जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिसके लिये सबको छोडा
उसीने मेरा धागा तोडा

वटपौर्णिमाऽऽऽ

वटपौर्णिमाऽऽऽ

किसी औरके धागोंसे थकेली होगयी

काल की परवा की येणार्‍या दिवसात चित्रा नावाचे सुकट पात्र मेघनाला म्हणत होत की आदित्य सारखा नवरा मिळण भाग्याच असत. मेदे म्हणाली हो ना, फार्र प्रेम आहे त्याचे माझ्यावर. मग चित्रा बै झटकन म्हणल्या, पण आदित्य एकच आहे ना. अय्यो, एकच? शेवटी पोटातले व्हटावर आले मन्जी.

जिन्दगी एक सफर है सुहाना
यहा चित्रा बनेगी सौतन, मैने माना.

च्यायला, ते चित्रा प्रकरण लैच्च डॉक्यात जायला लागलंय. आता काय 'कळत नकळत' किंवा 'मासूम' सिनेमा बघायचा का? सविता प्रभुणे/शबाना आझमीच्या रोलमधे मेदे??? नहीं..............

बेफी सिर्य्ली बघू नका फार. वाईट पर्णाम व्हायलेत >>
बेफी तुम्ही असेच वागत राहिलात तर मला रू. २००० मिळवायचा चान्स आहे बरं का >>
आणि सोबत शाल आणि श्रीफळ पण >> दक्षे, रिया, बेफी... Rofl

डर्टी थीम होत चाललीय! दाखवायला काही राहिले नाही आता संपवायला हवी. नाहीतर गाठींची गुंतवळ बघावी लागणार!!

डर्टी थीम होत चाललीय! दाखवायला काही राहिले नाही >> असं कसं? झी वर (मराठी आणि हिंदी) थीम डर्टी झाली की मगच खरी सुरूवात होते. Proud

मला वाटतंय त्या विचित्राचा मनोज म्हणजे जुना आदित्य असावा Proud
बरीच लक्षणे सारखीच आहेत. फोन रिचेबल नसणे, नोकरी नसणे ई.

फायनली विचित्रा ने तिचं गुपित सांगितलं, आणि आज.........................

मनोज वेंगुर्लेकरची एंट्री........................... तर बघायला विसरू नका जुयेरेगा आज रात्री ८.३० वाजता झी मराठीवर Happy

अखेर चित्राच्या प्रेमाबाबत घरच्याना कळले. नाना सन्तापले, माई अगतीक झाल्या. नव्या आलेल्या सुनेने चहात साखरे ऐवजी मीठ घातले तर काय होईल असे हावभाव त्यानी सादर केले.

चित्राचा चेहेरा हे सान्गताना नेहेमीप्रमाणे रडका झाला होता. आदित्य, आमटीमधली चिन्च चूकुन खाल्ली जावी असा चेहेरा करुन उभा होता आणी मेघना सुतकात गेल्यासारखी हळु बोलत होती. मला तिला पाहुन रडु यायला लागले, पण घरचे सर्वच जण तो प्रसन्ग अतीशय गम्भीरपणाने बघत असल्याने मी हुन्दके आवरले. नाहीतर ते पण रडु लागले असते.

मला तिला पाहुन रडु यायला लागले, पण घरचे सर्वच जण तो प्रसन्ग अतीशय गम्भीरपणाने बघत असल्याने मी हुन्दके आवरले. नाहीतर ते पण रडु लागले असते. Lol

वाईट पर्णाम व्हायलेत>>>>>>>>>>> दक्स.....हे मस्त कोल्हापुरी ना?
रश्मी........... Biggrin

पियु, रिया,मानुषी.:फिदी: खरे तर तो प्रसन्ग पाहुन मला हसू येत होते, कारण आधी त्या फाटक्या चड्डी आदित्यच्या प्रेमात पडुन या आदे-मेदेने या सर्वान्पासुन लपवले होते, मग एकदा झटका बसल्यावर परत तेच काय? बर ती चित्रा पण खामुपाधु ( धन्यवाद सुमेधा या शॉर्टकट बद्दल) वाटत होतीच, मग तिचा भाऊ सतिश काय ते बघुन घेईल ना. पण हे दोघे समाजसेवेचे व्रत घेतल्यासारखे वागत आहेत. जणू काही विवाहमन्डळ चालवतायत.

सिरीयाल पुढे सरकेना.

मानुषी तै Happy

खामुपाधु ला कोल्हापूरीत खाल मान्या गाव तान्या असं म्हणतात. तान्या म्हण जे पिंजणारा
खाली मान असली तरी गाव पिन्जून काढेल अशी/असा.

हो गं रश्मी.............तुझी तळतळ (!!!) समजली. म्हणून खरंच हसू आलं!
सीरियल पहात नाही तरी.

सध्या हॅथवेचा लफडा सुरु आहे.
चॅनेल्स दिसत नाहियेत.
पोराच्या आवडीचे दोन कार्टुन चॅनेल्स आणि गाण्यांचे काही चॅनेल्स सोडुन.
आणि मी लै सुखी आहे Proud

रश्मीने लिहिलेले वर्णन वाचून तो भाग पाहिला.. आणि खूप हसलो.. !

नाना सन्तापले, माई अगतीक झाल्या. नव्या आलेल्या सुनेने चहात साखरे ऐवजी मीठ घातले तर काय होईल असे हावभाव त्यानी सादर केले.
आदित्य, आमटीमधली चिन्च चूकुन खाल्ली जावी असा चेहेरा करुन उभा होता >>>>> Lol हे परफेक्ट आहे !!

Pages