जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती चिवित्रा आता काय काय चाळे करायला लागलिये Uhoh फुलं काय चोरुन नेते आणि मी मेघना एक फुल आहे काही म्हणजे काही कळत नाही हिला, आणि आदित्य फुलपाखरु Wink

तो देसायांचा जावई आहे सतिष त्याच्या वडिलांच्या मित्राची ती चिवित्रा मुलगी आहे. देसायांची खरतर कुणीच नाही पण आयो जायो घर तुम्हारा या उक्तीला अनुसरुन ती देसायांकडे राहतेय.

अरेच्च्या असे आहे होय !! मला ती चिवित्रा त्या अर्चुची नणंद वाटत होती. आणि तो मनोज आदेचा मित्र वैगरे. बाकी तिच्या आईबापाने हिला वार्यावर सोडली आहे काय हुंदडायला. मुलीवर वचक ठेवू शकत नाहीत. एवढी नवीन काळातही जुन्याकालातील / पुराणातील तत्वे दाखवत असतात तर मग मुलीला धोपटून सरळ केलेली दाखवण्यात मुळीच गैर नसावे Angry

पण तो अस्वल प्रेमात असताना पण अस्साच वागत असेल ना हिच्याशी. >>
म्हणूनच चिवित्राच्या बाबांचा विरोध होता तिने त्याच्याशी लग्न करायला.. आदे मेदेने सर्वांना समजावून तिला तिचे प्रेम मिळवून दिलं तर आता त्यांच्याच संसारात विष कालवायला निघालीय. कृतघ्न कुठली.

जेव्हा त्या चिवित्राची एन्ट्री झाली तेव्हाच स्टोरी निश्चित होती कि पुढे असं होणार. मी खूप मागेच लिहिलं होतं. सगळ्या शिरेलीत मोर or लेस सेम स्टोरी असते फक्त ती गोगलगायीच्या चालीने मांडलीय इथे.

उद्याच्या भागात दाखवणार आहेत की मेदे आदित्यला सांगतेय चित्रा तुझ्या प्रेमात पडली आहे. हुश्श कोणाला तरी कळले म्हणायचे. आदेच मठ्ठ निघाला म्हणायचा.

आदेच मठ्ठ निघाला म्हणायचा.येस . ते बाबाब्जी पण आजच्या भागात " मनहूस" ला समजवायला गेले होते. पण त्याने वाटण्याच्या अक्षता लावल्या. ते मनहूस ला काय सांगतात. तुम्ही ती तुमची दाढी काढा हो. कसले (काय तो शब्द वापरलं आठवत नाहीये )दिसत हो त्या दाढी वाढलेय नमुन्यात असे ते कायसे शब्द होते . ते मुलीचा संसार वाचवायला गले खरे पण बाबाजी बाबाजी करत घरी आले Happy

आदे आधीपासुनच मठ्ठपणात डिग्री बाळगुन आहे. तोन्ड घट्ट मिटुन, झुलप कपाळावर आणुन, उगाच नसलेले नशिले भाव डोळ्यात आणुन कोणी हिरो बनत का? हे येड पेढ खाऊन पेडगावला जातय. ( हायला, डोक्यात गेल हे सोन्ग)

हे ध्यान त्या विचीत्रा-चिवित्राच्या बोटाना मलम हळुवारपणे फासत बसल होत ( एवढा वेळ? ) आणी ते विचीत्रा ध्यान रोमॅन्टीक होऊन त्याला हसत हसत न्याहळत बसल होत. छ्या! कुठल्याही सिरीयल अशा पाचकळ का बनत जातात निर्माता जाणे.:राग:

हे ध्यान त्या विचीत्रा-चिवित्राच्या बोटाना मलम हळुवारपणे फासत बसल होत >>> घरातल्या बाकीच्या बायका कोणाच्या लग्नाच्या मेहंदी समारंभातून आल्या होत्या ? एरवी भोचकपणा करत असतात की सगळ्या रूम मध्ये डोकावत Happy

हो ना स्वस्ति, माईना चालत वाटत हे.

कालच्या भागात विचीत्रा उर्फ बेडुकतोन्डी काल अर्चुशी धादान्त खोटे बोलली. तिला धरुन बदकाविशी वाटली, पण टिव्ही फुटला असता म्हणुन मोह आवरला. मेघनाने आदेला सान्गीतले की विचीत्रा त्याच्या प्रेमात पडलीय, तर सामान्य नवर्‍याप्रमाणे त्याने तिला वेड्यात काढले. बहुतेक काही दिवसानी आदेचे पण अस्वलात रुपान्तर होईल.

रश्मी , Proud

आता मेदेने बिचार्‍या चित्राचा जीव पुन्हा नव्याने तुटला म्हणु उसासे सोडायला सुरुवात केली की मी सुडोमी

दक्षिणा.:फिदी: काल विचीत्राला जेवढा मेदेचा राग आला, त्यापेक्षा जास्त मला विचीत्राचा राग आला. ती सारा राग ओढणी ताणुन व्यक्त करत होती, अर्चुला पण वाटले की ओढणी फाटेल.:फिदी: आज विचीत्रा बाई डबे देणार आहेत हापिसात.

आदित्य यडा आहे.
मेघना आवडते मला. ती हुंदके दिल्यासारखं हसते मात्र. ते १०० तल्या ९९ वेळा म्युट करतात. कधीतरीच ऐकायला मिळतं. काल मिळालं बर्‍याच दिवसांनी Proud

काल मेघनाच्या तोंडी एक डॉयलॉग होता. प्रेम म्हणजे फक्त हट्ट, आवेग नव्हे तर संयम पण आहे. मी वाट पहात होते की ही बया प्रेम म्हणजे समर्पण म्हणते की काय आणि त्या देवानंदला समर्पित करुन टाकते की काय त्या चिवित्राला.

माझा नवरा म्हणतो त्या आदित्यला न्हावी मिळत नाही का किती ते डोळ्यावर केस अश्याने चकणा बघेल काही दिवसांनी तो. मग नक्की चिवित्रा कोण आणि मेघना कोण हे ठरवणे कठीण होऊन जाईल.

कालच्या एपिसोडमधे काय झालं ? आदे म्हणत होता - विचित्राला सावरायला कोणी नाहीये वगैरे...

परवा आदेला कळतं की मनोजचा फोन आला होता तेव्हा विचित्रा काय सांगते ? तेवढा पार्ट मिस झाला आणि लिंक लागत नाहीये Sad

मला तर नक्की काय झालं तेच कळलं नाहीये अजून. एपिसोड पाहून सुद्धा! प्लीज कोणीतरी समजावून सांगेल का की आदे आणि विचित्रा मधे नक्की काय घडतं? तो तर तिला जोरजोरात हलवून हलवून "का नाही करायचंय पॅच अप?" असं विचारत असतो ना? मग त्याला नक्की कश्यामुळे तिचं प्रेमात पडणं रीअलाईज होतं?

Pages