Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरं झालं सांगीतलस ते. २/३
बरं झालं सांगीतलस ते. २/३ गाठींच्या माळा मुंग्यांची वाट पाहात पडल्यात सध्या...
आम्ही भाजीआमटीत ढकलून
आम्ही भाजीआमटीत ढकलून द्यायचो.
मंजूडी, सध्या घरातल्या
मंजूडी, सध्या घरातल्या स्वैपाकात साखर/गूळ गृहसदस्यांच्या तब्येतीमुळे ना के बराबर वापरला जातोय. त्या गाठींचं काय करायचं या प्रश्नावर मैतरीणीने ही युक्ती सांगितली.
रुचिरामधे बत्ताश्याची
रुचिरामधे बत्ताश्याची कोशिंबीर आहे. मी कधी केली नाही
Magil 3-4 diwsapasun asleleya
Magil 3-4 diwsapasun asleleya wadal- pawasamule khup kairya padlya aahet zadanchya....so ya pad n laglelya Kairichya recipes sangal ka koni please....
tya kairya kisun thewayachya
tya kairya kisun thewayachya freez madhe. aani lagel tas waparayachi
for ex. ambyachi dal, chatani
काहीचं पन्हं, काही किसून
काहीचं पन्हं, काही किसून मुरांबा, काहींचा छुंदा.
बाकी उरलेल्या किसून डीप फ्रीज करायला काचेच्या बरणीत ठेवा. प्लॅस्टीक मध्ये नको.
Thanks झंपी, cha,....
Thanks झंपी, cha,....
परवा लोणच्याच्या कैर्या आणुन
परवा लोणच्याच्या कैर्या आणुन कापुन त्यांना हळद, मीठ लावुन उन्हात सुकवत ठेवल्या. दरवर्षी मी कैर्यांना एक ऊन दाखवुन संध्याकाळी लोणचं बनविते पण यावेळेस सांबांनी अजुन एक दिवस कैर्या उन्हात ठेवायला सांगितल्या.
काल संध्याकाळी घरी जाऊन बघते तो तर काय कैर्या कडकडीत वाळलेल्या
लोणचं बनविणे शक्य नसल्याने 'आंबोशी' म्हणुन चालवु या निर्णयाला मी पोचले. पण साबा काही ऐकेनात, गरम तेलात कडक कैर्या नरम पडतील या युक्तीवादावर त्यांनी मला तसल्या कैर्यांचं लोणंचं बनवायला सांगितले.
रात्री ८ वाजता बनविलेले लोणचं आज सकाळी १० वाजता पाहिले तरी त्यातील कैर्या कडक त्या कडकच
आता मी काय करु? काही युक्ती आहे का? नाहीतर लोणच्याला घातलेलं १ किलो तेल + बाकीचं सामान सर्व वाया जाईल
काही उपाय आहे का जेणेकरुन कैरीच्या फोडी नरम पडतील.
गुढीपाडव्यानंतर साखरेच्या
गुढीपाडव्यानंतर साखरेच्या डब्यात पडून राहाणाऱ्या बत्ताशाच्या गाठी संपवायच्या दोन पध्दती नुकत्याच कळाल्या.>>>>>>>> अजुन एक.. त्याचा लिंबु सरबत मस्त होतो.. गाठी पाण्यात घालुन ठेवायच्या.. विरघळल्यावर सरबत..
अकु, मी लहानपणापासून हेच बघत
अकु, मी लहानपणापासून हेच बघत आले की त्या गाठी पाडव्यानंतर साखरेच्या मोठ्या डब्यात जातात. जेव्हा गोडाधोडाचे काही करायचे असेल तेव्हा किंवा खूप लोक आले असतील तर चहामधे (तेव्हा घरात फक्त बाबाच एकटे चहा पित) घालायला वापरल्या जात.
मला वाटत होतं सगळ्यांकडे असंच करतात.
पण तुम्ही गाठी खात का नाही?
पण तुम्ही गाठी खात का नाही? मी खाते. मस्स्स्त गोऽऽऽड असतात!
निल्सन, हे लोणचे चांगले
निल्सन, हे लोणचे चांगले टिकेल. खायला घेण्यापुरते एका घट्ट झाकणाच्या भांड्यात काढून ते भांडे कूकरमधे ५ मिनिटे वाफवायचे, फोडी मऊ होतात. किंवा तर त्यात जास्त तेल असेल तर मंद गॅसवर लोणचे ( खाण्यापुरतेच ) गरम करायचे.
पाड्व्यानंतर एक १ - २ दिवस
पाड्व्यानंतर एक १ - २ दिवस कणाल हवी तर गाठी ठेवायची नाहीतर दोर्या कापून अगदीच वेळ असेल तर १-२ बत्ते घालून साखरेच्या डब्यात. हेच बघत आलेय लहानपणापासून
दिनेशदा धन्यवाद! जीव अगदी
दिनेशदा धन्यवाद!
जीव अगदी भांडयात पडला तुमची पोस्ट वाचुन. कारण आता एव्हढ्या ३ किलोच्या लोणच्याचे काय करायचे हे कळतच नव्हतं. साबांकडेसुद्धा कोणती युक्ती नव्हती. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ही लोणचं घालायच्या आधी सर्व कैर्यांच्या फोडी कुकरमध्ये वाफवायच्या विचार केलेला पण लोणचं टिकणार नाही म्हणुन नाही केलं.
पण तुमची आयडीया चांगली आहे जेव्हढं हवे तेव्हढच वाफवुन घ्यावे. हे मला काही सुचलं नव्हतं
परत एकदा धन्यवाद!
थोड्याशा लोणच्यात कैरीचा किस
थोड्याशा लोणच्यात कैरीचा किस घालून पहा.. कैरीला पाणी सुटून कडक कैर्या मऊ पडतील... ही युक्ती जमली तर उर्वरीत लोणच्याच करा ... मीठ मात्र घालाव लागेल ...
डझन भर आंबे खुप पिकले आहेत.
डझन भर आंबे खुप पिकले आहेत. घरात खाणारी माणंस २. रस करुन फ्रिजमधे ठेवला तर तो काळा पडतो. काय करता येइल?
रस करुन फ्रिजमधे ठेवला तर तो
रस करुन फ्रिजमधे ठेवला तर तो काळा पडतो. <<< तुम्ही कसा ठेवता?? फ्रिजरमध्ये रस व्यवस्थित राहतो. आमच्याकडे दिवाळी पर्यंत असतो. स्टीलचे डबे, टपरवेअरचे डबे ह्यात साठवून ठेवा. झाकण घट्ट हव.
वरची लेयर काळी पडत नाहि का?
वरची लेयर काळी पडत नाहि का?
तुमची पद्धत स्टेप बाय स्टेप
तुमची पद्धत स्टेप बाय स्टेप सांगता का?
प्राची, काळा नाही पडत. मी पण
प्राची, काळा नाही पडत. मी पण जास्तीचा रस अमूल आईसक्रिमच्या चौकोनी डब्यांमधे साठवून डीप फ्रिजरमध्ये ठेवते. लागेल तसा आमरस, शिरा, मिल्कशेक, आईसक्रिममध्ये वापरते.
तुमची पद्धत स्टेप बाय स्टेप
तुमची पद्धत स्टेप बाय स्टेप सांगता का? <<<<< काही नाही आहे. साल काढुन हाताने एका भांड्यात रस काढते. मिक्सरच्या भांड्यात चवीप्रमाणे साखर घालून फिरवते. हे काम फक्त आई करते. ती उरलेल्या आंब्यांपासून, किंवा कोवळ्या आंब्यांपासून बनवते. एका झाडाचे आंबे काढायला घेतले की आम्ही तयार झालेले, कोवळे सगळेच काढायला सांगतो. तिच्या फ्रिजरमध्ये रायवळ, पायरी, हापूस अस तिन्ही असत वेगवेगळ्या डब्यात. गावावरून येताना ती हे डबे फ्रिजर मधून निघायच्या वेळी काढते आणि ट्रेनमधून सेक्न्ड एसीमधून्न घेऊन येते.
सकाळी निवडलेली पालेभाजी
सकाळी निवडलेली पालेभाजी दिवसभर प्लास्टिकच्या पिशवीत बांधून नीट राहते का या दिवसात? अॉफिसात एसी आहे पण फ्रीज नाही. बँगेतून बाहेर काढून ठेवू का?
रस काढताना खराब झालेल्या
रस काढताना खराब झालेल्या आंब्याचा काढू नका. तसेच जर थोडा खराब झाला असेल तर तो भाग सुरीने कापून त्याच्या आजूबाजूचा भागही थोडा कापून मग नळाखाली स्वच्छ धुवून रस काढा.
आशुडी, निवडलेली पालेभाजी
आशुडी, निवडलेली पालेभाजी वर्तमानपत्रात बांधून बाहेर ठेवू शकते का?
ओके. या वेळी फ्रिजर मधे ठेवुन
ओके. या वेळी फ्रिजर मधे ठेवुन बघते. धन्यवाद.
दिवसभर प्लास्टिकच्या पिशवीत
दिवसभर प्लास्टिकच्या पिशवीत बांधून नीट राहते का या दिवसात?>> नाही. ती मान टाकेल. पिशवीला भोकं पाडून उघड्यावर ठेवलीस तर कदाचित बरी राहिल.
वर्तमानपत्रात बांधून >> वर्तमानपत्राचा उपयोग अन्नपदार्थांसाठी प्लिजच नको आरती. कोरड्या पदार्थासाठी नाही, ओल्या पदार्थांसाठी नाही. बांधून ठेवायला, गुंडाळून ठेवायला, झाकण ठेवायला कश्शाला कश्शालाही नाही. पाच मिनिटांसाठीही नाही.
पाच मिनिटांसाठीही नाही. <<<<
पाच मिनिटांसाठीही नाही. <<<< हो मंजुडी.
ओके, पिशवीची गाठ सोडून बाहेर
ओके, पिशवीची गाठ सोडून बाहेर ठेवते. धन्यवाद मंजूडी, आरती.
ऑफिसात टिश्यु पेपर मिळतील का
ऑफिसात टिश्यु पेपर मिळतील का आशू? त्यात बेस्ट राहील.
Pages