दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
लिंबुटिंबु, :
लिंबुटिंबु,
:G:
हे धत्तड धत्तड धत्तड! आरामात
हे धत्तड धत्तड धत्तड!
आरामात पोस्टी वाचल्या पाहिजेत.
देशभरात मतमतांतरे आहेत , मी
देशभरात मतमतांतरे आहेत , मी अरविंदची भक्त वगैरे नाही, पण त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. विजयाचे शिल्पकार तेच आहेत. दबलेल्या महत्वाकांक्षा उद्रेकत आहेत.योगेंद्र यादव यांच्यासारख्या तरल आणि तलम विचारवंतानेही त्याच मार्गाने जावे याचे आश्चर्य वाटते आहे. प्रशांत भूषण यांच्याकडून अपेक्षाच नव्हती.
थेट दिल्लीतून आतल्या गोटातून
थेट दिल्लीतून आतल्या गोटातून राइट-अप्स, तक्ते, मॉर्फ्ड फोटोज ह्यांचा टोपलंभरून वानवळा आला आहे.
तो तुमच्यासोबत वाटून घ्यायच्या आधी एक-दोन गोष्टी स्पष्ट करते.
"भ्रष्टाचारमुक्त भारत ह्या ध्येयामध्ये आपची स्थापना होण्याच्या आधी योयांचं योगदान काय" हा प्रश्न विचारणं हा उद्धटपणा, कृतघ्नपणा आहे असं काहींनी लिहिलंय. आपसमर्थक असं विचारूच कसं शकतात असा प्रतिप्रश्न केलाय. हा प्रश्न विचारण्यात वावगं काय आहे? मला तुम्ही अकेंबद्दल हा प्रश्न विचारा, मी ऑफेण्ड न होता १,२,...५ मुद्दे देईन. व्यक्ती कुणीही असो, वयाने- ज्ञानाने कितीही ज्येष्ठ-श्रेष्ठ असो, त्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारण्याचा एखाद्याचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. ह्यावरून माझ्या आस्तिक आई-बाबांशी अनेकदा वाद झाले आहेत. देवावर शंका घेऊ नये, संतांवर शंका घेऊ नये असं त्यांचं मत असतं. पण सॉरी. मला हे अजिबात मान्य नाही. मी प्रचंड शंकेखोर आहे. अजिबात श्रद्धाळू नाही. माझ्या प्रश्नांचं माझ्यापुरतं समाधान झाल्याशिवाय एखादी गोष्ट स्वीकारणं मला कठीण जातं. मला पटलेलंच तुम्हाला पटेल असं होणार नाही. वस्तुस्थिती समोर आल्यावर त्यातून काय निष्कर्ष काढायचे हा ज्याच्या-त्याच्या विवेकबुद्धीचा प्रश्न आहे.
केदारने जेव्हा इथे पहिल्यांदा विचारलं की प्रभु आणि योयांना बाहेर काढण्याबद्दल तुमचं काय मत आहे, तेव्हा मी अकेंची बाजू घेतली नव्हती. माझं उत्तर होतं की हा आपचा फार मोठा लॉस आहे आणि मला हे आवडलेलं नाही. त्यानंतरही मी २-३ वेळा लिहिलंय की मी दोन्ही गटांच्या बाजू पाहतेय, ऐकतेय. सध्या कुणाचीच बाजू घेणं मला योग्य वाटत नाही.
पण गेल्या १०-१२ दिवसांत जे काही घडतंय त्यामुळे मी माझ्यापुरती आश्वस्त आहे की जे झालं ते योग्य झालं. किंबहुना जरा कमीच झालं. प्रभु आणि योयांना फक्त कमिटीमधून नव्हे तर आपमधूनच बाहेर काढायला हवं.
हे मत बनवण्यापूर्वी मी योयांच्या पत्रकार परिषदा, ट्वीटस स्वतः वाचले आहेत. सत्य उघड झाल्यावर योयांनी स्वतःचंच ट्वीट डिलीट केलेलंही मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळे अकेगटाने पद्धतशीरपणे पुरवलेल्या माहितीच्या प्रभावाखाली येण्याचा प्रश्नच नाही.
योया खोटं बोलत आहेत हे धडधडीतपणे दिसतंय.
१. योया म्हणाले की आमचं मत होतं की मिटींगचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं. पण ते केलं गेलं नाही.
इथे बघा - मिटींगच्या व्हिडिओजमधला एक. अके बोलताना रेकॉर्ड केलं गेलंय. २८:३८ मिनिटाला अकेच्या बाजूला एक कॅमेरावाला दिसतोय. म्हणजेच दुसर्या बाजूचंही रेकॉर्डिंग चालू होतं.
२. योया म्हणाले - आम्हाला धक्काबुक्की झाली, अरविंद फक्त बघत उभा राहिला.
वरच्या व्हिडिओमध्ये २८:१० च्या आसपास अके "एक मिनिट एक मिनिट, बैठ जाईये, बैठ जाइये सब लोग" म्हणत गोंधळ घालणार्यांना थांबवताना दिसत आहेत. पुढे हेही म्हणताना दिसत आहेत - "मेरा आप सबसे एकही निवेदन है, मैं आप सबकी भावनाए समझ सकता हूं, लेकिन हम सबको एक-दुसरे को सुनना पडेगा और शांती से सुनना पडेगा"
३. योया म्हणाले - मिटींगला बाउन्सर्स आणले गेले.
वरचा व्हिडिओ पुन्हा पहा - त्यात जे हट्टेकट्टे तरूण दिसत आहेत ते ३-४ वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे स्वयंसेवक आहेत. हात जोडून विनंती करत आहेत. २८:३४ मिनिटाला. ह्याच लोकांनी योया आणि इतर नेत्यांच्या सभांमध्ये गर्दी नियंत्रण करण्याचं काम केलं आहे. आज ते भाडोत्री बाऊन्सर्स झाले?? आणि "तुम्हाला उचलून बाहेर फेकू का" असं हात जोडून विचारत आहेत. कैच्याकै.
४. योयांचा खास माणूस रमझान
४. योयांचा खास माणूस रमझान चौधरी. ह्याला मारपीट झाली असं कालपासून सगळ्या चॅनेल्सवर सांगितलं जातंय.
कोण आहे ही व्यक्ती ?
हरियाणामध्ये निवडणूका लढवायच्या नाहीत असं अकेंनी निक्षून सांगितल्यानंतर रमझान चौधरीने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. जर एखाद्या सदस्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली किंवा दुसर्या पक्षासाठी प्रचार केला तर त्याचं आपचं सदस्यत्व आपोआप रद्द समजलं जातं.
योया हरियाणाचे संयोजक होते. त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती??? मग रमझान चौधरी योयांसोबत का होता?
५. रमझान चौधरीच्या पायाचं हाड मोडलं असं योया/मिडिया सांगत आहेत. ही रमझानच्या तक्रारीची कॉपी. हाड मोडल्याचा उल्लेखही नाही. झालेल्या अपमानाचा शोध घ्यायचा म्हणे पोलिसांनी. छान.
६. योया म्हणत आहेत की आप
६. योया म्हणत आहेत की आप रस्त्यावरून भरकटला आहे. इतकंच काय तर आपने संस्थळावरून घटना काढून टाकली आहे.
इथे पाहून या. आपची घटना संस्थळावरच आहे.
७. योयांनी ट्वीट केलं आहे की - "As per Party's constitution, the NE has no authority to appoint new Lokpal. Only the Lokpal can appoint their successor."
आणि वस्तुस्थिती काय आहे? - अॅडमिरल रामदासांचा कार्यकाल नोव्हेंबर २०१३ मध्येच संपला आहे. त्यांनी ४ आठवड्यांच्या आत दुसर्या लोकपालाची नियुक्ती करणं अपेक्षित होतं. जर लोकपाल ही नियुक्ती करू शकले नाहीत तर नॅशनल एक्झिक्युटिव्हच्या सदस्यांनी नवीन नियुक्ती करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे कालच्या एन ई च्या मिटींगमध्ये तीन सदस्यांची नवीन लोकपाल समिती नियुक्त करण्यात आली.
'मला कळवायला हवं होतं, मला वाईट वाटलं' वगैरे पत्र रामदासांनी लिहिलं आहे. पण प्रश्न हासुद्धा उठतो की २८ मार्चच्या मिटींगसाठी 'मला येऊ नका' सांगितल्याचा मेसेज आल्याचं पत्र योयांच्या फेसबुकवर का जाऊन पोहोचलं???
लोकपालचं काम निष्पक्ष राहून तपासणी करणं आहे. त्या मिटींगमध्ये दोन गट असणार आहेत हे सर्वांनाच माहीत होतं. अशावेळी रामदासांनी स्वतःच तिथे जाणं टाळायला हवं- टु अवॉइड बाएस. पण त्याउलट ते 'मला यायचं होतं' अशा अर्थाचं पत्र लिहितात आणि ते योयांकडे देतात हे मनाला पटत नाही. ह्याआधीही त्यांनी पक्षाला लिहिलेली 'एक्स्प्लोझिव' पत्रे मिडियाच्या हातात पडली आहेत. का आणि कशी?
<<एका माजी सनदी अधिकार्याला आधी किरण बेदी, मग व्ही के सिंग आणि आता अॅडमिरल रामदास बाहेर काढावे लागले याच अर्थ काय घ्यावा ?>>
अॅडमिरल रामदास ह्यांना हटवून नवीन समिती नेमली. ह्यावरून मोदीसमर्थकांनी लगेच रामदासांना विक्टिम बनवायची गरज नाही. कारण भाजपाने ह्याआधीच रामदासांची गाठ फोर्ड फाऊंडेशनशी मारून ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्ही उलट अकेचे आभार मानायला हवेत.
मीनाक्षी लेखींचं प्रेस स्टेटमेंट - " The AAP's internal lokpal Admiral (retired) Laxminarayan Ramdas and his family have links with the Ford Foundation. Kavita N Ramdas, the eldest daughter of Admiral Ramdas, is the head of Ford foundation in South Asia. Admiral Ramdas’s wife Leela Ramdas is the chief of committee constituted under the Vishakha Guidelines. Ramdas is also a recipient of Ramon Magsaysay Award. This family is part of a lobby that worked towards securing this award for Arvind Kejriwal as well."
:००७ जेम्स बॉण्ड मोड ऑफः
पुढील प्रचारासाठी आणखी टपाल कधी येईल ह्या प्रतिक्षेत.
मिर्चीतै, मी फार काळानंतर
मिर्चीतै, मी फार काळानंतर लिहित आहे. तुमचा अंमळ तोल गेलेला पाहून वाईट वाटले.

तसे तर तुम्ही (एक किंवा अनेक) फक्त केजरीवालच्या भक्त आहात हे सुरूवातीपासुन जाणवत होतेच, आता ते जास्तच अधोरेखित झाले आहे. असो, कोणी कोणाचे भक्त असावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,
आप / केजरी भक्त हे इतर भक्तांपेक्षा वेगळे असतील असे वाटत होते, पण
नंदिनीतै, अश्विनीतै, आणि अन्य काही भौ - तुमच्या निरिक्षण आणि विश्लेषणाला मनापासुन दाद !
मला तरी ते ए आणि बी टीम या मुद्द्यामधे काही तथ्य वाटत नाहीये. हे जे नवे तारे आहेत त्यांचा संघ / भाजपशी संबंध असणे शक्य नाही. तसे असते तर पहिल्या निवडणुकीच्या वेळेस यांनी कॉन्ग्रेस बरोबर हातमिळवणी न करता भाजप बरोबर केली असती किंवा अन्य काही सेटिन्ग केले असते असे वाटते.
Straight trees are cut first
Straight trees are cut first !
राजकारणात रहायचं तर दक्ष रहायलाच हवं. अके भावनाप्रधान आहेत.अशी माणसे डोक्याने निर्णय न घेता हृदयाने विचार करतात. कसे निभावणार ही चिंता वाटायची. पण आता तीसुद्धा कमी झाली. त्यांच्या आजूबाजूची "सुमार सद्दी" त्यांना योग्य सल्ले देत आहे असा विश्वास वाटायला लागला आहे.
परवाच्या मिटींगमधले व्हिडिओज-
१. अरविंद केजरीवाल - पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टींवर बोलले (स्टिंगव्यतिरिक्त)
ते साले/कमिने वालं स्टिंग म्हणजे योया गटाने केलेला सेल्फ-गोल होता. अकेंना सत्ता चढली आहे का की खरंच त्यांच्याभोवती Coterie आहे असं वाटत होतं. मोदी, मनमोहन सिंग ह्यांच्यासारखी संवाद तोडण्याची वागणूक अकेंकडून अपेक्षित नव्हती आणि हे माझ्यासारख्या अनेकांना सलत होतं. पण त्या स्टिंगमधलं संभाषण ऐकून उरला-सुरला संदेह दूर झाला.
२. कुमार विश्वास - हा व्हिडिओ जरा इमोशनल अत्याचार आहे. पण नाटक नाही वाटलं.
दोघांच्याही भाषणाच्या वेळी समोर प्रभु आणि योया बसले आहेत. त्यांच्या चेहर्यावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची मला उत्सुकता आहे.
आय रेस्ट माय केस. मला ह्या लोकांबद्दल विश्वास वाटतो. हे सगळं वाचूनही मी आंधळा विश्वास ठेवत आहे, अकेभक्त/आपभक्त आहे असं कुणाला वाटत असेल तर मला असं म्हणवून घेण्यात अजिबात संकोच नाही.
<<देशभरात मतमतांतरे आहेत , मी
<<देशभरात मतमतांतरे आहेत , मी अरविंदची भक्त वगैरे नाही, पण त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. विजयाचे शिल्पकार तेच आहेत. दबलेल्या महत्वाकांक्षा उद्रेकत आहेत.योगेंद्र यादव यांच्यासारख्या तरल आणि तलम विचारवंतानेही त्याच मार्गाने जावे याचे आश्चर्य वाटते आहे. प्रशांत भूषण यांच्याकडून अपेक्षाच नव्हती.>>
भारतीताई, पहिल्यांदाच लिहिलंत इथे.
(No subject)
if AAP's internal lokpal can
if AAP's internal lokpal can be biased ( as agreed by mirchi, the aap supporter) then how can having janlokpal will solve all issues wrt corruption in India? Janlokpal is a person and can be susceptible to personal bias and can be corrupt, too. So having janlokpal wont solve the issue of corruption. Thdn whats thd use of AAP which is created with the agenda to bring janlokpal ?
मिर्ची तै मनापासुन दाद! .
मिर्ची तै मनापासुन दाद!
.
ओहोहोहोहोहोहोहो! हमारे तो ये
ओहोहोहोहोहोहोहो!
हमारे तो ये समझमे नही आ रहा था की एक महिला इन सब धुरंधंरोंका सामना अकेले कर कैसे पा रही है! अब जाकर बत्ती जली है के मॅडम आप की इन्टरनेट स्पीकर है! तभी उनके पास ऐसे ऐसे कागजात पहुंचरहे है जिनके दस फीसदी सबूत देना भी किसीके बसमें नही है! अब अगर ये ना समझमे आ रहा हो के रमझान चौधरीके खत के दुसरे कागजपे क्या लिखा है तो भैय्या इतका समझलो के वो समझनेलायक बात होही नही सकती! अब अगर वो हट्टेकट्टे नौजवान पीछले तीन सालसे पार्टीमे रहकर खुली सडकोंपे पब्लिकके ताने सुनकर पार्टीको मजबूत बनारहे है तो क्या वो बाऊन्सर्स कहलायेंगे? भाई सेहत बनाना तो कोई बुरी बात है नही! और कुमार विश्वासभी तो चिल्ला चिल्लाके कह रहे है के ये बाऊन्सर्स नही हमारे बच्चे है! अब ये नीचे जो पंक्तिया मॅडमजीने लिखी है वो पढकर बस इक बात नही समझमे आती के क्या पीछले तीन सालसे ये लडके जब पार्टीका काम कर रहे थे तबसे मॅडम इन्हे जानती है?
>>>त्यात जे हट्टेकट्टे तरूण दिसत आहेत ते ३-४ वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे स्वयंसेवक आहेत. हात जोडून विनंती करत आहेत. २८:३४ मिनिटाला. ह्याच लोकांनी योया आणि इतर नेत्यांच्या सभांमध्ये गर्दी नियंत्रण करण्याचं काम केलं आहे. आज ते भाडोत्री बाऊन्सर्स झाले?? <<<
इस बातकाभी सबूत अगर आप माँगोगे तो मिलहीजायेगा! और रही बात हाथ जोडनेकी तो हाथ तो दुष्मनको मारनेसे पहले 'स्पॉट नाना' भी जोडा करता था और वो जानी राजकुमारका लाडला पुरुरवाभी!
भैय्या हम परेशान इस बातसे है के कुछ लोगोंको ऐसा क्युं लगता है के महस उनके पास कोई सोर्स होनेकी वजहसे वो जो कुछ भी सबूतके तौरपर दिखाते है उसे देखकर पढनेवाले हक्काबक्का रहजायेंगे? ये क्युं नही लगता की किसीको अच्छा दिखानेके चक्करमे वो यहाँके पढनेवालोंसे इतने दूर गये है के उनमे ऑर आदरणीय केजरीवालजीमे अब कोई फर्कही नही महसूस हो रहा? ये क्युं नही लगता की उन्होने दिखाये हुवे सबूतही एक अकेला सोर्स नही है जिसपर तमाम पढनेवाले अपनी राय बनालेंगे?
रही बात अरविंद केजरीवाल और आम आदमी पार्टी की - तो हम तो भैय्या यहीं कहेंगे के अरविंद केजरीवाल भलेही आम आदमी होंगे, उनके प्रशंसक आम आदमी नही रहे! अगर सचमुचमेभी श्री केजरीवाल इतके अच्छे होंगे तो भी यहाँ उनकी की जा रही तारीफ देखकर लगने लगेगा की आदमी एक नंबरका बदमाष है!
और कहीं ना कहीं, यही वो चीज है जिसे अंधभक्ती कहां जाता है!
>>और कहीं ना कहीं, यही वो चीज
>>और कहीं ना कहीं, यही वो चीज है जिसे अंधभक्ती कहां जाता है!
सत्यवचन श्रीमान !
बाकी काही असो, मिर्चींनी
बाकी काही असो, मिर्चींनी खरोखरच जबरदस्त प्रतिवाद केला आहे हे कबूल करायलाच हवे. तेही, जवळपास दहा पंधरा सदस्य मुक्त शैलीने वाद घालत असताना!
यानिमित्ताने काहींना
यानिमित्ताने काहींना अंधभक्तीची लक्षणे लक्षात आली हे खूप झाले.
७. योयांनी ट्वीट केलं आहे की
७. योयांनी ट्वीट केलं आहे की - "As per Party's constitution, the NE has no authority to appoint new Lokpal. Only the Lokpal can appoint their successor."
आणि वस्तुस्थिती काय आहे? - अॅडमिरल रामदासांचा कार्यकाल नोव्हेंबर २०१३ मध्येच संपला आहे. त्यांनी ४ आठवड्यांच्या आत दुसर्या लोकपालाची नियुक्ती करणं अपेक्षित होतं. जर लोकपाल ही नियुक्ती करू शकले नाहीत तर नॅशनल एक्झिक्युटिव्हच्या सदस्यांनी नवीन नियुक्ती करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे कालच्या एन ई च्या मिटींगमध्ये तीन सदस्यांची नवीन लोकपाल समिती नियुक्त करण्यात आली.
>>
इथल्या गोंधळात पडायचे नव्हते. वाचतो आहेच आणि मिर्ची हे देतील ह्याची खात्री होती. सो दिस पोस्ट
लोकपालाचे राजकारण करून तयार झालेल्या पार्टीत देखील नोव्हेंबर २०१३ ते २८ मार्च २०१५ लोकपाल नियुक्त केला नाही, आणि हे म्हणे पारदर्शक.
मिर्ची विचारतात की यादवांचे १ ते ५ द्या. आणि यादव तर फाउंडर मेंबर!!!!!!
अरेच्चा, का बुवा मग पार्टी जेंव्हा निर्माण झाली तेंव्हा अ के आणि मिर्चीसारख्या भक्तांनी ही परिक्षा घेतली नव्हती का? तुमचे १ ते ५ द्या तरच तुम्ही पार्टीत याल.
थँक गॉड मी आप मध्ये नाही. कारण (आपला पटणारेच) मी कुठलेही १ ते ५ केलेले नाही.
ह्या आणि अशा ड्युएल स्टॅन्डर्डस मुळेच आय वॉन्ट टू फरगेट नाऊ, की मी त्या जनलोकपाल आंदोलनात केजरीवालांकडून होतो ! फर्स्ट ब्लो वॉज फनी, की जनलोकपाल मेगॅसॅसे पुरस्कार विजेते होऊ शकतात. :|
असो केजरीवाल ह्यांना शुभेच्छा. आणि मिर्चीलाही. ( शेवटी श्रद्धाळू असणे म्हणजे देवाबद्दलच असते असे नाही).
<> मान्य आहे नताशा. पण
<>
मान्य आहे नताशा.
पण जनलोकपाल आणून काही उपयोग होणार नाही ह्या विचाराने काहीच न करता बसून चालणार नाही. सध्या दिल्लीत बाकीचेही काही उपाय चालू आहेत.
आजच दिल्ली एसीबीने एका सरकारी शाळेच्या प्रिन्सिपलला अटक केली आहे. गवर्नमेंट बॉइज सीनियर सेकंडरी स्कूल, निठारी चे प्रिंसिपलअशोक कुमार सिंह. विद्यार्थी फंडाच्या सुमारे २७ लाख रूपयांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
<<लोकपालाचे राजकारण करून तयार झालेल्या पार्टीत देखील नोव्हेंबर २०१३ ते २८ मार्च २०१५ लोकपाल नियुक्त केला नाही, आणि हे म्हणे पारदर्शक. >>
धरा मग त्यासाठीही केजरीवाललाच. पीएसीमध्ये प्रशांत भूषणसारखे ज्येष्ठ वकील होते. अकेंपेक्षा त्यांची जास्त जबाबदारी होती ह्या गोष्टीत लक्ष घालण्याची.
<<मिर्ची विचारतात की यादवांचे १ ते ५ द्या. आणि यादव तर फाउंडर मेंबर!!!!!!
अरेच्चा, का बुवा मग पार्टी जेंव्हा निर्माण झाली तेंव्हा अ के आणि मिर्चीसारख्या भक्तांनी ही परिक्षा घेतली नव्हती का? तुमचे १ ते ५ द्या तरच तुम्ही पार्टीत याल. >>
योयांचे १ ते ५ ह्यासाठी मागितले नव्हते. भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्याची आधी काहीही पार्श्वभूमी नसलेले लोक आपमध्ये येण्याबद्दल आक्षेप नाहीये.
(परवाचं जम्मू-कश्मिर विधानसभेतील विलोभनीय दृष्य)
बाकी तुम्हाला भाजपा आवडतो तर तिथेच खुष रहा. तुम्हालाही खूप शुभेच्छा. खूप गरज आहे.
चला, जनलोकपाल आणून उपयोग नाही
चला, जनलोकपाल आणून उपयोग नाही हे तरी मान्य झाले ना?
तेवढेच या ड्राम्याचे फलित.
जनलोकपाल आणल्यास भीक नको पण कुत्रं आवर असं होणार आहे. हा जो कोण जनलोकपाल असेल, त्याच्यावर कंट्रोल कोणाचा? की केजरी स्वतःच जनलोकपाल बनणार? कारण त्यांच्याइतका स्वच्छ, निरिच्छ मनुष्य भारतात दुसरा कुठला सापडायला? बाकी सारे तो चोर है. आणि मग या अनभिषिक्त सम्राटाला भारत भ्रष्टाचारमुक्त करायला (अन इतरही बरंच काही करायला) कोण अडवणार?
ऊप्स. पास. हा धागा बाकी
ऊप्स. पास.
हा धागा बाकी कशासाठी नाही तरी सगळ्यांच्या मनातली खळखळ-मळमळ बाहेर पडायच्या तरी नक्कीच कामी येतोय.
बेफी ची आत्ताची पोस्ट लई
बेफी ची आत्ताची पोस्ट लई भारी! मजा आली वाचायला
भारतीताईना हवशे,नवशे पदवी नाही मिळाली कारण अकेसारखेच त्याचे भक्तगण !!
नताशा लई भारी पण तु पण आता हवशी नवशी ठरशिल बघ बाई!
कस आहे ना मुद्दे खोडुन काढता आले की बघा बघा आम्ही कसे सच्चे नाही खोडता आले की पास,
बाकी अकेच्या राजिनामा नाट्यप्र्योगाच म्हणजे "अति झाल आणी हसु झाल " .
धरा मग त्यासाठीही
धरा मग त्यासाठीही केजरीवाललाच. पीएसीमध्ये प्रशांत भूषणसारखे ज्येष्ठ वकील होते. अकेंपेक्षा त्यांची जास्त जबाबदारी होती ह्या गोष्टीत लक्ष घालण्याची.
>>>>>
मग केजरीवालांची आपचे प्रमुख निमंत्रक म्हणून जबाबदारी कोणती?
मफलर बांधून खोकत धरणं धरुन बसण्याची?
सीझर्स वाईफ शुड बी अबाव्ह सस्पीशन एवढी साधी गोष्ट केजरीवालना माहीत नाही?
जबाबदारी इतरांची आणि यश मिळालं ते एकट्या केजरीवालमुळे हा याचा सरळ अर्थ होत नाही काय?
निवडणूकीत यश मिळालं ते गांधी घराण्यामुळे आणि अपयश आलं तर त्यात त्यांचा काही दोष नाही या अस्सल काँग्रेसी विचारसरणीची आठवण झालीच!
निवडणूकीत यश मिळालं ते गांधी
निवडणूकीत यश मिळालं ते गांधी घराण्यामुळे आणि अपयश आलं तर त्यात त्यांचा काही दोष नाही या अस्सल काँग्रेसी विचारसरणीची आठवण झालीच! >> दिल्लीत देखील भाजप्यांनी असाच काहीतरी जुमला भक्तांना चिटकवला होता ना त्याची ही आठवण झाली
अगदी अगदी कबीर! थोडक्यात
अगदी अगदी कबीर!
थोडक्यात काँग्रेस, भाजपा आणि आप, सगळे एकाच माळेचे मणी आहेत!
हमाममें सब नंगे!
मिर्ची, जेन्युइन प्रश्न अहेत,
मिर्ची, जेन्युइन प्रश्न अहेत, जेन्युइन उत्तराम्ची अपेक्षा आहे.
"आप" हा एक प्रयोग म्हणून सफल व्हावा अशीच माझीही इतर सामान्य भारतीयाप्रमाणे इच्छा आहे आणि ते मी बर्याच ठिकाणी लिहिलेही आहे. पण "जनलोकपाल", "मोहल्ला सभा" वगैरेला माझा विरोध आहे. कारण एका "इनएफेक्टिव्ह प्रोसेस" ला दुसर्या तितक्याच "इनएफेक्टिव्ह प्रोसेस"ने रिप्लेस करुन काही साध्य होत नाही, वेळ आणि रिसोर्सेस वाया जातात हा माझा अनुभव (अर्थात मॅनेजमेंटचा). त्यापेक्षा सध्या असलेल्या, ज्ञात (म्हणजे ज्याचे फायदेतोटे माहीत आहेत) अशा स्ट्रकचर्/प्रोसेस ला सुधारणे महत्वाचे. इथेच माझे अन केजरीवालचे रस्ते वेगळे होतात. मंजिल चाहे एक हो.
फीजीबिलिटी स्टडी/ लॅब म्हणून दिल्ली विधानसभेत आप बेस्ट आहे. आयेम हॅपी विथ इट. तसे इतरत्र लिहिलेही आहे.
नेहमीसारखेच मिर्चीनीं
नेहमीसारखेच मिर्चीनीं त्यांच्या खोडलेल्या मुद्दयाला बगल दिली. अन बाकीचेच लिहिले. असो अपेक्षा नव्हातीच म्हणा.
बाकी तुम्हाला भाजपा आवडतो तर तिथेच खुष रहा. तुम्हालाही खूप शुभेच्छा. खूप गरज आहे. डोळा मारा (परवाचं जम्मू-कश्मिर विधानसभेतील विलोभनीय दृष्य) >>
मी कुठेही राहिलो तरी भक्त होत नाही. धन्यवाद !!
मिर्चीजी, केदारने एखादा
मिर्चीजी,
केदारने एखादा प्रश्न विचारला तर त्याचा त्याला भाजप आवडण्याशी काय संबंध? त्याला बसप आवडत असेल किंवा AIADMK किंवा आणखी कुणी. Straw Man Arguments कशाला?
केजरीवालांच्या खोकल्यावरून उगाचच टिपण्ण्या होऊ नयेत प्लीज.
>>सगळ्यांच्या मनातली खळखळ-मळमळ बाहेर पडायच्या तरी नक्कीच कामी येतोय.
This was uncalled for. इथे आप चे हिरिरीने समर्थन करणार्या तुम्ही एकट्याच असल्याने असा persecution complex आला आहे का? शाझिया, व्ही के, बेदी यांच्या बाहेर जाण्याने मलाही आश्चर्य वाटले नाही. त्यांनी भाजप मध्ये जाऊन आणी मग लोकपाल वर मौन बाळगून आपल्या प्राथमिकता दाखवूनच दिल्या आहेत. पण योयांचे जाणे हा आप च्या दृष्टीने PR nightmare आहे. हे ग्रेसफुली हाताळले गेले नाही हे तर तुम्हीही मान्य कराल. धुरळा खाली बसल्यावर कदाचित सत्य बाहेर येइलही पण निदान आज तरी योया, दमानिया पाटकर यांच्या पक्षत्यागाने प्रतिमा मलीन झाली आहे हे खरे.
मिर्ची, दोनदा विचारलेला
मिर्ची,
दोनदा विचारलेला प्रश्न सोईस्कर नाही म्हणून बहुतेक टाळला असावात.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपची मतं वाढली असं तुम्ही आवेशात सांगत असताना अचानक रसातळाला गेलेल्या पक्षाला केजरीवालनी दिल्लीच्या सत्तेवर आणला हे कसं काय?
लोकसभेत आपची मतं वाढली होती तर पक्ष रसातळाला कसा गेला होता?
काल मिर्चीची चिडचिड वाढल्याने
काल मिर्चीची चिडचिड वाढल्याने त्यांनी विश्रांती घ्यावी असं सुचवलं होतं, पण मीच घेतली विश्रांती. नंदीनी यांच्या पोस्ट्स सुरेख.
मुद्दा आपने केलेल्या कामांचा असेल तर त्याबद्दल मी कधीही प्रश्न विचारलेला नाही. आपला दोन मुद्यावर पाठिंबा मिळाला असं वाटतं. फ्री पाणी आणि स्वस्त वीज. फ्री वाय फाय हे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी असावं. तर ही तीनही कामे झालेली आहेत. )मोदींनी नेमकी कोणती कामं केली हे गुलदस्त्यातच आहे. त्यांनी जे काही केलय त्यामुळे असंतोष आहे जनतेत. तसंच काँग्रेसला गेल्या साठ वर्षात एव्हढं साधं का जमू नये हा प्रश्न सुद्धा रास्त आहे.)
ही कामं आप करू शकणार नाही, केलेली नाहीत याबद्दल माझे प्रश्न कधीही नव्हते. आम आदमी पक्ष हा राजकारणातला एक प्रयोग आहे असं सांगितलं गेलं होतं. भ्रष्टाचार उखडून टाकू यावर ज्यांना विश्वास ठेवायचा ते ठेवतील. मी उखडला का असं सुद्धा विचारणार नाही. पण .. जे मुद्दे स्कीप होत आहेत त्याबद्दल इतरही कुणी बोलत नाही. जर इतर पक्ष करत नाहीत म्हणून आम्ही केलं नाही तर का विचारता असा प्रश्न असेल तर पुढच्या वेळी या मत मागायला, तुम्हाला इतरांना जी जागा दाखवली ती दाखवू असं मतदार मनात म्हणतील्च. ४९ दिवसातल्या कारभारामुळे केंद्रात आपचा एकही निवडून येऊ शकला नाही यावरून मतदार नाराज होते हे ध्यानात घेऊनच गलती हुई जी म्हणालात ना ? मग पुन्हा गलती झाली तर लोक हेच म्हणतील की गलती हुई जी..
स्कीप होत असलेले मुद्दे. (इतर मुद्दे आता सोडून देत आहे).
१. रामलीला मैदानापासून केजरीवाल मोठे झाले. ज्या आंदोलनामुळे लोकांनी विश्वास टाकला त्या जनलोकपाल कायद्याचं काय ? केंद्रात वर्षभर लोकपाल नाही, गुजरातेत आता दहा वर्षे लोकायुक्त नाही. - काय करताय ?
२. फ्री पाणी कधी द्याल ? पाणी उपलब्ध असेल तेव्हांच ना ? आताच दिल्लीत टंचाई जाणवू लागली आहे. केजरीवाल म्हणतात शेजारच्या भाजपच्या राज्याने पाणी सोडलं नाही तर केंद्र सरकारचं पाणी बंद करू. आता अकेभक्त यावर खूष होतील. माझा प्रश्न असा की हे असं किती दिवस चालेल ? शेजारच्या राज्यात भाजपशी करार करून निवडणूक लढवलीये का ? दिल्लीला पाणी मिळावं यासाठी स्वतःची व्यवस्था असावी यासाठी काही ठोस योजना आहे काय ?
३. यमुना नदी दिल्लीत वाहते. केंद्राशी चर्चा करून या नदीचं पाणी शुद्ध करता येईल किंवा सोनीपतच्या पुढे नदीवर पाणी उपसा केंद्र बनवून ते पाणी दिल्लीत साठवण्यासाठी आणता येईल. त्यावर प्रक्रिया करता येईल. अशी कुठली योजना आपकडे असल्याचं आढळलेलं नाही. हे प्रश्न निवडणुकीच्या आधीपासून स्कीप होताहेत. निवडून आल्यानंतरही.
पाणी फ्री देऊन इतर गोष्टींवरचा टॅक्स वाढवून किती दिवस गाडी चालेल ? पाच वर्षे जायचीत. लोकांना तोपर्यंत केलेल्या कामाचा विसर पडेल. इतर कामांचे नियोजनच नसेल तर ५९ महीने काय करणार ?
योया प्रकरणाचा आपला खूप मोठा फटका नाही बसणार. पण लोकांच्या मनावर ओरखडा तर उमटलाच आहे. कदाचित ५९ महीन्यात विसरतील लोक.
पण केंद्रात लोकपाल नेमण्यावरून आंदोलन तरी हाती घ्यावं. दिल्लीत लोकायुक्त नेमण्यापेक्षा महत्वाचे आहे ते. बिल पास झालेले आहे, केंद्र टाळाटाळ करत असेल तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावा. तुमचं बाळ आहे ते. संसदेला वेठीस धरून जन्माला घातलेलं. आता त्याला अनौरस म्हणून सोडून द्यायचं का ? का ? काही योजना आहेत का केम्द्राविरुद्ध संघर्षाच्या ?
सोडून दिलेले मुद्दे :
वाराणसीत केजरींच्या उमेदवारीने मोदींना फायदा झाला हे दाखवून दिलेलं आहे. यावरून या दोघांत साटंलोटं आहे हे म्हणण्याला आधार आहे. याच विश्वासाने भाजपने आपला दिल्ली सोडली असं म्हणण्यास वाव आहे. हा मुद्दा यासाठी सोडून दिला कारण सध्या त्याचं मायबोलीवर तरी रिलेव्हन्स नाही.
सध्या म्हणण्याचं कारण असं की भाजप नको म्हणून आपला मत म्हणजे सब मिले हुए है जी च्या न्यायाने पुन्हा फसवणूक तर होत नाही ना हे पहायला हवंय. पाणी, वीज फ्री देऊन हिट अॅण्ड रन मुलाखतींमधले अंबानींवरचे आरोप ठंड्या बस्त्यात तर गेले नाहीत ना यावर सुद्धा लक्ष असायला हवं. कुठे गेले ते पुरावे ? कुठे गेली ती हातात नाचवलेली कागदपत्रं ? म्हणजे साठ वर्षे काँग्रेसने नागवलेल्या गोरगरीब अडाणी जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आम आदमी पक्ष काही करू शकेल का या दृष्टीने पाहील्यास त्यांच्याकडे कोणती योजना आहे ?
पूर्वी भाजप वि काँग्रेस असा सामना रंगवून भय दाखवून मत द्यायला लावत होते. आता काँग्रेसची जागा आप घेईल असा अंदाज आहे. कोंग्रेसम्मुक्त भारत या घोषणेत काँग्रेसची मतं फोडणारे कुणीतरी गृहीत धरले नसेल असं म्हणवत नाही. हे राजकारण आहे. पण कौन मिले हुए है जी हे पहायला हवंय इतकंच..
बाकी अनेक मुद्दे आता राहूच द्यात.
आप जे दिल्ली मध्ये काम करत
आप जे दिल्ली मध्ये काम करत आहेत त्याचा आढावा घेऊन तसे काम, त्या योजना महाराष्ट्रात आणता येतील का अशा प्रकाराची कंस्ट्रक्टीव चर्चा इथे कोणाला करायची इच्छा दिसत नाही. फक्त आप मधील अंतर्गत भांडणे जी सध्या चालू आहेत, त्याचे दळण दळत बसायचे. चांगले आहे.
If you care so much, become volunteer, participate and then be a judge. But that would be too much to ask 
AAP is newly formed political party. It is experimenting with lot of new things. It can not be full-proof. It is good to criticize if the party stray away from its election promises but it is their internal matter how they handle the organization and people who are not even remotely affiliated with AAP are commenting. But again, opinions are free to offer.
Pages