली प्रार्थना फेसबुक वर पाहायला मिळाली, तसेच हेमा मालिनी सुद्धा शिक्षा कमी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत म्हणे (मटा लाइव्हच्या अपडेट नुसार) ..
उद्या एखादा असाच दानधर्म करणारा गुणी बॉलीवूड स्टार येऊन या प्रार्थना करणार्यांच्या घरच्यांना असा चिरडून गेला तर काय stand असेल यांचा..
भरपूरच मूर्ख लोक आहेत बुवा आपल्या देशात ..
हसवा कि रडव तेच कळत नाही ..
न्याययंत्रणेचे अभिनंदन....
न्याययंत्रणेचे अभिनंदन.... कशासाठी १३ वर्षे लावली म्हणून ?
किकु.... १०० अपराधी सुटले तरी चालतील...परंतु एकही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये अशा प्रणालीवर आपली न्याययंत्रणा चालते. त्यातही फास्ट ट्रॅक वगैरे न्यायालये काढून निकाल दिले जातात.
१३ वर्षे लागूनही न्याय मिळाला म्हणून न्याययंत्रणेचे अभिनंदन. नाहीतर हिट अँड रन होवूनसुद्धा पोलिस ठाण्यात त्याला ८०० रु.च्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन झाला होता. नाही का?
या सगळ्यामध्ये हास्यास्पद
या सगळ्यामध्ये हास्यास्पद प्रकार म्हणजे काही महाभाग सलमानच्या सुटकेसाठी (आता शिक्षा कमी होण्यासाठी) प्रार्थना करत आहेत.
>>>
लॉजिकली हे हास्यास्पद वाटले तरी प्रॅक्टीकली काही गैर नाही.
उदाहरणार्थ आपल्यापैकी कोणाच्या मुलाच्या हातून अॅक्सिडंट झाला तर आपण त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी अशीच प्रार्थना करणार ना.
भावनिकद्रुष्ट्या फेव्हरीझम होणे हे मानवी स्वभावाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
याउपर न्यायनिवाडा उशीरा का होईना किमान होणे हे अभिनंदनास्पदच. न्यायालयाचा निर्णयाचा आदर आहे.
रुनम्या, 'व्यवच्छेदक' लक्षण
रुनम्या, 'व्यवच्छेदक' लक्षण असं म्हणालास तू
व्यवच्छेदक म्हणजे रे काय, किती अवघड शब्द वापरतोयस
तुझे लक्षण काही ठीक दिसत नाहीये मला.
रुन्मेशशी सहमत. यात
रुन्मेशशी सहमत. यात हास्यास्पद काहीही नाहीय. मी सलमानची फॅन आहे आणि मला खुप वाईट वाट्तेय आज. मीही त्याला ३ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा नको म्हणुन प्रार्थना करतेय. आज त्याच्या जागी माझा नातलग असता तर मी हेच केले असते.
पण म्हणुन मी न्यायालयाने त्याला शिक्षाच देऊ नये, दिली तर ते चुक, सलमानची काडीची चुक नाहीयेच वगैरे काहीही म्हणत नाहीय.
त्याने चुक केलीय त्याला शिक्षा होणारच, नव्हे ती व्हावीच म्हणजे असल्या गंभीर चुका इतर जण करणार नाहीत. आणि ज्यांच्या हातुन झाल्यात त्याना समाजातले त्यांचे स्थान शिक्षेपासुन वाचवु शकणार नाही हा संदेशही मिळेल.
५ वर्षे जातोय तो आत. शिक्षा सुनावली गेली.
१० वर्षावरुन ५ वर्षावर शिक्षा
१० वर्षावरुन ५ वर्षावर शिक्षा आणली गेली.
जे गेले त्यांच्या नातेवाइकाना
जे गेले त्यांच्या नातेवाइकाना इमोशनल क्लोजर मिळाले असेल. सलमान बद्दल कळवळा असणार्यांनी हा देखील विचार करावा.
हास्यास्पदच आहे त्याला कमी
हास्यास्पदच आहे त्याला कमी शिक्षा व्हावी म्हणणे.
या असल्या फॅन्समुळेच यंत्रणेवर प्रेशर येत रहाते. एवढा गुन्हा करून १३ वर्ष सांडासारखा फिरतच होता. करोडो रूपये कमवलेत त्याने. थट्टा आहे ही आपल्या न्यायव्यवस्थेची.
दारूच्या नशेत लोक चिरडले तरी फॅन्स बिंडोकासारखे कमी शिक्षा व्हावी अशी प्रार्थना करतात हे खरंच हास्यास्पद आणि भयानक आहे. माणुसकीशून्य.
आता फ्लोअरवर असलेल्या फिल्मसच्या निर्मात्यांचे पैसे बुडतील म्हणून शिक्षा देऊ नका हो असे गळे काढले जातीलच. १३ वर्षांपूर्वी, गुन्हा घडायच्या आधी जर निर्मात्यांनी साइन केले असेल याला तर या गळे काढण्याला अर्थ आहे. अन्यथा आरोपीला तुम्ही हिरो म्हणून साइन करताय इथेच मोठा विनोद आहे.
व्यवच्छेदक : That
व्यवच्छेदक : That particularizes, specifies, excepts, distinguishes. Integral.
एखाद्या वस्तू/व्यक्ती/आजार/परिस्थीती इ. चे वर्णन करताना, त्या अन फक्त त्याच बाबीस लागू पडणारे एकादे लक्षण असते, त्या लक्षणाला व्यवच्छेदक लक्षण असे म्हणतात.
अमा, नीधप >> +१ उद्या एखादा
अमा, नीधप >> +१
उद्या एखादा असाच दानधर्म करणारा गुणी बॉलीवूड स्टार येऊन या प्रार्थना करणार्यांच्या घरच्यांना असा चिरडून गेला तर काय stand असेल यांचा..
भरपूरच मूर्ख लोक आहेत बुवा आपल्या देशात ..
हसवा कि रडव तेच कळत नाही ..>>
खरतर प्रचंड चीड येते या लोकांची.
शिक्षा झाली हे बरं झालं.
भरपूरच मूर्ख लोक आहेत बुवा
भरपूरच मूर्ख लोक आहेत बुवा आपल्या देशात .. >>>
रझा मुरादचं वक्तव्य ऐकल्यावर हे पटलच (तो म्हणे टॅक्स भरतो, प्रामाणिक आहे, बॉलिबुड मध्ये त्याचे कोट्यावधी चाहते आहेत म्हणुन त्याची शीक्षा कमी करा)
टाइमसऑफ इंडिया वर तर आरत्या चालु होत्या त्याच्या.. त्याने खुप छान समाजसेवा केलीये ब्ला ब्ला...
अरारा...
ती टाइम्स वरची बया तिच्या घरचं कोणी असतं त्या मृतांमध्ये तर अशीच काहीही बरळी असती का?
आणि सिस्टिमॅटिकली त्याची
आणि सिस्टिमॅटिकली त्याची बीइन्ग ह्युमन वगैरे ब्रांड डेव्हलप करून दयावान वगैरे इमेज बनवन्यात आली. अशी इमेज विकत घेणारे ही आहेत. तरी अजून ब्लॅक बक वगैरेचे किलिन्ग बाजुलाच राहिलेआहे.
शिक्षा झाली हे बरं झालं. >>>
शिक्षा झाली हे बरं झालं. >>> काय बी उपयोग नाही होणार याचा. १५ दिवस तुरुंगात घालवले की २-२ महिन्याची फर्लो रजा घेणार आणी पिच्चर, बिग बॉस वगैरेचे शुटिंग करायला मोकळे.
आणि सिस्टिमॅटिकली त्याची
आणि सिस्टिमॅटिकली त्याची बीइन्ग ह्युमन वगैरे ब्रांड डेव्हलप करून दयावान वगैरे इमेज बनवन्यात आली. <<<
अगदी.
हा खटला न्यायालयात गेला. जनमानस याच्या विरूद्ध जातेय हे लक्षात आल्यावर ठरवून केलेली मार्केटींग खेळी आहे.
बिईंग ह्युमन ट्रस्ट शिक्षा
बिईंग ह्युमन ट्रस्ट शिक्षा कमी होण्याकरीताच स्थापन केली आहे. असा संशय यायला वाव आहे. संस्था मदत फक्त भारतातच करते म्हणून नेपाळला मदत केली नाही. आज कोर्टामधे सलमानच्या वकिलाने देखील युक्तिवाद करताना या सांरख्या ट्रस्टची माहीती दिली. जर निस्वार्थपणे मदत करत असेल तर या युक्तिवादात याबाबींचा समावेश करायला नको होता.
निव्वळ दिखावेगिरी करुन लोकांच्या नजरेत स्वतःची छबी चांगली बनवण्याचा प्रयत्न होता. जेणेकरुन शिक्षा मिळाल्यास ती कारणे कोर्टात दाखवून शिक्षेमधे सवलत मिळावी आणि जनतेच्या नजरेत स्थापन रहावे.
१०० अपराधी सुटले तरी
१०० अपराधी सुटले तरी चालतील...परंतु एकही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये अशा प्रणालीवर आपली न्याययंत्रणा चालते. त्यातही फास्ट ट्रॅक वगैरे न्यायालये काढून निकाल दिले जातात.
सहमत आहे, पण फास्ट ट्रॅक वगैरे विशेष केसेसमध्ये असते. असो हा विषयच वेगळा आहे, इथे तो दोषी होताच आणि त्याला शिक्षा व्हायलाच हवी.
निधप +१००
हो गिरीकंद बरोबर आहे तुमचं...
हो गिरीकंद बरोबर आहे तुमचं... पण उगाच मनाचे समाधान!
संजय दत्तही अशीच शिक्षा भोगतोय (का?) ना? याचही तेच होणार.
आता सलमान ला शिक्षा झाली, मग
आता सलमान ला शिक्षा झाली, मग being human बंद का? न्याय व्यवस्थेने 13 वर्षानंतर का होईना न्याय दिला, हे ही तितकेच महत्वाचे..
शिक्षेच्या कालावधीत १ दिवस
शिक्षेच्या कालावधीत १ दिवस म्हणजे २ दिवस मोजतात असे ऐकलय हे खरे आहे का ( म्हणजे दिवसाचा एक आणि रात्रीचा १ असे काउंट होते) तसे असेल तर हा टग्या २.५ वर्षात बाहेर येईल त्यात चांगली वर्तणूक वगैरे दाखवून १.५ वर्षात बाहेर येवू शकतो .
सलमानच्या चाहत्यांना आठवत
सलमानच्या चाहत्यांना आठवत असेल की सलमानच्या विरोधात साक्ष द्यायची हिंमत दाखवलेला त्याचा बॉडिगार्ड गायब झाला आणि मग त्याचा अचानक मृत्यूच झाला.
पोलिस कॉन्स्टेबलचंही तेच झालं.
स्वतःच्या ड्रायव्हरवर हीच केस सलमान घालायला निघाला होता...
याला ना अभिनय येत, ना हा माणूस म्हणून चांगला आहे.. काय बेसिसवर लोक फॅन असतात कुणास ठाऊक.
http://web.archive.org/web/20
http://web.archive.org/web/20130704042216/http://bollywoodjournalist.com...
वाचा
हे केस सेशन कोर्टात १३ वर्ष
हे केस सेशन कोर्टात १३ वर्ष चालली ना?
सलमानने आता अपिल करून हायकोर्टात नेली तर? निर्णय अजून लांबणीवर.
पैसा असला की लोक काहिही करतात.
हास्यास्पदच आहे त्याला कमी
हास्यास्पदच आहे त्याला कमी शिक्षा व्हावी म्हणणे.
या असल्या फॅन्समुळेच यंत्रणेवर प्रेशर येत रहाते. एवढा गुन्हा करून १३ वर्ष सांडासारखा फिरतच होता. करोडो रूपये कमवलेत त्याने. थट्टा आहे ही आपल्या न्यायव्यवस्थेची.
दारूच्या नशेत लोक चिरडले तरी फॅन्स बिंडोकासारखे कमी शिक्षा व्हावी अशी प्रार्थना करतात हे खरंच हास्यास्पद आणि भयानक आहे. माणुसकीशून्य.
आता फ्लोअरवर असलेल्या फिल्मसच्या निर्मात्यांचे पैसे बुडतील म्हणून शिक्षा देऊ नका हो असे गळे काढले जातीलच. १३ वर्षांपूर्वी, गुन्हा घडायच्या आधी जर निर्मात्यांनी साइन केले असेल याला तर या गळे काढण्याला अर्थ आहे. अन्यथा आरोपीला तुम्ही हिरो म्हणून साइन करताय इथेच मोठा विनोद आहे>>>>>>>>>>>>>>>>>>.+ नीधपला १००० मोदक! १००% सहमत.
आमच्या भागात एक नगरसेवक
आमच्या भागात एक नगरसेवक गणेशोत्सव, शिवाजी जयंती सारख्या सणवारात मोठा कार्यक्रम करायचा. स्टेजवर भलेमोठे हात जोडून उभे असलेले पोस्टर, "नगरसेवक अमुक तमुक यांच्या तर्फे अमुक मदत तमुक मदत" वह्या वाटप इत्यादी. सतत काही ना काही चालूच होते. आधी फार कौतुक वाटत होते. पण नंतर माझ्या एका मित्राने आमच्या भागात दुकान टाकल्यावर या नगरसेवकाची माणसं या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्गणी मागायला येऊ लागली. ते ही थोडेथोडके नव्हे तर ४०००/- ,१००००/- असेच आकड्यांमधे वर्गण्यांची मागणी होउ लागली. इथूनच कळले नगरसेवक व्यापार्यांकडून दमदाटीने पैसे जमा करतो आणि नंतर स्वतःच्या नावावर हे कार्यक्रम खपवत आहे.
१२ तासाचा दिवस तुरुंगात असतो.
१२ तासाचा दिवस तुरुंगात असतो. संपूर्ण दिवसाचे २४ तास असल्यामुळे ५ वर्षाची शिक्षा प्रत्यक्षात २.५ वर्षाची असते
नीधप, तुमच्या प्रत्येक
नीधप, तुमच्या प्रत्येक पोस्टशी सहमत.
Pages