Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. पगारे तुम्ही जे लॉजिक
मस्त. पगारे तुम्ही जे लॉजिक लावले आहे ते द्रविड साठी वापरले तर तो ही एक जेमतेम बर्यपैकी फलंदाज होता असे म्हणावे लागेल.
जाऊ द्या हो. कुठे ट्रोल
जाऊ द्या हो. कुठे ट्रोल लोकांच्या नादी लागता. जिथे जावे तिथे ट्रोलिंग करावे हा स्थायीभाव आहे त्यांचा.
Fuller Length on stumps > वरुण हे सतत करू शकेल असे वाटत नाही. वरुणचे रडार खराब आहे फार. वेग वाढवायच्या आणि घाबरवायच्या नादात त्याची तीव्रता पण फार लवकर कमी होते. थोडा विचार करून खेळायला हवे त्याने.
कोहलीची एक क्वालिटी जगात
कोहलीची एक क्वालिटी जगात सर्वोत्तम आहे - त्याला हरायची चीड आहे.
सचिनच्या पहिल्या ईंग्लड ऑस्ट्रेलिया दौर्यातील शतके पाहिली की बालकृष्णाच्या लीला वाटतात. एवढे चांगले क्रिकेट लाईव्ह बघायचे नशिबी नव्हते याची हळहळ वाटते.
द्रविड वेगळ्याच जातकुळीचा खेळाडू आहे.
सचिन, कोहली, लक्ष्मण, सेहवाग, दादा वगैरे हे सारे अंगी एक उपजत टॅलेंट घेऊन जन्माला आले होते.
द्रविड हा मेहनत आणि सरावाच्या मुशीतून तंत्र घोटून तयार झालेला अभ्यासू खेळाडू होता.
अवांतर - सचिनचे शतकाच्या जवळ आल्यावर संथ होणे यावर कोणी टिका करत असेल तर त्याच्या सर्वच चाहत्यांनी ते स्विकारायला हवे. जे खरे आहे ते खरे आहे. याला दोष म्हणावे का? किंवा किती महत्व द्यावे? हे मात्र ज्याने त्याने आपापले ठरवा.
कशाला स्वीकारायला हवे? कारण
कशाला स्वीकारायला हवे? कारण नजीकच्या मेमरीत त्याने तसे केले म्हणून? २४ वर्षे जो खेळाडू खेळत होता, आणि डोमेस्टिक धरले २५-२७ वर्षे, त्याचा एकच पॅटर्न असू शकत नाही. सचिनचे अनेक डाव असे आहेत की ज्यात तो ९० मधे सुद्धा आक्रमक होता - सिक्स मारून शतक पूर्ण केल्याचीही उदाहरणे आहेत.
शतकाच्या जवळ आल्यावरच्या आक्रमकपणाच्या बाबतीत ज्याचे कौतुक केले जाते त्या खुद्द सेहवाग नेच याचे सुंदर स्पष्टीकरण दिलेले आहे - ९०-१०० हा काळ सर्वच फलंदाजांना टेन्शन देतो. काहीजण लौकर मारून त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, तर काही जास्त सांभाळून खेळून. सचिन ने वेगवेगळ्या काळात दोन्ही केलेले आहे.
आणि उपजत टॅलेण्ट (व नो मेहनत) हे दादा व लक्ष्मण च्या बाबतीत एकवेळ खरे असेल. खेळतानाचे फुटवर्क, अनेक वेळेस केलेला आळशीपणा यातून ते दिसते. पण त्याबाबतीत द्रविड व सचिन हे दोघे सारखेच. द्रविडकडे ही उपजत टॅलेण्ट होतेच - त्याचेही फटके बघायला अत्यंत सुंदर व कलात्मक असत. सचिनचा नैसर्गिक आक्रमकपणा व फ्लेअर त्याच्याकडे नव्हती. पण टॅलेण्ट (कौशल्य या अर्थाने) व मेहनत दोघांनीही प्रचंड घेतली आहे.
पण मग पगारेंच मत काय आहे."
पण मग पगारेंच मत काय आहे." २०१५ च ब्रॅंड अॅम्बॅसीटर सचीन तेंडुलकर ला न देता राहुल गांधी किंवा रॉबर्ट वधेरा यांना द्याव " हे आहे की काय????
फा च्या पोस्टला प्रचंड
फा च्या पोस्टला प्रचंड अनुमोदन.
९१ च्या दौर्यामधे ज्या प्रकारे गांगूली खेळला होता त्यावर झालेली टीका मनावर घेत प्रचंड मेहनत करून त्यानेही आपला खेळ बदलला होता. नुसत्या टॅलेंटच्या जोरावर ९६ला परतला नव्हता.
अनुमोदन फारएण्ड.
अनुमोदन फारएण्ड.
सचिनबद्दल बोलायचे झाल्यास,
सचिनबद्दल बोलायचे झाल्यास, शतकाचे टेंशन सर्वांनाच येते हे कबूल, पण त्यातही कमीजास्त प्रमाण असतेच. सचिन जास्त घ्यायचा हे बॉडीलॅंगवेजवरून समजायचे. अन्यथा हि टिका इतरांवरही कमीअधिक प्रमाणात झाली असतीच.
सुरुवातीच्या काळात तो तसा नव्हता हे ही खरे, पण अर्थातच, कारण हा तांत्रिक दोष नसून मानसिक होता, म्हणून कारकिर्दीच्या सुरुवातीला तो नव्हता, नंतर डेव्हलप होत गेला. शतकांचे त्याचे विक्रम होऊ लागले तसा वाढत गेला.
द्रविडबद्दल बोलायचे झाल्यास सुंदर कलात्मक फटके म्हणजे स्पेशल टॅलेंट बोलता येणार नाही. अर्थात जो भारतासाठी खेळतो त्यात क्रिकेट या खेळाचे टॅलेंट आहे म्हणूनच तो तिथे आहे, कोणीही ठरवले आणि मेहनत करून क्रिकेटर बनला असे होत नाही. पण इथे टॅलेंट म्हणजे एखादे स्पेशल टॅलेंट, गॉड गिफ्ट या अर्थाने. द्रविड या इतरांच्या तुलनेत कमी गिफ्टेड होता. हे कशाला, तो युवराज पण एक कमालीचा गिफ्टेड प्लेअर आहे, हे तो जेव्हा फुल्ल फ्लो मध्ये असते तेव्हा दिसतेच, त्याचे ते फटके मग तोच मारू जाणे. पण त्याच जोडीने दोषही आहेतच म्हणून तो काही महान खेळाडू नाही झाला. द्रविडची कारकिर्द आपल्या खेळात कमीतकमी दोष राहतील, बेसिक्स सारे फॉलो होतील, सर्व प्रकारच्या परिस्थितीशी (खेळपट्टी, हवामान) आपण जुळवून घेऊ, या हिशोबाने त्याने बांधली. स्पेशल टॅलेंट नसल्याने एकदिवसीय मध्ये तो तुलनेत कमी आकर्षक वाटला पण उपयुक्त नेहमीच राहिला. कसोटीमध्ये तर त्याच्यातील वर उल्लेखलेल्या गुणाला तोड नाही.
असो, हे ज्याचे त्याचे मत. तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज!
९१ चा गांगुली बच्चा होता,
९१ चा गांगुली बच्चा होता, सारेच सचिन नसतात जे लहान वयात मोठे पराक्रम करतील.
बाकी मेहनत नाहीच (शून्य) असे कोणी म्हटलेय. वर्गातल्या सर्वात हुशार मुलालाही अभ्यास करावा लागतोच. मेहनतीला पर्याय नसतोच.
खास करून वीकनेसवर मेहनत करावीच लागते, जर समोरच्या गोलंदाजांनी तेच हेरले तर तुमची शक्तीस्थाने व्यर्थ आहेत.
सचिन हा चांगला खेळाडू असला
सचिन हा चांगला खेळाडू असला तरी कधीही बेडर नव्हता संघ विजयाच्या समीप आला कि तो हमखास तंबूत परतलेला दिसायचा. शेवट पर्यंत क्रीजवर थांबून त्याने जिंकून दिलेल्या सामन्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असेल. कसोटीत त्याला सर्वोत्तम समजत असले तरी तो भ्रम आहे. >>>
या शतकातील सर्वश्रेष्ठ विनोदांपैकी एक!
साक्षात डॉन ब्रॅडमनने सचिनमध्ये मला माझं स्वत:चं प्रतिबिंब दिसतं असं सांगितलं होतं. ब्रॅडमनला क्रिकेट काहीच कळत नव्हतं नाही का?
द्रविडचे special talent
द्रविडचे special talent त्याचे अफलातून concentration हे होते. हा एक बॅटिंगचा एक अविभाज्य नि लोकांच्या नजरेपासून पूर्णपणे दुर्लक्षित असलेला पैलू आहे ज्याच्या श्रेयाचा वाटा त्याला कधीच मिळत नाही (जसे timing, eyesight, wrist work, footwork , ability to gauge line and length faster वगैरेंना मिळते). असे पराकोटिचे concentration हे मेहनतीने येत नसते तर ते अंगीभूतच असावे लागते.
गांगूलीबद्दल तो ९२ मधे फक्त वयाने बच्चा होता. ९१-९२ चा रणजी सीजन त्याने गाजवला होता नि एक specially talented player म्हणून त्याला down under पाठवले गेले होते.
पगारे, तुम्हाला माहीत नसेल तर
पगारे,
तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. कसोटी क्रिकेटमध्ये एकूण चार इनिंग्ज असतात. पहिल्या तीन इनिंग्जमध्ये मॅच सेट अप केली जाते तर चौथ्या इनिंग मधे जिंकली जाते.
चौथ्या इनिंगमध्ये मॅच जिंकताना २० रन्स करुन नॉट आऊट असलेल्या बॅट्समनचं कर्तृत्व मोठं की आधीच्या इनिंगमध्ये शंभरावर रन्स करुन मॅच सेट अप करणार्या बॅट्समनचं कर्तृत्व मोठं?
वन डे मध्ये सचिन सलामीला येण्यास सुरवात झाली तेव्हा त्याच्यावर आक्रमक सुरवात करुन देण्याची जबाबदारी होती हे उघड होतं. सचिन आऊट झाल्यावर उरलेले सर्वजण धडाधड कोसळले असं किती वेळा झालं आहे? ज्या दिवशी वन डे मध्ये सचिन पूर्ण ५० ओव्हर्स खेळला, त्या दिवशी त्याने २०० रन्स काढल्या. वयाच्या ३८ व्या वर्षी! पण त्या पहिल्या इनिंगमध्ये काढल्या होत्या, त्यामुळे ती इनिंग महत्वाची नाही खरं की नाही?
अनुभवाने प्रत्येक बॅट्समन आपली खेळण्याची शैली बदलत असतो. सचिन, द्रविड, लारा, पाँटींग, रिचर्ड्स, गावसकर सर्वांनी हे केलं आहे. कारण वयोमानपरत्वे रिफ्लेक्सेसमध्ये फरक पडत जातो. हे सगळं कशाही खातात हे तुम्हाला माहीत आहे काय?
असामी, अनुमोदन! तासनतास
असामी,
अनुमोदन!
तासनतास एकाग्रपणे खेळून आपली विकेट न गमावण्याची जी पराकोटीची उच्च एकाग्रता द्रविडमध्ये होती तितकी एकाग्रता असलेला आजचा एकमेव बॅट्समन म्हणजे शिवनारायण चँडरपॉल! ज्या काळात आणि ज्या कमकुवत संघात तो आपली जवळपास अख्खी करीयर खेळला, त्याचा विचार केला तर तो किती ग्रेट आहे हे समजून येऊ शकतं.
चँडरपॉल बद्दल अनुमोदन.
चँडरपॉल बद्दल अनुमोदन. completely underrated player.
चंदरपॉल गेली ४०-५० वर्षे खेळत
चंदरपॉल गेली ४०-५० वर्षे खेळत असावा. मला तर जुन्या रिची बेनॉ, सोबर्स ई च्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट क्लिप्स बघताना मधेच तेथेही चंदरपॉल दिसेल असे वाटते. त्याच्या लाँजिटीविटीचे रहस्य त्याचा मिड ऑफ फेसिंग स्टान्स असावा. हा ही हीरो बहुतांश अतिशय चेंगट खेळणारा, पण एके काळी धुलाई पण करत असे. त्याच्यावर कोणीतरी रचलेले "Hit them Chanderpaul" हे गाणे- बहुधा कॅलिप्सो असावे- आमच्या विस्कॉन्सिन मधल्या, आणि क्रिकेटशी कसलाही संबंध नसलेल्या, पण विविध प्रदेशातील संगीताची आवड असणार्या- एका नातेवाईकाने ऐकवले होते. वर पुन्हा तुला चंदरपॉल माहीत आहे का, हे ही विचारले होते मला.
लक्ष्मण व दादा बद्दल मी जे
लक्ष्मण व दादा बद्दल मी जे लिहीले आहे त्याची उदाहरणे:
लक्ष्मण ला अनेक वेळेस जागच्या जागेवरून खेळायची सवय होती. त्यामुळे कधीकधी चांगला खेळत असतानाही तो लौकर बाद होत असे. पाक विरूद्धच्या २००४ च्या वन डे सिरीज मधे शोएब ने त्याल जबरी काढला होता
https://www.youtube.com/watch?v=jybf7_IWc-s&t=20m24s
मात्र लगेच पुढच्याच मॅच मधे याच लक्ष्मण ने याच अॅटॅक विरूद्ध याच मैदानावर सणसणीत शतक मारून भारताला सिरीज जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. आणखी एक उल्लेखनीय गोष्ट - वन डे साठी फिट नाही असे समजला जाणार्या लक्ष्मण ने मार्च च्या उकाड्यात, दुपारच्या इनिंग मधे शतक मारताना तब्बल ६० रन्स पळून काढल्या होत्या, आणि १००+ स्ट्राईक रेट. ते ही भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात - मालिका जिंकायची पहिल्यांदाच संधी असताना.
आणि हे दादा साहेब. ऑस्ट्रेलियाविरूद्ध चेस करताना प्रचंड मेहनत घेऊन शतक मारल्यावर केवळ रन काढताना बॅट न घासल्याने आउट झाले. रिप्ले मधे बघितलेत तर कळेल की बॅट क्रीज मधे होती, पण जमिनीवर टेकलेली नव्हती. असले अचाट प्रकार दादाच करू शकतो.
https://www.youtube.com/watch?v=0_Bvf6D1F7g&t=6m35s
या अशा गोष्टी सचिनने केलेल्या सहसा दिसणार नाहीत, आणि द्रविडच्या तर कधीच नाहीत.
चंदरपॉल गेली ४०-५० वर्षे खेळत
चंदरपॉल गेली ४०-५० वर्षे खेळत असावा. मला तर जुन्या रिची बेनॉ, सोबर्स ई च्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट क्लिप्स बघताना मधेच तेथेही चंदरपॉल दिसेल असे वाटते.
>>> फारेण्डा...
चंदरपॉल गेली ४०-५० वर्षे खेळत
चंदरपॉल गेली ४०-५० वर्षे खेळत असावा. मला तर जुन्या रिची बेनॉ, सोबर्स ई च्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट क्लिप्स बघताना मधेच तेथेही चंदरपॉल दिसेल असे वाटते. >>
<<चंदरपॉल गेली ४०-५० वर्षे
<<चंदरपॉल गेली ४०-५० वर्षे खेळत असावा. मला तर जुन्या रिची बेनॉ, सोबर्स ई च्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट क्लिप्स बघताना मधेच तेथेही चंदरपॉल दिसेल असे वाटते.>>


चँडरपॉलच्या करीयरच्या
चँडरपॉलच्या करीयरच्या सुरवातीपासून आतापर्यंत बदलत गेलेल्या स्टान्सबद्दल एव्हढंच म्हणावसं वाटतं -
It started as a little shrimp, over the years evolved into a crab and now has grown into a full scale lobster!
फा.. मधल्या सर्व पोष्टींना
फा..
मधल्या सर्व पोष्टींना अनुमोदन !
चंदरपॉल गेली ४०-५० वर्षे खेळत
चंदरपॉल गेली ४०-५० वर्षे खेळत असावा. मला तर जुन्या रिची बेनॉ, सोबर्स ई च्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट क्लिप्स बघताना मधेच तेथेही चंदरपॉल दिसेल असे वाटते >>>>
अमोल

एकाग्रता concentration,
एकाग्रता concentration, टेंपरामेंट, क्विक लर्नर वगैरे हे स्पेशल टॅलेंट नाही झाले. या क्वालिटीज झाल्या, ज्या क्रिकेटच नाही तर कोणत्याही खेळात वा ईतरही क्षेत्रात लागू..
चंद्रपाल..
मी सुद्धा जेव्हा त्याला बघतो तेव्हा मला हाच प्रश्न पडतो, अरे हा आहे टीम अजून.. अजून खेळतोय.. निवृत्ती घेऊन पोरेबाळे नातवंडाबरोबर खेळायच्या वयात वेस्टईंडीजवाले त्याला राबवत आहेत वाटून दयाच येते हल्ली त्याची.. त्याची भुमिकाही तशीच वाटते, संघाची लाज वाचवणे..
वयाच्या ४२ व्या वर्षी चँडरपॉल
वयाच्या ४२ व्या वर्षी चँडरपॉल जितका फिट आहे तितके आमचे पुजारा आणि शर्मा प्रभृती पंचवीशीतही फिट नाहीत असं खेदाने म्हणावंसं वाटतं. चँडरपॉलकडे पाहून असं वाटतं, की विल्फ्रेड र्होड्सचा ५३ व्या वर्षी टेस्ट मॅच खेळण्याचा विक्रमही तो सहज मोडू शकेल! कोणी सांगवं.. तोपर्यंत त्याचा मुलगा रिटायर झालेला असेल!
१] << चंदरपॉल गेली ४०-५०
१] << चंदरपॉल गेली ४०-५० वर्षे खेळत असावा. मला तर जुन्या रिची बेनॉ, सोबर्स ई च्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट क्लिप्स बघताना मधेच तेथेही चंदरपॉल दिसेल असे वाटते >>>> मला तर येत्या विश्वचषकासाठीच्या वे. इंडीज संघात तो दिसला तरी अजिबात नवल वाटणार नाही !;

२] 'जीवनगौरव' पुरस्कारासाठी इतका लायक उमेदवार कुठल्याही देशात असेल असं वाटत नाहीं;
३] "हें बघ, इतराना हसूं दे, 'कॅलिप्सो' करूं दे, पण तूं मात्र भारतीय वंशाची ' टवाळा आवडे विनोद' ही परंपराच एक 'मिशन' म्हणून चालवायची आहे !", असं खडसावून सांगूनच जणूं देवानं त्याला पृथ्वीतलावर पाठवलं असावं; जुन्या 'क्लिप्स' पहाणार्या इथल्या कुणाला चंदरपॉल चुकून हंसताना कुठं दिसला तर मला ती दुर्मिळ क्लिप जरूर पाठवावी ;
४]१५८ कसोटी, ११,००० धांवा, ३० शतकं,६५ अर्धशतकं;
२६८एकदिवसीय सामने, ८,७०० धांवा, ११ शतकं ५९ अर्धशतकं ! कुठं त्याची टिमकी वाजवणं नाही, मिरवणं नाहीं ! वांकून त्रिवार सलाम, चंदरपॉलजी !!!
एकाग्रता concentration,
एकाग्रता concentration, टेंपरामेंट, क्विक लर्नर वगैरे हे स्पेशल टॅलेंट नाही झाले. या क्वालिटीज झाल्या, ज्या क्रिकेटच नाही तर कोणत्याही खेळात वा ईतरही क्षेत्रात लागू.. >> अजिबात नाही. पराकोटीची एकाग्रता भरपूर प्रयत्न करून अंगी बाणवता येत नाही. तुमच्या एकाग्रतेच्या पातळीमध्ये थोडीफार वाढ होऊ शकते, परंतु तुमच्या अंगभूत क्षमतेच्या पलीकडे ती जाऊ शकत नाही. असामी ह्यांना अनुमोदन.
चँडरपॉलवर धीमेपणाने खेळण्याचा
चँडरपॉलवर धीमेपणाने खेळण्याचा नेहमी आरोप केला जातो. परंतु टेस्ट मॅचमध्ये इनिंग्ज बिल्ड करणं ही महत्वाची कला त्याने कोळून प्यायलेली असल्याने त्याला कधीही धावांसाठी झगडावं लागलेलं आठवत नाही. सुरवातीची अनेक वर्ष लाराच्या छायेत काढूनही स्वतंत्र बॅट्समन म्हणून डेव्हलप होणं आणि संघाचा आधारस्तंभ बनून जाणं यातच त्याचं मोठेपण दिसतंं. वेस्ट इंडीजच्या कमकुवत बॅटींग लाईनअप मुळे आपली विकेट वाचवून उभं राहणं आणि रन्स काढणं अशी दुहेरी जबाबदारी तो वर्षानुवर्षे पार पाडत आला. भारत किंवा ऑस्ट्रेलियासारख्या संघात तो असता तर त्याचं रेकॉर्ड आज कोणत्या लेव्हलला असतं याची कल्पनाही करता येत नाही.
याच महाभागाने टेस्टमध्ये ६९ बॉलमध्ये सेंच्युरी ठोकलेली आहे हे कितीजणांना माहीत आहे?
https://www.youtube.com/watch?v=7LjSWwHEuAo
त्रिनीदादच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या दोन बॉलमधे जिंकायला १० रन्स हव्या असताना फोर आणि सिक्स मारुन मॅच जिंकली आहे!
https://www.youtube.com/watch?v=YDRCyHEjMyo
५८ कसोटी, ११,०० धांवा, ३०
५८ कसोटी, ११,०० धांवा, ३० शतकं,६५ अर्धशतकं; >>>>
भाऊकाका, ११,००० करा हो!
कारण,
इथे अनेकजण असे आहेत ज्यांना ११०० खरं वाटेल!
पराकोटीची एकाग्रता भरपूर
पराकोटीची एकाग्रता भरपूर प्रयत्न करून अंगी बाणवता येत नाही. तुमच्या एकाग्रतेच्या पातळीमध्ये थोडीफार वाढ होऊ शकते, परंतु तुमच्या अंगभूत क्षमतेच्या पलीकडे ती जाऊ शकत नाही.
>>>>
प्रश्न एकाग्रता अंगी बाणवता येते वा एका पलीकडे जाते की नाहीये याचा नाहीयेच, तर वर मी उल्लेखलेल्याप्रमाणे ते क्रिकेटींग स्पेशल टॅलेंट नसून ती क्वालिटी आहे. तसेच याप्रकारचे एक उदाहरण मी टेंपरामेंटचे दिलेय. ते देखील उपजतच असते.
असाच आणखीन एक यादगार
असाच आणखीन एक यादगार बॅट्समन...
६३ टेस्ट - ४७९४ रन्स - १२ शतकं - २७ अर्धशतकं - अॅव्हरेज ५१.५४
२१३ वन डे - ६७८६ रन्स - ४ शतकं - ५५ अर्धशतकं - अॅव्हरेज ३५.३४
या सगळ्याच्या जोडीला तो एक उत्कृष्ट विकेटकिपर होता. अॅडम गिलक्रिस्टचा उदय होण्यापूर्वी तो सर्वोत्तम विकेट किपर बॅट्समन म्हणून ओळखला जात होता.
ज्या देशाकडून तो खेळला तो कसोटी आणि वनडे मधला लिंबूटिंबू संघ असल्याने त्याच्या गुणांचं चीज झालं नाही असं मला नेहमी वाटतं. आपल्याच देशाच्या हुकूमशहाविरुद्ध उघडपणे बंडाचा झेंडा फडकवण्याची धमक फार कमी जणांमध्ये असते. त्याची करीयर त्यामुळे अकाली संपली!
Pages