अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहीद आझाद आम आदमी पार्टीचे मुसलमान विंगचे अध्यक्ष यांनी केजरीवालची नविन स्टींग टेप जाहीर केली आहे,

शाहिद आझाद यांचा दावा आहे की केजरीवाल यांना ५ पेक्षा जास्त मुसलमान लोकांना तिकिट द्यायच नव्हत , त्याबद्दलची ही टेप.

कुठलिच टेप स्टींग टेप वाटत नाहिय.
जसे सुनबाई सासुबाईंना विचारतायत भाजी काय करायची आणि सासुबाई सांगत आहेत वांग्याची भाजी कर.अश्या टायपच्या टेप आहेत. लोकांना बिजली,पाणीशी मतलब.

अरे भल्या गृहस्थांनो, त्या आख्ख्या ऑडिओ क्लिपमध्ये पैसे किंवा पद देण्याघेण्याबद्दल अवाक्षर तरी आहे का??? :कपाळाला हात लावलेली बाहुली:

<<१६ जुलैला केजरीवाल नी चिवचिव (tweet) केले होती की भाजप कोग्रेस मधुन ६ कोग्रेस चे MLA खरेदी करायचा प्रयन्त कर आहे २० कोटी प्रत्येकी, २ मंत्रीपद आणि ४ चेअरमन.>>

एक्झॅक्टली. असं काहीही केजरीवालांनी ऑफर केलेलं पकडलेलं स्टिंग असेल तर दाखवा की बुवा. हे काय पाणचट स्टिंग्ज आणून राह्यलाय?

काँग्रेसचा सपोर्ट घेऊन सरकार बनवूया म्हणून राजेश गर्ग मागे लागले होते. 'तुम्ही म्हणत आहात तर ६ लोक बाजूला येऊन बाहेरून समर्थन देत असतील तर बघा' असं म्हणत त्यालाच गुंतवून ठेवलंय. मुत्सद्देगिरी. अके इज अ वाइज मॅन Happy

हे बघा, घोडेबाजार असा असतो. ४ कोटी रूपये+विधानसभेचं तिकीट+निवडणूक लढवायचा खर्च+चेअरमनची खुर्ची !

दुसरं स्टिंगपण आलंय म्हणे. अजून ऐकलं नाही. पण त्यात म्हणे केजरीवाल मुस्लिम मतं मिळवण्यासाठी मुस्लिमच उमेदवाराला तिकीट द्यायची गरज नाही असं म्हणताना पकडलंय. निष्कर्ष काय तर ते सांप्रदायिक आहेत ! Lol
"Talking to Zee News, Azad said, "Kejriwal said Muslims won't vote for Congress, so, whether we give tickets to Muslim candidates or not, the minority community will vote for AAP anyways."

मेनका, अगदी अगदी.
ह्या स्टिंग्जमुळे एक फायदा मात्र झाला. प्रभू आणि योयांना पीएसीमधून बाहेर काढल्यानंतर ट्वीटरवर आपसमर्थकांमध्ये चांगलीच फूट पडली होती. ह्या बिनडोक स्टिंग्जमुळे सगळे पुन्हा एकजूट झालेत आणि धमाल करत आहेत Lol

रमाकांत,
तुमची चित्रे सांगतात की अके मुस्लिम अपीजमेंट करतात.
आणि तुम्ही लिहिलंय की <<शाहिद आझाद यांचा दावा आहे की केजरीवाल यांना ५ पेक्षा जास्त मुसलमान लोकांना तिकिट द्यायच नव्हत , त्याबद्दलची ही टेप.>>

एक काहीतरी ठरवा बुवा. अके मुस्लीम तुष्टीकरण करत आहेत की करत नाहीत. म्हणजे कशाचा विरोध करायचा ते ठरवता येईल. Proud

:G:

मिर्ची तै त्याच काय आहे ना !! की, काही केल तरीही केजरीवाल हे बरोबरच असतात हे आताच आम्हाला समजल !!

रमाकांत,
FYI 'पार्टी विथ अ डिफरन्स' हे भाजपाचं घोषवाक्य आहे (आणि तो डिफरन्स आम्ही गेले १० महिने अनुभवतोच आहे !)

आपचं एक महिन्याचं रिपोर्ट कार्ड.
मिडियाला चर्चा करायची तर ह्यावर करावी किंवा ह्याच्यावर .
किंवा मग ह्याच्यावर - प्रत्येक विधानसभेत आपापल्या आमदाराला दररोज भेटता येण्यासाठीचं वेळापत्रक आणि हेल्पलाइन नंबर.
किंवा मग ह्याच्यावर- No peons or bells for Delhi government's aam-aadmi panel

एका 'प्रादेशिक' पक्षाच्या अंतर्गत बाबींवर एवढा वेळ चर्चा करण्यापेक्षा त्या सरकारच्या कामांवर चर्चा का होत नाहीये? आम्हाला त्यात जास्त रस असायला पाहिजे. गॉसिपिंगमध्ये नाही.

लिंकांची अ‍ॅलर्जी असणार्‍यांनी कृपया ही पोस्ट वाचू नये.

"आप एक सीडी महासम्मेलन कराइए, जितने स्टिंग्ज और सीडीज है सब एक साथ इकठ्ठा किजीए, कम्पाइल करके एक साथ चलाइए, बहोत दिन से बच्चों की अच्छी फिल्में नहीं आई है, तो उन्हें एक कार्टुन देखने को मिल जाएगा"
- कुमार विश्वास Biggrin

मिर्ची तै,

विकास के काम पे ध्यान दें !!

अश्या वेगाने " स्टींग" येत राहीली तर ह्या ५ वर्षे नंतर काय करणार याचा "आप" ला विचार करुन ठेवावा लागेल.

परत एकदा सांगतोय,
"आआपची हार" ही जनतेच्या अपेक्षेची हार असेल, व ती पचवण सर्वांनाच खुप कठीण जाईल !!

सर्व सर्कस आहे... माझ्याकडे पुरावा आहे, कॅसेट आहे, फिल्म आहे - पण त्याच्यात मधुन खुप काही निघत नाही आहे.

निरन्कुश टिका करण्यापेक्षा त्यान्ना अजुन थोडा काळ द्यायला हवा... किमान वर्ष तरी मग मुल्यमापन करा ना. हेच मी मोदी यान्च्याबद्दलही लिहीले होते. पण येथे निव्वळ टिका, टिका आणि टिका.... काम तरी कसे करणार ?

जनतेच्या (दिल्ली तसेच बाहेरच्या) माफक अपेक्षा आहेत, आणि त्या अपेक्षा पुर्ण करण्याची जबाबदारी निवडुन आलेल्या पक्षावर आहे.

<<जो जीत कर बिखर जाये उसे AAP कहते हे>>
स्वप्निल, स्वप्नातून लवकर बाहेर येण्यासाठी शुभेच्छा.

लिंबूभाऊ, करमणूक कर द्यावा लागेल हां.
खरंतर ह्या धाग्यापेक्षा जास्त करमणूक तर मोदी-मुफ्ती युतीच्या राज्यात चालू आहे. जरा उलगडून सांगा की आम्हाला त्यातली मर्म Wink

आसिफमियांकडे स्टिंग आहेत हे अनेक महिन्यांपासून नुसतंच सांगत आहेत. पण आजसुद्धा मिडियाला ठेंगाच दाखवला Lol

आप सध्या ज्या स्तिथीतून जात आहे राजकारणात ती स्तिथी अपरिहार्य असते. आपमध्ये कोणीही येवो कोणीही जावो
दिल्लीतील जनतेला फरक पडणार नाही.कारण केजरीवाल ह्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. केजरीवाल हे राजकारणात उतरले आहेतच तर त्यांना राजकारणातील विरोधकांशी सामना करावाच लागेल मग ते स्व पक्षातील असो वा विरोधी पक्षातले ह्यातूनच त्यांचे नेतृत्व तावून सुलाखून निघेल.केजरीवाल ह्यांच्या तोंडावर तीळा एवढा डाग पडला तरी शिमगा करणाऱ्या विरोधकांना नखशिखांत बरबटलेले स्वताचे लाडके नेते दिसत नाहीत ह्याला काय म्हणावे..

सचिन +१

मनिष सिसोदियांची फेबु पोस्ट -
"It has been one Month since your government was sworn-in. Here is a brief list of things we were able to accomplish together in this first month:
First 30 days of your government"

मनमौजी, आता तुम्हीच सांगा - "आपं भजे, मनिषं भजे" का करू नये? Wink

मोदी सरकारकडूनही हीच अपेक्षा होती. १ वर्षात फार मोठ्ठा बदल होणार नाही हे सगळ्यांनाच मान्य होतं/आहे. पण निदान त्या दिशेने वाटचाल होतेय हे तरी दिसायलाच हवं. विरुद्ध दिशेचा रस्ता पकडला की ओरड होणारच. अजूनही सावरावं.

सचिन भै ,

+++++++तीळा एवढा डाग पडला तरी शिमगा करणाऱ्या विरोधकांना नखशिखांत बरबटलेले स्वताचे लाडके नेते दिसत नाहीत ह्याला काय म्हणावे.+++++++

नखशिखांत बरबटलेले स्वताचे लाडके नेते म्हणजे कोयले की कालिख अस तुम्हाला सुचवायच आहे का ?

Pages