Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह, सहीच की..पण आता अमॅझॉन
ओह, सहीच की..पण आता अमॅझॉन वरुन मागवायला उशीर झालाय. टारगेट / वालमार्ट मधे बघायला हव्या.
मायक्रोवेव्ह मधे गरम करताना
मायक्रोवेव्ह मधे गरम करताना पेपर टॉवेल खाली ठेवला तर सॉगी नाही लागणार..
रंगीत कपड्यावरील हळदीचा डाग
रंगीत कपड्यावरील हळदीचा डाग कसा काढावा?
व्हिनेगर, बेकींग सोडाने डाग नाही निघत आहे.
हळदीचा डाग त्याला साबण न
हळदीचा डाग त्याला साबण न लावता कडक उन्हात तीन-चार दिवस वाळवून घेणे. नंतर व्हिनेगर लावून पाण्याने धुणे, कपडा खडखडीत वाळू देणे. मग व्हॅनिश वापरून कपडा नेहमीप्रमाणे धुवून टाकणे. हळदीचा डाग गायब.
धन्यवाद मंजूडी! करुन बघते.
धन्यवाद मंजूडी! करुन बघते.
वॉव भारी आयडिया मंजूडी. हेच
वॉव भारी आयडिया मंजूडी. हेच पांढर्या कपड्यांवरच्या डागासाठीही ना?
हळदीचे डाग काढण्यासाठीची ही
हळदीचे डाग काढण्यासाठीची ही स्वानुभवी युक्ती आहे. कपड्याचा रंग कुठलाही... फक्त काळ्या रंगाच्या कपड्यावर हळदीचा डाग अजून पडला नाहीये, त्यामुळे काढला नाहीये
कपडा न धुता कडक उन्हात वाळवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढची कृती.
ओके.
ओके.
फ्लॉवरची भाजी (त्याच त्या
फ्लॉवरची भाजी (त्याच त्या चवीची) खायचा जाम कंटाळा येतो. साखि स्टाईल भाजी दा कू असल्यामुळे घरातल्या काही मेंब्रांना चालत नाही. म्हणून मग आज फ्लॉवरच्या भाजीच्या कृतीला जरा वेगळे वळण दिले. तव्यावर थोडेसे तेल गरम करून फ्लॉवर (तुरे) खरपूस परतून घेतला. नेहमीसारखी तेलाची फोडणी करून त्यात धणे जिरे पूड घालून परतले व फ्लॉवर तुरे, गोडा मसाला, काळा मसाला, मीठ, किंचित आमचूर पावडर घालून परत परत परतले. पाण्याचा एक हबका सर्वात शेवटी मारला व मिनिटभर झाकण ठेवले. कुरकुरीत व स्वादिष्ट फ्लॉवर भाजी तयार झाली आहे!
फरसबीच्या भाजीच काय करता
फरसबीच्या भाजीच काय करता येईल ??
म्हणजे मुळातच वेगळी भाजी कशी करावी ??
मी लसूण , जिर्याची फोडणी देते . आमचूर , गरम मसाला , कोथिंबिर घालून परतते .
पण भाजी नीट मिळून येत नाही .आणि कच्चट लागते .
काही वेगळी पाक्रु आहे का?
आता भिजवलेली वाटीभर भाजी फ्रिजभर पडली आहे , कशात ढकलू ?
आमची आलू-गोबी आवडेल बघ तुला
आमची आलू-गोबी आवडेल बघ तुला अरुंधती. तेलात अद्रक, जीरे, ओबडधोबड कुटलेले धणे, हिरव्या मिरच्या अशी फोडणी करायची. त्यात फ्लॉवरचे तुरे, बटाट्याच्या लांब काचर्या, मीठ, धने पुड, गरम मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा तंदुरी चिकन मसाला घालायचा. व्यवस्थित परतून मग २-३ मिनीट गच्च बसणारं झालण ठेवायचं. नंतर झाकण काढून परत भरपूर परतायचं. भाजीला सुटलेलं सगळं पाणी आटून भाजी खरपुर झाली पाहिजे. वरून लिंबू पिळयचं आणि कोथिंबीर घालायची.
स्वस्ति, फरसबी वाटीभरच असेल
स्वस्ति, फरसबी वाटीभरच असेल तर मटकीच्या उसळीत ढकलता येईल. नाहीतर पूनमने उडदाची डाळ भिजत घालून लिंबू पिळून फरसबीची भाजी करण्याची कृती लिहिली आहे, आणि ललीने सांबार मसाला घालून करण्याचे कृती लिहिली आहे.
भिजवलेली वाटीभर भाजी म्हणजे
भिजवलेली वाटीभर भाजी म्हणजे फरसबीची का?
फरसबी म्हणजे बीन्सच्या शेंगा ना?
कि कुठल्या दाण्यांबद्दल बोलताय?
फरसबी म्हणजे बीन्सच्या शेंगा
फरसबी म्हणजे बीन्सच्या शेंगा ना?>>>> ललिता-प्रीतिची रेसिपी वाचाच मग.
हे पण बघा. http://www.maayboli.com/node/15041
अल्पना, कृतीवरून चव मस्तच
अल्पना, कृतीवरून चव मस्तच लागेलसं वाटतंय. नक्की करून बघेन, थँक्स!
फरसबी म्हणजे बीन्सच्या शेंगा
फरसबी म्हणजे बीन्सच्या शेंगा ना? >>> हरदासाची कथा मूळपदावर
मंजू, सांबार मसाला घालून वांग्याची भाजी होती, गं...;) कांदा-उडीद डाळ घालून फरसबीची.
अकु, अल्पनाच्या व्रत के आलू
अकु, अल्पनाच्या व्रत के आलू रेसिपीच्या धाग्यावर मी ज्या पुस्तकाबद्दल लिहिले आहे त्यात फ्लॉवरच्या बर्याच रेसिपीज आहेत, एकदा जमल्यास वाचून बघ. छोटेसे पुस्तक आहे ते.
मी काहीवेळा फ्लॉवरच्या भाजीला पंचफोडण घालून फोडणी करते. कधी ग्रेव्हीवाली भाजी हवी असेल तर ताजे टोमॅटो ब्लांच करून त्याची प्युरी बनवताना, धने, मिरे आणि सुके खोबरे घालते. फोडणी करून फ्लॉवर जरा परतला की ही प्युरी घालून थोडावेळ भाजी शिजू द्यायची. मस्त लागते
अय्या हो की लले.
अय्या हो की लले.
नोट करून ठेवते संपदा. थँक्स!
नोट करून ठेवते संपदा. थँक्स!
सांबार मसाला घालून घेवड्याची,
सांबार मसाला घालून घेवड्याची, पालक, कोबी, भोपळ्याची भाजीही छान लागते. घेवड्याला अगदी किंचित सांबार मसाला पुरतो. फळभाज्यांसोबत सांबार मसाल्याचा स्वाद इन जनरल पूरक ठरतो. चवीत बदल म्हणून मी ट्राय करते अनेकदा.
खूप संत्री आली आहेत एका
खूप संत्री आली आहेत एका शेतातून. त्याचं सरबत करून ठेवलं आहे. त्यात प्रिझर्वेटिव म्हणून काही घालायला हवं का? असेल तर काय आणि किती प्रमाणात?
साखरेचा पाक करून तो थंड करून त्यात संत्र्याचा रस ओतला.
मानुषी, पाक पक्का अन भरपूर
मानुषी, पाक पक्का अन भरपूर असेल तर सरबत टिकेल. फिजमध्ये काही दिवस अजून जास्त. केमिकल प्रिझर्व्हेटीव्ज वापरून जास्त टिकेलही पण त्याला तो एक टिपिकल दर्प येतोच काही दिवसांनी. नपेक्षा, बाटली घट्ट बंद करून फ्रिजात टाकणे अन फार दिवस वाट न पाहाता संपवून टाकणे हे बेस्ट.
बाकी मार्म्लेड, जॅम करता येईल.
एवढी संत्री आहेत, त्याची सालं
एवढी संत्री आहेत, त्याची सालं न फेकता, वाळवायची सावलीमध्ये. खडखडीत वाळली की बारीक पावडर करायची. ही पावडर उटण्यासारखी अंघोळीला वापरता येते. दिवसभर फ्रेश सिट्रस सुवास दरवळ्तो. डिओ ची गरज पडत नाही.
मानुषी, वर योकु ने
मानुषी, वर योकु ने लिहिल्याप्रमाणे पाक अगदी पक्का हवा. शंका असेल तर प्रिझर्वेटीव्ह घालायला हवे. ज्या दुकानात ते मिळायची शक्यता आहे, त्यांच्याकडेच संत्र्याच्या सरबतासाठी कुठले योग्य आणि प्रमाण किती, ते सांगतील. अगदी काही ग्रॅमच घालायचा असतो.
तसेही सरबत आता उन्हाळ्यात ( यावर्षी असलाच तर ) संपून जाईल म्हणा !
गोबी मांचुरिअन ग्रिल करून
गोबी मांचुरिअन ग्रिल करून मस्त लागते.
फ्लॉवर मैदा +कॉर्नफ्लॉवर +सोया सॉस+ पाण्याच्या मिक्स्चर मध्ये बुडवून ग्रिल करायचे. थोडस तेल वरून घालायच ग्रिल होताना. नंतर आपल्या नेहमीच्या पद्धतीने सॉस करून मांचुरिअन तयार. एकदम कमी तेलात होते. चव अर्थातच तळलेल्या मांचुरिअन पेक्षा थोडी कमीच चविष्ठ लागते. पण कॅलरीज कमी.
दुसरी मेथड :फ्लॉवर ग्रिल. तुरे थोडे मोठे ठेवायचे. तेल लावून ४०० फॅ ला खरपुस ग्रिल करुन त्यावर चाट मसाला, तिखट मीठ,जीर्या धन्याची पावडर घालून एकदम जबरी लागतात.
फरसबीची भाजी शेंगदाण्याचा
फरसबीची भाजी शेंगदाण्याचा कुट, लसून, मसाल्याचे तीखट,मीठ आणि जीर्या धन्याची पावडर घालून मस्त लागते. पाणि अगदीच लागल तरच. वाफेवर शिजवायची.
अकु, मुळ्याचा ठेचा/चटका इथे
अकु, मुळ्याचा ठेचा/चटका इथे मिळेल वाचायला
धन्यवाद तायांनो . पण काही
धन्यवाद तायांनो .
पण काही केली तरी ती भाजी मिळून येत नाही . फळफळीतच लागते .
आता भिजवलेली वाटीभर भाजी फ्रिजभर पडली आहे ,>>> मुद्राराक्षस . आता शिजवलेली वाटीभर भाजी फ्रिजमध्ये पडली आहे ,
सांबार मसाला घालून घेवड्याची, पालक, कोबी, भोपळ्याची भाजीही छान लागते>>>>
अक्क्कुताई , यु आर मल्टीप्ल्याईंग माय कन्फ्युजन
आता हा घेवडा कोण ??? ( मनातल्या मनात : तरी साबा म्हणतातच ,... कधीतरी कीचनमध्ये लक्ष देत जा गं बाई )
आता इत्क्या लोकांनी सल्ले
आता इत्क्या लोकांनी सल्ले दिलेत तर एक माझा पण
आई फरसबीच्या शेंगा थोड्या वेळ पाण्यात उकळते आणि मग फोडणी देते. तसं करून पहा. मग ते फोडणी, नारळ वगैरे नेहमीचे यशस्वी कलाकार. मी स्वतः नारळ नेहमीच हाताशी नसतो म्हणून परतून झाल्यावर धण्याची पावडर घालते आणि बंद करायच्या जस्ट आधी घरगुती गरम मसाला.
गुढीपाडव्यानंतर साखरेच्या
गुढीपाडव्यानंतर साखरेच्या डब्यात पडून राहाणाऱ्या बत्ताशाच्या गाठी संपवायच्या दोन पध्दती नुकत्याच कळाल्या.
१. चहासाठी पाणी उकळताना एकेक गाठी सुट्टी करून त्यात घालणे. चवीनुसार साखर अॅडजस्ट करणे.
२. कैरीचे पन्हे करण्यासाठी प्रेशरकुकरला कैरी उकडली की ती बाहेर काढल्या काढल्या अगदी गरम असताना त्यात गाठी घालणे. लगेच विरघळतात त्या उष्णतेने म्हणे!
Pages