व्यभिचार .. राजाराणीच्या कथेतील !

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 April, 2015 - 13:03

व्यभिचार म्हणजे नक्की काय यावर इथे यन्न नंबर ऑफ टाईम्स चर्चा झाली असावी. पण तरीही बालमनाला पडलेले प्रश्न आजही कायम आहेत.

तीच ती आपल्या राजाराणीची कथा. जी कित्येक आयांनी आपल्या मुलांना मम्मम भरवताना सांगितली असावी.

आटपाट नगराचा एक राजा होता.

राजाला दोन राण्या होत्या.

एक आवडती, तर एक नावडती!

किमान दोन राण्या असल्याशिवाय राजाचे राजापण कसे सिद्ध होणार नाही!

कधी दोनाच्या जागी अनेक राण्या असायच्या, पण त्यातही एक पट्टराणी असायचीच.

तर ती पट्टराणी सर्वात आवडती का असायची हे बरेचदा कथेत सांगितलेले नसायचे.

पण जी सर्वात सुंदर असणार तीच पट्टराणी हे बालमनालाही समजू यायचे.

याउलट एका राणीचे दोन राजे होते अशी कथा मात्र कधी ऐकल्याचे आठवत नाही.

पण ते एक असो!

आपण सोयीसाठी एक राजा आणि त्याची आवडती, नावडती अश्या दोन राण्यांचीच कथा घेऊ.

तर, या राजाराणीच्या "त्रिकोणी" कुटुंबाची कथा लहानपणी आनंद देऊन गेली खरी,

तरी वयात येता येता काही प्रश्न मनात सोडून गेली.

जिथे आज एकापेक्षा अनेक जोडीदारांबरोबर एकाच वेळी संबंध ठेवणे हा व्यभिचार समजला जातो,

तिथे या राजा-राण्यांच्या कथेत व्यभिचारी कोण?

० राजा -- जो आपल्या राजा असण्याचा गैरफायदा उचलत एकाच वेळी दोन दोन राण्यांशी संबध ठेवतो.
० आवडती राणी -- जी आपल्या सौंदर्याच्या जिवावर नावडतीचा हक्क मारते.
० नावडती राणी -- जी राजाला आपण आवडत नाही हे माहीत असूनही त्याच्याशी संबंध जोडून राहते.
० आपण सारे -- जे एक राजा आणि दोन राण्यांच्या कथा अगदी लहान वयातच बालमनावर बिंबवतो.

स्त्री-पुरुष नात्यातील व्यभिचाराचा अर्थ कोणी ईथे उलगडून सांगेल का ...
की काही प्रश्न अनुत्तरीतच राहिलेले चांगले जे वेळ पडल्यास त्यांची उत्तरे आपल्या सोयीने शोधता येतात..

......!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे आवरा याला. काही लोक स्वत:च्या:बाल बुद्धीचे प्रदर्शन का भरवत असतात कळत नाही.

आजच्या आणि पुर्वीच्या समाजात व्यभिचारी त्यांना म्हणत जे विवाहबाह्य संबंध ठेवत. उदा: जो पुरूष आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर स्त्रीयांसोबत शारिरीक संबंध ठेवतो यात वेश्यागमन सुध्दा समाविष्ट आहे. त्या पुरूषाला व्यभिचारी पुरूष म्हणतात.

>>>>>>

एका पत्नीनंतर दुसरे लग्न करताना पहिल्या पत्नीची लेखी परवानगी घ्यावी लागायची असा कायदा होता का?

नसल्यास त्या परिस्थितीत पहिल्या पत्नीच्या मनाविरुद्ध दुसरे लग्न झाले असल्यास तो व्यभिचार नाही का?

मला सांगा किती स्त्रिया स्वखुशीने आपला नवरा दुसर्‍याबरोबर शेअर करायला तयार होत असतील?

महाराज अस्वस्थपणे येरझा-या घालत होते. राणी वीरझारा बघत होत्या.

"कोण आहे रे तिकडे ?"
"आज्ञा महाराज ! "
" प्रधानजी ! कितीदा सांगितलं, सर म्हणत चला. हे महाराज बिहाराज आउटडेटड झालंय, शिवाय टीव्हीवरच्या साधूबाबांमुळे फारच चीप वाटतं ते "
" ओह, सॉरी महाराज ! "
" अरेच्चा, पुन्हा तेच "
" सॉरी सॉरी... आता लक्षात ठेवून सर महाराज "
" तुम्ही नाहीच सुधारणार , बरं ते जाऊ द्या. तुम्ही या वेळेला कसे ? आणि दरबारी कुठे गेलेत ?"
" महाराज कुणीच नसतं हल्ली, म्हणून मला थांबावं लागतं. कधी माझ्या राणीचा हुकूम येईल.. सांगता येत नाही "
" का य बडबडताय प्रधानजी ? राणी तुमची की माझी ?"
" माफ करा सरमहाराज, अहो राणीसरकार प्रजेसाठी, मी पण प्रजाच नाही का ? तुमच्या त्या राणी कशा असतील ? तुमच्या तर त्या धर्मपत्नी आहेत ना !"
" अस्सं ! चंगू मंगू कुठे गेले ?"
" सरमहाराज ! दरबारी म्हणून तेव्हढेच तर उरलेत. ते हल्ली दिसत नाहीत. गेले कित्त्येक दिवस मी आणि राणीने त्यांचा चेहरा पाहीलेला नाही "
" प्रधानजी ! राणी सोडून बोला "
" बरं, क्षमा असावी "
" मुद्द्याचं बोला, कुठे उलथलेत दोघे ? "
" महाराज, आपण राज्याच्या खर्चाने कर्मचा-यांना फ्री नेट सुविधा दिल्यापासून हे दोघेही आपल्या माबो संस्थानात उंडारत फिरताहेत. कधी विबासं गल्ली, कधी वन नाइट स्टँड गल्ली, कधी चॉईस गल्ली, कधी मुक्त गल्ली, कधी व्यभिचार गल्ली, कधी अफेअर्स गल्ली.... आणि कधी कधी तर महाराज वाईफ स्वॅपिंग गल्ली "
" हे काय ऐकतोय , प्रधानजी ? आमच्या राज्यात हे सगळे प्रकार ? आणि ते शेवटचं काय म्हणालात ?"
" कान इकडे करा. उंगुड मुंगुड पुंगुड यडक्कम ढण्चम मण्छम ढगळम मचलम हिंगा हुप्पा हुस्शा हय्या हल्ला हल्ला... येणमाडती काणमाडती.... म्हणजे आपल्या राणी सरकार आणि उं उं "

"प्रधानजी, काय बडबडताय, तुमचं डोकं तर जागेवर आहे ना ?"
" सरमाहारज, अहो उदाहरण दिलं, तुम्हाला चटकन समजण्या साठी "

क्रमशः

Rofl

लहानपणीची गोष्ट आता कळली का? की नवा अर्थ समजला.. की कवी मनाचा जन्म झाला?

पहले नक्की करो रे बाबा.. :फिदी

धागाकर्त्याच्या वैचारिक वयाबाबत शन्का यावी असे धागे निघत आहेत , हे माबोचे दुर्दैव?

अरे बाबा जरा आजुबाजुला बघा. मुस्लिम धर्मात ४ बायका करायचि परवानगी आहे. मग तो व्यभिचार का?

जे तत्कालीन धर्म /समाजाला मान्य आहे तो व्यभिचार कसा ठरेल?

ॠन्मेष बाबा तुम्ही जास्तच फेमिनिस्ट होत आहात दिवसेंदिवस ...आधी ती दीपिका आणि आता हे .........!

हरे राम! मग पन्डित नेहेरु म्हणा की . किती वेळ मी इतिहासातले राजेच आठवत बसले.:फिदी:

नेहरु इतिहासातील नाहीत का ?

नॅहरुनी सुखही भोगले व राज्यही केले.

गांधीजीनीही संसार केला . त्याना चार मुले होती.

गांधीजींचे कट्टर विरोधक मात्र ना संसारसुख , ना वंशवृद्ध्ही .... असेहोउन मेले .... Proud

एका पत्नीनंतर दुसरे लग्न करताना पहिल्या पत्नीची लेखी परवानगी घ्यावी लागायची असा कायदा होता का?>>>> माझा जन्म राजाराणीच्या काळातील नसल्यामुळे त्यावेळच्या कायद्याबद्दल माहिती नाही.

नसल्यास त्या परिस्थितीत पहिल्या पत्नीच्या मनाविरुद्ध दुसरे लग्न झाले असल्यास तो व्यभिचार नाही का?>>>> नाही. कारण दुसरे लग्नसुध्दा समाजमान्य पध्दतीने झाले आहे आणि लग्न झाले असल्यामुळे विवाहबाह्य संबंधाचा प्रश्नच निर्माण होत नाही आहे.

मला सांगा किती स्त्रिया स्वखुशीने आपला नवरा दुसर्‍याबरोबर शेअर करायला तयार होत असतील?>>>> नक्की कन्फर्म करा तुम्हाला काय म्हणायचे आहे 'दुसर्‍याबरोबर' की 'दुसरीबरोबर'. त्या एका शब्दामुळे वेगळाच अर्थ ध्वनित होत आहे.

तेथे दुसरीबरोबर असं तुम्हाला म्हणायचे असेल तर, मला विचारण्यापेक्षा तुम्ही गर्लफ्रेंडला विचारा योग्य उत्तर मिळेल आणि ते तुम्हाला पटवून घ्यावेच लागेल.

याउप्पर, तुमच्या मनात अजुनही प्रश्न उत्पन्न होत असतील तर.....................

तुम्हाला पहिल्यांदा ही गोष्ट सांगणार्‍या व्यक्तींना यापुढील प्रश्न विचारा, आणि आमचा जीव सोडा.

त.टी. : उपरोक्त लिखाण हे तुम्हाला समजवण्याच्या नादाला लागल्यामुळे मला आलेल्या नैराश्येतून झाले असल्यामुळे. Light 1

नसल्यास त्या परिस्थितीत पहिल्या पत्नीच्या मनाविरुद्ध दुसरे लग्न झाले असल्यास तो व्यभिचार नाही का?>>>> नाही. कारण दुसरे लग्नसुध्दा समाजमान्य पध्दतीने झाले आहे आणि लग्न झाले असल्यामुळे विवाहबाह्य संबंधाचा प्रश्नच निर्माण होत नाही आहे.

>>>>>>>>

समाजमान्य !! वाह!!

म्हणजे पहिल्या पत्नीच्या मनाविरुद्ध लग्न केले तरी नो प्रॉब्लेम जर ते दुसरे लग्न समाजमान्य असेल तर..

याचा अर्थ ईतकाच होतो की आज आपण ज्याला व्यभिचार म्हणतो तो तेव्हा समाजमान्य होता. Happy

समाजमान्य !! वाह!!

म्हणजे पहिल्या पत्नीच्या मनाविरुद्ध लग्न केले तरी नो प्रॉब्लेम जर ते दुसरे लग्न समाजमान्य असेल तर..

याचा अर्थ ईतकाच होतो की आज आपण ज्याला व्यभिचार म्हणतो तो तेव्हा समाजमान्य होता. >>

याच उत्तर सातींनी पहिल्याच पानावर दिले आहे. तुमच्या लक्षात नसेल तर पुन्हा इथे देते....

<<व्यभिचार ही संकल्पनाच नैसर्गिक न असता सामाजिक आणि नैतिक असल्याने आजुबाजूच्या समाजमान्यतेनुसार ती बदलणार हे खरे आहे. >>

बराच किस पडलाय इथे, उन्हाळ्यामुळे एव्हाना वाळला पण असेल. तळुन चिवडा करावा का?:अओ:

निधी, हो, ते मान्य आहेच.
किंबहुना व्यभिचाराची आपली स्वतःची व्याख्या उराशी कवटाळून बसलेल्या लो़कांनाच हे दर्शवून द्यायचे आहे की ती आज जशी आहे तशी आधी नव्हती ना पुढेही राहणार ..

funnysmiley Hit me.gif

ॠन्मेषभाऊ तुम्हालातर मी वैचारिकदृष्ट्या खुप प्रगल्भ समजत होतो. एक खाजगी प्रश्न विचारायचा मोह मुद्दाम टाळतोय. तुम्ही लघुकथा छान लिहीता, लिहीत रहा.

प्रथमजी, आपण एकाच वेळी सर्वांना खुश नाही ठेऊ शकत...
पण वेगवेगळ्या वेळी मात्र बहुतेकांना ठेऊ शकतो..
तुम्हाला माझे काही आवडते ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे..
ते जे आवडते ते मी जपायचा प्रयत्न करेन Happy

छान प्रश्न आहे. विचार करायला लावणारा.
माझ्या मते या उदाहरणातल्या, "व्यभिचार" या शब्दामुळे थोडी गडबड उडाली आहे. माझी मते पुढीलप्रमाणे

१) राजाने जे केले तो व्यभिचार आहे का?
- नाही
२) राजाने जे केले ते योग्य केले का?
- सांगता येत नाही. या निर्णयाला अनेक कंगोरे असू शकतात. काळ, समाज, संस्कृती, गरज, ई. उदा. पहिल्या पत्नीपासून मुलगा होत नसेल तर काही राजे राज्याला वारस मिळविण्यासाठी दुसरे लग्न करीत असावेत का (??) या उदाहरणात राज्याचे व्यापक हित पाहता पहिल्या राणीच्या अहिताला दुय्यम स्थान मिळते.
३) मला सांगा किती स्त्रिया स्वखुशीने आपला नवरा दुसर्‍याबरोबर शेअर करायला तयार होत असतील?
- ज्या संस्कृतीमध्ये बहुपत्नीत्वाची प्रथा रुढ आहे, कदाचित तेथल्या स्त्रियांना याचे फारसे काही वाटत नसेल(??)

किंबहुना व्यभिचाराची आपली स्वतःची व्याख्या उराशी कवटाळून बसलेल्या लो़कांनाच हे दर्शवून द्यायचे आहे की ती आज जशी आहे तशी आधी नव्हती ना पुढेही राहणार ..>>

धागा नक्की का काढलायस?
तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी की लोकांना समजावण्यासाठी?

जर हे मान्य असेल की व्यभिचार ही संज्ञा आजुबाजुच्या समाजमान्यतेनुसार व बदलत्या काळानुसार बदलत जाणार तर मग राजा-राणीच्या कथेतील काळ व आत्ताचा काळ यांची तुलना केल्यामुळे तुला पडलेल्या प्रश्नांच्या जंजाळातून तू बाहेर पडला असावास अशी आशा आहे. Happy

क्लिओपात्राला दोन नवरे होते व ईजिप्तच्या त्याकाळच्या प्रथेनुसार तिने स्वत:च्या दोन्ही सख्ख्या भावांशी लग्न केले होते.तिला अजुन एक ग्रीक नवरा होता,अलेक्झांडर का कोनीतरी.आता ही कथा ऐकल्यानंतर तरी तुमच्या बालमनाचे समाधान झाले पाहीजे.

Pages