क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑस्ट्रेलिया पाचशेपार!

भारताच्या तोंडात!

स्मीथ २०-२० खेळतोय आणि अश्वीन त्येला मदत करतोय.. स्मीथ २०० च्या उंबरट्यावर.. २०० झाले की १०/१० खेळेल आणि आपले बॉलर त्येला ३०० पुरे करयला भाग पाडतील असे दिस्तेय सध्या..

चला सामना अनिर्णित अथवा भारताची हार. या दोन निकालांपैकी तिसरा निकाल लागला तर पाकिस्तान भारतात विलिन होईल.

अनिर्णित ठेवणे कठीण आहे. आपले रथी एका सेशनमध्ये ७-८ विकेट फेकण्यात तरबेझ आहेत. पहिल्या इनिंगमध्ये जेवढे करतील तेवढे चांगले. जमल्यास ५००. कारण त्यापेक्षा कमी झाल्यास शेवटचा दिवस तलवार डोक्यावर असेलच.

बाकी आज जे घडले ते फारसे अनपेक्षित नव्हतेच. अजून एका व्हाईटवॉशसाठी तयार राहा.

<< खांदे पाडायचे नाही हे धोनी आणि कंपनीलाच सांगत होतो भाऊ, >> धोनीसाठी तुमचा हा कॉल बहुतेक ' आऊट ऑफ रेंज' झाला असावा व आतां तर एकंदर परिस्थितीच धोनीच्या 'आऊट ऑफ रेंज' गेली असावी !!! Wink
अजूनही कुणाच्या तरी अंगात 'लक्ष्मण' संचारेल, अशी एकच आशा !!

आजचा दिवस तर गेला उद्याच्या दिवसात ४०० वर काढतील का ? ४०० बनवुन परत त्यांना लवकर गुंडाळायचे म्हणजे ५ व्या दिवशी आपल्याला किमान १५० च्या आतच रन्स काढावे लागतील असे

अजूनही कुणाच्या तरी अंगात 'लक्ष्मण' संचारेल, अशी एकच आशा

>>>

अहो भाऊकाका,

त्यांचं क्रिकेट दादा, सचिन आणि द्रविडमध्येच संपतं हो!

<< त्यांचं क्रिकेट दादा, सचिन आणि द्रविडमध्येच संपतं हो! >> ' रात्रीच्या गर्भात असे उद्यांचा उषःकाल ', हे मनाला समजावत, बजावत असतों, म्हणून तर इतकीं तपं आपलं क्रिकेट बघूं शकलोय !!! Wink

महान लोकांची आठवण काढत बसण्यापेक्षा आता आपण काय करतोय त्यावर विचार करावा.
जे गेलेत ते गेले. जे आहे त्यांची काळाजी घ्यावी Happy

मुरली विजयने आता इंप्रेस करायच्या पुढे जात हळूहळू भरवश्याचा सलामी फलंदाज होऊ लागलाय. खूप कूल वाटतो खेळताना तो, समोरच्यालाही आत्मविश्वास देऊन जावा. फक्त उद्या कोहलीने अतिहुशारी दाखवत खेळू नये.. जर उद्या मस्त खेळले तर रैवारची सुट्टी वसूल होईल.. नंतर मग टाका हव्या त्या पाट्या..

मैदानावरच्या कामगिरीइतकीच मैदानाबाहेरच्या वर्तनाचीही या नव्या खेळाडूंनी काळजी घेतली पाहिजेल तरच कदाचित ते प्रेक्षकांच्या मनातील "सचिन, द्र्वीड, कुंबळे वगैरेंच्या" आसपास तरी जाऊ शकतील!>>>>>>सचिन, द्र्वीड, कुंबळे हे खेळाडू नसते वाद अंगावर ओढवून घेत नसत त्यांना क्रिकेट पेक्षा त्यांची करिअर महत्वाची वाटत असे. ग्रेग सारखा कोच येवून संघात फुट पडत असे तेव्हाही हे नम्रच राहिले नि आता १० वर्षाने आत्मचरित्रात त्याचा उल्लेख येतोय.ह्यांच्याच कालखंडात क्रिकेटला फिक्सिंगणे ग्रासले भलेही ते त्यात नसतील पण जे चाललेय त्यातले त्यांना काहीही ठावूक नसेल असे समजणे हे भोळसटपणाचे ठरेल. भेकडपणाच्या आलवणा खाली शांत राहणे म्हणजे नम्रता हा नवीनच समज आपल्या देशात रूढ झालाय.

पगारे,
फिक्सिंगबाबत जीवाची भितीही असावी, त्यामुळे तिथे असे म्हणता येणार नाही.
पण चॅपेलबाबत, येस्स, तिथे कचच खाल्ली. कमाल म्हणजे आता सचिनच्या आत्मचरीत्रात हे येताच ईतरही पोपटासारखे बोलायला लागले.

त्या धवनला या कसोटीत बसवायला हवे होते, नुसते फॉर्मसाठीच नाही तर गेल्या सामन्यात दुखापतीचा जो ड्रामा केला त्यासाठी.. पण सध्याच्या क्रिकेटमध्ये एवढे राजकारण शिरलेय ते शक्य नाहीये.. आजही गळपटलाच तो.. किंबहुना कधीही बाद होईल असाच खेळतो, मग का उगाच एंटरटेन करत आहात.. सेहवाग सारख्या वर्ल्डक्लास खेळाडूची कारकिर्दच संपवता येते तर अश्यांनाही आतबाहेरचा रस्ता दाखवत राहिले पाहिजे.

सचिन, द्र्वीड, कुंबळे हे खेळाडू नसते वाद अंगावर ओढवून घेत नसत त्यांना क्रिकेट पेक्षा त्यांची करिअर महत्वाची वाटत असे.
>>>>>>

पगारे,
Namaskar.jpgआवरा !!!!

केवळ रडू आले!

स्मिथ तर इतका निर्भयपणे खेळत होता की तो कधी आउट होईल असे वाटतच नव्हते. पण जॉन्सन, हॅरिस नि लायनसुद्धा? हर, हर!

रात्रीच्या गर्भात असे उद्यांचा उषःकाल ', हे मनाला समजावत, बजावत असतों, म्हणून तर इतकीं तपं आपलं क्रिकेट बघूं शकलोय !!!
यातला उद्या म्हणजे शंभर वर्षांनी वगैरे असावा. कधी कधी उषःकालाची वाट पहाण्यापेक्षा १०० वॉट चे १०० दिवे आणून लावून टाकावे असे वाटते.

या पेक्षा अमेरिकन लीग बेसबॉल बरा, बॅट्स्मन वेगळे नि बॉलर वेगळे. कितीहि बॉलर चालतील.

काँग्रेसवाले म्हणतील, यावर लोकसभेत चर्चा होऊन पंतप्रधानांनी राजिनामा द्यावा. मंत्रिमंडळ बरखास्त करून, राहुल का राजीव का कोण तो सध्याच्या पिढीतला गांधी आहे त्याला किंवा परदेशातली एखादी मोलकरीण आणून तिला भारताचे राज्य द्यावे.

<<काँग्रेसवाले म्हणतील, यावर लोकसभेत चर्चा होऊन पंतप्रधानांनी राजिनामा द्यावा. मंत्रिमंडळ बरखास्त करून, राहुल का राजीव का कोण तो सध्याच्या पिढीतला गांधी आहे त्याला किंवा परदेशातली एखादी मोलकरीण आणून तिला भारताचे राज्य द्यावे.>>

झक्की तुम्ही काँग्रेस च नाव काढु नका.. नाहीतर सचिन पगारे लगेच अ‍ॅक्टीव होतील. आणि धागा काढतील..
"भाजपा चे राज्य आणि क्रीकेट ची अधोगती" आणि त्यात म्हणतील धोनी ला कॅप्टन शी देण हाच चुकीचा नीर्णय आहे. राहुल गांधी यांना नॉन प्लेयींग कॅप्टन करता येत असताना पण मोदी नी धोनी ला कॅप्टन केले.

जायंट्स नि जेट्स गेल्यावर फूट्बॉलमधे काय राहिले? त्यातून सियाटल चुकीच्या किनार्‍यावर!
मला वाटते भाऊ, तुम्ही केदार इ. लोकांनी तडक मेलबोर्न गाठून धोनी, शर्मा, शामी, यादव, आश्विन यांना जबरदस्त तंबी द्यावी की असे असे खेळला नाहीत तर पुनः कधी तुमचे सामने पहाणार नाही.

पगारे, विविध क्षेत्रातील विविध व्यक्तींबद्दल तुमचे हेच मत आहे का ते वाचायला आवडेल. राजकारणातील, विशेषतः

<<...भाऊ, तुम्ही .... तंबी द्यावी की असे असे खेळला नाहीत तर पुनः कधी तुमचे सामने पहाणार नाही.>> झक्कीजी, जित्याची खोड.... !!! Wink -

adyatalo3.JPG

कीत्येक वर्षात परदेशात आपली २०० आणि ३०० च्या वर पार्टनर शीप बघीतल्याचे आठवत नाही आहे राव. आणि ह्येंच्याकडुन अपेक्षा करणे पण रास्त वाटत नाही..

<< परदेशात आपली २०० आणि ३०० च्या वर पार्टनर शीप बघीतल्याचे आठवत नाही आहे राव >> सध्यां तरी आपली टोटल धांवसंख्या २००च्यावर गेलीय व ३००च्या वर जण्याची दाट शक्यता आहे, हेंही नसे थोडकें !!! Wink

३१३-३ !!! कोहली व रहाणे दोघेही शतकाच्या उंबरठ्यावर !!
[' रात्रीच्या गर्भात असे उद्याचा .... ' ! Wink ]

कोहली आणि जॉन्सनची ठस्सन चालूय आणि कोहली लॉस्ट हिज टेंपरामेंट..दोन तीन लाईफ मिळाल्या..

रहाणे काय क्लास शॉट खेळतो, बघायलाही मजा येते.. पण त्यालाही टेंपरामेंट थोडे सुधरवायची गरज..
शतक झाले.. कोहलीचेही होईलच.. आज खेळा दोघे दिवसभर. रैवार वसूल.. नाहीता मागचे लाईनलावू आहेत..

Pages