व्यभिचार म्हणजे नक्की काय यावर इथे यन्न नंबर ऑफ टाईम्स चर्चा झाली असावी. पण तरीही बालमनाला पडलेले प्रश्न आजही कायम आहेत.
तीच ती आपल्या राजाराणीची कथा. जी कित्येक आयांनी आपल्या मुलांना मम्मम भरवताना सांगितली असावी.
आटपाट नगराचा एक राजा होता.
राजाला दोन राण्या होत्या.
एक आवडती, तर एक नावडती!
किमान दोन राण्या असल्याशिवाय राजाचे राजापण कसे सिद्ध होणार नाही!
कधी दोनाच्या जागी अनेक राण्या असायच्या, पण त्यातही एक पट्टराणी असायचीच.
तर ती पट्टराणी सर्वात आवडती का असायची हे बरेचदा कथेत सांगितलेले नसायचे.
पण जी सर्वात सुंदर असणार तीच पट्टराणी हे बालमनालाही समजू यायचे.
याउलट एका राणीचे दोन राजे होते अशी कथा मात्र कधी ऐकल्याचे आठवत नाही.
पण ते एक असो!
आपण सोयीसाठी एक राजा आणि त्याची आवडती, नावडती अश्या दोन राण्यांचीच कथा घेऊ.
तर, या राजाराणीच्या "त्रिकोणी" कुटुंबाची कथा लहानपणी आनंद देऊन गेली खरी,
तरी वयात येता येता काही प्रश्न मनात सोडून गेली.
जिथे आज एकापेक्षा अनेक जोडीदारांबरोबर एकाच वेळी संबंध ठेवणे हा व्यभिचार समजला जातो,
तिथे या राजा-राण्यांच्या कथेत व्यभिचारी कोण?
० राजा -- जो आपल्या राजा असण्याचा गैरफायदा उचलत एकाच वेळी दोन दोन राण्यांशी संबध ठेवतो.
० आवडती राणी -- जी आपल्या सौंदर्याच्या जिवावर नावडतीचा हक्क मारते.
० नावडती राणी -- जी राजाला आपण आवडत नाही हे माहीत असूनही त्याच्याशी संबंध जोडून राहते.
० आपण सारे -- जे एक राजा आणि दोन राण्यांच्या कथा अगदी लहान वयातच बालमनावर बिंबवतो.
स्त्री-पुरुष नात्यातील व्यभिचाराचा अर्थ कोणी ईथे उलगडून सांगेल का ...
की काही प्रश्न अनुत्तरीतच राहिलेले चांगले जे वेळ पडल्यास त्यांची उत्तरे आपल्या सोयीने शोधता येतात..
......!
आता ऋन्मेष आपल्या
आता ऋन्मेष आपल्या सगळ्यान्च्या पोस्टीला उत्तर देईल आणी शतकी मजल मारेल.:खोखो::हहगलो:
गंभीर विषयाचा धागा असा
गंभीर विषयाचा धागा असा राजाराणीच्या कथेचा संदर्भ देऊन काढण्याची संकल्पना काही आवडली नाही.
>>>>>>>>>>
हे आपले विधान व्यभिचार हा विषय गंभीर आहे या गृहीतकावर आधारला आहे.
जर मी किंवा आपण ते तसे नाहीये हे सिद्ध केले तर हा प्रश्नच राहणार नाही.
....
राजाराणीच्या कथेचा उल्लेख करून तुम्ही विचारलेले चार प्रश्न, हे तुमच्या दृष्टीने खरे प्रश्न आहेत की ................
>>>>>>>>>>>
नक्कीच व्यभिचार म्हणजे काय हाच प्रश्न आहे. लोकांकडून त्यांची व्यभिचाराची व्याख्या जाणून घ्यायचाच हेतू.
.....
तुम्ही हा धागा असा काही कन्स्ट्रक्ट केला आहेत की:
१. त्यावर गंभीरपणे काही म्हणावे असे बहुतेकांना वाटणार नाही
>>>>>>>>>>
कदाचित बहुतेकांची व्याख्या राजाराणीच्या कथेत नक्की व्यभिचारी कोण इथे येऊन थांबली असावी. त्यांच्या व्याख्येनुसार या कथेतील कोणाला व्यभिचारी त्यांना ठरवायचे नसेल. लहान मुलांना सांगितले जाणार्या कथेचे पावित्र्य नष्ट तर नाही ना होणार या भितीने गंभीरपणे काही बोलायचे टाळले असावे.
आणि
२. कोणीही काहीही म्हणाले तरी त्यावर प्रत्युत्तर द्यायला तुमच्याकडे एक कोणतेतरी मत असेलच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>>>>
यावर असेही म्हणू शकतो की व्यभिचाराची ठाम अशी एकही व्याख्या बनू शकत नाही हे आपणही मान्य केलेत
एवढे करूनही काही नवीन मिळाले असते तर आवडले असते, पण सत्तर एक प्रतिसाद झाले, अजून काही खास नवीन वाचायला मिळाले नाही.
>>>>>>>
येईल.
किती वेळ लोक स्वत:लाच फसवत प्रश्नाला बगल देत पळत राहणार.
अगदी नाही आले तरी मनोमन हे कबूल करतीलच की व्यभिचार या शब्दाचे (ज्या अर्थाने घेतो त्याचे) आपण स्तोम माजवलेय.
माझा प्रतिसाद.. मग काय ठरलं
माझा प्रतिसाद..
मग काय ठरलं शेवटी ?.... असा होता !
अजूनही तोच आहे !!!
>>>>>>
व्यभिचार म्हणजे काय याची उकल होत या प्रश्नाचा शेवट झाला तर मलाही आवडेलच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला स्वत:लाही हिच उत्सुकता आहे की काय ठरेल शेवटी.
तुर्तास शुभरात्री
हाच निकष लावायचा तर मग दशरथ,
हाच निकष लावायचा तर मग दशरथ, पांडव, अगदी कृष्णसुद्धा व्यभिचारी ठरेल>>>
काहीही कारण नसताना एका पेक्षा जास्त लग्न करणारा / करणारी व्याभिचारीच असते .
राजे लोक पैशाच्या जोरावर आणि राजा असण्याचा गैरफायदा उचलत अनेक स्त्रियांशी लग्न करत असे . तर स्त्रिया पैशाच्या , पुढच्या security च्या आशेने
राजाच्या अनेक बायका असणं स्वीकारत असतील .
काही कारणासाठी स्त्री ने किवा पुरुषाने एका पेक्षा जास्त लग्न केली तर कदाचित व्यभिचार मानत नसतील . उदा . दशरथ , कृष्ण , द्रौपदी , तारा , मंदोदरी .
अनेक आदिवासी जमातीमध्ये , नेपाळ मध्ये घरातल्या मोठ्या मुलाशी लग्न झालं कि by default त्याचे सगळेच भाऊ तिचे नवरे होतात .
सई ताम्हनकरने (त्या
सई ताम्हनकरने (त्या बातमीनुसार) कोथरुडातल्या सोसायटीत हे केले त्याला काय म्हणायचे?
अप्प्या फालतूपणा नको करु हा.
अप्प्या फालतूपणा नको करु हा. सई इज सई. तिने कहीही केले तरी ती पूजा असते. क्ळ्ळं ?
क्ळ्ळं
क्ळ्ळं![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
९८
९८
९९
९९
१००
१००
काय धप्पापार्टी चालुय का?
काय धप्पापार्टी चालुय का?:फिदी:
हो गं! सईला देऊन झाली आता
हो गं!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
सईला देऊन झाली आता इथे!
अप्पाकाका पण ना!!!!!
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अजुन एक शतक पुर्ण.
अजुन एक शतक पुर्ण. अभिनंदन!!!!!!!!!
नरेश, मग, धक्का मी दिलाय.
नरेश, मग, धक्का मी दिलाय. होणारच पूर्ण शतक![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
निधी
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
काहीही कारण नसताना एका पेक्षा
काहीही कारण नसताना एका पेक्षा जास्त लग्न करणारा / करणारी व्याभिचारीच असते .
राजे लोक पैशाच्या जोरावर आणि राजा असण्याचा गैरफायदा उचलत अनेक स्त्रियांशी लग्न करत असे . तर स्त्रिया पैशाच्या , पुढच्या security च्या आशेने
>>>>
हो!
राजे देखील दोन प्रकारचे असतात.
आवडते. नावडते.
जे आवडते असतात त्यांनी एकापेक्षा जास्त राण्या स्वयंवरात जिंकलेल्या असतात किंवा एखाद्या राजाने त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांना आपले अर्धे राज्य आणि राजकन्या दिलेली असते वगैरे वगैरे.
जे नावडते असतात ते ऐय्याश असतात, त्यांनी मुली जबरदस्ती पळवून आणल्या असतात.
त्यामुळे कारण हे महत्वाचे आहेच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरं, मग
बरं, मग
मग काही नाही, तो शाहरुख,
मग काही नाही, तो शाहरुख, सलमान, अमिर, अक्षय आणी गुलशन ग्रोव्हर, शक्ती कपूर, रणजीत यान्च्यामधला फरक समजावुन सान्गतोय आपल्याला. कथेचे सार आत्ता लक्षात आले माझ्या.
रश्मी >>
रश्मी >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
ही कुठली नवीन गोष्ट? एका
ही कुठली नवीन गोष्ट? एका राणीला दोन राजे असतात. एक आवडता एक नावडता...
चला, चला, दुसरा धागा विणायची वेळ झाली!
*एक धागा गरजेचा, बाकी धागे ऋन्मेषचे
मला त्या सगळ्या राजाराणीच्या
मला त्या सगळ्या राजाराणीच्या गोष्टी परत वाचायच्या आहेत. शेप्रेट शेप्रेट धाग्यात येऊ द्या.
जेव्हा कधी ऐकल्या असतील त्यावेळी हा अँगल कळला नव्हता.. आता एवढे पावसाळे बघितल्यावर जरा वेगळ्या चष्म्यातून बघीन म्हणतो.
३ देवदास नंतर देव डी बघताना कसं वाटलं, तसंच वाटेल कदाचित.
व्यभिचार करायचा की स्वैराचार
व्यभिचार करायचा की स्वैराचार ती त्या राजा राणीची चॉइस आहे ना, तुम्ही कश्याला नाराज होत आहात. एकीकडे दिपीकाचा माय चॉइस विडिओ तिने 'आउट ऑफ वेडलॉक काही केले तरी तिची चॉइस' म्हणत ऊधो ऊधो करायचा आणि दुसरीकडे राजाने केले तर त्याला धोपटायचे, अजब दुतोंडी मानसिकता आहे.
ह्यांना प्रश्न बिश्न काही नाही पडलेले, फक्त असले विषय चघळायला आवडतात.
त्या मिलिट्रीच्या धाग्यावर नुसते 'तिचा स्पर्श' म्हंटले तर ह्यांना भलतेच आठवले, डोक्यात कायम तेच असल्यावर जग तसेच दिसणार ना.
आधी सई ताह्मणकर सारखं
आधी सई ताह्मणकर सारखं कुणीतरी बनून दाखवा, मग तिच्या वर टीका करा.
एकीकडे दिपीकाचा माय चॉइस
एकीकडे दिपीकाचा माय चॉइस विडिओ तिने 'आउट ऑफ वेडलॉक काही केले तरी तिची चॉइस' म्हणत ऊधो ऊधो करायचा आणि दुसरीकडे राजाने केले तर त्याला धोपटायचे, अजब दुतोंडी मानसिकता आहे.
>>>>>>>>>>
एक्झॅक्टली हुप्पाहुय्या एक्झॅक्टली...
तुम्ही धाग्याचे सार काढलेत..
दिपिकाच्या चॉईसला व्यभिचाराचे समर्थन म्हणणारे आता राजाच्या व्यभिचाराला त्याची चॉईस म्हणत आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages