दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
<<ओके मिर्ची , तुमच्या
<<ओके मिर्ची , तुमच्या पोस्टवरुन अस कळतय की अके इज ओनली ट्रू man . काय सोलुशन असतील ती त्यांच्याकडेच . अगदी मेधाताई, योयो पण फिकेच .>>
वाटू शकतं असं तुम्हला. पण हे लिहिण्यापेक्षा योयांबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर दिलंत तर बरं होईल. पुढे चर्चा करता येईल.
प्रश्न पुन्हा लिहिते-
"वैकल्पिक राजनीती आणि भ्रष्टाचारमुक्त भारत" ह्या ध्येयासाठी आपची स्थापना होण्याआधी योगेंद्र यादव ह्यांनी केलेली ५ कामे सांगा.
<<या प्रश्नाचं उत्तर केजरीवाल देउ शकतील. त्यांनी का घेतलं ब्वॉ यादवांना आप मधे ? म्हणजे आप मधे बिनकामाच्या लोकांनाही महत्वाच्या जबाबदा-या देत होते का ? ते तर म्हणत होते की आम्ही माणसं तपासून घेतो...>>
तुम्ही गेलात तर तुम्हालाही घेतील ते. corrupt, criminal, communal ह्या ३-c च्या चाचणीत उतरणारा कोणीही आपमध्ये घेतला जाऊ शकतो. आत आलेले लोक पुढे काय काम करणार ह्याची जबाबदारी केजरीवालांवर नसून त्या लोकांवर आहे. त्यांनी अनुचित प्रकार केल्यास त्यांना ruthless होऊन बाहेर काढायची जबाबदारी केजरीवालांवर आहे. ती त्यांनी पार पाडली नाही तरच त्यांचा दोष.
महाराष्ट्राच्या कार्यकारणीत
महाराष्ट्राच्या कार्यकारणीत संघाच्या लोकांकडे अधिकार आहेत. दमानिया, मयंक गांधी, रवी श्रीवास्तव हे लोक संघाचे आहेत. समजावाद्यांकडे दुय्यम पदं आहेत.
मयंक गांधी, रवी श्रीवास्तव, अंजली दमानिया या तिघांची आप मधे येण्या आधीची पाच कामे सांगू शकाल काय ?
१
२
३
४
५
बाळू, आधी योयांचं उत्तर
बाळू, आधी योयांचं उत्तर द्या.
तुम्ही योया समर्थक नसाल आणि कालच्या प्रकाराबद्दल तुमचं काही मत नसेल तर एकच विनंती आहे की नवीन फाटे सध्या फोडू नका. मी ह्या लष्कराच्या भाकर्या भाजतेय. त्यामुळे सगळ्या मुद्द्यांवर एकत्र चर्चा करण्याइतका वेळ माझ्याकडे नाही. सध्या योयांबद्दल चर्चा चालू आहे. लेट अस स्टिक टु इट प्लीज.
<<त्यांनी अनुचित प्रकार
<<त्यांनी अनुचित प्रकार केल्यास त्यांना ruthless होऊन बाहेर काढायची जबाबदारी केजरीवालांवर आहे. ती त्यांनी पार पाडली नाही तरच त्यांचा दोष>>
------ किव्वा केजरीवाल यान्ची मनमानी, एक छत्री अम्मल न जुमानल्यास (अशी दुसरी शक्यता आहे) त्यांना ruthless होऊन बाहेर काढायची जबाबदारी केजरीवालांवर आहे.
ज्युलिअस सीझर, नेपोलियन,
ज्युलिअस सीझर, नेपोलियन, मुसोलिनी या सर्वांनी बुद्धीवाद्यांची हेटाळणी केली. सीझरने आणि नेपोलियन ने लोकशाही मार्गाने निवडून आलेल्यांची यथेच्छ अवहेलना केली. आपच्या मुंबई आंदोलनात संसद म्हणजे टॉयलेट, राज्यघटनेवर कुत्रं मुतताना दाखवणे हे प्रकार झाले. रामलीला आंदोलनाच्या वेळी संसदेला घेराव घाला असे आदेश अण्णा आणि केजरीवाल यांनी दिले होते. केजरीवाल यांचा लोकशाही मूल्यांवर असलेला विश्वास यातून त्या वेळी कळून आला होता.
आंदोलनाला विचार आवश्यक असतो,
आंदोलनाला विचार आवश्यक असतो, विचाराची मांडणी करता येऊ शकणारे बुद्धीवादी नेतृत्व हवे असते. सध्याच्या जमान्यात दूरचित्रवाणीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी आश्वासक पण बुद्धीमान चेहरा हवा असतो. यादवांचा दबदबा, लौकीक असा की त्यांचं बोलणं सुरू झालं की कुणीही विचार करणारा मनुष्य हातातलं काम सोडून थबकत असे. निखील वागळेंना आपल्या कार्यक्रमात यादवांनी सहभाग घ्यावा असं वाटत असे. यादव माहीत नाहीत असा क्वचितच कुणी असेल. त्यांच्या संयत शब्दांची मोहीनी कुणावर नसेल असं शक्य नाही. या इमेजचा फायदा होईल असं केजरीवालांना वाटलं नसेल ?
यादवांकडून वॉर्डस्तरीय कामांची यादी अपेक्षित असेल तर कार्ल मार्क्सने आयुष्यात काही काम केलं नाही असं म्हणावं लागेल.
<<आपच्या मुंबई आंदोलनात संसद
<<आपच्या मुंबई आंदोलनात संसद म्हणजे टॉयलेट, राज्यघटनेवर कुत्रं मुतताना दाखवणे हे प्रकार झाले.>>
ह्यावर विश्वास बसत नाही. लिंक द्या.
<<किव्वा केजरीवाल यान्ची मनमानी, एक छत्री अम्मल न जुमानल्यास (अशी दुसरी शक्यता आहे) त्यांना ruthless होऊन बाहेर काढायची जबाबदारी केजरीवालांवर आहे.>>
उदय, थोडा धीर धरा. आधीही लिहिलं होतं की खोटा रंग फार काळ टिकत नाही. ६ महिने, फार तर एक वर्ष. एवढाही वेळ नाही लागणार.
ह्यावर विश्वास बसत नाही. लिंक
ह्यावर विश्वास बसत नाही. लिंक द्या. >>>> सिरीयसली ?
तुम्हाला पोलीस कारवाई, टीव्हीवरच्या चर्चा यातलं काहीही माहीती नाही ? माझाच यावर विश्वास बसत नाही मिर्ची तै. गुगळून पहा. आपच्या व्यंगचित्रकाराला राजद्रोहाचं कलम लावल्यावरून अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गळे काढले होते सर्वांनीच. अंकित त्रिवेदी , पोलीस अॅक्शन या स्ट्रीगने गुगळून पहा...
<<आंदोलनाला विचार आवश्यक
<<आंदोलनाला विचार आवश्यक असतो, विचाराची मांडणी करता येऊ शकणारे बुद्धीवादी नेतृत्व हवे असते. सध्याच्या जमान्यात दूरचित्रवाणीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी आश्वासक पण बुद्धीमान चेहरा हवा असतो. यादवांचा दबदबा, लौकीक असा की त्यांचं बोलणं सुरू झालं की कुणीही विचार करणारा मनुष्य हातातलं काम सोडून थबकत असे. निखील वागळेंना आपल्या कार्यक्रमात यादवांनी सहभाग घ्यावा असं वाटत असे. यादव माहीत नाहीत असा क्वचितच कुणी असेल. त्यांच्या संयत शब्दांची मोहीनी कुणावर नसेल असं शक्य नाही. या इमेजचा फायदा होईल असं केजरीवालांना वाटलं नसेल ?
यादवांकडून वॉर्डस्तरीय कामांची यादी अपेक्षित असेल तर कार्ल मार्क्सने आयुष्यात काही काम केलं नाही असं म्हणावं लागेल.>>
यादव हे अमेझ्झिंग प्रवक्ता आहेत ह्यावर आंधळा-बहिरासुद्धा शंका घेणार नाही.
ठळक केलेल्या वाक्याबद्दल एकच वैयक्तिक मत - कॉफी टेबल सोशलिझ्म वाईट नसेल पण त्याने हाती फार काही लागलेलं दिसत नाही.
समाजवाद, कार्ल मार्क्स वगैरे मोठमोठी नावं घेऊन मला बुली करू नका ब्वॉ. शून्य वाचन आहे माझं (जसं नागरिकशास्त्र फक्त शाळेत शिकले तसंच) मी शास्त्रशाखेची विद्यार्थिनी आहे.
<<तुम्हाला पोलीस कारवाई,
<<तुम्हाला पोलीस कारवाई, टीव्हीवरच्या चर्चा यातलं काहीही माहीती नाही ? माझाच यावर विश्वास बसत नाही मिर्ची तै. गुगळून पहा. आपच्या व्यंगचित्रकाराला राजद्रोहाचं कलम लावल्यावरून अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गळे काढले होते सर्वांनीच. अंकित त्रिवेदी , पोलीस अॅक्शन या स्ट्रीगने गुगळून पहा...>>
तुम्ही मुद्दा मांडलात की पुरावे, लिंक्स तुम्ही द्यायच्या. मला लिंक्स चालतात.
ह्या असीम त्रिवेदीबद्दल बोलत आहात का?
https://www.google.co.in/sear
https://www.google.co.in/search?q=ankit+trivedi+cartoons,+india+against+...
https://www.google.co.in/search?q=ankit+trivedi+cartoons,+india+against+...
https://www.google.co.in/search?q=ankit+trivedi+cartoons,+india+against+...
"हम ना लेफ्ट के है, ना राईट
"हम ना लेफ्ट के है, ना राईट के. हमें हमें जनता की समस्याओं का समाधान जिस मार्ग में में मिलेगा वहां से हम ले लेंगे" हा केजरीवालांचा अप्रोच मला जास्त व्यावहारिक वाटतो.>>>>>>>>>>+१११११
केजरीवालांचा हा अप्रोच दिल्लीकरांना चांगलाच कळाला आहे.
जे आप ला सोडून पळत आहेत कींवा ज्यांची हाकालपट्टी होत आहे त्यांना जनतेच्या समस्येअशी काही देने-घेने असेल असे वाटत नाही.
या मुद्यावरून इतका गदारोळ
या मुद्यावरून इतका गदारोळ उठलेला की त्याच्या लिंक्स मागितल्याबद्दल आश्चर्य वाटले. थोडक्यात रामलीला मैदानावर अण्णांचं उपोषण झालं होतं या विधानावर कुणी अविश्वास दाखवून पुरावे मागितल्यावर जे काही वाटेल तसं..तर ते असो.
तुम्हाला आपबद्दल खडा न खडा माहीत असताना इतका मोठा गदारोळ माहीत नाही यावर विश्वास बसला नाही एव्हढंच.
अहो बाळूभौ, आता असीम त्रिवेदी
अहो बाळूभौ, आता असीम त्रिवेदी आपमध्ये आहेत हे सांगणारी लिंक पण देऊन टाका की लगे हाथ.
मेनका तै, मायबोलीवर स्वागत.
मेनका तै, मायबोलीवर स्वागत. तुम्ही मला एक आठव्ड्याने ज्येष्ठ आहात खरं तर
मिर्ची तै
अगदी अचूक ओळखलंत मिर्ची तै. मी चुकीचं नाव दिलेलं. तुम्ही असीम त्रिवेदी हे योग्य नाव विचारलेलं आहे. कोर्टाच्या निणयाची लिंक तुम्ही दिली आहे. पण या विषयावर जवळपास दोन आठवडे साधकबाधक चर्चा झालेल्या आहेत.
केवळ ६६ ए नाही.
राष्ट्रीय मानचिन्हांचा अवमान, राज्यघटनेचा अवमान हा राजद्रोहाचा गुन्हा आहे. ते कलम योग्यच होतं. पण टीव्हीवरून टीका सुरू झाल्याबरोबर पोलीस गांगरले आणि आबांनी आम्ही त्रिवेदी ला विनाशर्त सोडून देण्यास तयार आहोत असं जाहीर केलं. कोर्टात लिहून दिलं.
गंमत म्हणजे एका मोठ्या नेत्याच्या निधनानंतर जो सक्तीचा बंद पुकारला होता त्याविरुद्ध कमेण्ट केल्याबद्दल दोन मुस्लीम मुलींना पोलिसांनी कायद्यात तरतूद नसताना रात्री ताब्यात घेतल. त्यांच्याविरुद्ध धार्मिक तेढ उत्पन्न केल्याची कलमं लावली. त्या वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल गळे काढणारे कुणीही पुढे आले नाहीत की कुठल्याही मराठी वाहीनीवर त्याबद्दलचा कार्यक्रम झाला नाही.
असीम त्रिबेदी ने काढलेले कार्टून्स जर कुणी महंमद शेखने काढले असते तर ? सोचो...
बाळूभौ, लिंक सापडली की नाही?
बाळूभौ, लिंक सापडली की नाही?
......
......
मिर्ची तै असीम त्रिवेदी आप
मिर्ची तै
असीम त्रिवेदी आप मधे कशाला हवेत ?
ही चित्रं उपोषण स्थळाच्या ठिकाणी लावण्यात आलेली होती. जिथे अण्णा निवांत पहुडले होते. त्या स्टेजला दर्शनी भागात या चित्रांनी शोभा आणलेली होती. आता याचीही लिंक हवी असेल तर सॉरी !!
मिर्ची-१, बाळूभौ-० ओक्के,
मिर्ची-१, बाळूभौ-०
ओक्के, आता बिझी. नंतर बोलू.
मेनका तै असू द्यात. त्याच्या
मेनका तै
असू द्यात. त्याच्या लिंक्स वर दिलेल्या आहेत तेव्हां कारवाई या कारणाने झालेली असेल तर ती अन्यायकारक आहे असं म्हणावं लागेल. सूचक हा आयडीही याच प्रवृत्तीचा असेल असं म्हणावं लागतंय. अन्याय करणा-यांच्या अशा अन्यायाविरुद्ध लढणा-यांना अशा कारवाईला तोंड द्यावंच लागतं.
@ अॅडमिन
वर मेनका तै म्हणतात ते खरं आहे काय ?
इथे असीम त्रिवेदी च्या चित्रांच्या लिंक्स दिलेल्या आहेत. काय म्हणणं आहे आता ?
बाय मिर्ची तै... आज शेअर
बाय मिर्ची तै...
आज शेअर बाजार बंद, तेव्हां मला सुट्टी.
मिर्ची -१ की मेनका १ ?
मिर्ची -१ की मेनका १ ?
बाळ जंपे, तुमचे पण स्वागत.
बाळ जंपे, तुमचे पण स्वागत. बरे हायत न्ह्व?
मिर्ची तै असीम त्रिवेदी आप
मिर्ची तै
असीम त्रिवेदी आप मधे असल्याच्या लिंक्स बद्दल एव्हढं का लावून धरताय ? असीम त्रिवेदी आप मधे आहेत असं म्हटलेलं नाही मी. केजरीवालांचा लोकशाही मूल्यांवरचा विश्वास त्या वेळी दिसून आला असं म्हटलंय. याचा आप मधे त्रिवेदी असण्याशी काय संबंध बुवा ? या धाग्याचा आणि आपचा ही नायक केजरीवाल आहेच ना ?
तुम्ही पहा बर अडचणीच्या कित्येक प्रश्नांना बगल दिलेली आहे. आम्ही काय मागे लागलो का उत्तरासाठी ?
हे विचार चैतन्य आंग्रे या आय
हे विचार चैतन्य आंग्रे या आय डी चे होते. ज्याची कंप्लेट सुचक या आय डी ने admin कडे केली होती व दोन्ही आय डी उडाले होते. >>
आपले विचार कळाले मेनका तै. आपण लांबर राहूयात एकमेका पासून. गुडबाय !
मिर्ची फारच सुंदर प्रतिवाद
मिर्ची फारच सुंदर प्रतिवाद करतायत.
<<ही पोस्ट मिर्ची ताई साठी आहे . बाकीचानि लोड घेऊ नये. धन्यवाद . कृपया>>
ज्या धाग्यावर चर्चा चालू आहे तिथे आपल्याला निरुत्तर करणारी विधाने आल्यावर इतरांनी 'गप्पं बसा ' असे म्हणून अप्रत्यक्षरित्या दटावणे हे काही खरे नाही.

मी ह्या लष्कराच्या भाकर्या
मी ह्या लष्कराच्या भाकर्या भाजतेय. त्यामुळे सगळ्या मुद्द्यांवर एकत्र चर्चा करण्याइतका वेळ माझ्याकडे नाही >>>लषकरच्या भाक-या भाजू नका. सो सिंपल.
माझ्या प्रतिसादातले सोयीचे तेव्हढेच मुद्दे तुम्ही कधीपासून घेताय आणि गैरसोयीचे सोडून देताय. तेव्हां अमूक एका मुद्यावरच बोलूयात कारण तुमच्याकडे वेळ नाही याला काही अर्थ नाही.इतर लोक रिकामटेकडे आहेत का ? तुम्हाला कुणीही सक्ती करत नाहीये. आमचं सोडा, पण तुमच्याकडून आता असे प्रतिसाद येऊ लागलेत जे अपेक्षित नाही.
मिर्ची ताई, जंप करा.
मिर्ची ताई, जंप करा.
मेनका १ आणि सुचक हे पुरोगामी
मेनका १ आणि सुचक हे पुरोगामी आयडीज असल्याबद्दल आनंद व्यक्त करावा की खेद ?
@ मिर्ची तै
तुमच्याकडे मुद्दे शिल्लक नाहीत अस्म दिसतंय. आधी योयांचं उत्तर द्या वगैरे आग्रह म्हणजे तुम्हाला मयंक गांधी, दमानिया याबद्दल उत्तर द्यायचं नाही असं सुचित करत आहे. याच पद्धतीने माझ्या प्रतिसादातून वेचक तेव्हढं उचलताना जे सोडलं गेलंय त्याची लिस्ट इथे द्यावी का ? ( काय काय सोडून दिलेलं आहे याची नोंद घेतली होती फक्त, कारण सध्या जसे प्रतिसाद येताहेत तसे यापूर्वी नव्हते आलेले).
तर आधी योयांचं उत्तर द्या म्हटल्यावर योयांचं महत्व काय आहे हे सांगितल्यावर तुम्ही अक्षरशः गामा पैलवानाला लाजवेल असा प्रतिसाद दिलाय म्हटल्यावर आता अपेक्षा ठेवण्यात खरंच काही अर्थ नाही. एनी वे, चालू द्या तुमचं.
चैतन्य आंग्रेची पोस्ट तर काही
चैतन्य आंग्रेची पोस्ट तर काही या धाग्यावर सापडली नाही. पण असीम त्रिवेदीने काढलेल्या कार्टून्सबद्दल एक नाही, दोन नाही तीन तीन आयड्यांना ठाऊक नसावे आणि वस्तुस्थिती लिहील्याबद्दल अॅडमिनकडे तक्रार करणे आणि त्यावर कारवाई झाल्याची बातमी दुस-याने पुरवणे हे मनोरंजक आहे.
सगळे कसे एका लायनीत सापडले.
Pages