अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यामध्ये बालगंधर्व-संभाजीपार्क-डेक्कन जिमखान्या जवळ वायफाय फ्रीकनेक्शन उपलब्ध होते असे आठवते... कुणाचे आहे ते?

प्रोजेक्ट्स असेच लाँच होतात ना? आपच्या सो कॉल्ड उच्चशिक्षितांना याची कल्पना नाहि? >> ते रेल्वेमंत्री रेल बजेटच्या आधी लोकांच्या सूचना मागवतात.. सुपर-राष्ट्रभक्त (अनिवासी Wink ) पंप्र निती आयोग आणि इतरही बर्‍याच गोष्टींवर लोकांना सूचना द्या म्हणतात.. त्यांच्याकडेही उच्चशिक्षित नाहियेत बहुतेक Happy

मनीष, श्शSSS.
असं नाही बोलायचं. त्या विकासाभिमुख, राष्ट्रवादी सूचना असतात !

मिर्ची ताई - आता २१ आमदारांना पार्लमेंटरी सेक्रेटरी केले म्हणे. ते सुद्धा दबावामुळे.
केजरीवाल ला काय झालय? ह्या २१ लोकांना ऑफिस, ट्रान्स्पोर्ट वगैरे मिळणार. मंत्री करता येत नाही म्हणुन ही पळवाट.

काहीतरी जाम चुकतय.

केजरीवालांकडे वाय-फाय पुरवायचा सगळा स्टडी / प्लान तयार असेल कदाचित. पण अजून नागरिकांच्या काही अपेक्षा असतील तर सुचना मागवत असतील. ठिकच आहे की. सजेशन स्किम्स सगळीकडे (कंपन्यांमध्ये / संस्थांमध्ये) असतातच. कधी कधी त्यातून एकदम चांगलं सोल्युशन मिळून जातं. वेगवेगळी सरकारं आता हे राबवत असतील तर चांगलंच आहे.

<<मिर्ची ताई - आता २१ आमदारांना पार्लमेंटरी सेक्रेटरी केले म्हणे. ते सुद्धा दबावामुळे.
केजरीवाल ला काय झालय? ह्या २१ लोकांना ऑफिस, ट्रान्स्पोर्ट वगैरे मिळणार. मंत्री करता येत नाही म्हणुन ही पळवाट. काहीतरी जाम चुकतय.>>

दबावामुळे? हे कुठून कळलं?
टोचा, एकेका मंत्र्याकडे ५-५ पोर्टफोलिओज आहेत. प्रत्येक विभागातील गरजा, अडचणी एका व्यक्तीला कळतील ही अपेक्षा अवाजवी नाही का? आमदारांचा लोकांशी थेट संबंध असतो. म्हणजे आपच्या आमदारांचा तरी असायलाच हवा (इफ दे क्लेम सो). नागरिक आणि मंत्री ह्यांच्यामधला एक दुवा म्हणून हे सेक्रेटरी काम करतील. जर त्यांना त्यासाठी अतिरिक्त वेतन/भत्ता मिळणार नसेल तर त्यात हरकत घेण्यासारखं काय आहे?

नागरिक आणि मंत्री ह्यांच्यामधला एक दुवा म्हणून हे सेक्रेटरी काम करतील. जर त्यांना त्यासाठी अतिरिक्त वेतन/भत्ता मिळणार नसेल तर त्यात हरकत घेण्यासारखं काय आहे?>>>>>

हे काम करण्यासाठीच त्यांना आमदार म्हणुन निवडुन दिले आहे. आधीच्या सरकार ला हे करायची गरज का पडली नसावी? सध्याची नोकरशाही आहेच ना काम करुन घ्यायला.

वेतन तर आमदारकीचे मिळतच आहे ( जे भरपुर आहे )त्यामुळे अजुन वेतन देण्याची काहीही गरज च नाही, त्यामुळे त्याचे कौतुक करूच नका. पण ह्या सेक्रेटरी बनण्याच्या नावाखाली सरकारी गाड्या, ऑफिस मग त्या ऑफिसचा स्टाफ वगैरे मिळणारच आहे.
आता महाराष्ट्र सरकारनी ८० आमदारांना पार्लमेंटरी सेक्रेटरी नेमले तर तुमचे काय म्हणणे असेल.

these secretaries will get ministerial status, transport for official purposes and space in the minister's office.

सध्या आआप काम करत आहे. आणि दुसरी कडे केंद्राचे राज्यातले सरकार आधीच्या सरकारने तिजोरी रिकामी ठेवली आहे म्हणत सगळ्या जगाला वाटायला सुरुवात केली आहे. तिजोरी मोकळी आहे तर वाटत कशाला बसले आहे? हे मात्र विचारायचे नाही Wink
आणि हो पीएमओ ला माहीती अधिकारात विदेशी दौर्यांबद्दलचा खर्च विचारला तर नकार दिला गेला. हीच काय ती पारदर्शकता. सब जुमला है जी जुमला Rofl

>>ते रेल्वेमंत्री रेल बजेटच्या आधी लोकांच्या सूचना मागवतात..<<
बहुतेक तुम्ही मिर्चिताईंनी दिलेले १० प्रश्न वाचलेले दिसत नाहि किवा ते तुम्हाला समजलेले दिसत नाहि. तुमच्या सोयीकरता परत एकदा खाली देतो; अ‍ॅट लिस्ट ठळक केलेले प्रश्न वाचा. कुठल्या अँगलने ते तुम्हाला लोकांच्या अपेक्षा/सुचना वाटत आहेत? एक ग्राहक म्हणुन जेंव्हा तुम्ही तुमच्या गरजा/अपेक्षा देता ते एंड प्रॉड्क्ट डोळ्यासमोर ठेउन; तो एंड प्रॉड्क्ट कुटल्या मेथ्डॉलॉजी/आर्किटेक्चर नुसार बनवावा ते तुम्ही ठरवता कि प्रोजेक्ट टीम?

ठळक केलेले प्रश्न तुम्हाला सुचना वाटत असतील तर नाईलाजाने तुमचा चष्मा वाजवीपेक्षा जास्त गडद आहे असंच म्हणावं लागतंय... Happy

Q 1. How do you define public wifi? Kindly suggest case studies on public wifi from other parts of the world.
Q 2. What should be the ideal level of access to public wifi? Can it be made available right upto your doorstep?
If yes, what are the feasibility and technological challenges? Or shud it be available at well-defined public spaces in neighbourhoods?
Q 3. What is the infrastructure and technology required to create the public WiFi network?
Q 4. What should be the essential services that a government should aim at providing through public WiFi?
Q 5. What is the capex and opex required to create and operate public WiFi?
Q 6. What could be a model that makes public WiFi viable, sustainable and scalable in terms of usage, technology and financials?
Q 7. Can public WiFi network be made financially self-sustainable if viewed from the welfare service perspective alone?
Q 8. Should there be multiple operators or an exclusive operator in a well-defined zone of the city?
Q 9. What could be the operating architecture that brings all the stake holders together?
Q 10. What are the advantages and disadvantages of a private enterprise model vis a vis a PSU model?"

आमच्या पक्षाने सांगितले होते की, वीज-पाणी मोफत देणे अशक्यच आहे. तेज धावणारे मीटर बदलण्यासाठी दिल्लीच्या सरकारने काय केले? - मिनाक्षी लेखी, भाजप

------

Rofl Biggrin Proud Happy Rofl याला म्हणतात वराती मागुन ..
२६ मे नंतर यांचेच राज्य होते तेव्हा यांनी त्यावर काय केले हे विचारायचे नाही Wink

बहुतेक तुम्ही मिर्चिताईंनी दिलेले १० प्रश्न वाचलेले दिसत नाहि >> मान्य.. मी ते वाचलेलं नव्हतं.. हे प्रश्न जर विचारले असतील तर तुमचा प्रश्न बरोबर आहे.. Happy

पण एकंदरच आप जेव्हा लोकांकडं जातं तेव्हा आपला वाइट ठरवलं जातं आणि बाकिचे तेच करत असतील तर त्यावर कोणी बोलत नाही म्हणून तसा प्रतिसाद.

<<हे काम करण्यासाठीच त्यांना आमदार म्हणुन निवडुन दिले आहे. आधीच्या सरकार ला हे करायची गरज का पडली नसावी? सध्याची नोकरशाही आहेच ना काम करुन घ्यायला.
वेतन तर आमदारकीचे मिळतच आहे ( जे भरपुर आहे )त्यामुळे अजुन वेतन देण्याची काहीही गरज च नाही, त्यामुळे त्याचे कौतुक करूच नका. पण ह्या सेक्रेटरी बनण्याच्या नावाखाली सरकारी गाड्या, ऑफिस मग त्या ऑफिसचा स्टाफ वगैरे मिळणारच आहे.>>

टोचाभौ, पार्लमेंटरी सेक्रेटरी हे प्रकरण आपने जन्माला घातलंय असं वाटतं का तुम्हाला?
१. ममतादिदींच्या राज्यात १३ पा. से. आहेत.
"Chattopadhyay said that the parliamentary secretaries would enjoy the status, privileges and perks similar to that of a minister of state or deputy minister as the Chief Minister prefers."

२. गुजरातच्या आनंदीबेनकडे पण ५ पा.से.आहेत. They will enjoy the status of a Deputy Minister

३. मोदींकडे ६ पा.से.होते. त्यांना पा.से. बनवण्यातील हेतू वेगळा असावा असं दिसतंय.
"This will help the party in the elections as those selected are from the constituencies which are considered `weak` for the party," a senior BJP functionary said.
The parliamentary secretaries will have the status of deputy minister and be entitled to an official car, bungalow, office in the state secretariat and other perks !

आपच्या पा.सें. चा मोठ्ठा फरक हा आहे की आधीच जाहीर केलं गेलं आहे की त्यांना अतिरिक्त भत्ते/वेतन मिळणार नाही !

<<आता महाराष्ट्र सरकारनी ८० आमदारांना पार्लमेंटरी सेक्रेटरी नेमले तर तुमचे काय म्हणणे असेल.>>

त्यांनाही अतिरिक्त भत्ते मिळत नसतील आणि ज्या कामासाठी ते पद मिळालं आहे ती कामं मार्गी लागत असतील तर माझं काहीच म्हणणं नसेल.
मात्र वरील उदाहरणातील अतिरिक्त भत्ते घेणार्‍या पा.सें. बद्दल तुमचं म्हणणं मला ऐकायचं आहे.:)

वाय-फाय विषयावर राजच्या पोस्टींना उत्तर देणार नाही असं ठरवलं होतं. पण रहावत नाही.

<< कुठल्या अँगलने ते तुम्हाला लोकांच्या अपेक्षा/सुचना वाटत आहेत? >>

लोक म्हणजे त्या क्षेत्रातील शून्य ज्ञान असणारे, केवळ उपभोक्ते हा विचार सोडून जरा विचार केलात तर बर्‍याच प्रश्नांची उत्तरे तुमची तुम्हालाच मिळतील.
पाण्याच्या प्रश्नाबाबत सुद्धा दिल्ली डायलॉग कमिशन (आपचा थिंकटँक) ने सूचना मागवल्या होत्या. त्याला एक प्रतिसाद.
आता IIT च्या विद्यार्थ्यांना तरी काय कळतं त्यातलं, आप ला लोकांना पाणी पुरवायचंच नाहीये म्हणून ही नौटंकी वगैरे तुम्ही म्हणू शकताच. तुम्हाला कोण अडवणार? Wink

मिर्चीताई - भाजप, काँग्रेस, ममता तर चोर आहेतच. आता आप त्यांची उदाहरणे देवुन आप कसे बरोबर आहे हे सांगायला लागले तर कठीण आहे.

आप ह्या चोरांपेक्षा वेगळे आहे असे मत होते, पण ...

त्यांनाही अतिरिक्त भत्ते मिळत नसतील आणि ज्या कामासाठी ते पद मिळालं आहे ती कामं मार्गी लागत असतील तर माझं काहीच म्हणणं नसेल.>>>> गाड्या, ऑफिसेस, स्टाफ चे काय? पगार तर मिळतोच आहे मग भत्याची अपेक्षाच कशाला. आणि फक्त आमदार म्हणुन राहुन काम करता येत नाही का? पा.से. कशाला व्हायला पाहीजे.

पुन्हा - भाजप काँग्रेस चे दाखले देवू नका. आप वेगळी असेल तर ते वेगळेपण ठसठसीत पणे समोर येवू द्या. आमचा कोळसा कमी काळा आहे ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही.

मिर्चीताई - तुमच्या किंवा आपच्या अजुन हे का लक्षात येत नाहीये की लोकांनी आप ला मते दिली ती "थोड्याश्या" बदलांसाठी नाही. लोकांना संपूर्ण बदल हवा आहे. आणि तो दिसायला पण पाहीजे. खरेतर People are demanding Blood. लोकांना हे जुने राजकारणी तुरुंगात बघायचे आहेत. काहीतरी ड्रास्टीक बदलाची अपेक्षा आहे. तसा तो दिसला नाही तर लोक खट्टू होतील आणि पुढच्या वेळेला गप्प बसतील.

टोचा, तुमच्या पोष्टीमधिल शेवटच्या पॅरामध्ये 'आप' काढुन 'भाजपा' टाकलं तरी ते एकदम फिट्ट बसतंय., हे माझं निरीक्षण! बघा ना, वड्रा,शीला, अजितदादा, भुजबळ,तटकरे.......... अजुनही बाहेर आहेत. >> लोक खट्टू होतील आणि पुढच्या वेळेला गप्प बसतील.>> अगदी खरंय. अनुमोदन

तुमच्या पोष्टीमधिल शेवटच्या पॅरामध्ये 'आप' काढुन 'भाजपा' टाकलं तरी ते एकदम फिट्ट बसतंय>>>

अगदी मान्य आहे. भाजप पेक्षा मोदी म्हणायला पाहीजे. भाजप कडुन लोकांच्या अपेक्षा कधीच नव्हत्या. मोदींकडुन होत्या. त्या काही पूर्ण होताना दिसत नाहीत, त्यामुळे मोदींचे मतदार निराश आहेतच.

<<आप ह्या चोरांपेक्षा वेगळे आहे असे मत होते, पण ... गाड्या, ऑफिसेस, स्टाफ चे काय? पगार तर मिळतोच आहे मग भत्याची अपेक्षाच कशाला. आणि फक्त आमदार म्हणुन राहुन काम करता येत नाही का? पा.से. कशाला व्हायला पाहीजे.>>

गाड्या बक्षिस मिळणार नाहीत. वेगळी ऑफिसेस बांधून मिळणार नाहीत. स्टाफ नवीन भरती होणार आहे का? होणारच असेल तर नोकर्‍या वाढतील. होणार नसेल तर आधीचेच कर्मचारी रिशफल होऊन पा.सें.ना मदत करतील.
ह्यात आप चोर असण्याचा प्रश्न येतोच कुठे?

<<पुन्हा - भाजप काँग्रेस चे दाखले देवू नका. आप वेगळी असेल तर ते वेगळेपण ठसठसीत पणे समोर येवू द्या. आमचा कोळसा कमी काळा आहे ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही.>>

भाजपा-काँग्रेसचे दाखले येत रहाणार. त्याला नाईलाज आहे. मी इंग्लंड-अमेरिकेतील पक्षांशी तुलना करून कशी दाखवू ?
वरील पक्षांनी भ्रष्टाचार केला आणि आपनेही भ्रष्टाचार केला, त्यावेळी आपचा भ्रष्टाचार कमी आहे म्हणून आप कमी चोर आहे, असं जर मी म्हटलं तर लगेच दाखवून द्या. तशी वेळ येणार नाही, कारण सगळ्यात आधी मीच विरोध करीन. मी आपच्या मुद्द्यांना समर्थन करत आहे, आप ह्या नावाला नाही.

<<मिर्चीताई - तुमच्या किंवा आपच्या अजुन हे का लक्षात येत नाहीये की लोकांनी आप ला मते दिली ती "थोड्याश्या" बदलांसाठी नाही. लोकांना संपूर्ण बदल हवा आहे. आणि तो दिसायला पण पाहीजे. खरेतर People are demanding Blood. लोकांना हे जुने राजकारणी तुरुंगात बघायचे आहेत. काहीतरी ड्रास्टीक बदलाची अपेक्षा आहे. तसा तो दिसला नाही तर लोक खट्टू होतील आणि पुढच्या वेळेला गप्प बसतील.>>

संपूर्ण बदलाचे साचे तयार होताना दिसत आहेत. बदलाचे दृश्य परिणाम दिसायला वेळ लागणार. तेवढा धीर आहे ना?

बदलाचे दृश्य परिणाम दिसायला वेळ लागणार. तेवढा धीर आहे ना>>>>>

कीती वेळ पाहीजे? काहीतरी सांगा ना.

दिल्ली सरकार मधे ४०-५० हजार तरी नोकर असतील. त्यातले हजारो भ्रष्ट असणार ( माझ्या कडे विदा नाही ). रोज १०० तरी निलंबीत करणे शक्य नाही का?
आधीच्या ३ सरकार मधल्या मंत्र्यांवर रोज एक ह्या गतीने खटले तरी दाखल करता येणार नाहीत का?

भ्रष्टाचार केल्याबद्दल कारवाई होऊ शकते हा व्हिजीबल मेसेज जायला नको का मतदारांमधे.

केजरीवालच म्हणायचे की भ्रष्टाचार हा एकमेव प्रॉब्लेम आहे. तो थांबवला की बाकी प्रॉब्लेम आपोआपच सुटतील. हे मला २००% मान्य आहे. त्या बाबतीत पावले का उचलताना दिसत नाहीत. फक्त भ्रष्टाचाराला वेळीच शिक्षा दिली तर रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्यव्यवस्था आपोआप सुधारेल. वेगळे काही करायची गरज नाही.
जान-१५ पर्यंत केलेल्या भ्रष्टाचाराला केजरीवालांनी माफ केले आहे का?

आंधळेच ६० वर्षाचा हिशोब मागतात. कारण त्यांना जे दिसते त्यावर विश्वास ठेवता येत नाही Rofl
खुद्द प्रधानसेवकाला विदेशात जाउन मान्य करावे लागले की ६० वर्षात भारताने किती प्रगती केली आहे.
तरी भक्तांना मान्यच होत नाही Wink

हो हो युरिया शवपेट्या पेट्रोलपंप हे तर राष्ट्रभक्ती राष्ट्रहितांचे स्मारकच होते नाही का ? Rofl

१५ लाख कोटी घोटाळ्यात शेवटी मौनीबाबाला कोर्टाने समंन्स पाठवलच !!

म्हणे ६० वर्षात ला विकास !!

:G:

:G:

:G:

:G:

Pages