Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53
सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...
न्याययंत्रणेचे अभिनंदन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मधे तो एक सायनी आहुजा होता
मधे तो एक सायनी आहुजा होता त्याने त्याच्या मोलकरणीवर बलात्कार केला त्याचे नंतर काय झाले काहीच समजले नाही.
सलमान खानबद्दल इतकेच वाईट वाटते की हा माणूस काही गुन्हेगार नाही. जे काही झाले ते चुकुन झाले. आपल्या देशात रात्री अपरात्री गरीब लोक रस्त्यावर झोपतात त्यात अशा अपघातात जातात.
दारू पिऊन कितीतरी लोक वाहने चालवतात. प्रवास करतात. अशा नशेत होणार्या चुकांची भरपाई किती महाग पडते ह्याचे उदा सलमान खान आहे.
मला फार वाईट वाटते आहे कारण सलमान आपल्यासारखाच नॉर्मल आहे. मुद्दाम त्याने कुणाचा खून केलेला नाही. नशेत जे काही झाले ती चुक नशेत होता म्हणून झाले. पण नंतरही मी सलमानबद्दल वाईट ऐकले की तो अजूनही दारुत गाडी चालवतो.
असो. मला मैने प्यार किया, हम आपके है कौन, साजन, पत्थर के फुल हे सिनेमे अजून लक्षात आहेत सलमानचे.
पण जेंव्हापासून त्याने शर्ट बाहेर काढायला सुरुवात केली तेंव्हापासून मी त्याचे सिनेमे बघणेच बंद केले. व्यायाम करुन करुन ही लोक कसे शरिर गेंड्यासारखे जाड करतात. बघवत नाही इतके फुललेले शरिर. कुठेच जागा नसेल अजून काही फुगायला.
१२ तासाचा दिवस तुरुंगात असतो.
१२ तासाचा दिवस तुरुंगात असतो. संपूर्ण दिवसाचे २४ तास असल्यामुळे ५ वर्षाची शिक्षा प्रत्यक्षात २.५ वर्षाची असते
>>>
एक्झॅक्टली हेच विचारायचं होतं.... हे खरं आहे? असं असतं? याच लॉजिक ने १० वर्षांची शिक्षा भोगायला ५ वर्षे लागणार? की ५ ची अडीच लागणार? की असं काही नसतं? ५ म्हणजे पूर्ण ५ कॅलेंडर वर्षे?
:feeling अज्ञानी:
हायकोर्टात अपील करणार आहेतच
हायकोर्टात अपील करणार आहेतच त्याचे वकील. तसे झाले, तर जामीनावर येईल बाहेर १५ दिवसात. मग फ़क्त देश सोडता येणार नाही, बाकी सगळं चालू राहीलच.
चाहते, सो कॉल्ड सेलिब्रिटींनी त्याच्या शि़क्षेचा शोक केला तरी एकवेळ माफ, पण मिडियाने तरी त्याची बाजू घेऊ नये हीच एक आशा!
१२ तासाचा दिवस तुरुंगात असतो.
१२ तासाचा दिवस तुरुंगात असतो. संपूर्ण दिवसाचे २४ तास असल्यामुळे ५ वर्षाची शिक्षा प्रत्यक्षात २.५ वर्षाची असते>> म्हणजे जन्मठेपेची १४ वर्षांची शिक्षा प्रत्यक्षात ७ वर्षांचीच असते की काय?
सिस्टिमॅटिकली त्याची बीइन्ग
सिस्टिमॅटिकली त्याची बीइन्ग ह्युमन वगैरे ब्रांड डेव्हलप करून दयावान वगैरे इमेज बनवन्यात आली.
>>>>
म्हणजे एखाद्याची इमेज बघून शिक्षेत सूट देता येते हे मान्य करता आपणही एकाअर्थी ..
ती इमेज खरी की खोटी की ब्रांडींन्ग ते नंतर ठरवूया..
दारूच्या नशेत माणसे चिरडणे हा
दारूच्या नशेत माणसे चिरडणे हा गुन्हा नाही?
चुकून असो की मुद्दामून जीव गेला ना माणसांचा? मग तो गुन्हाच होतो.
बाकी विटनेस दाबून टाकण्यासाठी केवढी तरी यंत्रणा कार्यरत होती. विटनेस रस्त्यावर आला, भिकेला लागला आणि क्षयाने मेला. यानंतरही सलमान काही गुन्हेगार नाही??????
मला फार वाईट वाटते आहे कारण
मला फार वाईट वाटते आहे कारण सलमान आपल्यासारखाच नॉर्मल आहे. मुद्दाम त्याने कुणाचा खून केलेला नाही. नशेत जे काही झाले ती चुक नशेत होता म्हणून झाले. पण नंतरही मी सलमानबद्दल वाईट ऐकले की तो अजूनही दारुत गाडी चालवतो.
>>>>>
एक्झॅक्टली !!
नशेत..
वाईट खरी दारू आहे..
पण ते कित्येक जण पितातच ना..
सरकारही त्यावर बंदी आणतेय का?
आहे कोणाच्यात हिंमत या बेसिक कारणाविरुद्ध आवाज उठवायची?
दारूच्या नशेत माणसे चिरडणे हा
दारूच्या नशेत माणसे चिरडणे हा गुन्हा नाही?
चुकून असो की मुद्दामून जीव गेला ना माणसांचा? मग तो गुन्हाच होतो.
बाकी विटनेस दाबून टाकण्यासाठी केवढी तरी यंत्रणा कार्यरत होती. विटनेस रस्त्यावर आला, भिकेला लागला आणि क्षयाने मेला. यानंतरही सलमान काही गुन्हेगार नाही??????
>> नीधप +१
ती चूक नव्हती गुन्हा होता हेही मान्य होत नाहीय लोकाना .
चुकून नाही झालेले बी.
चुकून नाही झालेले बी. culpable homicide amounting to murder या आरोपाखाली शिक्षा झाली आहे. म्हणजेच चूक नाही, intent to kill आहे. मुद्दाम केलेली हत्या.
रून्मेश यार, विरोधासाठी विरोध
रून्मेश यार, विरोधासाठी विरोध नको, जरा लॉजीकल बोल
बाकी विटनेस दाबून टाकण्यासाठी
बाकी विटनेस दाबून टाकण्यासाठी केवढी तरी यंत्रणा कार्यरत होती. विटनेस रस्त्यावर आला, भिकेला लागला आणि क्षयाने मेला. यानंतरही सलमान काही गुन्हेगार नाही??????
>>>>
हो, हा गुन्हा आहे!
पण हा सिद्ध होणे ही गरजेचे आहे.
जर पुरावा नसेल तर यामागे सलमानचा हात आहे असा आरोप तुम्हीही करू शकत नाही.
हे मी सलमानची बाजू नाही घेत तर प्रॅक्टीकल विधान आहे.
नी + कितीही! मला खुप आनंद
नी + कितीही!
मला खुप आनंद झालाय.
पण फक्त ५ वर्शच शिक्षा याचं वाईट वाटतंय.
एक अज्ञानी प्रश्न - सलमानच्या या केस मधे एक माणुस मारला गेल ना? म्हणजे हा मनुष्य वध होत नाही का? आणि गुन्हा करून फरारी, पुरावे गायब करणे, तपासात अडथळे वगैरे गोष्टी या अभिनेत्यांना वगैरे लागू होत नाहीत का?
होत असतील तर ५ वर्षे अतिच कमी शिक्षा नाही का?
दारूच्या नशेत माणसे चिरडणे हा
दारूच्या नशेत माणसे चिरडणे हा गुन्हा नाही?
चुकून असो की मुद्दामून जीव गेला ना माणसांचा? मग तो गुन्हाच होतो.
बाकी विटनेस दाबून टाकण्यासाठी केवढी तरी यंत्रणा कार्यरत होती. विटनेस रस्त्यावर आला, भिकेला लागला आणि क्षयाने मेला. यानंतरही सलमान काही गुन्हेगार नाही??????
>> नीधप +१
ती चूक नव्हती गुन्हा होता हेही मान्य होत नाहीय लोकाना .
<<<<<<<< +१
आबासाहेब कोणता मुद्दा लॉजिकल
आबासाहेब कोणता मुद्दा लॉजिकल नाही? दारूबंदीचा का?
सिस्टिमॅटिकली त्याची बीइन्ग
सिस्टिमॅटिकली त्याची बीइन्ग ह्युमन वगैरे ब्रांड डेव्हलप करून दयावान वगैरे इमेज बनवन्यात आली.
>>>>
म्हणजे एखाद्याची इमेज बघून शिक्षेत सूट देता येते हे मान्य करता आपणही एकाअर्थी ..
>>>> इमेज बघून सूट देता येते असा अर्थ आहे त्या वाक्याचा???
वाहन चालवण्याचा परवाना नसताना
वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चलवणे ही एक चूक.
वर दारु पिउन वाहन चालवणे ही घोडचूक
आणि
ते वाहन चालवून कुणास यमसदनी धाडणे हा तर मोट्ठाच गुन्हा.
त्यामुळे सलमान खान दोषी आहेच .
पुन्हा एकदा न्यायंत्रणेचे अभिनंदन.
रुन्मेश तू जरा केसचं
रुन्मेश तू जरा केसचं निकालपत्र वाचतोस का?
एक अज्ञानी प्रश्न - सलमानच्या
एक अज्ञानी प्रश्न - सलमानच्या या केस मधे एक माणुस मारला गेल ना? म्हणजे हा मनुष्य वध होत नाही का?
>>>
हो याला सदोष मनुष्यवधच म्हणतात. बहुतेक
एक्झॅक्टली !! नशेत.. वाईट खरी
एक्झॅक्टली !!
नशेत..
वाईट खरी दारू आहे..
पण ते कित्येक जण पितातच ना..
सरकारही त्यावर बंदी आणतेय का?
आहे कोणाच्यात हिंमत या बेसिक कारणाविरुद्ध आवाज उठवायची?
>>
यावर काही बोलायची माझी ताकद नाही
खरोखर लोकाना अस वाटत की सलमान ने काहीच्च केलेल नाही अन ते दारूमुळॅ झाल तर धन्य आहे
रुन्मेश तू जरा केसचं
रुन्मेश तू जरा केसचं निकालपत्र वाचतोस का?
>>>>>
एवढ्यात नको, आणखी वरच्या कोर्टात जाऊन फायनल शिक्षा होईल तेव्हा वाचेन
खरोखर लोकाना अस वाटत की सलमान
खरोखर लोकाना अस वाटत की सलमान ने काहीच्च केलेल नाही अन ते दारूमुळॅ झाल तर धन्य आहे
>>>>
असे कोण म्हणतेय,
पण जी दारू कित्येक गुन्ह्यांना, अपघातांना कारणीभूत ठरते तिला मोकळे का सोडता?
वाईट खरी दारू आहे.. पण ते
वाईट खरी दारू आहे..
पण ते कित्येक जण पितातच ना..
सरकारही त्यावर बंदी आणतेय का?
आहे कोणाच्यात हिंमत या बेसिक कारणाविरुद्ध आवाज उठवायची?>>
खरे आहे. पण सरकार बंदी आणते तरी दिवसाढवळ्या लोक दारू विकतात पितात आणि मरतात.
आपल्या देशात अजूनही दारुवर हवी ती बंदी आली नाही. आणि कित्येक लोकांचे घर दार संसार ह्या दारुमुळे मातिमोल झालेले आहेत. असंख्य लोक जिवाने गेले आहेत. तरी देखील ही दारु बंद होत नाही. कित्येक लहान मुलांचे बालपण दारुने हिरावून घेतले आहे.
नीधप, जे झाले तो गुन्हाच आहे. त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे.
सलमानला माझा सल्ला: जे झाले ते नकळत झाले. शिक्षा भोगून नव्याने जीवन सुरु कर.
रून्मेश, जाऊ दे.
रून्मेश, जाऊ दे.
एवढ्यात नको, आणखी वरच्या
एवढ्यात नको, आणखी वरच्या कोर्टात जाऊन फायनल शिक्षा होईल तेव्हा वाचेन
>>> अरे मग तेव्हाच दारूबद्दलही बोल की... कशाला आत्तापासून?
इमेज बघून सूट देता येते असा
इमेज बघून सूट देता येते असा अर्थ आहे त्या वाक्याचा???
>>
हो,
त्याने इमेज बिल्डींग शिक्षेत सूट मिळायला केली असा त्याच्यावर आरोप करणे म्हणजेच इमेज बघून सूट देता येते शिक्षेत हे मान्य करणेच ना...
काही चुकतेय का लॉजिक?
ऋन्मेष, प्रत्येक बाबतीत तारे
ऋन्मेष, प्रत्येक बाबतीत तारे तोडलेच पाहीजेत का रे बाळ?
पूनम ज्या माणसाला आपण
पूनम ज्या माणसाला आपण ज्याचा फॅक्ल काढलाय त्याचं नावही माहित नाही अशा माणसाला तु निकालपत्र वाच म्हणून सांगतेयस?
'दारु पिवून गाडी चालवणे' हाच
'दारु पिवून गाडी चालवणे' हाच मुळात गुन्हा आहे. लोक भलत्या कॉन्फिडन्सने दारु पिवून गाडी चालवतात आणि एखाद्या दुर्दैवी क्षणी कुणाच्या तरी जीवाचं बरंवाईट होतं. असं कुणी गाडी खाली येऊन गेलं तर अजून वेगळं कलम i.e. culpable homicide amounting to murder' आहेच. कुणी गाडी खाली नाही आलं म्हणजे दारु पिवून गाडी चालवल्याचा गुन्हा उघडकीस येत नाही इतकेच.
माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या
माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की
लोकहो, किमान निकालपत्र तरी
लोकहो, किमान निकालपत्र तरी वाचा आणि मग बोला.
Bollywood superstar Salman Khan has been sentenced to five years in jail after he was found guilty of killing a homeless man in a 2002 hit-and-run after a night out drinking.
Judge DW Deshpande convicted the 49-year-old of culpable homicide for crashing his SUV while drunk into a group of homeless men sleeping on the pavement and then fleeing the scene. ('All Charges Against You Proved,' Says Judge to Salman Khan
"You were driving the car, without a licence and you were under the influence of alcohol," the judge told the Bollywood star who was present in the court.
सलमान दोषी होताच. चूक त्याची नाही दारूची होती हे विधानही कोणी करू शकतं यावर माझा विश्वास बसला नसता. पण मायबोलीवर तर वाचायलाच मिळालं. धन्य हो!
Pages