जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता परत बाबाजी आणि होयहो देसाइ वाडीत रहायला येणार तर...>> यांची घर म्हणजे धर्मशाळाच असतात. आओ जाओ घर तुम्हारा.. Angry

अहो पण त्या चायनीज सांस्कृतिक दर्शनाचे काय ???>>> हो ना का कोणता नविन सिनेमा येणार आहे आणि त्याच्या प्रमोशनबद्दल काही आहे Uhoh

<,आता परत बाबाजी आणि होयहो देसाइ वाडीत रहायला येणार तर.>> ते त्यांच्या घरात माई आणि नानांना राहायला बोलावताहेत ना ( नातवं डा सकट ). मग देसाई वाडीत फक्त कपल्स आणि चिवित्रा. मग चिवित्रा हळू हळू आदित्यच्या प्रेमात पडणार. इकडे तो दाढीवाला म्हणणार . बरोबर आहे तूला आदित्य आवडत होता म्हणूनच देसाई वाडीत सारखी पडीक व्हायला जात होतीस.
इसको बोलते है कथानक Happy

नैइ कैइ..बाबाजींना बाबाजीन्चा आदेश आलाय नां.. चिवीत्रा देसाई वाडीत अलिये मग तिच्या नरड्यात प्रसाद नको पडायला...किंवा अता 'आदे-मदे च्या मधे न येणे' याचा वेगळा प्रसाद पडयला हवाच...मग ते परत..दे वा त

आणि चिवित्रा आणि बाबाजी-होयहो एकाच रुमात...मग बाबाजी - चिवित्रा नि फ़ाटकि चड्डि बात आगे बाढो...

मग त्यानंतर देसाई वाडी बाबाजी-होयहो कडे जमणार...विचित्रा च्या केळवणाला Happy Happy

अहो पण त्या चायनीज सांस्कृतिक दर्शनाचे काय ???>>>

नाही. ते आदेने मेदे आणि विजया यांनी २ दिवस पिकनिकसाठी स्पेअर ठेवावे म्हणून मारलेली थाप होती.

ओह ती थाप होती का, मला पण वाटलं नवीन पिक्चरचं प्रमोशन Happy

काल ती सेल्स गर्ल आदे-चिवित्रा ला नवरा-बायको समजली , चिवित्रा नुसती फुदकत होती कपडे ट्राय करताना

मला वाटलं आदे एकदा तरी म्हणेल की तुला नाही घेते ड्रेस.....

तो चक्रमादित्य कशाला म्हणेल असं. गॉगल स्वतःच स्वतःच्या डोळ्याना लावयला काय धाड भरलीये कुणास ठाउक??

अस्वलाने पाहिले.

काल ती सेल्स गर्ल आदे-चिवित्रा ला नवरा-बायको समजली...>>

अरे पण त्या सेल्सगर्ल ला पण एवढं कळु नये.... नवरा सोबत असताना कोणती बायको स्वत:चे पैसे खर्च करून शॅापिंग करेल.
Wink Proud

>>>नवरा सोबत असताना कोणती बायको स्वत:चे पैसे खर्च करून शॅापिंग करेल.<<<

असे काहीतरी बोलू नका. एक स्त्रीवादी गट चवताळेल.

आम्ही आमच्याच पैश्याने शॉपिंग करतो बर Wink
नवर्‍याने घेतलच काही तर ते सरप्राईज असत आणि अशी सरप्राईजेस ही वेळ स्थळ प्रसंगावर अवलंबुन असतात Lol

काहीही दाखवतात. किती तो कृतघ्नपणा पण मी म्हणते इतक त्या मेघनाने केलं त्या चिवित्रासाठी आणि ही बया तिच्याच घरावर सॉरी नवर्‍यावर डल्ला मारतेय? Uhoh बहुदा त्यांच्यात पण मुलं मिळत नसावित लग्नासाठी Lol

किती तो कृतघ्नपणा पण मी म्हणते इतक त्या मेघनाने केलं त्या चिवित्रासाठी आणि ही बया तिच्याच घरावर सॉरी नवर्‍यावर डल्ला मारतेय? >> मला आधी वाटलं की हेवा वाटतोय मेदीच्या नशीबाचा तिला आणि ते साहाजिकही होतंच! मला देसाई "मेंढरां"पेक्षा चित्रा आणि आदीमानव हे स्वभाव वास्तववादी वाटताहेत. कुठलेही निर्णय घाईगडबडीत आततायीपणे घेण्यार्‍या अशा स्वप्नाळू मुली आणि असे संशयी, तिरसट, हेकेखोर पुरूषही असतात.

चित्रातील बदल बघून मेदेच्या मेदात उजेड पडायला नको? बाबाजी इतकं जीव तोडून सांगतात पण एखाद्याचं कानफाट्या नाव पडलं की....
आणि आदित्य पण काय असा एरवी हगल्यापादल्याला बायको लागते जोडीला (नकट्या नवर्‍या जोडीला गाण्यासारखी) आणि सरप्राईज द्यायला हिच सापडली? माई रिकामीच असते ना तिला घेऊन जावं! अगदीच नाही तर बाबाजींना तरी! ते पण धन्य झाले असते आणि बायको पण खुष झाली असती! स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घ्यायची हौस का असते काही नवर्‍यांना?
आम्हाला उगाच वाटलेलं आदे आदर्श नवरा आहे! सर्वसामान्यच निघाला ना!!

नाही हं! मेदे आणी आदे हे आदर्श जोडपेच आहे. बघा की मेघनाच्या बटा जशा तरंगत असतात, तशा अदित्यच्या झिपर्‍या पण माथ्यावर उडत असतात. जेव्हा पहावे तेव्हा दोघे दात दाखवत असतात. तिकडे श्री आणी जानु आलटुन पालटुन दात दाखवतात, प्रत्यक्ष खरे जोडपे असूनही.

काही दिवसानी मेदे स्वत:हून आदेचे लग्न विचीत्रा बरोबर लावुन देईल आणी मग फाटक्या चड्डीला शोधायला जाईल. सर्वत्र मग शान्तता नान्देल.:खोखो:

हे लोक पिकनिकला गेलेत ना? मग त्या मनोजला (स्वारीच अस्वलाला) कुणी पत्ता दिला तिथला? ह्यांना बर सगळ कळत लगेच आणि तिकडे त्या जानकीला दिवस गेल्याची बातमी अजुन श्री बाळाला नाहिये तो अडकलाय प्राणांपेक्षा प्रिय माणसाच्या शोध कार्यात.
इथे अस्मिताला पाठवावं काय. तिला सगळ माहिती असत आणि जे माहिती नसत ते ती शोधुन काढते.

काल काय ते रिसेप्शनमधल लुटुपुटुचं भांडण आणि मग चिवित्राच आदित्यच्या गळ्यात पडणं, त्यावर मेघनाने असु दे पडुदेत गळ्यात अजुन मी थोडी विश्रांती घेते Wink
मग तो पायरीवर बसुन बरोब्बर चिवित्राच्या खिडकीसमोरचा रोमांस सगळंच सेटींग Lol

रश्मे तु आधी नावं नीट लिही बघु. विचित्रा नव्हे, चिवित्रा...

ती शुभी बघ कशी नीट नावं लिहिती Proud
तु लिही १०० वेळा पाटिवर...

त्यावर मेघनाने असु दे पडुदेत गळ्यात अजुन मी थोडी विश्रांती घेते >> अगदी अगदी हेच भाव. बावळ्ट आहे मेदे झालं.
ती बेडूकतोंडी घेऊन जाईल आदेला तरी ही बया असूदे तिला जास्त गरज आहे आधाराची वगैरे म्हणेल.
रच्याकने ती चित्रा हसली की मला बेडकाच्या तोंडाची आठवण येते. या गालापासून त्या गालापर्यंत

Pages