आपल्या जीवनावर पुस्तक, व्यक्तिरेखा, जवळची माणसे, घडलेल्या घटना, परिस्थिती आणि अनुभव खुप खोल वर प्रभाव टाकतात. लहानपणी महाभारता वर गोष्टी ऐकल्या होत्या. मला कर्णाचे प्रण, प्रतिज्ञा, जीवन, अगतिकता, झुंजार योद्धे पण, त्याचा पदोपदी झालेला अपमान आणि त्यामधून त्यांनी काढलेला मार्ग.त्यातून कर्णा बद्दल खुपच उत्सुकता वाढली. कथेतील ऐतिहासिक व्यक्ति, पुस्तकातील व्यक्तिरेखा, किवां एखादे पुस्तक वाचल्या नंतर त्यांचा आपल्या मनावर खुप खोलवर परिणाम होतो. नकळत तुम्ही त्या व्यक्तिच्या विचाराशी जोडले जाता किंवा त्याच्या विचाराचा अनुभव घ्यावासा वाटतो.
मग मी कर्णा वरचे भरपूर वाचन केले. प्रत्येक लेखकाने त्यांच्या परीने कर्णावर लिहिले आहे. सगळी कडे कर्ण कमी - जास्त प्रमाणात चांगला दाखवला आहे. कर्ण दानशूर, दान वीर होता हे सगळ्या पुस्तकात आहे. पण 'मृत्युंजय' वाचल्या नंतर कर्णाच दृष्टिकोन कळला. काय रंगवलंय कर्णाला लेखकाने. 'मृत्युंजय' शिवाजी सावंत यांची सर्वोच्च कलाकृती आहे. मला आधी मराठी पेक्ष्या दुसर्या भाषेत प्रगल्भ शब्द योजना आहे असे वाटायचे. पण 'मृत्युंजय' वाचून माझा समज खोटा ठरला. काय अप्रतिम शब्द रचना आहे 'मृत्युंजय' मध्ये. एक-एक शब्द पारड्यात तोलून निवडला आहे. एखाद्या कलाकाराची सर्वोच्च कलाकृती वाचून आपण त्या शब्द रुपी पावसात मनसोक्त भिजुन जातो. 'मृत्युंजय' वाचुन मी खुपच प्रभावित झालो. भीष्म आणि कर्ण ने खुप प्रतिज्ञा केल्या. मला वाटते की त्यांची प्रतिज्ञा आणि जीवन भर त्यांनी पाळलेला शब्द हेच त्यांचा जीवनाचे मर्म, असामान्य कर्तृत्व आणि मोठेपण आहे.
मला असे वाटायचे की प्रतिज्ञा निभावणे खुप सोपे असते. त्यामधे विशेष काही नसते असे समजत होतो. माझ्या कडे एक टू-व्हीलर आहे. मग मी सुध्दा एक प्रण केला. एक महिना मी गाडीवरून जाताना जो मागेल त्याला टू-व्हीलर वर लिफ्ट देईल असा प्रण केला. हा प्रण एक महिना निभावणे मला कठीण गेले. माणूस पहिल्यांदा स्वत:च्या सुरक्षेचा विचार करतो. मी कधीही अनोळखी व्यक्तिला निर्जन रस्त्यावर लिफ्ट दिली नाही. मळके कपडे घातलेला मनुष्य दिसला आणि त्याने लिफ्ट मागीतली तर त्यामुळे माझे कपडे खराब होतील म्हणून मी त्यांना लिफ्ट दिली नाही. ओळखीच्या लोकांना लिफ्ट दिल्यावर मना मधे कुठे तरी नकळत अपेक्षा होती की ते कधीतरी आपल्या गरजेच्या वेळी लिफ्ट देतील. फक्त शाळेत जाणारी मुले यांना निरपेक्ष वृत्तीने लिफ्ट दिली. प्रतिज्ञा, प्रण घेणे खुप सोपे आहे पण ती प्रत्येक प्रसंगी निरपेक्ष वृत्तीने निभावणे, टिकवणे खुपच कठीण, अवघड काम आहे. त्यामुळे कर्णाला असामान्य व्यक्तिरेखेला माझा मनापासून दंडवत प्रणाम.
कर्णाला तर राज्य वगैरे सर्व
कर्णाला तर राज्य वगैरे सर्व काही मिळाले तरी त्याला काहीच मिळाले नाही असे बोलले जाते मग "एकलव्य" याला तर काहीच मिळाले नाही अंगी सर्व गुण सर्वसंपन्न असुन देखील राज्य तर सोडाच त्याची तिरंदाजी देखील काढुन घेण्यात आली. माझ्यामते कर्णापेक्षा कित्येक पटीने जास्त अन्याय एकलव्यावर झालेला आहे. त्या तुलनेने कर्णावर कोणताही अन्याय झाला नाही
या बीबीवर फक्त आणि फक्त कर्ण
या बीबीवर फक्त आणि फक्त कर्ण आणि महाभारता बद्दलच वाचायला आवडेल.
हजारो ख्वाईशे ऐसी, (तुझं छोटं नाव सांग बाई) रामायणाबद्दल नक्कीच बोलूयात पण नंतर केंव्हा तरी
इवान, >> हज्जारो वर्षांपासुन
इवान,
>> हज्जारो वर्षांपासुन लाखो करोडो लोकांना निव्वळ इतर जाती जमातीतील लोक असल्यामुळे योग्य मान दिला गेला
>> नाही त्यांना प्रत्येक गोष्टींपासुन वंचित ठेवले गेले.
हे तुम्ही कशाच्या आधारे म्हणता? अस्पृश्यता हज्जारो वर्षांपासून नसून इसवी सन चौथ्या शतकापासून म्हणजे काही शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. हे आंबेडकरांचं मत आहे. शिवाय मान देणं म्हणजे काय? पेशव्यांनी पंढरपूरच्या देवळाच्या रक्षणासाठी महार नेमले होते. तेव्हा कुठे आड आली होती अस्पृश्यता? उगीच काहीतरी ठोकून द्यायचं.
आ.न.,
-गा.पै.
मी निव्वळ कर्णाच्या
मी निव्वळ कर्णाच्या सुतपुत्रावरुन बोललो आहे. तोच एकटा वंचित राहिलेला नाही आहे. त्यावर भयंकर अन्याय झाला वगैरे जे चालु आहे त्यावर भाष्य केले आहे. वंचित ठेवण्यात एकलव्यला आले आहे. त्याला अंगी गुण असुन देखील न राज्य मिळाले नाही त्याला दिग्विजय मिळवण्याची कोणी संधी दिली नाही त्याला युध्दात सेनापतीपद मिळाले गेले. मग असे कोणती सुविधा मिळाली नाही ज्यावरुन कर्णावर अन्याय झाल्याचे सांगत आहेत ?
गामा तटस्थपणे महाभारत रामायण कधीतरी वाचत जावा.
सुरू झालं इथे पण
सुरू झालं इथे पण
काही लोकाना देवान (?) केलेल
काही लोकाना देवान (?) केलेल सगळ बरोबर अन बाकीच्यानी केलेल सगळ पाप वाटत .
मग त्यात चूक काय आहे >> ते बरोबर करतात म्हणूनच ते देव असतात ना. पण आपण देवापेक्षा जास्त शहाणे आहोत असं काही लोकांना वाटत असतं
कर्ण धनुर्धर होता . पराक्रमी होता हे सत्य आहेच . पण केवळ श्रेष्ठ धनुर्धर असणं एवढा एकाच निकष माणसाच्या आयुष्यात असतो का ? दया , करुणा , न्याय , नीती , संकटात असलेल्याला मदत कारण हे नसतं का ? कर्णाने ह्याच्यापेकी काय केलं ?
क्षत्रियाच काम दुष्टांच निर्दालन करून सुष्टांना संरक्षण द्यायचं . कर्ण स्वताला क्षत्रिय म्हणून घेतो . पण क्षत्रीयासारखा कुठे वागला तो ?
वंचित ठेवण्यात एकलव्यला आले
वंचित ठेवण्यात एकलव्यला आले आहे. >>> एकलव्याने गुरुची परवानगी न घेता विद्या मिळविली (कॉपिराईट ब्रिच) म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला ती विद्या कधी वापरता येऊ नये अशी गुरुदक्षिणा मागितली. मला ह्यात काहीच गैर वाटत नाही. खोटे बोलून विद्या तशी कर्णाने पण मिळविली होती आणि म्हणून परशुरामांनी त्याला शाप दिला होता की आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या लढाईत तू विद्या विसरशील. कर्णाच्या रथाचे चाक जेव्हा धसले तेव्हा तो शाप खरा ठरला. पण हा अन्याय आहे असे मी म्हणणार नाही. खोटे बोलून चुकीच्या पद्धतीने विद्या मिळविल्याची शिक्षा दोघांना झाली. कर्णावर इतर बाबतीत प्रचंड अन्याय झाला ह्या गोष्टीशी मी सहमत आहे.
एकलव्याने गुरुची परवानगी न
एकलव्याने गुरुची परवानगी न घेता विद्या मिळविली >> साफ चुक. एकलव्य गुरुकडे विद्या मागायला गेलेला. पण द्रोणाचार्यांनी तु राजपुत्र नसल्याने तुला मला शिकवता येणार नाही असे सांगितले त्यानंतर एकलव्य ने स्वत विद्या शिकला होता. आणि ती विद्या द्रोणाचार्यांची शिकवण लपुन छपुन बघत शिकलेला नव्हता. फक्त त्याने एक गुरु असावा या भावनेमुळे द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला होता. बाकी विद्या जो शिकलेला ती अर्जुनापेक्षा ही श्रेष्ठ आणि वेगळी होती. त्यामुळे द्रोणांनी जी विद्या त्यांची नव्हतीच त्याची गुरुदक्षिणा घेतली. जे खरतर चुकिचेच होते. तरी देखील एकलव्यांने आपला अंगठा कापुन दिला.
एकलव्य गुरुकडे विद्या मागायला
एकलव्य गुरुकडे विद्या मागायला गेलेला.
>>
हेच कर्णाबाबत पण झालेलं की
हेच कर्णाबाबत पण झालेलं की>>
हेच कर्णाबाबत पण झालेलं की>> परत चुक. कर्णाने तो ब्राह्मण असल्याचे परशुरामाला खोटे सांगितले. शिक्षा घेई पर्यंत. जेव्हा त्याच्या सहनशक्तीची परिक्षा घेतली जाते तेव्हा कर्ण कबुल करतो की तो ब्राह्मण नाही म्हणुन त्याला शाप मिळतो.
एकलव्याने असे खोटे बोलुन कोणतीही शिक्षा प्राप्त केली नाही
इवान १००% सहमत. द्रोणाने न
इवान
१००% सहमत. द्रोणाने न दिलेल्या विद्येची गुरुदक्षिणा मागितली. यात चोर कोण?
महाभारताकडे तटस्थपणे पाहावे.
महाभारताकडे तटस्थपणे पाहावे. तसे बघायला गेले तर दुर्योधन चांगलेच कॅरेक्टर उभे केले आहे. त्याला तो जे काही करतोय त्यात कधीच पश्च्याताप चुकीचे वाटत नाही. कधी ही तो कुणाकडे याचना करताना दिसत नाही. या कधीही त्यावर लागलेल्या आरोपाचे स्पष्टीकरण देताना दुसर्यावर जवाबदारी ढकलुन देत नाही. एक द्रौपदी वस्त्रहरण सोडता महाभारतात दुर्योधन या दुशासन यांनी स्त्रीयांबाबतीत कुठेही मर्यादा ओलांडलेली आढळली नाही. ना ही अत्यंत क्रुर उलट्या काळजाचे राजपुत्र अशी देखील जनतेसमोर त्यांची प्रतिमा आहे असे आढळले नाही. तरी देखील त्यांची शेड्स ही निगेटिव्ह दाखवली आहे. आजकालच्या कथेत या चित्रपटात खलनायकाची अशी एकाबाजुला उन्नत कामगिरी आणि दुसर्याबाजुला अत्याचारी असे दाखवत नाही. दोन्ही दाखवले तर रॉबिनहुड म्हणतात
दुर्योधन निगेटिव्ह का तर त्याने राखलेले कौटुंबिक संबंध . इतकेच बाकी अजुन कुठे त्याचे अत्याचारी रुप दिसुन आले नाही.
पण निव्वळ यावरुन त्याला दोष देणे चुकिचे आणि त्याच्या समर्थनात उतरने देखील चुकिचे
इवान >>+१ एकलव्य ने स्वत
इवान >>+१
एकलव्य ने स्वत विद्या आत्मसात केली होती. चोरली नव्हती. गुरु द्रोणाचार्य नी अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्यासाठी एकलव्य कडून अंगठा मागुन घेतला.
कर्णाने तो ब्राह्मण असल्याचे
कर्णाने तो ब्राह्मण असल्याचे परशुरामाला खोटे सांगितले. आणि विद्या घेत असतानाही तो शिकार करायला गेला . त्यानं मारलेला बाण एका गाईच्या कपाळात घुसला आणि रुतून बसला . तडफडून तिने प्राण सोडला . तेव्हा त्या गुराख्याने त्याला शाप दिला कि तुझा रथहि ऐन वेळेला भूमीत रुतून बसेल आणि असाच तडफडून मरशील .
पेशव्यांनी पंढरपूरच्या देवळाच्या रक्षणासाठी महार नेमले होते.>>
रक्षणासाठी नेमले होते . पूजेसाठी नव्हे . अस्पृश्यांना कमरेला खराटा आणि गळ्यात मडकं बांधायला लावण्याचा पराक्रम पेश्वांनीच केलाय ना . असो . अवांतर नको. विषय कर्णाचा चाललाय
एकलव्याने असे खोटे बोलुन
एकलव्याने असे खोटे बोलुन कोणतीही शिक्षा प्राप्त केली नाही >>> बरोबर आहे तुमचे. माझा थोडा गोंधळ उडाला होता!! अर्थात असे असेल तर एकलव्यावर सुद्धा अन्याय झालाच आहे. पण म्हणून कर्णावर झालेले अन्याय कमी होत नाहीत!!
एक द्रौपदी वस्त्रहरण सोडता महाभारतात दुर्योधन या दुशासन यांनी स्त्रीयांबाबतीत कुठेही मर्यादा ओलांडलेली आढळली नाही.>>> द्रौपदी वस्त्रहरण एवढी शुल्लक बाब आहे का? जर इंद्रप्रस्थाच्या महाराणीवर ही वेळ येऊ शकते तर इतर सामान्य स्त्रियांचे संरक्षण होईल ह्याची हमी काय??
द्रौपदी वस्त्रहरण एवढी शुल्लक
द्रौपदी वस्त्रहरण एवढी शुल्लक बाब आहे का? जर इंद्रप्रस्थाच्या महाराणीवर ही वेळ येऊ शकते तर इतर सामान्य स्त्रियांचे संरक्षण होईल ह्याची हमी काय?? >>>
माते मी काय लिहिले ते काळजीपुर्वक वाचावे. आपला कृतज्ञ राहिल. माझ्या कोणत्याही ओळीत द्रौपदी वस्त्रहरण ही शुल्लक बाब आहे असे कोणत्याही ओळी वरुन सुचित होत नाही. आणि मी ते केले ही नाही. त्या घटने आधी अथवा नंतर कोणतीही अशी घटना दुर्योधन अथवा इतर कौरवांकडुन कुणाबरोबर ही घडली नाही. हे ही लक्षात घ्यावे ती घटना एकमेव होती.
दुसर्या ओळीवर <<<<<<<<<"दुर्योधन निगेटिव्ह का तर त्याने राखलेले कौटुंबिक संबंध .>>>>> हे लिहिलेले आपण वाचले का? मी त्याचे कोणत्याही प्रकारचे समर्थन अथवा विरोध करत नाही. दुर्योधन हा फक्त कौटुंबिक संबंधातुनच त्याप्रकारचे कॅरेक्टर बनले होते. राज्यकर्ता अथवा अन्य कोणत्याही भुमिकेतुन त्याचे ते कॅरेक्टर बनले नाही. इतकेच सांगण्याचा उद्देश होता.
इवान, माझ्यामते वरती एका
इवान, माझ्यामते वरती एका प्रतिसादात हे वाक्य आलं आहे की महाभारतातील सगळी पात्रे ग्रे शेड मधे आहे. कोणीही एकदम चांगले नाही आणि कोणीही एकदम वाईट नाही
ग्रे शब्द चुकिचा आहे.
ग्रे शब्द चुकिचा आहे. परिस्थितीनुसार बदलत जाणारे मानवाचे अंतरंग कसे असतात त्याचा आढावा घेण्याचे काम महाभारताने केला आहे. ते ही अत्यंत गुंतागुंत पध्दतीने . सग़ळे कॅरेक्टर अश्या रंगात रंगवले आहे की एका ठिकाणी उभे असणार्या कर्णाला वाटत आहे तो स्वतः पांढर्या रंगात उभा आहे आणि अर्जुन काळ्या रंगाच्या ठिकाणी उभा आहे आणि त्याच वेळेस अर्जुनाला देखील वाटत आहे तोच पांढर्या रंगात उभा आहे आणि कर्ण काळ्या रंगात. दोघांनी जागा बदलली तरी तीच परिस्थिती दोघांना वाटते खरतर कोणीच कोणत्याच रंगात उभे नाही प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार बरोबरच्या रंगातच उभा आहे.
पण इथे आपण त्यांना कोणत्या
पण इथे आपण त्यांना कोणत्या रंगत पहातो ती चर्चा चालू आहे.
मला कर्ण कधीच खटकला नाही त्याच वेळेला अर्जुन कधीच आवडला नाही.
हे माझं मत झालं .
मला कर्ण का आवडला हे सांगतान मी कर्ण कसा बरोबर ते सांगणार
आणि अर्जुन का आवडला नाही हे सांगताना अर्जुन कसा चुकीचा ते सांगणार.
यात एकलव्य का बरोबर नाही मग हा प्रश्न चुकीचा नाही का?
कारण मी एकलव्याला चांगलं किंवा वाईट म्हणतच नाहीये.
(हेच दुसर्या बाजुने पण)
(मी म्हणजे चर्चा करणारे सगळेच (काही सन्माननिय अपवाद वगळता)
यात एकलव्य का बरोबर नाही मग
यात एकलव्य का बरोबर नाही मग हा प्रश्न चुकीचा नाही का? >> +१ चर्चा कर्ण ह्या पात्रावर चालू आहे.
जेव्हा अन्यायची गोष्ट येते
जेव्हा अन्यायची गोष्ट येते आणि संपुर्ण महाभारतात बिचार्या कर्णावरच अन्याय झाला असे सांगितले जाते तेव्हा एकलव्य आणि इतर गोष्टी आपसुकच येतात
जेव्हा अन्यायची गोष्ट येते
जेव्हा अन्यायची गोष्ट येते आणि संपुर्ण महाभारतात बिचार्या कर्णावरच अन्याय झाला असे सांगितले जाते तेव्हा एकलव्य आणि इतर गोष्टी आपसुकच येतात
>>>
बहुदा संपुर्ण महाभारतात बिचार्या कर्णावर अन्यायच झाला असे सांगितले जातेय सगळ्याच चर्चेमधे. फार तर फार कर्ण आणि पांडवांमधे अर्जुनावर (किंवा पांडवांवर ) अन्याय झाला नसून कर्णावरच झालाय असं म्हणलं जात असेल.
त्यास कारणीभुत महाभारत नाही
त्यास कारणीभुत महाभारत नाही तर कादंबर्या आहेत. दुर्योधनावरील कादंबरीत देखील त्यावरच अन्याय झालेले दर्शवले आहे.
एक द्रौपदी वस्त्रहरण सोडता
एक द्रौपदी वस्त्रहरण सोडता महाभारतात दुर्योधन या दुशासन यांनी स्त्रीयांबाबतीत कुठेही मर्यादा ओलांडलेली आढळली नाही.
बर मग ?त्याने दिसेल त्या प्रत्येक स्त्री सोबत असं केलं असतं तरच तो चुकीचा ठरतो असं म्हणायचय कि काय ? गुन्हा एकदा केला तरी तो गुन्हाच ठरतो ना . महाराज द्रोपदी त्याची भावजय होती . भाभी ला आई वगेरे मानण्याची प्रथा होती त्या काळी .
गुन्हा एकदा केला तरी तो
गुन्हा एकदा केला तरी तो गुन्हाच ठरतो ना . > हो तो गुन्हाच आहे. आणि त्याची योग्य शिक्षा त्याला मिळालीच आहे.
महाभारतात कर्णा बरोबर एकलव्य,
महाभारतात कर्णा बरोबर एकलव्य, अंबा या व्यक्तीरेखे वर अन्याय झाला आहे.
तसे बघायला गेले तर दुर्योधन
तसे बघायला गेले तर दुर्योधन चांगलेच कॅरेक्टर उभे केले आहे. त्याला तो जे काही करतोय त्यात कधीच पश्च्याताप चुकीचे वाटत नाही. कधी ही तो कुणाकडे याचना करताना दिसत नाही. या कधीही त्यावर लागलेल्या आरोपाचे स्पष्टीकरण देताना दुसर्यावर जवाबदारी ढकलुन देत नाही>>>
गुन्हेगारांना आपण चुकीचं करतोय असं वाटत असतं तर गुन्हे घडलेच नसते .अतिरेकी संघटना गोळीबार करतात , बॉम्बस्फोट करतात आणि त्यांची जबाबदारी स्वीकारतात,त्यांना त्यात चुकीचं वाटत नाही . ते पुढच्या गुन्ह्याच्या तयारीला लागतात मग त्याचं कॅरेक्टर चांगलं होतं का ?.
नालायक लोकांच्या टोळक्या समोर जेव्हा वस्त्र फेडली जातात तेव्हा त्या स्त्री ला काय वाटतं हे ज्याला कळतं तो दुर्योधन , दुशास्नाच्या character ला चांगलं म्हणेल का ? कल्पना करा आपल्या घरातल्या एखाद्या स्त्री सोबत असं घडलं तर ते करणार्याच्या कॅरेक्टर ला चांगलं म्हणाल काय ? कौरवांना , कर्णाला , धृतराष्ट्र , भीष्म ह्या सगळ्यांना त्यांनी ज्या चुका केल्यात त्या सगळ्या गुन्ह्यांसाठी माफ करता आलं असतं . त्यांना सुधारण्याच्या संधी अनेक वेळा दिल्या हि होत्या . पण द्रोपदी सोबत केलेल्या ह्या नीच प्रकारामुळे त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या . तेव्हा त्यांना शिक्षा मिळण योग्यच आहे
बहुधा घोषयात्रेच्या वेळी
बहुधा घोषयात्रेच्या वेळी दुर्योधन किंवा दु:शासन ह्यांपैकी एकाने कर्णाला द्रौपदी त्यांची दासी असल्यामूळे तिला उचलून घेऊन जाउया असे सुचवले होते ना ?
महाभारतात कर्णा बरोबर एकलव्य,
महाभारतात कर्णा बरोबर एकलव्य, अंबा या व्यक्तीरेखे वर अन्याय झाला आहे.>>>
अंबिका आणि अम्बालीकेवर पण
नालायक लोकांच्या टोळक्या समोर
नालायक लोकांच्या टोळक्या समोर जेव्हा वस्त्र फेडली जातात तेव्हा त्या स्त्री ला काय वाटतं हे ज्याला कळतं तो दुर्योधन , दुशास्नाच्या character ला चांगलं म्हणेल का ?
मला कुठेही ही कृती जस्टीफाय करायची नाही पण असे वाटते की दुर्योधनाला द्रौपदीबाबत कसलीही अभिलाषा नव्हती. केवळ तिने कुत्सितपणे हसल्याचा सूड आणि लहानपणापासून पांडवांबाबत बाळगलेली वैरभावना याच्या प्रभावाखाली त्यांना लज्जित करण्यासाठी त्याने केले. अर्थात कुठल्याही उद्देशाने केले तरी कुणालाही अगदी दासीलाही सर्वांसमक्ष असे करणे हा गुन्हाच मानायला हवा.
फक्त वर कुणी म्हणले आहे तसा दुर्यौधन हा काय आत्ताच्या राजकाऱण्यासारखा वासनेने पछाडलेला, उठसूठ अत्याचार करणारा अन्यायी क्रुर नव्हता.
Pages