Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<< ब्रिस्बेनच्या बाउन्सशी
<< ब्रिस्बेनच्या बाउन्सशी पहिल्या डावात आपले फलंदाज कसे जुळवून घेतात, ह्यावर बरेच काही अवलंबून >> ह्याला आशेची एक बारीकशी किनारही आहे - १] बाऊन्समुळे आपले मध्यमगती गोलंदाज अॅडेलेडइतके ब्रिस्बेनला अगदींच निष्प्रभ ठरणार नाहीत व २] दुसर्या कसोटीत अॅडेलेडप्रमाणे 'राऊंड द विकेट' मारा करून लायानसाठी खास 'रफ' तयार करण्याचं कामही आपले मध्यमगती गोलंदाज करणार नाहीत [ hopefully !].
दुसर्या कसोटीत
दुसर्या कसोटीत अॅडेलेडप्रमाणे 'राऊंड द विकेट' मारा करून लायानसाठी खास 'रफ' तयार करण्याचं कामही आपले मध्यमगती गोलंदाज करणार नाहीत [ hopefully !]. >> .. भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती होती ह्या डावपेचामूळे लॉयन थेट मुरली सारखे वळवत होता.
सुप्रभात. भारत ६०-१. भारताने
सुप्रभात.
भारत ६०-१. भारताने टॉस जिंकून फलंदाजी घेतली म्हणजे टॉस धोनीने केला हें सांगणे नकोच !!
स्विन्गींग व बाऊन्सी विकेटवर ५०+ची सलामीची कामगिरी चांगलीच. धवन आज खूप सावधगिरीने खेळला पण मोठी खेळी नाही करूं शकला.कव्हर ड्राइव्ह करताना मुरली 'अवे फ्रॉम द बॉडी' खेळतो तें सोडलं तर भारताला एक चांगला सलामीचा फलंदाज मिळाला आहे म्हणतां येईल. आश्विन संघात.
ऑल द बेस्ट, ऑल व्ह्यूवर्स !
१००-१, षटकं ३१. मुरली विजय
१००-१, षटकं ३१. मुरली विजय -५०+ . सो फार सो गुड !
पुजाराकडून मोठ्या खेळीची रास्त अपेक्षा. खरंच फार परिपक्व कसोटी फलंदाज होण्याची पूर्ण क्षमता असलेला खेळाडू आहे पुजारा !
एक विजयचा सुटलेला झेल वगळतां, ऑसीजचं अप्रतिम क्षेत्ररक्षण.
<< लॉयन थेट मुरली सारखे वळवत होता.>> काल टीव्हीवरच्या चर्चेतला एक मुद्दा [ बहुतेक द्रविडचा ] पटला- लायन चलाख गोलंदाज असला तरीही त्याच्या गोलंदाजीत मुरलीची सोडाच पण हरभजनच्या गोलंदाजीइतकीही विविधता नाही. विकेट साथ देत नसेल तर लायन भेदक ठरणार नाही.
ढापला राव पुजाराला ...
ढापला राव पुजाराला ...
पुजारा .... कितीही गुणी
पुजारा .... कितीही गुणी खेळाडू असला तरीही त्याला नशीबाची साथ लागतेच.. निदान बदकिस्मतीचा शाप तरी नसावाच !
मुरली विजयचं शतक ! अभिनंदन
मुरली विजयचं शतक ! अभिनंदन !!!
अभिनंदन!
अभिनंदन!
मुरली विजय खूप इम्प्रेस करत
मुरली विजय खूप इम्प्रेस करत आहे हल्ली...
रहाणेचं अर्धशतक ! १२
रहाणेचं अर्धशतक ! १२ सामन्यांत २ शतकं, ६ अर्धशतकं !! कीप-अप !
मुरली विजय खूप इम्प्रेस करत
मुरली विजय खूप इम्प्रेस करत आहे हल्ली... >> मुरली विजय चे नशिब !
ऑस्सम बॅटिग !! विजयने चूक करायला नको होती. सिक्सचा मोह टाळायला हवा होता. मला तर तो २०० साठी सेट दिसत होता.
<< विजयने चूक करायला नको
<< विजयने चूक करायला नको होती.>> ' विकेट फेकली' म्हणण्याइतपत !!
मुरली विजय खूप इम्प्रेस करत
मुरली विजय खूप इम्प्रेस करत आहे हल्ली... >> मुरली विजय चे नशिब ! >>>> समहाऊ मुरली विजयचा खेळ किंवा परफॉर्मन्स सहज वाटत नाही.. अगदी फ्लुक नाही म्हणता येणार पण काही लोकं त्यांच्या नशिबामुळे 'at right place at right time' असतात त्यातला प्रकार झाल्यासारखा वाटतो.. त्याच्या इतक्या कॅलिबरचे बाकी बरेच खेळाडू होते पण योग्य संधी अभावी पुढे जाऊ शकले नाहीत पण ह्याला नशिबाची साथ मिळाली असते.. कदाचित हे मत पूर्ण चुकीचे असू शकेल..
आजच्या शतकाबद्दल अभिनंदन !
एकूणात बॅटींग चांगली केलेली दिसत आहे तर !
रहाणेचे शतक होणार का? सकाळचे
रहाणेचे शतक होणार का? सकाळचे सत्र जरा संभाळून खेळला तर चांगली धावसंख्या होइल असे वटते आहे
रहाणेचे शतक, रोहित, धोनि नि
रहाणेचे शतक, रोहित, धोनि नि आश्विन मिळून दोनएकशे करायला हरकत नाही. म्हणजे आपली कुणाचीच हरकत असणार नाही म्हणा, तेंव्हा त्यांनी ते करावेत अशी आशा!!
अरे काय ... म्हणता म्हणता
अरे काय ... म्हणता म्हणता आऊट झाला
सध्या मा़झ्या मनात हॅझेलवूड व
सध्या मा़झ्या मनात हॅझेलवूड व हॅडली बद्दल फार वाईट वाईट विचार येत आहेत. त्यांची व्हूडू बाहुली करावी नि त्या बाहुलीला टाचण्या टोचाव्या, बदड बदड बदडावे असे वाटत आहे. :रागः
अर्थात तुम्ही म्हणाल काय हे, अगदीच खिलाडू वृत्ति नाही! थोडे जरी क्रिकेटमधले कळत असते तर, किती सुंदर गोलंदाजी करतो आहे, त्याचे कौतुक करायला पाहिजे असे म्हणायला पाहिजे होते.
वाटल्यास तुम्ही म्हणा तसे. पण प्रामाणिकपणे मला तसे वाटते - उगाच लोकांना दा़खवायला खोटेपणा करण्याचे दिवस गेले माझे. आता मला काय वाटते ते स्पष्ट बोलायला काही भीति वाटत नाही मला.
वाट्ल्यास अॅडमिन ना सांगून या धाग्यावर लिहायची बंदी करा मला. तरी मी दुसरीकडे कुठेतरी लिहीनच. इतर अनेक धागे आहेत जिथे काहीहि असंबद्ध, वेडेवाकडे लिहीले तरी हा़कलत नाहीत.
वाटणारच! आप्ल्याला वाटते
वाटणारच! आप्ल्याला वाटते आपल्या खेळाडू ने शतक काढावे आणि हा येवुन बळी घेऊन जातो मग राग येणारच
झक्की, आपण फॅन आहोत.
झक्की, आपण फॅन आहोत. निष्पक्षपाती असण्याचे आपल्याला कारण नाही. चांगला तो सिडल होता, त्याला टाकून ह्याला घेतला म्हटल्यावर राग येणारच.
गेला वॉर्नर एकदाचा ... चक्क
गेला वॉर्नर एकदाचा ... चक्क स्लिपमध्ये अश्विनने कॅच घेतला म्हणजे मिरॅकल्स होऊ शकतील असे मानायला जागा आहे.
समहाऊ मुरली विजयचा खेळ किंवा
समहाऊ मुरली विजयचा खेळ किंवा परफॉर्मन्स सहज वाटत नाही. >>
अरे नाही रे पराग. तो गेल्या वर्षीपासून खूप जबरदस्त खेळतोय. त्याचे लेफ्ट बॉल्स म्हणा वा त्याचे कव्हर ड्राईव्हस हे सहज असतात. २०१२ ला त्याला टेस्ट मधून ड्रॉप केले होते पण २०१३ मध्ये परत घेतले. तेंव्हापासून मला तो " मि डिपेंडेबल" वाटतो टेस्ट मध्ये. त्याच्या खूपश्या शॉट केवळ कॅटेगिरीच्या होत्या.
आजच्या शेन वॅटसनच्या शॉटस काय जबरी आहेत. सुपर्ब टायमिंग ! केवळ !
रहाणेचं शतक हुकलं याचं वाईट
रहाणेचं शतक हुकलं याचं वाईट वाटलंच पण त्याहीपेक्षां पहिल्या डावांत किमान ४५० व्हाव्या ही अपेक्षा पूर्ण न झाल्याचं ! [ संकुचित वृत्तीचा कां होईना पण तोही आनंद मिळालाच असता रहाणे-रोहित या मुंबईच्या जोडीला पुन्हा मुंबईला संघातलं महत्वाचं स्थान मिळवून देताना पहाण्याचा !]
<< त्यांची व्हूडू बाहुली करावी नि त्या बाहुलीला टाचण्या टोचाव्या, बदड बदड बदडावे असे वाटत आहे. >> झक्कीजी, हें आपल्यापेक्षां आपल्या खेळाडूना तीव्रतेने वाटणं महत्वाचं !
<< वाट्ल्यास अॅडमिन ना सांगून या धाग्यावर लिहायची बंदी करा मला.>> अहो, विश्वचषक तोंडावर आलाय; असली अफलातून फटकेबाजी करणार्या, खतरनाक बाऊंन्सर्स टाकणार्या ऑलराऊंडरला वगळायला कुणाला वेड लागलंय कीं काय !
<<समहाऊ मुरली विजयचा खेळ किंवा परफॉर्मन्स सहज वाटत नाही. >><<अरे नाही रे पराग. ... २०१२ ला त्याला टेस्ट मधून ड्रॉप केले होते पण २०१३ मध्ये परत घेतले.>> मागेंही मीं चर्चेत म्हटलं होतं कीं विजय हा तंत्र, टेंपरॅमेंट पहातां कसोटीसाठीच सलामीचा फलंदाज आहे; पण मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या सध्याच्या आकर्षणामुळे तो त्या फॉर्मॅटमधेही आपण फिट्ट बसतो असं दाखवण्याच्या नादात फसला होता व अजूनही त्याची ती खाज गेलेली नाही. कदाचित 'त्याचा खेळ सहज वाटत नाही', याचं हेंच कारण असावं.
<< चक्क स्लिपमध्ये अश्विनने कॅच घेतला म्हणजे मिरॅकल्स होऊ शकतील असे मानायला जागा आहे.>> मिरॅकल्स होतील असं मानायला जागा नाही; तो टिपीकल स्लिपमधला कॅच नसून उंच उडालेला कॅच होता !!
ऑसीज १२२-३. आतां मात्र ऑसीजना
ऑसीज १२२-३. आतां मात्र ऑसीजना कमीतकमी धांवसंख्येवर रोखणं खूप महत्वाचं; पहिल्या डांवातील आघाडी जितकी जास्त तितकी जिंकण्याची संधी अधिक !
आयला रे आपले लोक पण ना..
आयला रे आपले लोक पण ना.. चांगल्या कंडिशनचा फायदा घेऊ शकत नाहीयेत..
चांगली स्पोर्टींग विकेट आहे,
चांगली स्पोर्टींग विकेट आहे, चांगला सामना बघायला मिळत आहे, अर्थात दोन्ही संघ तुल्यबळ वाटत आहेत हे सुद्धा महत्वाचे आहेच.
जो बेस्ट खेळेल तो जिंकेल..
तुर्तास ऑस्ट्रेलिया 55 - भारत 45 .. कारण ऑस्ट्रेलियाचे शेपूट ज्याला मागच्या सामन्यात संधीच मिळाली नाही ते वळवळण्याची दाट शक्यता मला वाटतेय..
<< जो बेस्ट खेळेल तो
<< जो बेस्ट खेळेल तो जिंकेल..>> म्हणूनच आपण बेस्ट, निदान ऑसीजपेक्षां 'बेटर', खेळावं हीच तर प्रार्थना चाललीय इथं !
एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते व ती म्हणजे आतां भारताविरुद्ध खेळताना ऑसीजची पूर्वीची उच्चभ्रू वृत्ती गायब झाली आहे; भारतीय संघाबद्दल हा आदर व दरारा निर्माण करण्याचं श्रेय हल्लींच्या सर्व संघाना व खळाडूना जातं.
खरे तर ऑस्ट्रेलियाचा हा संघ
खरे तर ऑस्ट्रेलियाचा हा संघ सुद्धा त्यांच्या आधीच्या संघाच्या तुलनेत तेवढा जबरदस्त नाहीये.
हेडन, लॅगर, पाँटींग, मार्टीन, क्लार्क, स्टीव वॉ, मार्क वॉ, मायकेल हसी, सायमंड, बेवन, गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, मॅकग्राथ, बिकेल, गिलेस्पी, ब्रेट ली ... वगैरे फार मोठी नावे जवळपास एकाच वेळी खेळत होती..
उलट त्या संघा विरुद्ध भारतीय संघाने (फलंदाजांनी) जो आपला दरारा निर्माण केलेला तो मला बरेचदा कौतुकास्पद वाटायचा.. अन्यथा इतरांचा ते कचराच करायला मैदानात उतरायचे..
सचिन, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग यांनी त्यांच्याविरुद्ध दाखवलेली वर्ल्डक्लास फलंदाजी हे मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या सर्वोत्तम क्रिकेटमध्ये मोजतो..
ह्या निमित्ताने २००३-०४ च्या
ह्या निमित्ताने २००३-०४ च्या सीरीजबद्दल -
'The toughest home series' - Gilchrist
http://www.espncricinfo.com/australia/content/story/137316.html
ॠन्मेष, मला वाटतं नुसती
ॠन्मेष, मला वाटतं नुसती त्यांची अप्रतिम फलंदाजीच नाही तर सचिन, द्रविड, लक्ष्मण यांच्या विनयशील वागण्यानेही ऑसी प्रेक्षक व क्रिकेटप्रेमी भारावून गेले असावेत; पाँटींगबद्दल आदर असूनही त्याच्या उद्धटपणामुळे ऑस्ट्रेलियात तो नावडता झाला होता व सचिन, द्रविड व लक्ष्मण लोकप्रिय झाले होते, असं मला माझ्या तिथल्या नातेवाईकाने सांगितलं होतं. कदाचित, याचा नकळत परिणाम म्हणून ऑसीज आपली प्रतिमा बदलत असावेत ! असो.
भारताने पहिल्या डांवात आघाडी मिळवण्याची संधी घालवली आहे. स्मिथने पुन्हा शानदार शतक झळकावलंय. जॉनसन भारतीय शेपटाला कसं वळवळायचं याचं प्रात्यक्षिकच सादर करतोय !
अत्यंत भंकस बॉलिंग केली
अत्यंत भंकस बॉलिंग केली आपल्या लोकांनी हॅडिन बाद झाल्यावर... जॉन्सनला तर फुल चान्स दिला धुवायचा.. आणि त्यानी तो पूर्णपणे घेतला..
Pages