गोल स्कार्फ

Submitted by आरती on 23 December, 2014 - 10:02

दोन सुया वपरुन विणलेला गोल स्कार्फ. [Cowl / Infinity Scarf / Neck Warmer]

जाड लोकर आणि १० नंबरच्या सुया वापरल्याने अगदी झटपट आणि एकदम उबदार पण झाला.

एक उलट, एक सुलट असे टाके घालत ७० सुया विणल्या आहेत [पहिली आणि शेवटची सोडुन ७०]. मग दोन्ही बाजु शिउन टाकल्या. झाला स्कार्फ तयार.

scarf neck warmer.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान आरती Happy
एक प्रश्न - दोन्ही बाजू शिवताना एक पीळ घालून शिवला का ? फोटोत स्कार्फ ला ट्विस्ट असल्याचा इफेक्ट वाटतोय म्हणून विचारलं..

आरती सेम असाच स्कार्फ मी विणला आहे:--
जाड पण मऊ लोकर आणि जाड सुयांवर एकुण ३२ टाके घालुन विणला आहे.वीण एक उलट एक सुलट.लांब पट्टी विणुन सुयांवरच [अहिली व शेवटची ओळ असे -गोल जोडले आहे. .scarf-2_0.JPGscarf-11.JPG

सोनचाफा, पिळ नाही दिला. ओढणीला जसा गळ्याशी पिळ दिसतो ना तसाच थोडा पिळ पडला आहे.

सुलेखा, मस्त दिसतो आहे स्कार्फ. रंग पण फ्रेश आहे एकदम.

दुसर्‍या सुईला "उलट ला सुलट" आणि "सुलट ला उलट" घेतले आहे का ?

Pages