जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना, आता ते दोघं नवपरीणित जोडपं देसाईवाडीत रहायला येणार तर आणि २-२ वॉशिंग मशिन्स मिळाली म्हणून जमदग्नी मनोज चित्रावर डाफरणार..................

काल आदेनी सगळ्यांना कागद वाटले सरप्राईझ काय असेल ते लिहायला. एक शब्द / वाक्य लिहायला आख्खा कागद Uhoh मला वाटले आता गोखल्यांच्या घरातून श्री बाळ येईल त्याला पर्यावरणाबद्दल सांगायला
Proud

या मालिकेतलं एकत्र कुटुंब सुंदर दाखवलंय - असं घरचे ज्ये.ना. फार कौतुकानं म्हणत असतात.
कुटुंबात आई-वडिलांना धरून असावं, मान्य, पण इतकं? असं अर्ध्या वचनात? आज्ञाधारक?
>>>>>>>>>>>>>>>हम है ना (सोनि टीवी) अशी एक हिंदी मालिका आहे त्यात तो बंटी भैया आपल्या आईला (श्रीमान गंगाधर टिपरे मधली सून) वचन देतो कि जोपर्यंत तू माझ्या पत्नीचा स्वीकार करत नाही तोपर्यंत मी तिला हात हि लावणार नाही (मुल होवू देणार नाही). किती महान वीचार आहेत त्या मुलाचे आणि त्याच्या आईचे. अर्थात किती आज्ञाधारकपणा असतो या मालिकेमधल्या हिरो आणि हिर्विनिमध्ये Happy Happy Happy Happy Happy Happy

मातोश्रींमुळे आता हे सगळे सिरीअल्स बघावे लागतायत..
काय त्या सरप्राईज्सच कौतुक नि त्या बाबाजींचा संशय!

होसुयमिघ मधे तर सगळे वेडेच भरलेत!

बाबाजीची शंका खरी ठरतेय की क्कॉय?? विचित्रा ला आदेच्या मनकवड्या (अस्सा नवरा हवा गं बाई!!) स्वभावाचं लई कौतुक वाटायला लागलेय! मधनंच मिटक्या मारल्या सारखा चेहरा करत त्याला टापत राहते... मेदीच्या मेंदूवर मेद चढलाय का?
आदीमानवाने आपले दात, केसाळ पंजे, नखं सगळंच दाखवायला सुरुवात केलीये... अरे त्याला मुंबईतलं बर्‍यापैकी स्वस्त्यापैकी सलून सुचवा रे कोणी... काय ते वॅक्सींग, कटींग, शेवींग, थ्रेडींग अजून काही उरलं असेल तर ते ही करून मेकओव्हर करून घे म्हणावं जरा माणसात येऊ दे, दिसायला नी वागायलाही!!

तो आदित्य घरातल्या घरात कसल्या चिठ्या लिहितो किती तो येडछाप पणा आणि घरातले भोचक कोणी कोणी चिठ्या कसे वाचत नाहीत ? टेरेस वरती पण एवढी आरास पण घरातल्यांना न सांगता ?

>आदीमानवाने आपले दात, केसाळ पंजे, नखं सगळंच दाखवायला सुरुवात केलीये... अरे त्याला मुंबईतलं बर्‍यापैकी स्वस्त्यापैकी सलून सुचवा रे कोणी... काय ते वॅक्सींग, कटींग, शेवींग, थ्रेडींग अजून काही उरलं असेल तर ते ही करून मेकओव्हर करून घे म्हणावं जरा माणसात येऊ दे, दिसायला नी वागायलाही!!><<

"आदीमानव" हाच शब्द मी शोधत होते. कोण आहे तो अ‍ॅक्टर? भालू दी बेअर आहे एकदम.

चित्राला आधी त्याचा स्वभाव दिसला नाही काय इतके वर्षे ओळखत होती तर...

दुसऱ्या एका शिरेलीची copy करतायेत बहुतेक. मी बघत नाही, इथे वाचून वाटतं. आता ती चित्रा बहुतेक आदित्यला मिळवायचे plans करणार. त्या दुसऱ्याशी लग्न करून पश्चाताप होईल आणि ह्या दोघांच्या मध्ये येईल आदित्य आणि मेघनाच्या.

छळून घेती रेशीमगाठी >> Rofl

मेदे नि आदे च्या अ‍ॅनिव्हर्सरीला त्यांची काय बकवास अ‍ॅक्टिंग करत होते अर्चु नि तिचा नवरा!! तरी बरी अख्ख्या देसाईवाडीला जेवणाचं निमंत्रण दिलं नाहीय!

छळून घेती रेशीमगाठी >>>>:हाहा:

नवीन नाव हवे होते. उसवलेल्या रेशीमगाठी, रन्गबिरेन्गी रेशीमगाठी. स्वर्गात जुळल्या रेशीमगाठी.

चित्राला आधी त्याचा स्वभाव दिसला नाही काय इतके वर्षे ओळखत होती तर... >> प्यार अंधा होता है!!
छळून घेती रेशीमगाठी >>>> Rofl
सस्मित Proud

Pages